Submitted by aashu29 on 20 July, 2022 - 04:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
भाकरी: मेथी चे पिठ- अर्धी वाटी, ज्वारी पिठ- दिड वाटी, कणिक-अर्धी वाटी (ऑप्शनल), मिठ, हळद, गरम पाणी, तेल.
चटणी:लाल सुक्या काश्मिरी किंवा रसगुल्ला मिरच्या(१२-१५), मिठ, कांदा(१), सुके खोब्रे(ऑप्शनल) जरासे, लसूण ६-७ पाकळ्या, तिळ, चिंच-गुळ भिजवून.
फोडणी साठी: हिंग, जिरे,मोहरी, तेल.
क्रमवार पाककृती:
भाकरी चे साहित्य गरम पाण्यात कालवून गोळा मळून १० मिन. ठेवावा. मग नेहमी प्रमाणे भाकर्या कराव्यात. जाडसर ठेवाव्यात. पिवळसर दिसतात. खूप खमंग लागतात. भाकरी ला खूप तेल लाऊ नये, किंचित परतताना लावावे.
चटणी चे साहित्य पैकी मिरच्या, सुके खोब्रे, तिळ फक्त एवढेच जिन्नस भाजून मग इतर साहित्या सोबत गंधगाळ मिक्सर करावे. मग फोडणी द्यावी.
ह्या चटणी भाकरी चा काला अप्रतिम लागतो. मला ही कॄती कुठे दिसली नाही म्हणुन पहिल्यांदाच पोस्ट करत आहे
घरी बनवताना फोटो घेऊन पोस्ट करेन.
वाढणी/प्रमाण:
३-४
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वेगळी रेसिपी. मेथीदाणे मिक्सर
वेगळी रेसिपी. मेथीदाणे मिक्सर वर बारिक केलेले मेथी पीठ ❓ मेथीदाणे भाजून घ्यायचे ❓
ओह मेथीचे पीठ, मला वाटले
ओह मेथीचे पीठ, मला वाटले हिरवी मेथीची भाजी घालून असेल
करून बघायला पाहिजे, वेगळी आहे. मेथीच्या पीठामुळे कडू लागत नाही का ?
ShitalKrishna >> लाडवासाठी मेथीचे पीठ मिळते, तेच असावे.
मला पण हिरवी मेथीच वाटलेले.
मला पण हिरवी मेथीच वाटलेले. चटणी भारी आहे करुन बघते.
घरी इंडक्षन असल्याने भाकरी भाजता येत नाही.
लाल सुक्या काश्मिरी किंवा
लाल सुक्या काश्मिरी किंवा रसगुल्ला मिरच्या म्हणजे निस्ता का?
निस्त्याची चटणी....
निस्त्याची चटणी....
गोव्याच्या कोकणी बोलीत निस्ते म्हणजे मासे!म्हणून इथे डोकावले.पण हे निस्ते पण मस्त आहे की.
माझ्या गावाकडे डायरेक्ट पीठ
माझ्या गावाकडे डायरेक्ट पीठ मिळते, ते भाजून दळलेले असावे. नक्की माहित नाही पण सहकार भांडारात रेडीमेड पीठ पाहिले आहे.
मेथीच्या पीठामुळे कडू लागत नाही का ?>> म्हणुनच प्रमाणात ज्वारी आणि कणिक घालावी. त्याने कडूपणा मरतो आणि खमंगपणा उरतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाल सुक्या काश्मिरी किंवा रसगुल्ला मिरच्या म्हणजे निस्ता का?>>> निस्त्याची चटणी म्हणजे मिरच्यांची चटणी. निस्तं म्हणजे नुसतेच..भाजी नसताना नुसत्या मिरच्यांची साईड डिश म्हणुन असे नाव पडले असावे.
सर्वांना धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिरचीच्या ठेच्याचे प्रकार
मिरचीच्या ठेच्याचे प्रकार
कुणीतरी नवीन धागा ठेचा
फोटो कुठेय?
फोटो कुठेय?
कुणीतरी नवीन धागा ठेचा>..
कुणीतरी नवीन धागा ठेचा>.. यस्स क्लेवर क्लेव र कोटी. माझ्या तर्फे तुम्हाला पाव किलो गुंटुर चिली.
ठेचिले अनंते ---
ठेचिले अनंते ---