दीपस्तंभ मनोबल प्रकल्पातील विदयार्थ्यांची दिवाळी झाली गोड

Submitted by Deepstambh Foun... on 31 October, 2022 - 01:43

दीपस्तंभ मनोबल प्रकल्पातील विदयार्थ्यांची दिवाळी झाली गोड
दीपस्तंभ मनोबल प्रकल्पातील दिव्यांग, अनाथ, वंचित घटकांतील विदयार्थ्यांसोबत दरवर्षी मनोबल येथे दिवाळी साजरी करण्यात येते.जे डोळ्याने प्रकाश बघू शकत नाही अश्या अंध विद्यार्थ्यांमधील ज्ञानरूपी प्रकाशाचे पूजन करण्यासाठी ‘प्रकाशपुजन’ या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.या वर्षीही ‘प्रकाशपुजन’ हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मनोबल प्रकल्पाच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी संपन्न झाला.
कार्यक्रमात दीपस्तंभ जळगाव व पुणे येथील दिव्यतेज टीम ने गायन व वादन सादरीकरण करीत सुरेल मैफल सजवली.मनोबलचे फैयाज अत्तार, श्याम मिश्रा, आशा वरांगडे ,दिव्यता अधिकारी, स्वामीनी , शेख नाझनीन, अनुषा महाजन, शिवा परमार यांनी विविध गाण्याचे सादरीकरण केले तर सुरज केणी, लक्ष्मी शिंदे, मानसी पाटील यांनी नृत्य सादर केले. चैतन्य पानवलकर याने बासरी वादन तर फैयाज अत्तार याने माऊथ ऑर्गन वर गीत सादर केले.एक पाय नसणाऱ्या मानसीने अतिशय उत्तम नृत्य सादर केले, संपूर्ण अंधत्व असणाऱ्या विदयार्थ्यानी नाटक सादर केले तर ऐकू न येणारी मुले सांकेतिक भाषेच्या आधारे गाणं सादर करत होते हे पाहुन उपस्थित भारावून गेले.विद्यार्थ्यांचे पूजन डॉ.विद्या गायकवाड, कुसुम पगारिया, स्मिता मोहिते, रिद्धी जैन, हेमलता अमळकर, दीप कोठारी, वर्षा अडवाणी, सुनीता पाटील ( पाचोरा ), कविता झाल्टे, अमिषा डाबी, शिरीन मुल्ला, शर्वरी महाजन, डॉ.संगीता संघवी यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी , पुखराजजी पगारिया, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, महानगर पालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, डी.एस.पाटील, नंदू अडवाणी, दीपस्तंभचे उपाध्यक्ष डॉ. राजेश डाबी, भरतदादा अमळकर, नीळकंठ गायकवाड, डॉ.प्रवीण शुक्ला उपस्थित होते.औरंगाबाद ग्लोबल एक्सपर्टचे प्रशांत देशपांडे यांनी प्रकाश पूजन या कार्यक्रमासाठी देणगी दिली होती. अमिषा डाबी यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार नवीन कपडे घेण्यात आले.दिवाळीच्या फराळासाठी कविता झाल्टे आणि प्रमोद संचेती यांनी प्रत्येकी ५१ हजार रुपयांची देणगी दिली.
सालाबादाप्रमाणे दिवाळीत मनोबलच्या विदयार्थ्यांचे अभ्यंग स्नान करण्यात आले.लक्ष्मी पुजन करून विदयार्थ्यानी दिवाळी साजरी केली.मनोबल प्रकल्पातील मुलींनी मुलांना ओवाळून भाऊबीज साजरी केली.किरण कक्कड, संजय पाटील, प्रफुल्ल बोरकर यांनी दिवाळीत विदयार्थ्याच्या मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केली.अत्यंत पारिवारिक आणि आनंददायी वातावरणात मनोबल मधील विदयार्थ्यानी दिवाळी साजरी केली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक पाय नसणाऱ्या मानसीने अतिशय उत्तम नृत्य सादर केले, संपूर्ण अंधत्व असणाऱ्या विदयार्थ्यानी नाटक सादर केले तर ऐकू न येणारी मुले सांकेतिक भाषेच्या आधारे गाणं सादर करत होते
>>>>>

माणसाची सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे "मनोबल" च हे पटले वाचून. अन्यथा देवकृपेने सारे काही धडधाकट असूनही केवळ स्टेज फिअर मुळे हे भल्याभल्यांना जमत नाही.

छान ऊपक्रम, कौतुकास्पद.

अतिशय स्तुत्य उपक्रम. खूप कौतुक आहे तुमचं. विदयार्थ्यांसाठि काहि मदत करता येत असेल तर जरुर कळवा.