एका विद्यार्थिनीसाठी तातडीने माहिती हवी आहे.
एका ठिकाणी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स / रोबोटिक्स / काँप्युटर इंजिनियरिंग अशा तीन शाखांपैकी एकीची निवड करायची आहे. आर्टिफिशिअल इंजिनिअरिंग अशी स्पेशलायझेशन असलेली पहिलीच बॅच असणार आहे. तिकडे प्रवेश घ्यावा कि रेग्युलर कंप्युटर इंजिनिअरिंग करून आर्टिफिशिअल इंजिनिअरिंगचे कोर्सेस करावेत किंवा पीजी करावे ? आर्टिफिशिअल इंजिनिअरिंग करून ज्या संधी मिळणार आहेत त्या कंप्युटर इंजिनिअरिंग करूनही मिळू शकतात का ? मी या क्षेत्राशी संबंधित नाही . त्यामुळे प्रश्न विचारताना चूक झाली असेल तर समजून घ्यावे.
कि रोबोटिक्सला प्रवेश घ्यावा. मुलींसाठी हे क्षेत्र कसे आहे ?
गरीबीतून आलेले कुटुंब आहे. आईने कष्ट करून मुलांना शिकवले आहे. एक्स्पोजर नसल्याने काय करावे याची माहिती नाही. खासगी कॉलेजच्या सीईटीत पास झाल्याने कॉलेजेस मागे लागले आहेत. एआय चांगले आहे असे त्यांना सांगण्यात आले आहे. जेईई नंतर प्रवेश मिळेलच असे नाही. तोपर्यंत थांबलात आणि इथे जागा संपल्या तर असा पेच पडला आहे. ( ही शंका इथे विचारायची नाही). पण जर या कॉलेज मधे प्रवेश घ्यायचा झाला तर कोणते क्षेत्र निवडले पाहीजे ?
मायबोलीवर या विषयातले जाणकार असल्याने इथे विचारल्यास फायदा होईल म्हणून हा प्रपंच. कृपया या विद्यार्थिनीला योग्य सल्ला द्यावा ही नम्र विनंती.
( आपण देणार असलेली माहिती नंतर कदाचित इतरांनाही उपयोगी पडू शकेल).
Lili poonawalla Foundation
Lili poonawalla Foundation website check kara for scholarships
काँप्युटर इंजिनियरिंग/सायन्स.
काँप्युटर इंजिनियरिंग/सायन्स.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स / रोबोटिक्स या उपशाखा आणि फक्त मार्केटिंग फंडे आहेत कॉलेजेसचे. कॉम्पुटर इंजिनीरिंग करून या उपशाखामध्येसुद्धा उत्तम करियर करता येते.
कंप्युटर इंजीनीअरिंग करु द्या
कंप्युटर इंजीनीअरिंग करु द्या!
उत्तम धागा आणि लोकांनी अगदी
उत्तम धागा आणि लोकांनी अगदी मॅच्युअरली उत्तरं दिली आहेत.
अमितव +१.
रोबॉटिक्स तर इथे (सिंगापुरात) प्राथमिक शिक्षणात १ विषय म्हणुन आले आहे (करिक्युलर म्हणुन वेटेड सबजेक्ट नाही).
माझ्या मुलाने सेकंण्डरीत रोबोटिक्स ज्यादा चा सब-विषय घेऊन शिकला आहे. उपयुक्त आहे आणि शिक्षणात अनेक संधी देखिल आहेत पुढे. पण ईंजिनियरींग करता कॉम्प्युटर किंवा तत्सम आवडिचा विषय घेऊन पुढे स्पेशलायझेशन करावे!
कंप्युटर इंजीनीअरिंग करु द्या
कंप्युटर इंजीनीअरिंग करु द्या!+११११
सर्वांचे आभार. खूप छान
सर्वांचे आभार. खूप छान मार्गदर्शन केले आहे सर्वांनी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथून पुढे पण कुणाला या धाग्याचा उपयोग झाला तर आनंद होईल.
फारएंड यांच्या पोस्टशी १००%
फारएंड यांच्या पोस्टशी १००% सहमत. आताचे व्यावसायिक जग जितके स्पर्धात्मक आहे तितक्या तयारीचे आपले इंजिनिअरिंग किंवा खरे तर कोणतेच व्यावसायिक कोर्सेस नाहीत. अनिल सहस्रबुद्धे जे सध्याचे एआयसिटीइ चे चेअरपर्सन आहेत आणि पुर्वी सीओईपीचे डायरेक्टर होते त्यांची खालील मुलाखत चिंतनीय वाटली:
https://indianexpress.com/article/idea-exchange/anil-sahasrabudhe-idea-e...
कंप्युटर इंजीनीअरिंग पुर्ण
कंप्युटर इंजीनीअरिंग पुर्ण करुन नंतर आर्टिफिशिअल ईंटेलिजन्स निवडता येउ शकते. पण आर्टिफिशिअल ईंटेलिजन्स साठी आधी कंप्युटर इंजीनीअरिंग पुर्ण करणे बरे पडेल.
पण सर्व कौलेज मध्ये अभासक्रमात तसा फार फरक नसतो डिग्री लेव्हलला. स्पेशलाझेशनला गेल्यावरच फरक पडेल
रानभुली, माझी लेक ही NYU, New
रानभुली, माझी लेक ही NYU, New York मधून Artificial Intelligence आणि Machine learning minor घेऊन MS करत आहे.
AI चांगलेच आहे.
AI चांगलेच आहे.
छान सल्ले दिलेत सर्वांनी.
छान सल्ले दिलेत सर्वांनी. रानभुली, कॉलेजकडून कोर्सची त्यात कधी काय शिकवणार अशी माहिती पण मिळवता आली का? येईल का? त्याने अजुन स्पष्ट होईल.
थोडं वेगळं मत मांडतोय,
थोडं वेगळं मत मांडतोय, संपादकांना किंवा धागा लेखकास आगाऊ वाटल्यास काढून टाकावे मी माफी आगाऊच मागून ठेवतो, कारण,
ह्यात तीन सेट्स दिलेत कोर्सेसचे, मुलीच्या घरची परिस्थिती दिली आहे ओके, पण
मुलीला काय करायचे आहे ?
ह्यावर पुरेशी क्लेरिटी नाही, त्यामुळे मी इथे तांत्रिक किंवा कोर्स संबंधी सल्ले देणार नाही, तर वेगळं काहीतरी बोलणार आहे.
पोरगी कष्टातून गरिबीतून वर येते आहे, अतिशय स्तुत्य आहे, अशी चारदोन उदाहरणे बघण्यात आहेत, त्यांच्यापैकी २ लोकांच्या फिया पण आमच्या पिताजींनी भरल्या होत्या हे स्वकुलस्तुतीचे सार्थ दासबोध प्रणित मूर्ख लक्षण पत्करून मी इथे नमूद करतोय.
अश्या केसेसमध्ये मुलांना अकाली प्रौढत्व येतं, जबाबदारीची जाणीव होते, त्यातून पोरे लवकरात लवकर स्वकष्टार्जित स्थैर्य अन आर्थिक सुबत्ता मिळून आपले अन आपल्या कुटुंबाच्या आर्थिक / सामाजिक गरिबीचे फेरे सुटण्याची आशा बाळगून असतात. ते चूक नाही, पण मला वाटतं उलट अश्या केसेसमध्ये समुपदेशन किंवा कलचाचणी केली तर आपण कैक आयुष्य अजून सुंदर करू शकतो, एकेकाळी स्पर्धा परीक्षा मास्तर म्हणून काम केल्यावर अशीही उदाहरणे बघितली आहेत जिथं रखडत रखडत एटीकेटी लावत ६ वर्षे लावून बीएससी अन ८ वर्षे लावून बीई झालेली मुले पहिल्याच फटक्यात उप-जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस/विक्रीकर/ अबकारी उप- अधीक्षक असे एमपीएससी थ्रू किंवा आयएएस-आयपीएस-आयआरएस इतकेच नाही तर अगदी मानाच्या इंडियन रेल्वे ट्राफिक सर्विस, इंडियन डिफेन्स अकाउंट्स सर्विस वगैरे सेवा शाखांत उच्च पदस्थ झाली आहेत.
कधीतरी वाटते पोरांना आपण चाकोरीबद्ध करतो कारण पैसा/मानपान/सामाजिक उतरंडी/ परदेशगमन इत्यादी समाजमान्यता प्राप्त "यशस्वी असण्याच्या परिमाणाना" प्राप्त करायचे ते ट्राईड अँड टेस्ट केलेले मार्ग असतात अभियांत्रिकी अन तदानुषंगिक शिक्षण टाकाऊ असे मी अजिबात सुचवत नाहीये पण
पाल्याचा कल पाहून त्यातून आर्थिक/ सामाजिक स्थैर्य अन जीवनमान उंचवण्याचे मार्ग शोधले तर ते पाल्य पालक ह्यांना तर सुसह्य अन उत्तम होईलच पण असे पाल्य ज्या क्षेत्रात जाईल ते तिथून शिकून बाहेर पडल्यावर समाजासाठी एक ऍसेटच ठरतील
इथे कल म्हणजे आवड असे मला म्हणायचे आहे, चाकोरीबद्ध सगळे करतात म्हणून केलेली घोकंपट्टी बेस्ड कागदावर उमटलेले मार्करुपी आकडे नाही
जेम्स वांड - छान विचार.
जेम्स वांड - छान विचार.
जेम्स वांड , खूपच सुंदर
जेम्स वांड , खूपच सुंदर प्रतिसाद. खरंच खूप छान लिहीलेलं आहे.
सुनिधी , त्यांना तिन्ही शाखांचा अभ्यासक्रम मिळाला.
रानभुली,
रानभुली,
विषयाचं मर्म आणि कंटेंट समजून घेतल्याबद्दल आपले कौतुक करतो, जुन्या दिवसांना आठवत स्पर्धा परिक्षांतील अभ्यास ह्या विषयावर वेळ मिळाल्यास एखाद लेख लिहावा म्हणतो, पोराचा कल १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाचा अभ्यास करण्याकडे असेल तर त्याला मारून मुटकून ओम्स लॉ शिकवून उपयोग नाही, तर १८५७च्या अभ्यास वापरून अर्थार्जन ते ही सन्माननीय अर्थार्जन कसे करता येईल हे शिकवण्यात मजा असेल असे मला वाटते कायम.
तुम्ही दिलेल्या 3 अभ्यासक्रमांचा किंवा ज्ञानशाखांचा तसा माझा काही खास अभ्यास नाही, त्यावर वरती विषय तज्ञ लोकांनी उत्तम सल्ले दिले आहेतच हे पण इथे नमूद करणे माझे काम होय.
कल असा 'एकच 'असू शकतो का?
कल असा 'एकच 'असू शकतो का?
मी इंजिनिअरिंग केलं नसतं आणि समजा आर्टस् मध्ये गेलो असतो तर भाषा इतिहास इ. रस होता. कॉमर्स ला जाऊन analytical स्किल ठीक ठाक असल्याने पुढे एम बी ए वगैरे जमलं असतं. स्पर्धा परीक्षा ही देऊ शकलो असतो. विज्ञान शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायो सगळ्यात ठीक ठाक गती होती. त्यामुळे पुरेसे प्रयत्न केले असते तर नावेने पैलतीर गाठला असता. बायो मध्ये रस होता पण मराठी माध्यमातून आल्याने शब्द आणि स्पेलिंग यात मार खात होतो. त्यात थोडे प्रयत्न तेव्हा केले असते तरी पुढे गेलोच असतो.
आज मागे वळून बघताना मला परत १०/ १२ वीत सोडलं आणि यातील कुठे जाऊ असा प्रश्न परत पडला तर काय निवडेन याचं ठोक उत्तर देता येईल का याची आजही शाश्वती नाही. पण आत्मविश्वास आलेला असल्याने कुठेही गेलो तरी यश मिळेलच याची मात्र खात्री असेल. नाही जमलं एखादं क्षेत्र तर मार्ग काढायची अक्कल आलेली आहे. गरिबीतून वर आल्यावर रिसोर्सेस कमी असल्याने हे मागे पुढे करणं प्रत्येक वेळी शक्य नसेल हे जाणतो. फक्त मला विचारायचं होतं की असा कल वगैरे काही ठोस असतं का?
'हे नाही ' इतपत असू शकतं, जे माझ्या बाबतीत प्युअर आर्ट... चित्रकला इ मला गती नाही हे समजलं होतं. पण ' हेच करु ' असं काही असतं का? असू शकतं का? असावं का? नसेल मला वाटतं. असू ही नये असंच वाटतं.
आज पैसे मिळवल्यावर मला पैसे मिळवणे आवडते हे मला समजलेले आहे. पैशामागे न धावता ही पैसे मिळवता येतात हे सुध्दा समजले आहे. ध्येयाकडे वाटचाल करत रहाणे/ पर्झवियरंस हा एक गुण असला आणि अगदीच चुकीच्या क्षेत्रात गेला नाहीत की बस!
वरील काही क्षेत्रात गेलो असतो आणि पुरेसा (?) पैसा मिळाला नसता तर .. या जर तर ला अर्थ नाही खरतर. पण रिटायर झाल्यावर खयाल अच्छा आहे झालं.
ध्येयाकडे वाटचाल करत रहाणे/
ध्येयाकडे वाटचाल करत रहाणे/ पर्झवियरंस हा एक गुण असला आणि अगदीच चुकीच्या क्षेत्रात गेला नाहीत की बस!
प्रिसाईजली, माझा पॉईंट जवळपास जाणारा आहे, हेच करू हे मी पण म्हणत नाहीये पण साधारण आवडीचा अंदाज घेऊन, काय करू नये हे ठरवलं का बस, मला इतिहास आवडत असे, गणित अजिबात नाही, तरी शेवटी पियर प्रेशरमध्ये इंजिनिअरिंग घेतलं अन स्वतःच स्वतःचे हाल करून घेतले, पदरी पडलं अन पवित्र झालं केलं का ती ऍडजस्टमेंट होते अन ऍडजस्टमेंट्स हॅव देअर ओन काँसीक्युइन्सेस सर, ते इतर कोवळ्या पोरांसोबत होऊ नये अशी फक्त माझी प्रामाणिक इच्छा बाकी काही नाही, कमवायचा पैसाच आहे हे जसे तुम्हाला कैक वर्षानंतर कळले म्हणताय तसे आधीपासून स्वच्छ डोक्यात असले की तो आवडीच्या क्षेत्रातून कमावला तर जास्तच मिळू शकेल असे वाटते. आवड नेमकी काय अन ती कशी डिफाईन करायची ह्यावर भारतात एकंदरीत समुपदेशनाची वानवा आहेच तूर्तास पण नॅचरल इंटरेस्ट नाम की भी चीज होती है, तुम्हाला सगळ्या विषयांत उत्तम गती होती हे स्तुत्य आहेच पण आपण अपवाद आहात अन त्याने उदाहरणे सिद्ध होऊ शकत नाहीत.
कल असा 'एकच 'असू शकतो का? >>
कल असा 'एकच 'असू शकतो का? >> +१
आज पैसे मिळवल्यावर मला पैसे मिळवणे आवडते हे मला समजलेले आहे. >> +१
Managing your career is like investing - the degree of difficulty does not count. So you can save yourself money and pain by getting on the right train. - Warren Buffett
अपवाद असेन असं वाटत नाही
अपवाद असेन असं वाटत नाही म्हणून विचारात होतो.
कशी करतात आवड डिफाईन?
नॅचरल इंटरेस्ट कसा काढतात?
काय आवडत नाही, हे माहीत असले
काय आवडत नाही, हे माहीत असले तर process of elimination केली तर ती पण चांगली सुरुवात होऊ शकेल.
Doing what you like Vs. liking what you do या विषयावर सरांनी १ धागा विणावा, अशी विनंती करतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जेम्स वांड यांची पोस्ट समजली
जेम्स वांड यांची पोस्ट समजली पण अनेकांना अगदी १९-२० वर्षांपर्यंत आपल्याला नक्की कसली आवड आहे हे माहीत नसते (म्हणूनच थ्री इडियट्स मला पिक्चर म्हणून धमाल वाटला तरी त्यातला मेसेज बकवास आहे असेच नेहमी वाटते. ज्यांना १५-१६व्या वर्षीच आपले क्षेत्र कळले असेल त्यांच्याकरता ठीक आहे. बाकी असंख्य लोकाना तो उपयोगाचा नाही). मलाही नव्हते. इलेक्ट्रॉनिक्स मधे शिकत असताना प्रोग्रॅमिंग हा प्रकार आपल्याला आवडतो व त्यात बर्यापैकी गती आहे हे समजले. तेव्हा या क्षेत्रात नोकरी करावी असे वाटले. तसा तो "कन्विनियंट" विचार होता
कारण त्या क्षेत्रात तेव्हा नोकर्या उपलब्ध होउ लागल्या होत्या. मेकॅनिकल वगैरे क्षेत्रे "सॅच्युरेट झाली आहेत" असे बरोबरचे पब्लिक म्हणत असे. मला हे या लोकांना कसे समजते प्रश्न पडत असे.
तर मुख्य मुद्याकडे. आपला कल कशात आहे हे अनेकांना किंवा बहुतेकांना अगदी कॉलेज संपेपर्यंत समजत नाही. तेव्हा एका ठराविक वर्षापर्यंत "जनरलाइज्ड" अभ्यासक्रम निवडला तर खो खो मधे जसे आपण जोपर्यंत एका खांबाची दिशा पकडत नाही तोपर्यंत दोन्ही पर्याय ओपन असतात तसे होते. किंवा मग एकदा विषय निवडल्यावर सुध्दा बदलणे सोपे असले तर चांगले.
अनेकदा लोक हॉबी टाइप इंटरेस्ट आणि ज्यात आपण करीयर करू शकतो तो विषय या दोन्हीत गल्लत करतात. मला फोटोग्राफीची खूप आवड होती. पण एसएलआर कॅमेरा घेतला व फोटोग्राफीबद्दल आणखी माहिती काढू लागलो तेव्हा जाणवले की आपला इंटरेस्ट परफेक्ट फ्रेम पकडण्याइतकाच आहे. त्यात मग फिल्टर, एक्स्पोजर, अॅपर्चर वगैरे मंडळी आली की कंटाळा येतो. मला एकेकाळी क्रिकेट स्टॅट्स मधे इतका इंटरेस्ट होता की मी बरेच विक्रम सहज सांगत असे. पण एका लेव्हलनंतर त्याचाही कंटाळा आला. तेव्हा कॉलेजच्या वयात एखादा विषय आपली पॅशन आहे वगैरे समज त्या विषयात ३-४ तास घालवण्याइतकी, त्यातील शास्त्रीय माहिती मिळवण्याइतकी, आणि रोज ८-१० तास त्यावर काम करण्याइतकी ती आहे का हे पारखून घेणे आवश्यक असते.
रानभुली, जमल्यास ते इथे देता
रानभुली, जमल्यास ते इथे देता आले तर पहा. म्हणजे नीट कळेल. आमच्यावेळी कंप्युटर इंजिनीयर एक ना धड भाराभर होते. हल्ली बदल झाला असेल, नसेल माहिती नाही. त्यामुळे एआय कोर्स मधे नक्की कसा रस्ता आहे, त्यात कंप्युटर इंजिनीयर कोर्समधला किती रस्ता कॉमन आहे, वेगळेपणा नक्की केव्हा व कुठे येतो ही सर्व माहिती कळली तर इथे मत द्यायला सोपे होईल.
जेम्सवांडचा मुद्दा चांगलाय व अमितव, फारेंडचा पण. तिला आयटी/सॉफटवेअरमधे जायचे आहे ना? गणित आवडते ना? त्यात गती आहे ना?
जेम्स वांड यांच्याप्रमाणेच
जेम्स वांड यांच्याप्रमाणेच वरील तीनही शाखांपासून लांब असल्याने जनरलच लिहीतो.
पण एखाद्या शेतकरी कुटुंबातला मुलगा / मुलगी, कर्ता पुरूष नसेल, वाताहत झाली असेल तर कल जाणून घेणे वगैरे लांबच्या गोष्टी आहेत. आईला शहरात येऊन चार घरची कामं करावी लागत असतील तर मुलांच्या कलाप्रमाणे कलेमधली आवड शिकवणे आणि नंतर त्या क्षेत्रात करीअर कऊ देणे ही केव्हढी मोठी रिस्क असेल याची कल्पना येणार नाही. कल चाचण्यांबद्दल आजही जागृती नाही. आपल्या मुलाने लवकर आपल्या पायावर उभे रहावे, आपल्यासारखे त्याचे आयुष्य काबाडकष्टात जाऊ नये ही पालकांची आणि म्हणूनच मुलांचीही इच्छा असते.
नाहीतर ग्रामीण भागात बाय डिफॉल्ट मुलं राजकारणात जातात किंवा एमपीएससी / युपीएससी च्या नादाला लागून करीअर खराब करून घेतात. प्लान बी हाताशी नसतो. पुढे त्याच नेत्याच्या मागे लागून डीएड / बीएड करून त्याच्या शिक्षणसंस्थेत फुकटात शिक्षणसेवक आणि नंतर कमी पगारावर शिक्षकाची नोकरी किंवा चांगले काम असेल तर सहकारी साखर कारखाना / ग्रामपंचायत / पंचायत समिती / जिप / मनपा इथे नोकरी असे बहुतेकांचे आयुष्य जाते. हा पॅटर्न तोडणे हीच लढाई असेल अशांसाठी.
आणखी महत्वाचा मुद्दा.
आणखी महत्वाचा मुद्दा.
समजा एखाद्याचा गळा चांगला आहे, गाणे शिकला आहे, अभिनयात गती आहे, नृत्यात गती आहे. समजा त्याने वेळात वेळ काढून धडे गिरवले देखील आहेत. तरी त्या क्षेत्रात करीअरच्या संधी इतक्या सहज उपलब्ध असतील का ? ओळखी पाळखी / त्या त्या क्षेत्रातले वर्चस्व मोडून काढणे कितपत शक्य असेल ? माझ्या भावाचा मित्र उत्तम गायक आहे. कॉलेजनंतर मुंबईला त्याच क्षेत्रात करीअर साठी गेला. पण कोरस मधे गाणे, एखाद्या संगीतकाराची नाईट / कलाकाराचा शो यात संधी यापलिकडे त्याला ब्रेक मिळाला नाही. आता मिळणे शक्य नाही कारण टीन एजर मुलं उपलब्ध आहेत.
शांतप्राणी,
शांतप्राणी,
"नाहीतर ग्रामीण भागात बाय डिफॉल्ट मुलं राजकारणात जातात किंवा एमपीएससी / युपीएससी च्या नादाला लागून करीअर खराब करून घेतात." प्लान बी हाताशी नसतो.
एमपीएससी यूपीएससी बद्दल जनरल अवधारणा, त्यातून होणारी फलश्रुती अन त्याचे कारण असे सगळे तुम्ही चार ओळीत मांडलेत, ह्यावर फॉर्म्युला सिम्पल आहे, यूपीएससी / एमपीएससी करताना प्लॅन बी करू नका, तर
यूपीएससी/ एमपीएससीच प्लॅन बी ठेवा,
अर्थात तो ह्या धाग्याचा विषय नाही, त्यामुळे त्यावर विस्तृत परत कधीतरी.
Xxxxxx
समजा एखाद्याचा गळा चांगला आहे, गाणे शिकला आहे, अभिनयात गती आहे, नृत्यात गती आहे. समजा त्याने वेळात वेळ काढून धडे गिरवले देखील आहेत. तरी त्या क्षेत्रात करीअरच्या संधी इतक्या सहज उपलब्ध असतील का ?
मी कल ओळखा म्हणताना पण कुठल्या क्षेत्रांबद्दल बोलतोय हे आपण लक्षात घ्यावेत अशी नम्र विनंती. नाटक सिनेमा किंवा कलाक्षेत्रात सेट फिडर एन्ट्री नसते, त्यामुळे "करीयर" म्हणून अभिनय गायन इत्यादींवर मी तरी बोललो नाहीये
जेम्स वांड, कृपया वैयक्तिक
जेम्स वांड, कृपया वैयक्तिक घेऊ नये ही विनंती. थोडक्यात लिहील्याने मुद्दे पोहोचत नसावेत. तुम्हाला जे सांगायचे आहे ते सांगू शकता. गरज वाटल्यास माझे म्हणणे मी सवडीने स्पष्ट करीन.
अर्रर्रर्र, अग्रेसिव्ह लिहिलं
अर्रर्रर्र, अग्रेसिव्ह लिहिलं का मी फार ? असल्यास माफ करा पण मी अजिबात वैयक्तिक घेत नाहीये, उलट मला ही चर्चा हल्लीच्या काहिवर्षात झालेल्या असंख्य जालीय चर्चांत सर्वाधिक फ्रुटफुल ठरेल इतका आत्मविश्वास वाटतोय. विषय मस्त आहे, मतमतांतरे असणारच, मी पूर्ण प्रयत्न करीनच समजून घेण्याचा, बाकी वैयक्तिक वगैरे चिंताच नको, आपण बिनधास्त बोला.
जेम्स वांड,
जेम्स वांड,
वैयक्तिक घेऊ नका म्हटले होते कारण, तुमच्या प्रतिसादाबद्दल माझे मत नकारात्मक नाही. उलट त्यामुळे दोन मतं वेगळ्या angle मधून आली. ही सुद्धा चूक नाहीयेत.
कलचाचणी घेणारेही चूक नाहीत आणि त्यावर वेगळा विचार करणारेही नाहीत.
वर बहुतेक फारएण्डच्या प्रतिसादात थ्री इडियट्स चा मुद्दा आला आहे. तो ही लक्षणीय आहे. मोबाईल वरून लिहिताना कोट करून मेन्शन करणे शक्य नसल्याने या सगळ्याचा लसावि काढून प्रतिसाद दिला होता...
फ्युचर चा विचार करता, जर
फ्युचर चा विचार करता, जर नोकरी करायची असेल तर AI किंवा Robotics करावं, कारण तुम्हाला job साठी AI/robotics आणि काँप्युटर इंजिनियरिंग असे दोन्ही पर्याय उपलब्ध राहतिल...
साधारण १७-१८ वर्ष पुर्वी असच Information Technology नविन असताना, गैरसमज करुण मुलांनी फक्त computer engg करायचं, Information Technology शाखेला स्कोप नाही म्हनूण चांगले collages नाकरून, जिथे मिळेल तिथे computer engg केलं, पण नंतर campus placement नाही झालं तेव्हा चुक समजली.
Pages