साहित्य:
१) १ वाटी आवडीप्रमाणे १ किंवा कितीही कडधान्ये मोड आलेली (मूग व मटकी घेतलीये)
२) १ मिर्ची, लसणाच्या चार पाकळ्या व मूठभर कोथिंबीर
क्रमांक १ व २ जिन्नस मिक्सर, पाटा वरवंटा, रगड्यात
वाटून घ्या.
* मीठ हळद - आपल्या आवडीनुसार
* तेल - तळणार असाल तर जास्त लागेल शॅलो फ्राय केलं तर कमी आणि कुरकुरीत हव्या असतील तर तेल जास्त लागेल.
*पाणी
टोस्ट आहे तर अर्थात ब्रेड लागेल ४ स्लाइस ( पौष्टिकता वाढवायला मल्टीग्रेन ब्रेड घ्या)
वरील साहित्य अंदाजपंचे दाहोदरसे आहे. कडधान्यांचे वाटण जास्त झालं तर त्याचे आडई करता येतील.
वाटतात मीठ हळद टाका. फोटोत दाखवल्याप्रमाणे ब्रेड लागेल इतपत सरबरीत पीठ होण्यासाठी पाणी.
ब्रेडचे त्रिकोणी/आयाताकृती तुकडे करून घ्या. तवा तापायला ठेवा. तव्यावर तेल टाका. पीठात ब्रेड दोन्ही बाजूंनी बुडवून तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. आपल्या आवडीनुसार चीज किसून टाकू शकता.
सॉस/चटणी बरोबर छान लागतात किंवा एखादं आपल्या आवडीचे डीप.
काही साहित्य/कृतीत दिल्या आहेत. अधिक : तयारीचा वेळ १ दिवस दिलाय पण तयार मोड धान्य आणली तर वेळ वजा होईल. ऋतु व स्थानानुसारही वेळ बदलेल. उरलेली उसळ खपवायला करता येतील. त्यात भर घालू शकता.
मस्त रेसिपी..!
मस्त रेसिपी..!
वरचा फोटो अगदी तोंपासू..!
मस्तच रेसिपी आहे मंजू
मस्तच रेसिपी आहे मंजू
वा! फ्रेंच टोस्टची व्हेगन
वा! फ्रेंच टोस्टची व्हेगन आवृत्ती
अरे वाह भारी दिसतोय.. पाणी
अरे वाह भारी दिसतोय.. पाणी सुटले
तोंपासु फोटो आणि रेसिपी. छान.
तोंपासु फोटो आणि रेसिपी. छान.
छान आहे प्रयोग .
छान आहे प्रयोग .
छान दिसताहेत टोस्ट.
छान दिसताहेत टोस्ट.
मस्त आयडिआ आहे ही!
मस्त आयडिआ आहे ही!
सही एकदम.
सही एकदम.
एकदम भारी
एकदम भारी
भारी कल्पना
भारी कल्पना
Mast kalpana!
Mast kalpana!
आवडली पाककृती! सोपी आणि
आवडली पाककृती! सोपी आणि पौष्टिक! करून बघणार
टोस्ट मस्त चटपटीत दिसत आहेत.
टोस्ट मस्त चटपटीत दिसत आहेत.
वा, मस्तच दिसतंय
वा, मस्तच दिसतंय
मस्तच !
मस्तच !
आणि मोड आलेली कडधान्ये
आणि मोड आलेली कडधान्ये नसल्यास, बेसन वापरून करता येईल का?
की चांगले नाही लागणार?
मी बेसनचेच करते, चांगले
मी बेसनचेच करते, चांगले लागतात, आंबट गोड (आयडी). सोबत थोडं तांदूळ पिठ किंवा मुगडाळ पीठ असेल तर घालते.
हे अजून चविष्ट लागतील, करून बघायचेत मला.