१. पांढरी वडी
साहित्य : एक वाटी गच्च भरून खवलेला नारळ, एक वाटी दूध आणि पाऊण वाटी साखर
२. हिरवी वडी
साहित्य एक वाटी भिजवलेले पिस्ते, एक वाटी दूध, एक वाटी साखर व पाव वाटी पिठी साखर
३. केशरी वडी
साहित्य एक वाटी खवलेला नारळ अर्धी वाटी आंब्याचा मावा एक वाटी साखर व पाव पाव वाटी पिठीसाखर
१. कृती: नारळ दूध साखर एकत्र मिसळून घ्या व गॅसवर शिजत ठेवा घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत मिश्रण पसरवून घ्या आणि त्याची आयाताकृती वडी पाडा.
२. कृती: पिस्ते व दूध एकत्र करून बारीक वाटून घ्या त्यात साखर मिसळून गॅसवर शिजायला ठेवा घट्ट होत आलं की गॅस बंद करून त्यात पिठीसाखर टाकून मिश्रण दोन मिनिट हलवत राहा तूप लावलेल्या थाळीत घट्ट झालेले मिश्रण ताटलीत पसरवून आयाताकृती वडी पाडा.
३. कृती: पिस्त्याच्या हिरव्या वडीप्रमाणे केशरी वडी करा.
तिरंगा झेंडा करायचा होता म्हणून वेगवेगळे थापले.
एकावर एक मिश्रण ओतले तर तिरंगी वडी होईल. साहित्य दाखवण्यापुरतं आहे प्रमाणात नाही. पल्पने रंग छान केशरी येत नाही शक्यतो शुद्ध मावाच व न खारवलेले पिस्ते वापरा . खूप सुबक झाली नाही वडी. प्रेमळ माबोकर समजून घेतीलच.... पदार्थ गोड आहेच मानुनही घेतील.
छान.. पहिला झेंड्याचा फोटो
छान.. पहिला झेंड्याचा फोटो मला अपेक्षितच होता की कोणी नारळाच्या वड्या बनवून हे करणार
मस्तच दिसतोय झेंडा .
मस्तच दिसतोय झेंडा .
मस्त दिसत आहे.
मस्त दिसत आहे.
मस्त दिसतोय तिरंगा.
मस्त दिसतोय तिरंगा.
अशोकचक्र कसलं केलंय? लवंगा आहेत का?
मस्त.
मस्त.
मस्त!
मस्त!
वाह, मस्तच.
वाह, मस्तच.
वा!!!
वा!!!
ते अशोकचक्र खूपच छान...काय एक एक सुंदर कल्पना आहेत...!
मस्त मस्त!! अरे तू म्हणून
मस्त मस्त!! अरे तू म्हणून एवढं निकोप, निगुतीने इ इ करते आहेस.
(मी तर सरळ फूड कलर टाकून एकदम फोटोजेनिक बनवले असते. मग भले चव कैच्याकै असो.)
गोडाची रेसिपी गो.. ड आहे.
गोडाची रेसिपी गो.. ड आहे.
तिरंगी वडी छान.आहे.
तिरंगी वडी छान.आहे.
आवडली....अशोकचक्र cute झालंय
छानच रेसीपी. फोन वरुन
छानच रेसीपी. फोन वरुन बघितलेली. फूड कलर न वापरल्या बद्दल धन्यवाद.