मिश्र भाज्यांचा स्ट्यू

Submitted by अश्विनीमामी on 6 July, 2022 - 09:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नारळाच्या दुधाचा टेट्रा पॅक एक. मी डाबरचा मागवते बिग बास्केट वर मिळतो.
खडा मसाला: एक तमाल पत्राचे पान, दोन लवंगा, एक चक्री फूल, चार पाच मिरे, अगदीच बारका दालचिनीचा तुकडा. जिरे नाहीतर शाहा जिरे एक छोटा चमचा.

भाज्या: लांब चिरलेले आल्याचे तुकडे पाच सहा, दोन हिरव्या मिरच्या लांब उभ्या कापून . थो डी बारीक कापलेली कोथिंबीर गार्निशला,
गाजर बीन्स बारीक कापलेले तुकडे, मटार, एक मध्य म आकाराचा बटाटा, हे सर्व मिळून एक मोठी वाटी. गाजर बीन्स चे तुकडे बिग बास्केट वर येतात ते आल्यावर एकदा दोरीवाल्या चॉपर मधून काढायचे. साधारण एका साइजच्या सर्व भाज्या - तुकडे असावेत. छान दिसते. बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी.

फोडणी साठी : हेब्बर किचन ने खोबरेल तेल वापरले आहे. पण मी साधेच सफोला तेल वापरले आहे. चवी पुरते मीठ. वरुन घालायला एक चमच खोपरेल तेल असल्यास.

क्रमवार पाककृती: 

कृती फारच सोपी आहे. तवा/ कढई गरम करून त्यात तेल घालायचे. ग्यास मध्यम ठेवा. इंडक्षन कुक टॉप असल्यास ९०० डिग्री से. ला ठेवा.
मग मसाल्याचे पदार्थ व मिरची घाला आणि परता. थोडी कोथिंबीर घालता येइल व आवड त असल्यास कढीपत्ता. नसला तरी चालतो पण छान लागतो.

फोडणीत कांदा घालून एक दीड मिनिटे परता. ब्राउन होउ देउ नका. मग सर्व भाज्या घालून एकदा परता दोन चमचे पाणी घाला व झाकण ठेवुन गॅस मंद करून शिजूद्या पाच मिनिटे. मग झाकण काढून अर्धा टेट्रा पॅक नारळाचे दूध घाला म्हणजे साधारण दोन मोठे चमचे. मीठ घालून परत झाकण ठेवुन शिजवा लक्ष ठेवा नारळाचे दूध फुटले नाही पाहिजे व भाजी करपू शकते हाय हीट वर

आता गरम गरम स्टू नुसताच खाता येतो सूप सारखा किंवा बरोबर नीर दोशे.

एक बोल स्टू व दोन दोशे म्हणजे पोट भरीचे होते.

वाढणी/प्रमाण: 
हे दोन लोकांना एकावेळी होईल. मी एक एक बोल दोन वेळा खाल्लेला.
अधिक टिपा: 

सोबत घ्यायला नीर दोशे ( हे मला धड येत नाहीत म्हणून मी रवा मैदा समप्रमाणात घेउन धिरडी केलेली)
कोक णात करतात ती पिठाची धिरडी तांदळाचे घावन किंवा आपले साधे नेहमीचे दोशे, आप्पम कश्याबरोबरही छान लागते.

सांबार रसम खाउन जरा चेंज हवा होता मग हे बनवले. चेट्टेनाड चिकन बनव्ले होते त्यात अर्धा नादु चा डब्बा संपवला होता. मग उरलेल्यात व्हेज स्टू बनवला. असे प्लान केले तर डब्बा नीट संपेल. व दोन रेसीपी फ्रिज मध्ये राहतील. दोन दिवसांच्यावर फ्रिज मध्ये ठेवू नका.

माहितीचा स्रोत: 
आधी बरेच वेळा खाल्लेला आहे. व करायचा म्हणून हेब्बर किचन ची रेसीपी बघितली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑफिस मधील एका सहकारी मित्राने आणलेलं..तो केरळ चा होता...निव्वळ अप्रतिम ,..टेस्ट बुस्टर आहे..मिरची,,आणि अद्रक चा स्वाद छान येतो .

मस्त रेसिपी. पावसाळ्यात स्टु आणि आप्पम् खायला मजा येते. किंवा नुसतं स्तू सुधा मस्त पोटभर होतं. भरपुर भाज्या (मी यात ब्रोकोली, झुकिनी, बेल पेपर पण घुसवते)असल्यामुळे वन डिश meal........ अर्थात डिनरला नाही चालत, नारळ दुधामुळे calory rich होतं.

अमा, डाबर ऐवजी एकदा कारा (Kara) ब्रँड सुद्धा वापरून बघा. मला याची चव जास्त आवडते.

मस्त वाटतेय रेसिपी. समहाऊ कधी खाल्लेले नाहीये पण छान लागत असणार. सगळे पदार्थ असतात बहुधा घरात, लगेच करून बघायला सोपे आहे.

मस्त रेसिपी अमा.

मला पण आवडते ही डिश पण ना दु मूळे थोडी हेवी होते.

900???>> अहो ते इंड क्ष ण वर तसेच आकडे दिसतात १३०० ११०० ९०० ५०० व १०० हे काय आहेत टेंपरेचर ना? जे काय असेल ते त्यात ९०० ला ठेवा. मला कमी कळते ह्यातले परवा चुकून पॉज मोड वर गेलेला इंडक्षन तर मला वाट ले कुकर बिघडला कि काय. मग रिस्टार्ट केल्यावर झाला कुकर.

छान पाकृ, म्हणता तशी नुसती अथवा डोसे/धिरड्या सोबत.
BTW:
ती पॉवर आहे अमा watts मध्ये.
९०० ला सेटिंग‌ ठेवा एवढं पुरेसं आहे.

९०० ला सेटिंग‌ ठेवा एवढं पुरेसं आहे.>> यस्स सध्या ९०० वर सर्व स्वयंपाक नीट होतो आहे. अगदी तिथे उभी असले तरी १३ ०० वर जळते काही पण. नारळाचे दूध तर फार नाजूक प्रकरण.

पॉवर आहे watts मध्ये.
११०० -
९०० -
५०० -
(२३०ने भागून ५/४/२ ampere वीज खाणार. )