भारत का दिल देखो : (पाककृती ) मकई के खोऊंद

Submitted by मनिम्याऊ on 12 August, 2022 - 07:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मक्याचे पीठ : दीड वाटी (साधारण १५० ग्राम) (मक्याच्या भाकरीसाठी वापरतो ते घ्यावे. Corn flour नको)
ताक : १/२ लिटर (आंबट असावे)
तेल : २ चमचे
हिंग : १ छोटा चमचा
मोहरी : १ छोटा चमचा
हळद : १ छोटा चमचा

वाटणासाठी
आले : १ इंच
लसूण : ७-८ पाकळ्या
हिरव्या मिरच्या : २
कढीपत्त्याची पाने : मूठभर
जिरे : १ छोटा चमचा
मीठ : चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

'भारत का दिल देखो' या माझ्या मध्यभारतातील लोकजीवनावर आधारित असलेल्या मालिकेत घेऊन आले आहे एक झटपट चविष्ट प्रकार 'मकई के खोऊंद'.
मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात प्रामुख्याने का प्रकार केला जातो. करायला सोपा आणि हमखास जमणारा हा नाश्त्याचा पदार्थ

पाककृती
एका खोलगट पातेल्यात तेल गरम करावे .

कडकडीत तापले की हिंग मोहरीची खमंग फोडणी दयावी.
त्यात आलं - मिरचीचे वाटण घालावे. एक दोन मिनिट जरासे परतून घेऊन त्यात ताक घालावे.
हळद व मीठ घालून ताकाला उकळी येऊ दयावी. उकळी आल्यानंतर आच कमी करून मक्याचे पीठ थोडे थोडे करत घालावे. एकीकडे मिश्रण सतत ढवळत राहावे लागते नाहीतर पिठाच्या गुठळ्या होतात.
३-४ मिनिटातच मिश्रण घट्ट व्हायला लागते.
साधारण तांदळाच्या उकडीइतके घट्ट झाले की झाकण ठेऊन २ मिनिटे वाफ काढावी.

तोवर एका ताटाला तेलाचा हात फिरवून घ्यावा.
मिश्रण गरम असतानाच उतारावून वाटीच्या साहाय्याने ताटावर पसरवून घ्यावे. नीट थापून वड्या कापाव्या.

५ मिनिटात थंड होते. लगेच खाऊ शकता किंवा वरून आणखी एक फोडणी पसरवून (ढोकळ्याप्रमाणे) पण छान लागते.
ओले खोबरे/ कोथिंबीर पेरून पण सजवता येईल.

WhatsApp Image 2022-08-12 at 1.43.35 PM.jpeg

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात १५-२० खोउंद होतात
अधिक टिपा: 

आयत्या वेळी झटपट होणार पदार्थ

(प्रादेशिक प्रकारात ऑपशन्स मध्ये मध्यप्रदेश/ छत्तीसगढ/ मध्यभारत का नाही? नाईलाजाने प्रत्येक वेळी वैदर्भीय किंवा मराठी निवडावे लागते)

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो सामी, पण आता संपादन करण्याची मुदत निघून गेलीय ना. > ऍडमिन ला रिक्वेस्ट पाठवून बघ

Ok. नाहीतर भारत का दिल देखो.. अशा नावाने एक नवीन थ्रेड काढून त्यात थोडी प्रस्तावना लिहून या सगळ्या लिंक्स देता येतील का? आणि या विषयावर नवीन काही लिहिलं की ती पण लिंक तिथे update करायची. असं चालतं का?

रेसिपी आवडली, हटके आहे एकदम, इंदौरी भुट्टे का कीस खाल्ला होता एकदा सराफ्यात बरेच आधी, पण शिस्तीत (मक्याच्या) भाकरीच्या पिठाचा केलेला हा आयटम पण अपिलिंग वाटतोय, सवडीनुसार नक्की करून बघणार हा आयटम मी.

Pages