टैरो गूढ़ विद्या भाग २

Submitted by Keetaki Bapat on 29 June, 2022 - 08:23

नमस्कार
टैरो भाग -२

मागील लेखा मध्ये जसे आपण वाचले की या विद्ये मध्ये ७८ कार्ड्स असतात त्यात २२ कार्ड्स अशी असतात ती अतिशय महत्वाची असतात. त्याना आपण मेजर अर्काना ऐसे म्हणतो. अर्काना हा अर्कानम ह्या शब्दाचे बहुवचनी रूप आहे. अर्कानम याचा अर्थ "गूढ़" , रहस्य असा आहे. ही कार्ड अत्यंत प्रभावी असून ती अतिशय महत्वाची असतात.
ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती च्या भविष्य किंवा समस्या वाचना मध्ये ही कार्ड्स येतात त्यावेळेस त्यातून निघणारे अर्थ हे एखादे कोड़े उलघडण्या साठी किंवा समस्येचे मूळ जाणून घेण्या साठी अतिशय मदत करतात किंवा ती त्या करताच येतात. ज्यावेळेस मेजर अर्काना कार्ड्स येतात त्यावेळेस तुमच्या आयुष्यात काही तरी महत्वाचा बदल अपेक्षित असतो आणि आयुष्यात येणाऱ्या किंवा आलेल्या व्यक्ति, अपरिवर्तन अशा सगळ्या गोष्टी ही कार्ड्स दाखवतात. ह्या कार्ड्स चा अभ्यास करताना उत्तम निरिक्षण शक्ति, कल्पना शक्ति आणि तुम्हाला होणारे अंतर्ज्ञान याचा कस लागतो आपण ऐसे म्हणू शकतो की या सगळ्या शक्तींची वाढ करण्याकरता ही कार्ड्स आपल्याला मदत करतात. जसा जसा तुमचा अभ्यास वाढत जातो तसे तसे त्यातून मिळणारे संकेत तुम्हाला वाचता येतात आणि ती कार्ड चक्क तुमच्याशी बोलतात सांगायचे प्रयत्न करतात की त्याना काय अभिप्रेत आहे.
२२ कार्डामध्ये शुन्य ( ० ) ते ( २२ ) बावीस ऐसे क्रमांक दिलेले आहेत. एक प्रकारे माणसाचा लहानपणापासून ते पूर्णत्वा कड़े होणारा प्रवास ही कार्ड्स दर्शवतात. आपल्या आयुष्यातल्या सगळ्या पायऱ्या / घटना क्रमा क्रमाने एका नंबर प्रमाणे दिलेल्या आहेत. प्रत्येक कार्ड खुप काही सांगते. जसे निर्मिति, धाडस, नियोजन, यश, अपयश, दुर्घटना, मदत, गुरु, दिशादर्शक, मार्गदर्शक, नाश, ध्येय , अडथळे, मानसिक स्थिति, प्रेम, राक्षसी वृति, आश्रय, घराणे,अशा अनंत गोष्टी यातून अभिप्रेत होतात. म्हणून च एकेका कार्ड ची सम्पूर्ण माहिती करून घेणे आवश्यक असते.
क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फोटो टाका कार्डांचे. किंवा तुम्हाला अपेक्षित जे फोटो नेटवर कुठे आहेत त्यांची लिंक द्या. मग अर्कानाची चित्र समोर ठेवून कळेल.
टारो कार्डांचा संच कुठे मिळतो, कितीला? त्यात काही बदल असतात का? नसतील तर आपण आपली चित्रे चिकटवून संच घरी करू शकतो का? फोटोंशिवाय काही कळत नाही लेख.

हो. खूप त्रोटक लिहिलं आहे. माझ्याकडे एक पुस्तक आहे. त्यात प्रश्नानुसार पत्ते पिसायच्या आणि मांडायच्या वेगवेगळ्या पद्धती आणि प्रत्येक कार्डाचा अर्थ दिलेला आहे.

इकडे बरेच fan club आहेत. कांदेपोहे क्लबही आहे. टारो फ्यान क्लब?
माझा एक प्रश्न आहे - यातून मिळणारे निर्णय वैयक्तिक समस्यांसाठीच असतात का? खेळ ,राजकारण, यासाठी वापरतात का? जय,पराजय इत्यादी घडामोडींसाठी. म्हणजे विचारणारी पार्टी वेगळी असते.

कुठल्या दुसर्‍याभाषेत लिहिलेले गुगलने भाषांतरीत करुन इथे डकवले असा भास होतो. हे टॅरो कार्ड रिडर सांगु शकेल ?