लेसिक सर्जरी करणारे पुण्यातले चांगले डॉक्टर सुचवा

Submitted by कोहंसोहं१० on 15 June, 2022 - 14:30

माझ्या चष्म्याचा नंबर तसा कमी आहे (दोन्ही डोळ्यांचा -२.७५). परंतु आता चष्मा वापरून कंटाळा आला आहे आणि नंबर पूर्णपणे घालवण्यासाठी लेसिक सर्जरी करून घ्यायचा विचार करतोय. वय चाळीशीच्या आसपास आहे. अजून जवळचा चष्मा लागला नाही. या वयात सर्जरी करून नंबर घालवता येईल का? असल्यास कृपया लेसिक सर्जरी करणारे पुण्यातले चांगले डॉक्टर सुचवा.

धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

https://www.nioeyes.com/

डॉ. केळकरांचे National Institute of Ophthalmology येथे मी १९९५ ला चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी हे केले होते. त्यावेळी ही टेक्नॉलॉजी नवीन होती. डॉ. मिसेस चांदोरकर व डॉ. सावरकर अश्या दोन तिथे काम करणार्‍या डॉ. नी माझी सर्जरी केली होती. नंतर त्या दोघांनीही दुसरीकडे स्वतःचे सेंटर सुरू केले असे ऐकले होते. त्यांचा शोध लागला तर तेथेही जाऊ शकता. चांगले स्किलफुल डॉक्टर्स आहेत.

प्लीज आधी जुने धागे वाचा. Unless medical reason, कशाला उगीच डोळ्यासारख्या नाजुक अवयवाची सर्जरी करायची. इन्शुरन्स कंपनी देखील 7 पेक्षा जास्त नंबर असल्याशिवाय क्लेम approve करत नाही. सात पेक्षा जास्त असेल तर मेडिकल आणि त्यापेक्षा कमी असेल तर कॉस्मेटिक सर्जरी समजली जाते.
मी स्वतः डॉ चांदोरकरांकडे सर्जरी केली आणि ती super successful झाली. (बरीच वर्षे होऊनही काहीही त्रास नाही, except अती प्रखर उजेड सहन होत नाही. पण तरीही डॉ ईबलीस/ आराराच्या पोस्ट्स वाचल्यावर भीती वाटली होती. त्यांच्या पोस्ट्स वाचा आणि पुनर्विचार करा. चष्मा नको तर लेन्स वापराव्यात, प्लीज सर्जरी सहज म्हणुन नकोच.

Ho मीरा, मलाही आधी ती सर्जरी करायची होती.पण काही वैयक्तिक अडचणी आणि iblis/आरारा यांच्या पोस्टमुळे टाळली.

@aditya raut
डॉ. राजीव राऊत तुमचे नातेवाईक आहेत का?

माझ्या मुलीच्या डोळ्यांची लासिक सर्जरी डॉ रजनीश पवार (आदित्य आय क्लिनिक) ह्यांनी केली. काहीही प्रॉब्लेम आला नाही. डॉ रजनीश ह्यांनी व्यवस्थित फॉलो-अप पण केले.