नमस्कार,
टर्म इन्शुरन्स बद्दल काही प्रश्नः
१. टर्म इन्शुरन्स मधे कुठला चांगला आहे (तुमच्या अनुभवानुसार)?
२. आय सी आय सी आय चा ऑनलाईन इन्शुरन्स कसा आहे? (त्याय मेडिकल टेस्ट नाही)
३. आय सी आय सी आय चा सोडला तर इतर बाकी सगळ्यात मेडीकल टेस्ट आहे. मेडीकल टेस्ट न करता इन्शुरन्स घेण्यात क्लेम च्या वेळी गडबड होउ शकते का?
नुकताच एस बी आय च्या एका एजंटकडुन त्यांच्या शुभ निवेश या पॉलिसीबद्दल माहिती मिळाली. त्याने फार रोझी पिक्चर पेंट केले उदा. १५ वर्षात १०% अॅवरेज रीटर्न इ. पण गुगल केल्यावर कळले की त्यात अॅवरेज रीटर्न ३-४% आहे आणि रीटर्न किंवा कवरेज काही फारसे चांगले नाही. म्हणुन आता टर्म इन्शुरन्स घ्यायचे ठरवले.
इन्शुरन्स आणि इन्वेस्टमेंट दोन्ही दगडांवर पाय ठेवण्यापेक्षा एक गोष्ट नीट करावी हा उद्देश. असो.
मी ऑनलाईन माहिती काढतोच आहे पण इथे कोणाचा अनुभव कळल्यास निर्णयास जरा आणखी मदत होइल.
आपल्या मतांचे स्वागत.
धन्यवाद.
शोनु-कुकु: सर्वप्रथम
शोनु-कुकु: सर्वप्रथम कुठल्याही प्रकारचा ताण घेउ नये, आता मुदति विमापत्र घेतले आहे ना तर ते तुमच्यासाठी बरोबर आहे का ते ठरवावे.
विश्लेषण करुया:
१. दरमहा - रु ३,०००/- म्हणजे वार्षिक - रु ३६,०००/-
२. मुदत - २५ वर्ष म्हणजे २५ x १२ = ३०० महिने तुम्हाला दरमहा रु ३,०००/- विमाहप्ता भरावाच लागेल
३. पुर्ण रक्कम = २५ x ३६,००० = रु ९,००,०००/- भरले २५ वर्षात
४. वर दिलेल्या तक्त्यात दाखवलेली रक्कम रु ४०,९५,३०४/- ही फक्त निश्चित (guaranteed) नसुन त्यात वचनपूर्ती भर (loyalty additions) सुद्धा दाखवलेली आहे व्याज दर १०% धरला आहे
५. फक्त निश्चित (guaranteed) रक्कम कढायची असेल तर इथे Premium Calculator बघावा
आता समझा:
१. आपण दरमहा रु ३,०००/- गुंतवत आहात
२. ३०० महिन्या करता
३. व्याज - १०%
४. २५ बर्षात आपल्याला रु ४०,१३,३७२.११/- इतकी पुर्ण रक्कम मिळेल
रु ४०,९५,३०४ (विमा रक्कम) - रु ४०,१३,३७२.११ (गुंतवलेली रक्कम) = रु ८१,९३१.८९/- चा फायदा, खरच का!!!
हे लक्षात असु द्या:
१. वचनपूर्ती भर (loyalty additions) नक्की किति असेल ते विमा कंपनी मुदत पुर्तीच्या वेळी किंवा दहा वर्षे झाल्यावर ठरवते तेव्हा सांगताना ते नेहेमी जस्तितजास्त टक्के दर लावून रक्कम दाखवतात, तेव्हा आपण मुळात निश्चित (guaranteed) रक्कम किति मिळेल ते आधी काढावे
२. दर महिना आपल्याला विमाहप्ता भरावाच लागेल नाहीतर विमा संपवण्यात येउ शकतो
३. आपण विमा मुदतपूर्व संपवू शकता पण सोडकिंमत च्या स्वरुपात तोटा होउ शकातो
निष्कर्षः
१. साधे मुदती विमापत्र (Term Life Insurance policy) सर्वात सोप्पे आणि बरेच स्वस्त असते
२. गुंतवणूक करायला वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत तेव्हा विमा कंपनीला ती जबाबदारी कश्याला द्या!
३. पण आपण आधीच विमा घेतला असेल तर आता आपल्या हातात फक्त दोनच गोष्टी रहातात - एकतर आपण हप्ते भरत रहाणे किंवा विमा मुदतपूर्व संपवणे (अर्थात जाणकारांकडून जास्त माहिति मिळाल्या नंतरच)
४. निर्णय तुम्हालाच करायचा आहे
Hope this helps...:-)
गुंतवणूक करायला वेगवेगळे
गुंतवणूक करायला वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत तेव्हा विमा कंपनीला ती जबाबदारी कश्याला द्या!>>> सेम पिंच... पण ९०% लोकांना हे पटत नाही, इन्वेस्ट्मेंट आणि सिक्युरीटी गल्लत करतात. कदाचित त्यामुळे १० % लोक आणि कं. एन्जोय करतात.
सगळ्यांनीच टर्म इन्सुरंस घेतला तर कदाचित त्याचा प्रिमीयम कायच्या काय होइल.
अजुन एक, अॅक्सिडेंटल इन्स्युरंन्स्चे लिमीटच्या बाबतीत: ते लोक १० लाखाच्यावर देतच नाहित. मॅनेजर मला म्हणाले तुम्ही भले ५० लाखाला एलिजिबल असा किंवा २ कोटीला १० लाखाच्या वर आम्ही देतच नाही. १० लाखाला २००० प्रिमीयम. ( सध्याच्या रिस्क अॅनॅलिसिसला अॅक्सिडेंटल इंस्युरन्स खुपच चांगला पर्याय आहे, स्वस्तात मस्त). आपल्या पगाराच्या / टॅक्स रीटर्न च्या २० पट कव्हर मिळु शकते, पण ते देत नाहीत, जाणकार लोक जरा माहिती द्या.
योगिबीअर, धन्यवाद... बरीच
योगिबीअर, धन्यवाद...
बरीच माहीती कळाली...आम्ही हा वीमा जेव्हा कोणतीही गुंतवणुक नव्हती तेव्हा घेतला पण लवकरच मायदेशी परतणार आहोत तेव्हा बंद करण्याचा निर्णय झाला आहे..ते माहीती काढुनच करु...बाकी कडे गुंतवणुक झाली आहे त्यामुळे थोडा ताण पण कमी झाला आहे आता...Term Life Insurance policy घेउ पण जेव्हा कायमचे माय्देशी परतु तेव्हाच...
आपले मनापसुन आभार...
सध्या एच डे एफ सी चे ऑनलाईन
सध्या एच डे एफ सी चे ऑनलाईन प्लान चांगले आहेत टर्म इन्श्युरन्स साठी.
इन्व्हेस्टमेण्टसाठी टॅक्स वाचवायचा असेल तर इ एल एस एस मध्ये गुंतवावे. (फायनान्शियल अॅडवायझर आणि दोन सीए ने दिलेल्या माहिती नुसार.)
LIC ला पर्याय नाही. तुम्हाला
LIC ला पर्याय नाही. तुम्हाला जर क्लेम मिळण्याची खात्री पाहिजे असेल तर LIC ला पर्याय नाही. claim sati LIC best ahe .....तुम्ही उदा . घ्या केदारनाथ दुर्घटनेचे वेळी privte companies refuse to claim .......पण LIC settel the claim........choice is urs....कारण आपण पॉलिसी कशा साठी घेतो.
पॉलिसी घेण्यापूर्वी पॉलिसी
पॉलिसी घेण्यापूर्वी पॉलिसी डॉक्युमेण्ट्स वाचण्याला पर्याय नाही. कोणतीही इन्श्युरन्स कम्पनी असो. एल आयसी किंवा इतर कोणतीही. माझ्या नजरेसमोर ट्क्निकल पॉईण्टस वर एल आय सी ने क्लेम नाकारल्याचे मी पाहिले आहे. माझी आई, सासरे, मावशी, दीर असे अनेक जण एल आयसीचे एजण्ट असूनही मी पूर्ण अभ्यास करूनच पॉलिसी घेते.
policybazaar.com चांगली वेब्साईट आहे पॉलिसी निवडायला.
Review: LIC New Term Plans –
Review: LIC New Term Plans – Amulya Jeevan II & Anmol Jeevan II
मला असा एखादा विमा सुचवू
मला असा एखादा विमा सुचवू शकाला का ज्यामधे मी दरमहा ३ ते ५ हजार विम्याचे पैसे भरतो आणि माझ्या वयाच्या ६० ते ६५ मधे मला मी भरलेले पैसे व्याजासकट परत मिळतील? जर कधी काही अकस्मात अपघात झाला वा आजार झाला तर विमा मला अशावेळी चांगली रक्कम देईल? मी सिंगल आहे त्यामुळे मला बायका मुलांचा विचार करायची गरज नाही पण आई भावंड भाचा भाची पुतणी हे सर्व अतिशय प्रिय आहेत.
तसा माझा मनू लाईफचा विमा आहे. मला आपल्या भारतला एखादा विमा हवा आहे. शक्यतोवर एल. आय. सी. चा सुचवा.
.
मी बिरला सन लाइफ इंन्शुरन्स
मी बिरला सन लाइफ इंन्शुरन्स घेण्याचा विचार करते आहे.
मनी बॅक प्लस पोलिसी.
पोलिसी मॅच्युरिटी २५ years नंतर. कोणाला काही चांगले वाईट अनुभव असतील तर प्लीज सांगा.
इन्शुरन्स फक्त टर्म इन्शुरन्स
इन्शुरन्स फक्त टर्म इन्शुरन्स असावा असे तज्ञ सांगतात!
टर्म इन्शुरन्स कुठला चांगला
टर्म इन्शुरन्स कुठला चांगला आहे सध्या ?
३५ वय, १५ लाख वार्षिक उत्पन्न, साधारण कोणता प्लॅन घ्यावा? काय बाबी विचारात घ्याव्यात? याबद्दल कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
टर्म इन्शुरन्स मध्ये परतावा अपेक्षित नाही
आयुष्य ७५ वर्षे ग्रुहित धरले.
आयुष्य ७५ वर्षे ग्रुहित धरले. हाच इन्कम कायम राहण्यासाठी ८ टक्के दराने ७५ व्या वर्षी तुमची गरज साधारणत: ३ कोटी आहे. समजा तुमची अन्य गुंतवणुकी पासूनची मुद्दल अधिक व्याज रु. १ कोटी धरले. तर रु. २ कोटी चा टर्म इन्श्युरन्स लागेल.
मला term insurance
मला term insurance
घ्यावयाचा आहे
माझ वार्षिक उत्पन्न 5-6 लाख आहे ( पगारदार )
मला जास्तीत जास्त किती आणि कोणता इन्शुरन्स घ्यावा लागेल...?
Tata AIA insurance विषयी आपल मत काय
कारण ह्याचा हप्ता सगळ्यात कमी आहे
मी कोणता term insurance घेऊ ह्या विषयावर जरा मार्गदर्शन करावे...?
...
...
तीस वर्षे मुदतीचा इन्शुरन्स
तीस वर्षे मुदतीचा इन्शुरन्स - कव्हर १ कोटी रूपये
१. LIC Tech -Term Plan 854 घेतला तर वार्षिक हप्ता ७ ते ८ हजार* येतो. ( ३० वर्षात एकूण रू. २ लाखाच्या आसपास पैसे जातात )
२. LIC's Jeevan Amar - Term Plan (855) वार्षिक हप्ता ११७०६/- *रूपये.
तीस वर्षे मुदतीचा इन्शुरन्स - कव्हर २५ लाख रूपये
३. LIC's Saral Jeevan Bima- Term Plan (859) - वार्षिक हप्ता रू. १२८०३/- *येतो.
एल आय सी चीच पॉलिसी घ्यायची असेल तर एव्हढा फरक का ? कुणीही पहिलीच पॉलिसी घेईल. जीवन सरलचं कव्हर १/४ आहे आणि हप्ता सर्वात जास्त. काय लॉजिक आहे ? ( आयटी रिटर्न्स द्यावे लागतात का मोठ्या रकमेसाठी ?)
(* - एल आय सी च्या साईटवर प्रत्येकाला आपल्या गरजेप्रमाणे कॅलक्युलेशन करायची सोय आहे.)
https://ebiz.licindia.in/D2CPM/?_ga=2.121810895.512968665.1660015542-846...
आपल्याला इन्शुरन्स कव्हर
आपल्याला इन्शुरन्स कव्हर कितीचं घ्यायला पाहीजे यासाठी एक गाईडलाईन म्हणून हे बरं वाटलं.
https://ebiz.licindia.in/D2CPM/?_ga=2.121810895.512968665.1660015542-846...
मॅक्स वाले घरी येऊन लॅपटॉपवर करून दाखवतात. कम्पॅरिजन पण दाखवतात. व्हॉट्स अॅप / ब्ल्यूटूथला शेअर पण करतात.
उस्तुकते पोटी LIC Tech -Term
उस्तुकते पोटी LIC Tech -Term Plan 854 ची पॉलिसी बघितली, टर्म इन्शुरन्स मध्ये खुप चांगली वाटली. १ कोटीचा वर पॉलिसी घेतली तर रिबेट पण आहे.
online document मध्ये एक अट आहे वर्षाचे payment कमित कमी ५०००० रुपये पाहिजे, काही catagory साठी ३०००० रुपयाचा पर्याय पण आहे पण तो कधी लागु होतो ते कळले नाही. त्यामुळे एकतर जास्त रकमेची पॉलेसी घ्यावी लागेल किंवा सिंगल र्पिमियम / कमी वर्ष प्रिमियम भरायची पॉलिसी घ्यावी लागेल.
सिंगल प्रिमियम किंवा पॉलिसी टर्म पेक्षा १० वर्ष कमी प्रिमियम भरण्याचा पर्याय पण आहे. ३० वर्ष वया असेल तर १ करोड ची २० वर्षाच्या पॉलिसी साठी फक्र ८७००० सिंगल प्रिमियम आहे (कर वेगळा) , २ करोड किंवा वर २०% सवलत.
वर्षाचे payment कमित कमी
वर्षाचे payment कमित कमी ५०००० रुपये पाहिजे >>> सिंगल प्रिमियम घ्यावी लागेल बहुतेक. इन्शुरन्स एलिजिबिलिटी तेव्हढीच असेल तर टॅक्स सेविंगसाठी एकच वर्षे घेता येईल.
अॅको नावाच्या कंपनीची पॉलिसी सगळ्यात स्वस्त आहे. पण कंपनी राहील का २० वर्षांनी ?
कंपनीचा स्वतःचा री इन्शुरन्स
कंपनीचा स्वतःचा री इन्शुरन्स असेल की
Pages