http://www.maayboli.com/node/8395 इथुन पुढे चालू..
जय भवानी जय शिवाजी...
कोवळ्या पोरांनी घेतली तलवार हाती
ती निघाली रक्षिण्या आपुल्या देशा..
हर हर महादेव.. हर हर महादेव.. गर्जना
लांधती क्षितीजावरल्या रेषा...
सोनार, चांभार,लोहार, मराठा मिटले सारे भेद
अठरा पगड जातींना लागले स्वराज्याचे वेध
माया ममता सोडुन नाती
रक्ताची आहुती दिली रणा
स्वराज्याचे तोरण बांधले
जिंकला गड पहिला तोरणा
शहा़जी राजे होते अदिलशहाच्या दरबारी,
शिवबाचे कोवळे पंख घेती गरुड भरारी
आदिलशहा खुप कोपला
म्हणाला मारतो तुझ्या बापाला
शहाजी राजे आदिलशहाच्या तावडीतुन सुटतील हे स्वप्न देखील न पडत कोणाला
जिथे इच्छा तेथे मार्ग, मानाचा मुजरा माझ्या राजाला... मानाचा मुजरा माझ्या राजाला....
शत्रुच्या शत्रूशी केला तह
मुघलांचा आदिलशहाला शह
वडिलांना वाचवुनी
रक्षिले स्वराज्याला
जो थांबला तो संपला
राजा सांगे जगताला
ते करुन राजे गप्प बसले ?
छे.. अजिबात नाही एका मागुने एक गड ते सर करीत होते, प्रांत स्वतंत्र करीत होते ...
मग आदिलशहा काय गप्प बसणार ?
आदिलशहाच्या दरबारात होता एक चालाख सरदार ..अफजलखान,
"शिवाजी..? इस चुहे की लुंगा मै जान"
थाटात गर्जला अफजलखान
शिवबाला होती धोक्याची जाण
धाडलं सरळ तहाचं फर्मान
खानाला वाटलं.. आला उंदिर आयता पिंजर्याशी...
खान आला प्रतापगडाशी
एकांती भेट ठरली शिवबाशी
गळाभेट आडदांड खानाशी
शिवबाचे प्राण आले कंठाशी
खानाने उपसली कट्यार
चिलखतीवर केला फुसका वार
शिवबापण होता रे तय्यार
जी खुपसली वाघनखं धारधार
खानाचा कोथळा काढला बाहेर
खान जागच्या जागी झाला ढेर
सय्यद बंडाचा केला मागुन वार शिवबावर
जीवा महालेने झेलला तो जीवावर
होता जीवा म्हणुनी वाचला शिवा, ...
निश्चयाचा महामेरू |
बहुत जनांसी आधारू |
अखंड स्थितीचा निर्धारू |
श्रीमंत योगी |
राजाधीराज, शिवाजी महाराज की जय...!!!
जय भवानी.. हर हर महादेव.!!!
-सत्यजित.
काही चुक झाल्यास नक्की कळवा..
हर हर महादेव!! सत्याभाय जबरी
हर हर महादेव!!
सत्याभाय जबरी रे.....पोवाड्याच्या ठेक्यात म्हणायला मजा आली.
सत्या, बालपोवाड्यासाठी काही
सत्या, बालपोवाड्यासाठी काही गोष्टी टाळायला लागतील. उदा. लांधती क्षितीजावरल्या रेषा, अठरापगड जाती, रक्ताची आहुती... वगैरे. पहील्या भागाइतका हा भाग सोपा वाटत नाही. हे मला वाटतयं. आता तुला अपेक्षित असलेले बाल किती वयाचे आहेत त्यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत म्हणा.
सत्या मस्त जय भवानी जय शिवाजी
सत्या मस्त
जय भवानी जय शिवाजी !!!!
पहील्या भागाइतका हा भाग सोपा
पहील्या भागाइतका हा भाग सोपा वाटत नाही >> एक्झॅक्टली कौतुक.. मला पण असच वाटलं.माझा मुलगा ५ वर्षाचा आहे, त्याले हे नक्कीच कळणार नाही, पण तो नविन शब्दांचे अर्थ विचारतो आणि लक्षात ठेवतो. पण फारच अवघड न करता काही नविन शब्दांची ओळख होईल हा एक विचार, तसही आजकाल इंग्रजी माध्यमातुन मुलांना असे मराठी शब्द कळणे अवघडच. १० पैकी एक नविन शब्द आला तर कदाचीत मुल अर्थ विचारतील आणि समजवुन घेतिल पण सगळेच अवघड शब्द झाले तर मग फुल्टू इग्नोर मारतिल. म्हणुन फर्मान, तह, कोथळा हे रोजच्या वापरात नसणारे शब्द फुसका, तय्यार, हे मुलांना आपले वाटतिल असे.
६-८ आणि वरिल असा वयोगट मला अपेक्षीत आहे. आभार.
सुंदर! दोन्ही कविता!
सुंदर! दोन्ही कविता!