सिलबीर उर्फ टर्किश एग्स : तुर्की तडका

Submitted by जेम्स वांड on 23 July, 2022 - 05:07
टर्किश कुझिन, सिलबीर, एग्स, अंडी
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य खालीलप्रमाणे

पोच एग्स/ हाफ फ्राय एग्स करता अंडी -
१ किंवा २

योगर्ट :-
१. चार चमचे मध्यम आंबट किंवा गोडसर दही, मी वारणा कप मधले वापरले (अर्धे दही पाणी काढून घट्टसर त्यात अर्धे दही नॉर्मल दोन्ही फेटून तयार ठेवावे)
२. मिरी पावडर १/४ छोटा चमचा
३. काश्मिरी मिर्ची पावडर १/२ चमचा
४. मोठी असल्यास १ लहान असल्यास २ लसूण कळ्या ग्रेटर मधून बारीक किसून.

अलेप्पो बटर :-
१. अमूल बटर - १ चमचा
२. चिली फ्लेक्स - एक पुडी (डोमिनोजवाली वापरली)
३. तिखट पूड किंवा स्मोक पापरीका - १/२ चमचा
४. जिरेपूड - १/४ चमचा

चिली/ आलेपिन्यो पार्सले ऑइल :-
१. तिखट हिरवी मिर्ची - १ बारीक तुकडे करून
२. कोथिंबीर पाने ४-५ काड्यांची धुवून
३. ऑलिव्ह ऑइल किंवा ते नसल्यास कुठलेही स्वीट ऑइल (मी शेंगदाणा तेल वापरले घाण्यावरचे) - १ चमचा.
४. अगदी चवीपुरते मीठ.

क्रमवार पाककृती: 

आज एकंदरीतच Brunch प्रकारातील काहीतरी करण्याची ईच्छा होती पण फार साग्रसंगीत घाट घालण्याची तयारी नव्हती कारण पावसाळी आळस अन आठवडाभर कामानं पडलेला पिट्ट्या.

अश्यात दमदमीत काहीतरी पण लवकरात लवकर होईल असे करायचे डोक्यात आल्याने आज सिलबीर उर्फ टर्किश एग्स करून बघितली, अन महाराजा फर्स्ट अटेम्प्ट जीआरई क्लिअर होऊन मनाजोगती युनिव्हर्सिटी फुल स्कॉलरशिपवर मिळावी इतकी जबरदस्त जमली.

ही रेसिपी तीन भागांत असते, योगर्ट बेस, ऑईल्स आणि कम्पोजिशन ऑफ द डिश.

कृती :-

१. योगर्ट -
फेटलेल्या दह्यात मिरी पावडर, मिर्ची पावडर आणि बारीक किसलेली लसूण कळी घालून ते एकजीव करावे. हे दही बाजूला ठेवावे , ह्यात आपल्याला मीठ घालायचे आहे पण प्लेटिंग करेपर्यंत घालू नये, ऐन वेळेवर घालायचे असते.

२. अलेप्पो बटर -
तडका करण्याच्या भांड्यात चमचाभर किंवा आवडत असल्यास २ चमचे अमूल बटर गरम करावे, बटर वितळून त्याचा "crackling" आवाज होत बुडबुडे फुटू लागले की ह्या स्टेजला त्यात चिली फ्लेक्स, तिखटपूड/ पापरीका पूड व जिरेपूड घालून लगेच गॅस वरून उतरवून ढवळून घ्यावे, हे बटर असलेला तडका पॅन तसाच बाजूला ठेवावा.

३. चिली/ आलेपिन्यो पार्सले ऑइल -
लाकडी खलबत्यात किंवा असेल त्या खलबत्यात किंवा मिक्सर मध्ये मिर्चीचे तुकडे आणि कोथिंबीर पाने फिरवून घ्यावीत गंध पेस्ट करायची नाही ओबडधोबड सरबरीत करायची असते, आता एका वाटीत ही पेस्ट काढून त्यावर कच्चे शेंगतेल/ ऑलिव्ह ऑइल अन चवीनुसार मीठ घालून मिक्स करून बाजूला ठेवावे

प्लेटिंग -
वरती सांगितल्या प्रमाणे दह्यात चिमूटभर मीठ घालून फेटून घ्यावे. एका प्लेटमध्ये वरती तयार केलेले योगर्ट/ दही घालून चमच्याने नीट एकसमान पसरून घ्यावे, पसरताना त्यात चिली ऑइल व अलेप्पो बटर टाकायला कंगोरे करून घ्यावेत

त्या दह्यावर आता वरती बनवलेले चमचाभर चिली/ आलेपिन्यो पार्सले ऑइल पसरून घालावे,

इतके झाले की अंडे वाटल्यास पोच (poach) किंवा हाफ फ्राय करून त्या योगर्ट बेड वर ठेवावे, मी हाफ फ्राय केले कारण मला पोचिंगचे परत नवीन भांडी करून कुटाने करणे मनापासून नको वाटत होते,

हे झाले की त्यावरून गार झालेले अलेप्पो बटर ड्रीझल करावे, सोबतीला पिटा ब्रेड खातात जनरली, पण मी घरी होती तीच ब्राऊन ब्रेड कडा कापून कडक भाजून घेतले होते, चालत असल्यास अगदी चपाती घेतली सोबत तरी चालेल.

20220723_131143-01.jpeg20220723_131116.jpg

वाढणी/प्रमाण: 
एका माणसासाठी
माहितीचा स्रोत: 
आंतरजाल
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक यु ब्लॅककॅट आणि वावे ,

थोडं वेळखाऊ आहे पण सिम्पल अन सोपं आहे टेस्ट अफलातून आहे, मला आधी वाटलं होतं दही अन अंडी ते पण कच्च्या लसणीसोबत कशी लागतील पण तुफान लागतात.

अरेच्या !

पलीकडे मिपावर पण रेसिपी टाकली, इकडं पण टाकली अंडी न खाणारी जनताच जास्त बहुमतात दिसतेय एकंदरीत !

आणि असे असूनही आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार आपले मंडळी !

आभार प्राजक्ता आणि लंपन !.......

तुम्ही बरोबर म्हणताय लंपन, एक परफेक्ट रेसिपी कूक करणे म्हणजे एक पेंटिंग कंपोज करण्याचे सुख असते, उलट ह्यात तर कलर सोबत चव अन वास ही ज्ञानरंध्रे पण इन्व्हॉल्व असतात, कधीकधी हायपर रिऍलिटी साकारणाऱ्या कलाकाराला पण एक सरळ रेघ ओढता येत नाही, इटालियन न्योकी किंवा फ्रेंच बागेट लोफ बनवताना तो ही साक्षात्कार होतो, ह्यात काय बटाट्याचे डंपलिंग्ज तर आहेत किंवा ब्रेडच तर आहे साधी वाटणे साहजिक असते पण एकंदरीत परफेक्ट लोफ बनवणे एक आर्टिसनल प्रकार आहे हेच खरे. Happy

आय सिम्पली लव माय फूड Lol

अर्रर्रर्रर्र, एकूण अजून एक अंडी प्रेमी विथ या रायडर, पण ह्यामुळे डोके चालतेय थोडे, जर आपण हाफ फ्राय न करता प्लेन ब्लॅक पेपर, सॉल्ट वाले ऑम्लेट करून त्याच्या पठाणी ऑम्लेटसाठी पट्ट्या कातरतो तसे करून एका बाउल मध्ये त्या ऑम्लेट झिरमिळ्या, त्यावरच आपले गार्लिक योगर्ट अन अलेप्पो बटर सोबत चिली पार्सले ऑइल घालून मिक्स केले, तर सॉर्ट ऑफ किटो वर्मीसेली टाईप प्रकार तयार होईल की ! चव परफेक्ट सिलबीरची त्यातही !

अंडे फारसे न आवडर्यांमधे मी पण Happy .
त्यात half fry किंवा poached म्हणजे नाहीच
त्यात अंडे आणि दही म्हणजे नाहीच नाही.
वावे ने सांगितले तसे , वांगे वापरून बघेन कदाचित.
पण लिखाण आणि फोटो नक्कीच आवडला.

@स्वस्ति - आपापली टेस्ट आहे, पण एकंदरीत वांगे वापरायचे असले तर भरताच्या वांग्याची स्लाईस ग्रील करून मीठ मिरी भुरभुरून वापरलेली टेस्टी असेल.

@च्रप्स -बरोबर आहे तुमचे, पण एकंदरीत प्रत्येकवेळी एग्स कंटॅमिनेटेड असतीलच असेही नाही, ऑस्ट्रेलियन एग कौन्सिलनुसार अंडे ७४℃ च्या वरती शिजवले (पांढरे पूर्ण सेट अन बलक अर्धवट सेट) तरीही सेफ असते, झाकून शिजवणे म्हणजे स्टीम ट्रीटमेंट पण होतेच, अर्थात आपण वन इन थाऊजंड्स असण्याची स्लाईट रिस्कही अव्हॉइड करण्यास तुमचा सल्ला रास्त आहे कारण अमेरिकेतले उदाहरण बघता सालमोनेला हे मोस्ट कॉमन फूड पोयझनिंग रिझन आहे. आपापली ऑप्शन वे इन करावीत हे पटते. साधे मिरेपूड मीठ घालून केलेले ऑम्लेट घालून ट्राय करायला हवी ही रेसिपी.

@सायो - थँक्स, अंडी सोडून मात्र ही रेसिपी फक्त वांग्यासोबत बनू शकेल ती पण कशी हे माहिती नाही त्यामुळे, बनी तो बनी नही तो परभणी वृत्तीने प्रयोग करायला हवा.

रेसिपी मस्त… मला अंडे खायला खुप आवडते आणि सनी साइड अप तर खुपच.. त्यात आधी ते पिवळे खाउन मग बाजुचे मस्त कुरकुरीत पांढरे खायला मजा येते. मी सनी साइड अप बनवताना मुद्दाम त्याला कुरकुरीत करते.. रेसिपी नक्किच करुन पाहते,वाचतानाच तोंडाला पाणी सुटत होते.

जेवणाची तुलना पेन्टिन्गशी केली.. मस्त उपमा.

हा प्रकार फार मस्त लागतो.
मोबाईल वरून फोटो जात नाहीये, त्यामुळे उद्या टाकीन ते

मी बटर सोबत चिपोतले चिली वापरतो...

फोटो मस्त, मलाही साधना सारखच हाफ फ्राईड खुप आवडते.. पण दही आणी अंड कस लागेल ह्या बद्दल शंका आहे..
सध्या एक तुर्की सिरीयल बघते आहे त्यात ते बर्याचदा नाश्ता करतांना दाखवतात. त्यामुळे त्यान्च्या जेवणाबद्दल उत्सुकता आहे...

<< थँक्स मेझमॅन >>
माझ्या मते तो आय.डी. "माझे मन" आहे. चू.भू.दे.घे.

मला अंड्याचा काही प्रॉब्लेम नाही पण दही प्लस अंड कसे लागेल हा विचार करत आहे.

हाफ फ्राय/ पोच अंड्या ऐवजी आम्लेट प्रिफर करेन

चव आवडेल न आवडेल हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न..
पण छानच दिसतेय.

हाल्फफ्राय तर आमचा फॅमिली नाश्ता.. घरात सगळे फार आवडीने खातात. ही पाकृ वाचून समजून ट्राय करायला हवी.

दही आणि अंडी एकत्र कसे लागेल हे मला पण वाटलं होतं पण त्यात किसून घातलेलं लसूण अन मिरी पावडर अलग पंच देतात त्याला, सोबत पेपरिका , टेस्ट एन्हांस करायची असेल अन आवडत असेल तर बारीक चिरलेली डील किंवा शेपू गार्निश करायला वापरावा अन दह्यात पण चिमूटभर घालावा लसणीच्या सोबत. पण ओव्हरऑल दही अन अंडी वाटते तितके डेंजर वाटले नाही, उलट टेस्टी वाटले, हंग कर्ड बनवायचे नसल्यास थेट ग्रीक योगर्ट वापरले तरी चालेल.

रेसिपी अगदी वेगळीच आहे. दही + अंडं हे कॉम्बिनेशन कधी डोक्यातही आलं नसतं. असंच मास्टरशेफमधे दुधात मासे शिजवलेले पाहून दचकायला झालं होतं. अर्थात तितका नाही पण हलकासा धक्का बसला.

<<<<< मला अंडे खायला खुप आवडते आणि सनी साइड अप तर खुपच.. त्यात आधी ते पिवळे खाउन मग बाजुचे मस्त कुरकुरीत पांढरे खायला मजा येते. मी सनी साइड अप बनवताना मुद्दाम त्याला कुरकुरीत करते.. रेसिपी नक्किच करुन पाहते,वाचतानाच तोंडाला पाणी सुटत होते. >>>>> साधना, हे तू अगदी माझ्यावतीनं लिहिले आहेस. सेम टू सेम.

फोटो अप्रतिम आहे. एकदम प्रोफेशनल फुड फोटोग्राफी.

<<<<< , एक परफेक्ट रेसिपी कूक करणे म्हणजे एक पेंटिंग कंपोज करण्याचे सुख असते, उलट ह्यात तर कलर सोबत चव अन वास ही ज्ञानरंध्रे पण इन्व्हॉल्व असतात >>>> मस्त. अगदी खरंय.

मामी थँक्स, अहो प्रोफेशनल फूड फोटोग्राफी नाही, सॅमसंगच्या फोन्स मध्ये डेडीकेटेड "फूड मोड" असतो, अन्नपदार्थांचे मॅक्रो पद्धतीने प्रेझेंटेबल फोटोज घेण्यासाठी स्पेशल मोड दिलाय त्यांनी, तोच वापरला झालं !

अंडी लवर्स ऑफ द वर्ल्ड युनाईट !

Pages