तीन ताजे पण जास्त न पिकलेले लाल भडक बंगलोर टोमाटो, एक वाटी भिजवलेली मोड आणलेली मटकी, अर्धी वाटी भिजवलेली चणा डाळ. ( हेच माझे दुसरे कडधान्य ) कोथिंबीर, लाल तिखट, एक दोन चमचे चीज चे तुक डे. बिग बास्केट वर मिक्स मिळते ते सजावटी साठी. धने जिरे पूड, लिंबू रस, मीठ, असल्यास मोमो बरोबरची चटणी किंवा कोणता ही तुमच्या आव्डीचा सॉस. एक दीड चमचा तेल
अगदीच सोपीपाककृती : प्रथम तव्यात तेल गरम करुन त्यात मोड आलेली मटकी, भिजवलेली डाळ परतायला घ्या. एक वाटी मटकी असेल तर अर्धी वाटी डाळ घ्या. परततानाच त्यात तिखट, मीठ, धने जिरे पूड, कोथिंबीर घाला व मध्यम आचेवर परतत रहा. पाच ते सात मिनिटात मिश्रण कोरडे खुट खुटीत होईल. मग आच बंद करुन त्यावर लिंबू पिळा व बाजूला ठेवा.
असल्यास मोमो बरो बरची चटणी किंवा आव्डीचा सॉस मिश्रणा त घाला. पण फार पचपचीत व्हायला नाही पाहिजे. सुके मिश्रण छान लागते
आता हे गार होईपरेन्त टोमाटोच्या बास्केट बनवून घ्या.
वरील मिश्रण त्यात भरा व थोडी कोथिम्बीर भुरभुरवा. झाले.
आता प्लेट मध्ये थोडे चीज, काकडीचे काप, बारीक किसलेला कोबी कश्यावरही ठेवून सर्व्ह करा.
मी आज डब्यात आणले.
ह्यात किसलेले पनीर, लसुण चे तुकडे, बारीक चिरलेली कांदापात, पण छान लागेल. बास्केट संपल्यातर नुसते सारण खाउन मस्त लागते.
अमा, मस्त दिसताहेत बास्केट!
अमा, मस्त दिसताहेत बास्केट!
अरे वा. मस्तंच.. बास्केटची
अरे वा. मस्तंच.. बास्केटची आयडिया भारीच!
<<<<मी असले परतुन कडधान्य नेहमी खाते.>>>
मम.. माझं comfort food आहे हे.
अमा छान रेसिपी
अमा छान रेसिपी
अॅडमिवे/ वेब मास्टर: पा
अॅडमिवे/ वेब मास्टर: पा ककृती क्लासिफिकेशन मध्ये पारंपारिक मराठी आहे तसे आधुनिक मराठी/ फ्युजन मराठी पण हवे. किंवा काय सिलेक्ट करावे. हे सलाड तसे कुठेच फिट बसत नाही. पारंपारिक नाही.
टोमाटोला खाली एक बेस बनवून
टोमाटोला खाली एक बेस बनवून घ्यायचा थोडी चकती कापायची. म्हणजे बास्केट नीट बसेल. मग सुरीने छेद घ्यायचे मधले हँडल ठेवुन. हे झाले की आतला गर अलगद सुरीने किंवा मेलन बॉलर ने कोरुन काढायचे. किंवा काकडी अर्धी कापून मधल्या सीड कोरून काढूनही मध्ये सारण भरता येइल.
सारण भरुन उकडुन तिख्ट दिंडे करता येतील.
किंवा छोटे छोटे नाचणी डोसे करुन त्याव र एक एक चमचा सारण ठेवता येइल.
मस्त दिसताहेत बास्केट्स!
मस्त दिसताहेत बास्केट्स!
छान रेसिपी.. फोटोही मस्त...
छान रेसिपी..
फोटोही मस्त...
मस्त दिसतायत बास्केट अमा
मस्त दिसतायत बास्केट अमा
(No subject)
वा.. मस्त दिस्तायत बास्केटस..
वा.. मस्त दिस्तायत बास्केटस.. चविष्ट असणार पा़ कृ. करुन पाहणे आले आता
अमा, तुमच्या बास्केटस् घरी
अमा, तुमच्या बास्केटस् घरी न्याव्या असा मोह होतोय. :स्मित :मस्तच दिसताहेत.
मस्त !
मस्त !
गोड रेसिपी आहे आणि फोटो पण
गोड रेसिपी आहे आणि फोटो पण
अमा मस्तच, रेसिपी आणि फोटो
अमा मस्तच, रेसिपी आणि फोटो दोन्ही.