बाजरी वडे

Submitted by लंपन on 4 July, 2022 - 09:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ वाट्या बाजरीचे पीठ
2 टे स्पून आलं, हिरवी मिरची, लसूण पेस्ट
2 टी स्पून काश्मिरी लाल तिखट
2 टी स्पून जिरे पूड
2 टी स्पून धने पूड
कोथिंबीर बारीक चिरलेली
3 टे स्पून दही
1 1/2 टे स्पून तीळ
हिंग, हळद , मीठ , साखर चवीनुसार,
2 टे स्पून तेल
पाणी

क्रमवार पाककृती: 

बाजरीच्या पिठात वरील सर्व जिन्नस एकत्र करून पीठ मळून घ्या. एकदम सैल वा एकदम घट्ट मळू नका. दह्याऐवजी (आणि पाणी न घालता) पीठ ताकातच मळले तरी चालेल. पीठ मळून झाले की तसेच अर्धा तास झाकून ठेवा. आता कढईत तेल गरम करा. मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून हातावरच वडे थापा आणि मंद आचेवर तळा.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

दही / ताक आणि साखर घालायचीच आहे. तिखट कमी जास्त करू शकता. बाजरी आहे म्हणून मीठ लागणार आहे. कोथिंबीरीऐवजी मेथी घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक, यु ट्युब चॅनेल्स
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॉइंट नोटेड उद्याच गनीम मार्केटला धाडून परत येईपर्यंत मोहीम फत्ते करून झाकपाक मोकळं व्हावं म्हणतो

खूप दिवसांपासून करायचे होते. अखेर केले. खूप मस्त झालेले. गरमगरम लगेच संपले. अर्धे संपल्यावर फोटो घाईघाईने काढला image_6487327.JPG

रेसिपीबद्दल धन्यवाद

आज केले होते हे वडे
मस्त खुसखुशित झाले होते, मी थोडी कसुरी मेथि,एक चमचा कणीक्,एक चमचा डा.पिठ घातल होत.

काल केले हे वडे. फोटो काढायचा राहिला. ताकात भिजवलं पीठ. थोडं सैल भिजवलं गेलं. पण चवीला एकदमच मस्त झाले होते. सगळ्यांना आवडले! ताकाची आंबटसर चव छान लागते. Happy पाकृसाठी धन्यवाद!

Pages