तसं विशेष काही घडलं नव्हतं.
'ट्रेडिशनल डे'ला ती साडी नेसून आली तेव्हा त्याने पुन्हा वळून तिच्याकडे पाहिलं, आणि ते पाहून का कोण जाणे, पण तिने लाजून मान खाली घातली. बस्स, इतकंच!
अगदी खरं सांगायचं, तर त्यानंतरही काही विशेष घडलं नाही.
म्हणजे ते त्याच मित्रमैत्रिणींच्या ग्रूपमध्ये अजूनही होते. फक्त त्यानंतर तो तिच्याशी बोलण्याआधी जरा घसा खाकरायचा, आणि ती त्याच्याशी बोलायला गेली तर शब्दच विसरायची. बस्स, इतकंच!
झालंच तर शब्द विसरले की तिची कानशिलं तापायची, आणि खाकरल्यावर त्याचा आवाजही एरवीपेक्षा हळूवार व्हायचा.
बस्स, इतकंच!
आणि हो, बोलायला काही सुचायचं नाही तरीही ते एकमेकांशी बोलायला निमित्त शोधायचे.
आणि पर्सनल स्पेसेस म्हणतात त्या एकमेकांसोबत असताना आक्रसायच्या म्हणा, किंवा मिसळून जायच्या म्हणा.
म्हणजे तसा चुटपुटतादेखील स्पर्श त्यांच्यात झाला असेलनसेल, पण त्या स्पेसेस अशा ओव्हरलॅप झाल्या की दोघाच्या अंगभर रोमांच फुलायचे.
बस्स, इतकंच!
आणि आता आरशात बघताना ती लाजायची, आणि तो आता अॅक्च्युअली आरशात बघायचा.
बस्स, इतकंच!
गजरे हा तिचा वीक पॉइंट आहे ही नोंद त्याच्या नाकाने घेतली होती, आणि त्याच्या आफ्टरशेव्हचा वास तिने झोपेतसुद्धा ओळखला असता.
पिन सैल होऊन तिच्या केसांतून गळून पडलेला गजरा त्याने शिताफीने उचलून हातातल्या पुस्तकात ठेवला होता.
तिनेही त्याच्या आफ्टरशेव्हची छोटीशी बाटली विकत घेऊन गुपचुप पर्समध्ये ठेवली होती. तिच्या बाथरूमच्या फेर्या वाढलेल्या पाहून तिची मैत्रिण उगाचच काळजीत पडली होती.
बस्स, इतकंच!
तसं नंतर बरंच काही घडलं. म्हणजे मग कॅम्पस इन्टरव्ह्यूमध्ये दोघे नेमके एकाच कंपनीत सिलेक्ट झाले, आणि पुढे एकाच प्रोजेक्टवर काम करण्यासाठी परदेशी गेले, आणि मग एकच अपार्टमेन्ट शेअर करून राहिले आणि मग असंच बरंच काही.
पण कॉलेजमध्ये घडलं ते… बस्स, इतकंच!!
**********
तळटीपः
१. या लेखातील सर्व पात्रं आणि घटना आणि कॉलेज आणि मोरपिसं काल्पनिक असून कोणत्याही जीवित किंवा मृत मोरपिसांशी त्यांचं साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.
२. जवळपास सगळ्या सहभागी मायबोलीकरांनी कॉलेजच्या मोरपिसांची पिसं काढल्यामुळे (वा चक्क जाळल्यामुळे) एकतरी प्रवेशिका 'स्पिरिट'ला जागणारी असावी म्हणून हा खटाटोप.
३. रोमॅन्टिक लेखन हा माझा प्रांत नाही. काही कमीजास्त (कमीच असण्याची शक्यता अधिक) असल्यास सांभाळून घ्या.
हायला ! चांगली भट्टी जमलीये !
हायला ! चांगली भट्टी जमलीये ! तळटीप २. मधे पीसे पण चांगलीच काढलियेत
अरे वा चक्क रोमान्स ?
अरे वा चक्क रोमान्स ? अगदीच वेळ जात नाहीये का आज
बरंच इतकंच मध्ये बरंच काही
बस्स इतकंच मध्ये बरंच काही झालं की.
एम्टी
एम्टी
हे असं , अगदी अस्संच किती
हे असं , अगदी अस्संच किती कॉलेजमधून झालं असणार! अगदी प्रत्येक बॅचमधे असणार
मस्त जमलंय ...
आवडलं.
आवडलं.
स्पिरिट राखलंत!
(हा वाक्प्रचार चालेल का? )चला एक तरी प्रवेशिका
चला एक तरी प्रवेशिका स्पिरिटेड आली.
मस्त मूड पकडलाय. आवडले.
मस्त! पर्सनल स्पेस ओव्हरलॅप
मस्त! पर्सनल स्पेस ओव्हरलॅप होणे हे फार मस्त वर्णन आहे.
बाकी तळटिपा असलेली ही एकमेव रोमॅण्टिक कथा असेल
मला वाटले ही कथा पुढे अशी असेल की सुमारे एक आठवडा एका अपार्टमेण्ट मधे राहिल्यावर त्यांना जाणवले की ते मोरपिशी फ्लर्टिंग, ओव्हरलॅपिंग पर्सनल स्पेसेस वगैरे ठीक होते. पण आपण २४ तास एकत्र जन्मात राहू शकणार नाहीबाथरूमच्या चकरांमुळे आता लग्न
बाथरूमच्या चकरांमुळे आता लग्न होतं की काय वाटलं , पण शेवटी लग्न झालं नाही हे फारंच आवडलं, त्यामुळे रोमान्सला अनंत शक्यता आल्या. 'थोडं सांगून, बरंच लपवलंय' पद्धतीची शैली आवडली.
मी नेमकं उलटं लिहायला आले..
मी नेमकं उलटं लिहायला आले..
शेवटी किती दिवस अपार्टमेंटचं रेंट, ग्रॅासरीचा खर्च, कास्टोकोची बिलं, गॅसचा खर्च एक्सेल शीट मधे टाकत दोघांत डिव्हाईड करत बसणार.. म्हणून एकदाचं लग्न झालं, बस्स, इतकंच!!
मला वाटलं आता ते बारशाच
मला वाटलं आता ते बारशाच आमंत्रण देतायत कि काय आम्हाला बस इतकच
मजा आली वाचायला
हा तुमचा प्रांत नाही वगैरे
हा तुमचा प्रांत नाही वगैरे पटत नाही मोरपीस वाचून
मस्त लयबद्ध लिहलय
अरे धमाल. खरंच मोरपिशी.
अरे धमाल. खरंच मोरपिशी.
म्हाळसा...
भारी!
भारी!
छानच लिहिलंयत.
छानच लिहिलंयत.
मस्तच लिहिलं आहे!
मस्तच लिहिलं आहे!
शेवटच्या परिच्छेदात डिटेल्स नसते तरी चाललं असतं.. म्हणजे 'पुढे बरंच काही झालं' एवढंच असतं तर रोमँटिकपणा (गोष्टीत तरी) टिकून राहिला असता.
आहा...! बस इतकच.
आहा...! बस इतकच.
त्या तळटिपा मात्र रसभंग करणाऱ्या
दण्णंकन वास्तवात आणणाऱ्या, असा दुष्टावा बरा नव्हे
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
बस्स इतकंच मध्ये बरंच काही झालं की......+१.
आरारा….. तळटीपा वाचुन वर पार
आरारा….. तळटीपा वाचुन वर पार सिलिंगपर्यंत पोचलेल्या अपेक्षेच्या फुग्याला फॅनच्या पात्याचा फटका बसला हो…..
मस्त लिहिलेय, आवडले.. हे खरेच असेच घडण्याचे भाग्य ज्यांना लाभले त्यांचा हेवा वाटला..
मस्तच लिहिलंय. मजा आली
मस्तच लिहिलंय. मजा आली वाचताना. अन्य कुणाचा लेख असता तर शेवट वाचून इतरांनी म्हटल्याप्रमाणे चुटपुट लागली असती पण तुमचा लेख आहे म्हटल्यावर त्याचा शेवट अगदी apt वाटला. छान!
हा हा, क्युट…आहेत अशा जोड्या
हा हा, क्युट…आहेत अशा जोड्या पाहण्यात.
आवडलं . बस इतकंच !!
आवडलं . बस इतकंच !!
हायला छान लिहिलेय रोमांटीक
हायला छान लिहिलेय रोमांटीक
मी लिहायला घेतलेय, पण पहिलाच प्यारा अनरोमांटीक अँगलने जातोय.. आता घुसडावा लागणार कुठेतरी रोमान्स
झकास!
झकास!
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
तळटिपा असलेली ही एकमेव रोमॅण्टिक कथा असेल >> +१
बस इतकंच?
बस इतकंच? आवडली गोष्ट
मस्त !!
मस्त !!
खूप गोड आहे हे.
खूप गोड आहे हे.
चांगलं होतं स्पिरिट !
चांगलं होतं स्पिरिट !
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार.
तसंच हा उपक्रम आयोजित करून व्यक्त होण्याला संधी आणि दिशा दिल्याबद्दल संयोजकांचेही आभार.