कॉईल इंडक्शन गॅस बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by क्लिओपात्रा on 24 December, 2022 - 05:38

नमस्कार, आम्ही काही दिवसात कॅनडाला मूव्ह होणार आहोत. मला बरेच प्रश्न आहेत पण सामानाची बांधाबांध करायची तर पहिला. प्रश्न मला भांड्यांबद्दल पडतोय.
तर ज्यांनी कोणी incuction gas coil wala, वापरला आहे त्यांननि प्लीज मला सजेस्ट करा कि काय काय बेसिक भांडे न्यावेत, flat bottom चे सगळे भांडे चालतात कि स्पेसिफिक induction basech लागतात? स्टील चे काही भांडे आहेत फ्लॅट वाले ते चालतील का?
नॉनस्टिक चे चालतात का, समजा अलुमिनिम चे भांडे use केले तर हीट genret होतं नाही असे वाचले मी. असे कशी असते का?
दुसऱ्या देशात पहिल्यांदा जाणार आणि कोईल गॅस डिशवॉशर अश्या गोष्टी मी और माझा जवळचे कोणीच वापरट नाही इकडे , या संदर्भात काही धागे असतील तर द्या प्लीज.

Group content visibility: 
Use group defaults

<<incuction gas coil wala>>

इंडक्शन, गॅस आणि कॉइल हे तिन्ही वेगळे स्टोव्ह्ज आहेत.

इंडक्शन स्टोव्ह, इंडक्शन प्रिन्सिपलवर चालतो. थोडक्यात सांगायचे तर यात हीट स्टोव्हमध्ये नाही तर भांड्याच्या बूडात तयार होते. या स्टोव्ह साठी खास (फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा जाडसर बेस असणारी) "इंडक्शन बेस" सर्टिफाईड असेलीच भांडी चालतात. इतर नाही. यांचा बेस फ्लॅट असतोच. पण भांडे केवळ फ़्लॅट बेस असुन चालत नाही.

कॉइल स्टोव्ह: यामध्ये कॉइल मध्ये हीट तयार होते आणि त्यावर भांडे ठेवतो, भांड्यातच हीट तयार होत नाही. स्टोव्ह मधुन हीट भांड्याला मिळते. त्यामुळे याला कुठलीही भांडी चालतील. इंडक्शन बेस असणारी पण चालून जातील. तरी यात गॅस स्टोव्ह प्रमाणे ज्वाला नसल्याने फ्लॅट बेस असणे उत्तम. अल्युमिनियम अथवा इतर कुठल्याही धातुची भांडी चालतील.

दोन्ही प्रकारचे स्टोव्ह्ज कॅनडात नक्कीच आणि सहज मिळतील.

इंडक्शन स्टोव्हला खास भांडी लागत असली तरी त्यात थोड्या अनुभवाने हीट कंट्रोल चांगली करता येते. स्टोव्ह बंद केला्ह की हीट लगेच बंद होते ( गॅस स्टोव्ह प्रमाणे). कॉइल स्टोव्ह मध्ये तापलेली कॉइल सावकाश थंड होते, म्हणजे स्टोव्ह बंद केल्यावरही भांड्याला हीट देत रहाते. स्टोव्ह बंद केला तरी भांडे त्यावरुन काढुन घ्यावे लागते. इंडक्शन म्ध्ये त्याची गरज नाही. तसेच हवे तेव्हा पॉवर कमी जास्त करुन हीट कमी जास्त करता येते, जी त्वरीत होते. कॉइल मध्ये हीट कमी व्हायला / वाढायला वेळ लागतो.
सगळा स्वयंपाक करायचा असेल तर इंडक्शन स्टोव्ह कॉइल पेक्षा सोयीस्कर पडेल.

इंडक्शन स्टोव्हवर कोरडे पदार्थ - रवा,शेंगदाणे भाजता येतात का? पोळी भाजली जाते कारण त्यात पाणी असते?

इंडक्शन स्टोव्हवर कोरडे पदार्थ - रवा,शेंगदाणे भाजता येतात का? >> हो येते की. इंडक्षन कंपॅटिबल भांडीच वापरायची. माझ्याकडे आहेत तवा, डोसा तवा , पॅन व कढई. त्यातले मी पॅनच सर्वाला वापरते. व शेंग्दाणे मस्त भाजले जातात. पावर मध्यम ठेवायची नाहीतर लवकर जळायची शक्यता आहे. पोळ्या डोसे धिरडी सर्व मस्त होते. प्रेशर कुकर पण माझा इ. कंपॅटिबल आहे. त्यात वरण भात होतो. डाळ आधी तास भर भिजवून ठेवते म्हणजे वरण मस्त हाटता येते. अगदी पुणेरी वरण भात होतो. मध्यंतरी वॉटर प्युरिफायर नव्हता तर मी एक मोठे भांडे पाणी उकळून ठेवायची. दिवसाला पुरेसे होते. केक बीक मी करत नाही. घरी. पण इडल्या छान होतात. इडली पात्र मोठ्या कढई सारखे आहे. जास्तीच्या स्वयंपाकालाही वापरता येते. पण पावर मिडीअम ठेवायची. किंवा बंदच कराय्चे तापले की. फोडणी करपू शकते.

कॅनडा मध्ये अधिक अ‍ॅडवान्सह्ड ऑप्शन असणार. इथले कॅनडा वासी अद्ययावत माहिती देतील. पाइप्ड गॅस पण असेल. आमच्या कडे आहे पण मी बंद ठेवला आहे.

Thank you मानव पृथ्वीकर फॉर डिटेल इन्फो. आम्ही इकडून काही घरं पाहत आहोत, तर त्यात कोईल बर्नर्स चं होते.. सो तुम्ही सांगितलं त्यानुसार मी नेलेले फ्लॅट bottom utensils जरी इंडक्शन बेस नसले तरी चालून जातील बरोबर ना?

इंडक्शन स्टोव्ह साठी भांडे आवश्यक आहे. त्या शिवाय हीट तयार होतच नाही. गॅसवर भांड्यात/तव्यावर जे करू शकतो ते सगळे इंडक्शन स्टोव्हवर करता येते. पदार्थ ओला असणे/नसणे याचा संबंध नाही.

डायरेक्ट आचेवर शेकणे हे इंडक्शनवर करता येत नाही. पोळी/भाकरी शेवटी गॅस वर जसे आचेवर शेकतात तसे इंडक्शनवर शक्य नाही. तव्यावरच फडक्याने दाबून शेकावे लागते. कॉईल स्टोव्हवर तवा काढुन सरळ कॉईलवर शेकता येईल - इन प्रिन्सिपल - पण यावर अनुभवी लोकच अधिक सांगू शकतील.
याच कारणास्तव इंडक्शन स्टोव्हवर पापड सुद्धा तव्यावरच भाजावा लागतो , फडक्याने दाबून.
कॉईल शेगडीवर मध्ये जाळी ठेवून पापड भाजता यायला हवा. अनुभव नाही / पाहिले पण नाही.

<<त्यात कोईल बर्नर्स चं होते.. सो तुम्ही सांगितलं त्यानुसार मी नेलेले फ्लॅट bottom utensils जरी इंडक्शन बेस नसले तरी चालून जातील बरोबर ना?>>
हो, बरोबर.

कॅनडा मध्ये अधिक अ‍ॅडवान्सह्ड ऑप्शन असणार. इथले कॅनडा वासी अद्ययावत माहिती देतील.>>> धन्स अश्विनीमामी, actully घर ठरले नाहीये अजून आणि आम्ही भारतातून पाहत आहोत त्यात मला तरी आमच्या बजेट च्या घरांमध्ये coil burners disle. आणि वजन न्यायचे लिमिट असल्याने exact कळत नाहीये काय न्यायचे, असे नको व्हायला कि इकडून नेले आणि तिकडे pdun rahile भांडे.

कॉईल शेगडीवर मध्ये जाळी ठेवून पापड भाजता यायला हवा.>> ओह, यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा प्लीज. भरीतासाठी वांगे देखील भाजता येत नसवेत का मग?

तुम्ही अपार्टमेंट मध्ये राहणार असाल तर कॅनडात इंडक्षन (मग्नेटिक) कुकटॉप मिळण्याची शक्यता कमी आहे. (हे भयंकर generalization आहे). Coil किंवा फ्लॅट टॉप असेल तरी तो मग्नेतिक इंडक्षन सारखा दिसला तरी तो कॉइलच असतो फक्त दिसायला आणि स्वच्छ करायला सोपा इ इ. असतो.
थोडक्यात कुठलीही भांडी चालतील, सपाट उत्तम. भांडी इथेही चांगली आणि ठीक किमतीत मिळतात अर्थात हौसेला मोल नाही. इतकी वर्षे राहूनही दरखेपेला काहीतरी भलता जिन्नस भारतातून येतोच.

कळलं. इंडक्शन म्हणजे मा. वेव नाही. पण एका ठिकाणी पाहिलं की भांडं गारच राहातं पण पाणी गरम होतं. वेगळा प्रकार असेल. प्लेट गारच लागते पण वरचा पदार्थ तापतो.

पहिल्यांदा फार ओझे नेउ नका व पापड भरीत असे थोडे दिवस नाही जमणार्. परत भारतात सुट्टीला आल्यावर खाता येइल. तिथे फार मस्त खाणे मिळते. मी आत्ताच स्ट्रीट फूड पीके चा टोरांटो व्हिडिओ बघितला. हैद्राबादी कच्चे गोश्त बिर्याणी, उस्मानिया बिस्किटे, हलीम, चिकन ६५ सर्व वाजवी दरात मिळते . पान सुद्धा. थंडी सोडली तर मस्त जागा आहे. एंजॉय युअर न्यु एक्स्पिरिअन्स.

उघड्या स्प्रिंग सारख्या दिसणाऱ्या कॉईल स्टोव्हवर होस्टेलवर मक्याची कणसं भाजली आहेत, त्यावर वांगी पण भाजता येतील. कासवछाप सारख्या दिसणाऱ्या कॉईलवर जरा कठीण आणि अमितवने सांगितले तसे फ्लॅट टॉपवर अजून कठीण असावे. अन्यथा मावे.

सपाटबुडाचे कुठलेही चालतील. शक्यतो जाड बुडाच्या भांड्यात स्वयंपाक करावा म्हणजे तळाशी लागून करपत नाही. ते डिशवॉशर मधेही चालतील. काही जणं म्हणतात की स्टील डिशवॉशरमधे लवकर खराब होते. तुमचा भांड्यात जीव असेल तर हाताने घासून टाका.
वांगे भाजता येत नाही. अव्हन मधे करता येते. पापड व फुलक्यांना जाळी वापरता येते. पापड मावे मधेही भाजता येतो. काही नाही हो खूप सोपं आहे. मी अनेक वर्षं कॉईलवर, ग्लासटॉपवर व फ्लेमवर केला आहे. एकदा अंदाज आला की झटपट होतो. भारंभार भांडी नेऊ नका, आजकाल सगळं सगळीकडे मिळतं.

गॅसवर कुकिंग उपलब्ध असेल तर तो पर्याय निवडावा. भारतीय कुकिंगसाठी ते सगळ्यात बेस्ट, असे बायकोचे मत आहे. (पण अपार्टमेंटमध्ये ती शक्यता कमीच).

"इंडक्शन बेस" सर्टिफाईड असेलीच भांडी चालतात.>> +1 मग त्यात स्टील, aluminium, नॉन स्टिक सगळे येतात.
बेसिक भांडी जमली तर आणा. इथे कॉस्को मध्ये सेट मिळेल नाहीतर. पण त्या सेट मध्ये इंडियन स्वैपाकाला लागणारे भांडी नाहीत जास्त. मी तरी जाड बुडाच्या स्टील कढया भारतातून आणल्या. इंडक्शनचा अंदाज यायला वेळ लागतो,मला तरी लागला. पण जमते सवयीने.

वांगे अवन मध्ये भाजून नो मेस मस्त भरीत होते. अपार्टमेंट मध्ये अवन असतोच असतो.
अस्मिता, स्टील डिशवॉशर मध्ये खराब होते असा बिलकुल अनुभव नाही. भारतातला कुकर टाकला की खराब असा नाही पण फिनिश काहीतरी खरखरीत होतं. ते दोन तीनदा केल्यावर समजलं. तरी तो कुकर वापरात आहे. हल्ली आपल्या सारखा शिट्टी होणारा कुकर कनेडियन टायर फ्लायर मध्ये दिसलेला. आयपी आल्यापासून कुकर वापर होतच नाही, तरी हवा तर इंग्रो गाठायची ही गरज नाही.
कॅनडात स्वागत! कुठे येतात?

कानडा जाताय... अभिनंदन...
कानडा रॉक्स... आम्रविका पेक्षा लाख बेटर आहे इमिग्रंट साठी...

धन्स सगळ्याना! छान आणि नवीन माहिती.. बराच काथाकूट केल्यावर, शेवटी मी प्रेस्टिज चा प्लॅटिना चा सेट घेऊन टाकला! ऑल स्टील, इंडकशन base and dishwashre safe.त्यात कढई sausce पॅन आणि fry pan ahe . तिघांच्या कूकिंग ला इनफ. आता कोणता का गॅस असेना! सपाट बुडाचे भांडे आहेत पण इंडकशन असला रेंटल हाऊस मध्ये नाही चाल्ले तर करायचे काय ना! तिकडे सगळे मिळते पण आमचे जे ना मंडळी आम्हालाकांदे बटाटे लसूण लाल मिरच्या असा सगळंच घेऊन जा म्हणत आहेत.. जोक्स अपार्ट.. पण खरेच असे न्यावे का? नविन ठिकाणी survatila char pach days sathi? इथून घर फायनल झाले तरी मुक्काम Air bnb मध्ये असणारे काही दिवस आणि विंटर बघता बाहेर जाऊन शॉपिंग करायला थोडे कठीण जाईल ना?

अश्विनीमामी थँक्स.. Me too excited पहिल्यांदा असे लॉन्ग टर्म भारताबाहेर जाणार आहोत आम्ही.. सो वेगवेगळे फूड आणि अनुभव ghyaychet☺️

अमितव, IP mhnje? कॅनडात Missisauga/ etobicoke घर शोधणे चालू आहे. तुम्ही kuthe असता?

चप्रस थँक्यू! हो ऐकून आहोत.. बघू आता जीवाचा कॅनडा करायला जातोय तर खरं!

मुव्हिन्ग ला अनेक शुभाशीर्वाद. तापमानानुसार तिथे पोहोचल्यावर जॅकेट्स इनर्स घ्यावे लागतील सर्व फॅमिलीसाठी तेवढी तयारी ठेवा.

<< पण खरेच असे न्यावे का?

<< पण खरेच असे न्यावे का? नविन ठिकाणी survatila char pach days sathi? इथून घर फायनल झाले तरी मुक्काम Air bnb मध्ये असणारे काही दिवस आणि विंटर बघता बाहेर जाऊन शॉपिंग करायला थोडे कठीण जाईल ना? >>
------ खूप कष्ट पडणार नसतील, जागा असेल आणि सहजगत्या आणता येत असेल तरच आणा. कॅनडांतही सर्वकाही (पोळपाट, तवा, प्रेशर कुकर , भांड्यांची विविध पर्याय... अगदी गंगाजलही मिळते :स्मित:) मिळते. भारतातूनच वस्तू येतांत, आपल्याला आणायचे कष्ट पडत नाही, आणि किंमतीतही मोठा फरक नसतो.
Canadian Tire च्या वेबसाईटवर स्वयंपाक घरातील भांड्यांच्या किंमती बघा. तिथे किंवा वॉलमार्ट मधे प्रत्येक गोष्ट मिळेल.
https://www.canadiantire.ca/en.html

कॅनडा मधे स्थलांतर करणे हा फार मोठा निर्णय आहे. कॅनडामधे स्वागत, आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

<< तापमानानुसार तिथे पोहोचल्यावर जॅकेट्स इनर्स घ्यावे लागतील सर्व फॅमिलीसाठी तेवढी तयारी ठेवा. >>
----- हे खूप महत्वाचे आहे.... एक छान , जाड जॅकेट पेक्षा ३ वेगवेगळे लेयर्स मधे कपडे घालणे जास्त परिणामकारक आहे.
लेयर्स मधे कपडे हवेत, बाहेरचा लेयर हा wind breaker असल्यास उत्तम.

ज्या भागांत जाणार आहात, तिथला थोडा ( average seasonal temp...) अभ्यास करालच. हवामानाच्या बाबतीत फाजिल आत्मविश्वास कामाचा नाही.

Missisauga ला भरपूर भारतीय आहेत. ग्रोसरी आरामात मिळून जाईल. कच्चे काहिही नेऊ नका (कान्दे/बटाटे/डाळी/तान्दूळ). कोणतेही ईलेक्ट्रीक सामान (ईस्त्री/ड्रायर/मिक्सर वगैरे) नको. फोन/लॅपटॉप अ‍ॅडॅप्टर्स नक्की ठेवा. सुरवातीच्या २-४ दिवस खाण्यासाठी तयार पदार्थ जसे- थेपले/कोरडा खाऊ बाकरवडी/फरसाण्/कचोरी/मसाला पुरी) जवळ राहूदेत. आजकाल परदेश प्रवासासाठी उपमा/डाळखिचडी/पोहे असे तयार पॅकेट मिळते ते किन्वा यु-ट्युब वर सुद्धा क्रुति मिळेल. आवडत असल्यास थोडी थालिपीठ भाजणी, तयार आम्बोळी पीठही आणा.

जवळच्या ग्रोसरी मधे बेसिक टोमॅटो/कान्दे-बटाटे/फ्लोवर्,मिरची मिळेल. आपले भारतीय मसाले ५०-१०० ग्रॅम्स -गरम मसाला, तिखट, मिसळ्/उसळमसाला, गोडे मसाला, हळद्/हिन्ग, धणे-जिरे पूड,मोहरी पूड, सुन्ठ पूड , वेलची पूड ,चहा पूड,साजूक तूप कॅरी करा. airbnb असल्याने मीठ, साखर,मिरेपूड असे बेसिक सेट असते. पोळपाट-लाटणे, स्टील प्रेशर कुकर, चहाची गाळणी, उलथणे,झारा, पळी आणा, शक्यतो स्टील ची भान्डी जी डिशवॉशर मधे चालतील अशीच आणी फ्लॅटबॉटम आणा..बाकी टप्परवेअर, प्लास्टीक डबे नको.

हिवाळ्यात येत आहात सो जॅकेट्स ठेवा पण फार महाग नको..इकडेच घ्या (त्यावर किती टेम्परेचर पर्यन्त चालते ते लिहीलेले असते). decathlon मधे थर्मलवेअर बघा.