अळूची पानं
चणाडाळ, शेंगदाणे, (लाडात आल्यास) काजू, सुक्या खोबर्याचे काप
फोडणीचं साहित्य
तिखट, मीठ, मसाला (मी गोडा मसाला घालते, पण तुमच्या आवडीचा कुठलाही वापरा)
बेसनाचं पीठ
चिंच
गूळ
आवडत असेल तर एखाददुसरी हिरवी किंवा सुकी लाल मिरची
१. अळूची पानं धुवून, पुसून, देठं काढून चिरून घ्या.
फार बारीक नाही चिरली तरी चालतंय - शिजवून घोटायचीच आहेत.
२. देठं (यांना लाडाने देठी म्हणतात) सोलून चिरून घ्या.
(इथे इन्डियन ग्रोसरीत अळू मिळतं त्याला फार देठी ठेवलेल्याच नसतात, पण सोलायच्या कशा ते दिसावं म्हणून फोटो:
३. खोबर्याचे काप करून घ्या.
(मी केले, पण खवटसर वाटले म्हणून भाजीत घातले नाहीत. या पूर्वतयारीच्या फोटोत दस्तावेजीकरणापुरते ठेवले आहेत) :
४. प्रेशर पॅनमध्ये फोडणी करून त्यात पानं आणि देठी परतून घ्या.
(भाजीचं आणि/किंवा कोवळं अळू मिळालं तर आधी परतून घ्यावं लागत नाही. इथे बहुतेक वेळा वड्यांची आणि जून पानं मिळतात, जी शिजवली की चोथापाणी होऊ शकतं, म्हणून ही स्टेप.)
परतली की बर्यापैकी आळते भाजी.
५. आता बाकी व्यंजनं (डाळ, दाणे, काजू, खोबर्याचे काप) घालून सगळं मिश्रण जेमतेम बुडेल इतकंच पाणी घाला.
हे अळू हातालाच खाजरं वाटलं म्हणून मी आत्ता शिजवतानाच चिंचेचा कोळ घातला.
५. आता प्रेशर लावून दोन शिट्ट्या येऊ द्या. (शिट्ट्या म्हणजे प्रेशर पॅनच्या. तुम्ही प्रेशरही घेऊ नका आणि शिट्ट्याही वाजवू नका).
६. झाकण निघालं की जास्तीचं पाणी वेगळं काढा, म्हणजे बेसन छान मिसळेल.
(मुळात जास्त पाणी घालायचंच नाहीये आपण.)
७. आता थोडं बेसन घाला आणि छान घोटून घ्या. भाजी मिळून आली की ते मघाचं गाळून घेतलेलं पाणीही त्यात घाला.
८. आता सगळे टेस्टमेकर्स! तिखट, मीठ, (आणखी लागली तर) चिंच, गूळ, मसाला.
९. बेसन पुरतं शिजायला हवं, तेव्हा मध्यम आचेवर अधूनमधून ढवळत भाजी मस्त रटरटू द्या. शिंतोडे उडू नयेत म्हणून झाकण / स्प्लॅटरगार्ड ठेवा.
(सगळं सांगावं लागतं!)
१०. झाली भाजी! हाय काय नाय काय!
केलीत की खायच्या आधी या धाग्यावर, आणि अळूची आठवण काढून यच्चयावत् मायबोलीला कामाला लावणार्या मनीमोहोर यांच्या धाग्यावर फोटो टाकायला विसरू नका.
मस्त. लिखाणच इतकं छान आहे की
मस्त. मुळा न घातल्याने भाजी नक्कीच सात्त्विक झाली असणार.! मुळा नाही, चुका नाही, शुद्ध निर्भेळ सात्त्विक अळू. शिजल्यावरही रंग फारसा न बदललेले, थोडातरी हिरवेपणा टिकवून ठेवलेले अळू.
आणि लिखाणही इतकं शुद्ध सात्त्विक छान आहे की भाजी किती छान असेल?
असंच आमचं लिखाण असतं तर आमचंही फतफतं सुंदर झालं असतं !
ता. क. पाककृती आणि लिहिण्याची स्टाईल. दहापैकी दहा. (आणि मी मुळा हेटर आहे.)
मस्त. इथे खोबर्याचे काप
मस्त. इथे खोबर्याचे काप रेडिमेड मिळतात की.
माझी देठी हाताने सोलली जात नव्हती नीट म्हणून सोलाण्याने सोलून घेतली.
स्वाती , मस्तच लिहिली आहेस
स्वाती , मस्तच लिहिली आहेस रेसिपी. लिहिण्याची स्टाईल पण भारी आहे. आता अशी केली की परफेक्ट होणारच. कुठे म्हणून चुकायला वाव नाही.
भाजी दिसतेय पण छान , रंग पोत सगळंच. तो वरचा काजू आणि दाणा ही झकास बसलाय, बुडला नाहीये जरा ही.
मस्त रंग. एकदम tempting
मस्त रंग. एकदम tempting .भाजीत चमचा बुडवून लगेच चव घ्यायची इच्छा होतेय.
कालच, 4 दिवसांपूर्वी ची अळूची मोठ्ठा वाडगाभर भाजी एकटीनेच ओरपली. साबांचा उपवास , नवरा आणि मुलगा not at all अळु fan. त्यामुळे no भागीदार.
आता प्रतिक्षा ऋषीपंचमीची.
छान
छान
वा हे बेस्ट केलंस! फोटो पण
वा हे बेस्ट केलंस! फोटो पण मस्त!
इकडे मिळणारे पात्राचे अळू बघून इच्छा तर होते नेहमी पण हिंमत होत नव्हती. आता आजच करणार आहे फायनली.
आणि अळूची आठवण काढून
आणि अळूची आठवण काढून यच्चयावत् मायबोलीला कामाला लावणार्या मनीमोहोर यांच्या धाग्यावर फोटो टाकायला विसरू नका. >> हे राहिलं वाचायचं, भारी आहे हे.
मी एवढं लिहिलं अळू महात्म्य पण मी अजून एकदा ही केली नाहीये अजून ह्या वर्षी आणि करायला जमेल असं पण वाटत नव्हतं , शेवटी पर्वा नाडण हुन रेडी टू ईट पाकिटं मागवली आणि खाल्ली आज. वरण भात, अळू आणि शेवटी दही भातात अळू ...तेव्हा आत्मा शांत झाला. तरी अजून वड्या आणि देठी बाकी आहेच, ते गौरी गणपतीत तरी जमावे.
आता ऋषींच्या भाजीचा नंबर
आता ऋषींच्या भाजीचा नंबर
मिक्स भाजी
4 दिवस आधी थोडी माहिती लिहून धागा काढावा
हीरा
हीरा
मी मुळा हेटर नाहीये, पण (नुसता मीठ लावून खायला किंवा मग दह्यातली कोशिंबीर करून) कच्चा मुळाच आवडतो फक्त.
चुका इथे मिळत नाही. अंबाडीच का घालू नये असं मनात आलं होतं खरं, करून बघेन कधीतरी तशीही.
ममो
काजू आणि दाणा बुडायच्या आत फोटो काढण्याची कसरत काय सांगू!
स्वस्ति
आमच्याकडेही मीच एकटी गिऱ्हाइक असते अंबाडी, अळू, शेपू, डाळिंब्या वगैरेंना.
The pessimist in me : ‘मेलं आपणच करा आणि आपणच गिळा!’
The optimist in me : ‘आपणच गिळा! आपणच गिळा!!’
सायो, हो खोबऱ्याचे तयार काप आणेन पुढच्या वेळी.
सर्व प्रतिसाददात्यांचे आभार!
मला वाट्ते, काही वर्शांपूर्वी
मला वाट्ते, काही वर्शांपूर्वी एक महा बारा गटग - वासंतिक गटग झाले होते - लालू ह्यांच्या घरी तेव्हा ही भाजी तुम्ही करुन नेलेली. कारण त्या गटगचा जो बाफ होता त्यात ह्या भाजीचे फोटो व रेसीपी वाचल्याचे आठवत आहे. फार जबरी मेन्यू होता त्या प्रसंगी. बाफ पण वाचायला मजा आली होती.
अंबाडी केली होती - माझ्याच
अंबाडी केली होती - माझ्याच घरच्या जीटीजीला.
मग लोकाग्रहास्तव रेसिपीही लिहिली होती.
सिमिलरच आहेत पाककृती खरंच. बरोबर लक्षात आलं तुमच्या.
(हा लालूकडच्या - आणि पहिल्या - कल्लोळाचा वृत्तांत)
अमा - ही आठवण काढल्याबद्दल खरंच आभारी आहे - पुन्हा वाचताना स्मरणव्याकुळ की कायसंसं वाटलं अगदी!
Loks, अळूची भाजी करताना देठ
.
पा. कृ छान!
पा. कृ छान!
मी वाचली होती बरं का पोस्ट.
देवकी, मी वाचली होती बरं का पोस्ट.
लालू कडच्या कल्लोळाचा
लालू कडच्या कल्लोळाचा वृत्तान्त वाचून नॉस्टॅल्जिक व्हायला झालं!!
मी आत्ताच केली ही भाजी. मुळा
मी आत्ताच केली ही भाजी. मुळा मला आवडतो त्यामुळे मी घातला होता. अफाट झाली आहे चवीला. (अजिबात खाजरी झाली नाही!)
सोबत मसाले भात, जिलेबी, मठ्ठा असा एकदमच भार्री बेत जमला!!
वा वा! भारी बेत!!
वा वा! भारी बेत!!
अहाहा ! मै कडचा बेत बघुन जेवण
अहाहा ! मै कडचा बेत बघुन जेवण झालेल होत तरी भुक लागली.
सुंदरच बेत मैत्रेयी. किती
सुंदरच बेत मैत्रेयी. किती नीटस मांडले आहे. बटाटा अर्धा कापून त्यात उदबत्ती हवी.
मला पहिला फोटो चॉकलेट फज
मला पहिला फोटो चॉकलेट फज सारखा दिसला.
ही भाजी आणि गरम भात आवडतो, पण कधी केली नाही.
स्वाती, खोबरं, दाणे, डाळ हे भाजी घोटून घेताना mash होत नाही का? ते आख्खं रहायला हवं.
मैत्रेयी, फोटो जबरदस्त. कुठून येतो एवढा उत्साह? चांदीच्या ताटात वाढून फोटो काढायला हवा होता.
चांदीच्या ताटात वाढून फोटो
चांदीच्या ताटात वाढून फोटो काढायला हवा होता. >> अगदी अगदी मला पण वाटलं
>>> स्वाती, खोबरं, दाणे, डाळ
>>> स्वाती, खोबरं, दाणे, डाळ हे भाजी घोटून घेताना mash होत नाही का
नाही होत. न भिजवता शिजवल्यामुळे मॅश होण्याइतके मऊ झालेले नसतात.
डीटेल्ड स्टेप्स मुळे करावीशी
डीटेल्ड स्टेप्स मुळे करावीशी वाटतेंय.