बाजरी वडे

Submitted by लंपन on 4 July, 2022 - 09:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ वाट्या बाजरीचे पीठ
2 टे स्पून आलं, हिरवी मिरची, लसूण पेस्ट
2 टी स्पून काश्मिरी लाल तिखट
2 टी स्पून जिरे पूड
2 टी स्पून धने पूड
कोथिंबीर बारीक चिरलेली
3 टे स्पून दही
1 1/2 टे स्पून तीळ
हिंग, हळद , मीठ , साखर चवीनुसार,
2 टे स्पून तेल
पाणी

क्रमवार पाककृती: 

बाजरीच्या पिठात वरील सर्व जिन्नस एकत्र करून पीठ मळून घ्या. एकदम सैल वा एकदम घट्ट मळू नका. दह्याऐवजी (आणि पाणी न घालता) पीठ ताकातच मळले तरी चालेल. पीठ मळून झाले की तसेच अर्धा तास झाकून ठेवा. आता कढईत तेल गरम करा. मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून हातावरच वडे थापा आणि मंद आचेवर तळा.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

दही / ताक आणि साखर घालायचीच आहे. तिखट कमी जास्त करू शकता. बाजरी आहे म्हणून मीठ लागणार आहे. कोथिंबीरीऐवजी मेथी घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक, यु ट्युब चॅनेल्स
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास!

हे जमेल आणि आवडेल असं वाटतयं.

बाजरी + मेथीची हिरवी पाने यांच्या स्पाइसी पुर्या आवडता शीतकालीन मेन्यू आहे.

भारीच, अत्ता करून खावेसे वाटताएत. आज वातावरण असं तयार झालय, धोधो पाऊस आणि माबो उघडल्यावर बाजरीचे वडेच समोर आले. Happy

मस्तच.ब्रे.फा ला करुन पहायला हवे.

अवांतर द्यायचा मोह आवरत नाही.
एकदा चिकन जरा overcooked zale होते.बाईला तसे सांगून दिले.तिने त्यात बाजरीचे पीठ घालून वडे तळले.अतिशय मस्त झाले म्हणाली.

छान स्वस्त आणि मस्त पदार्थ आहे. यालाच बिबड्या असेही म्हणतात का? जाणकार अधिक माहिती देतीलच. टे आणि टी स्पून मध्ये नेमका किती फरक असतो?

ह्या बिबड्या नव्हेत, तो एक करायला खूप खटपटीचा पदार्थ आहे.

टी स्पून म्हणजे पोहे खायचा चमचा , दोन टी स्पून म्हणजे एक टेबल स्पून.

थॅंक्यु

टेबल मोठं असत म्हणून मोठा तो टेबल स्पून अस लक्षात ठेवलं आहे मी. ☺️

मस्त दिसतायत वडे.
वडे कडक होण्याची धास्ती आहे का याच्यात?

एक टेबलस्पून म्हणजे तीन टीस्पून. पंधरा मिली आणि पाच मिली.

बाजरीचे पीठ आणत नसल्याने ज्वारीचे पीठ+ बेसन(हे उगाच वापरले),त्यात बडीशेप, जिरे, धणे वाटून घातले.लाल तिखट, kasuri methi, इवलासा गूळ, कोथिंबीर घालून वडे केले.मस्त झाले.गरम गरम वडे, पावसाच्या वातावरणात मस्त लागले.
पुढच्यावेळी bajarinpith आणून तंतोतंत पाकृ अनुसरणार.

वावे, जशी बा.भाकरी कडक होते तसे हे वडे अजिबात कडक होत नाही.

मस्त !! आषाढ तळायला नवीन तिखट पदार्थ मिळाला . गोडासाठी यशस्वी शंकरपाळे , भोपळ्याचे घारगे आहेतच . यात खुसखुशीत व्हायला तेलाचे मोहन नाही का घालायचे ? कडक होत नसतील तर घरातल्या ज्येष्ठ लोकांसाठी करायचा विचार आहे.

एक टेबलस्पून म्हणजे तीन टीस्पून. पंधरा मिली आणि पाच मिली.>> वावे थॅंक्यु , आता हे ठेवीन माप

मृणाली, जाई, अनिंद्य, मनिमोहोरजी, धनुडी, देवकी, किशोर, सायो, सीमंतिनी, धनवंती, स्वप्नाली, वावे, अनामिका, अमुपरी, भरत आणि अश्विनी खूप धन्यवाद. वावे , अश्विनी वडे कडक नाही होत. पुण्यातले कांताबेनचे खाल्ले असतील तर साधारण तसे होतात. मोहन नाही घालायचं, साधं गार तेल 2 चमचे. वाटल्यास 2 वाटीचे करून बघा आधी, फार मोठ्या आकाराचे करू नका मात्र. स्वप्नाली अजिबातच कडू नाही होत, साखर घालायची आहे. बाजरी आहे हे कळणार पण नाही सांगितल्याशिवाय. मीठ मात्र जास्त लागते बहुदा बाजरीला. धनवनती आप्पे पात्रात नाही होणार कणिक आहे कारण. देवकी तुम्ही म्हणता तशी ज्वारीची एक पाकृ बघितली त्यात तुमचे घटक (गूळ बडीशेप सोडून) अधिक दही घालून पीठ 1 तास ठेवले आणि नंतर आप्पे केले त्याचे. मनिमोहोरजी मी पण वावेनी सांगितले तसेच प्रमाण वापरतो साधारण.

कडक रेसिपी,

हल्लीच कोलेस्ट्रॉल निघाल्यामुळे गृहलक्ष्मीने पूर्ण तेल बंद आंदोलन पुकारले आहे, तरी नशीब रोजची भाजी चपाती मिळते आहे उकडलेल्या भाज्या नाहीत,

त्यामुळे, जर वडे हातावर थापून तेलावर शॅलो फ्राय केले तर जमेल का प्रकरण असा एक आमचा प्रश्न आहे लंपनजी.

नसल्यास बिनदिक्कत सांगा एखाद दिवस बंडखोरी करून प्रिय कढई परत गॅसवर विराजमान करू, ओट्स चिया सीड्स वगैरेंचा निःपात करून परत एकदा कढई शासन स्थापन करण्यात आम्हाला आनंदच वाटेल.

कळावे लोभ असावा

- (कावेबाज होमकूक) वांडो

असे प्रकार शॅलो फ्राय करून तितके चविष्ट लागणार नाहीत असं मला वाटतं. शॅलो फ्रायच करायचं असेल तर थालीपीठ करायचं सरळ. Happy लंपन सांगतीलच अर्थात.
देवकी, लंपन, धन्यवाद. करून बघतेच एकदा.

वाण्डो शॅलो फ्राय नाही लागणार चांगले , कधीतरी ठीक आहे, तळूनच काढा हो. प्रज्ञा नाही केले कधी. धिरडी ओके होतात त्यामुळे वडे पण चांगले लागतील तिखट.

ओके. मला नाचणीचं पीठ संपवायचं आहे नाहीतर त्याला विरी जाईल आणि उकड काढून फुलके करत बसावे लागतील. गोड नको कारण पथ्य आहे ज्येनांना. तिखट पर्याय शोधते आहे.

Pages