Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनेक समस्या पुढे आई आणि मुल
अनेक समस्या पुढे आई आणि मुल ह्यांना येत असतील.>>>> नाही येत! अशा प्रकारे मोठी झालेली मुलं (आता 50+ वर्ष) आणि त्यांचे पालक बघता आपल्याकडे या वयोगटातील स्त्रियांना जे तब्येतीचे issues आहेत ते किंवा जरा कमीच इथे जाणवतात! इथे 90+ च्या स्त्रिया एकट्या राहून स्वतःचे व्यवस्थित manage करतात (driving सुद्धा). याचा अर्थ त्यांची मुलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात असा अजिबात घेऊ नये. ती मुलं पण आई वडिलांना भेटायला, काही लागले तर मदत करायला तत्परतेने येतात.
आणि नाइलाजाने मुलांना बाहेर घेऊन जावे लागते असंही नाही. वर मी लिहीलं आहे त्याप्रमाणे बाळाची योग्य ती काळजी घेऊन आया बाहेर पडतात. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर 24 तासात घरी परतणे फार कॉमन आहे.
आपल्याकडे मुल झाल्यानंतर अंघोळीसाठी एक बाई / पुढे थोडं मोठे झाले की सांभाळायला एक मदतनीस, तिच्यावर लक्ष ठेवायला आजी/आजोबा. इतर कामांना बायका बघून मजा वाटते हल्ली
मध्यंतरी एका नातेवाईकांकडे दीड वर्षाच्या बाळाला बाटलीतून दूध पाजण्यासाठी मदतनीस बाई, बाळाची आजी आणि आलेल्या एक नातेवाईक बाई अक्षरशः झटत होत्या
मग बाळाला तयार करण्यात पण सगळेच जण involve होते. नंतर बाळ आणि मदतनीस बाई खाली चक्कर मारायला गेले पण त्यापूर्वी pram काढून त्यात बाळाला बसवण्यात सगळेच झटत होते. 
वरचे प्रकार बघून आपल्या
वरचे प्रकार बघून आपल्या आज्ज्या म्हणतील, तुमचं बाळावर pramच नाहीये!
(कृ मजेत घेणे)
अस नाही आज्याचं बाळावर (आणि
अस नाही आज्याचं बाळावर (आणि स्वतःच्या मुलगा/सून/मुलगी/जावई यांच्यावर) अति pram अस म्हणता येईल
त्या आजी जस्ट retire झाल्या आहेत आणि त्यांच्या दोन्ही अपत्यांना एक वर्षाच्या अंतराने अपत्ये झाली आहेत. बिचाऱ्या बंगलोर मुंबई वाऱ्या करतात. शिवाय 96 वर्षाच्या सासूबाई मुंबई पासून तीन तास अंतरावर असलेल्या गावी आहेत. त्यांचेही turns घेऊन सगळे वयस्कर मुलं बघतात त्यामुळे यांचा turn असला की तिकडे पण जावं लागतं. यात त्या आजी आजोबाचे देशात/परदेशात फिरणे कधी होणार? Retirement नंतर परत अडकले आहेत.
>>>>>>आवरा =)) =))
>>>>>>आवरा
=)) =))
अति pram
अति pram
माफ करा, माझ्या एका
माफ करा, माझ्या एका प्रतिसादातले लीला गांधी हे नाव चुकले आहे. ते विठाबाई नारायणगावकर असेच हवे. चूक निदर्शनास आणणाऱ्या सर्वांचे आभार.
आता चोचल्यांबद्दल :
आपल्याकडे काही भोळ्या समजुती, एकंदरीतच चौरस आहाराविषयी प्रचंड अज्ञान आणि अंधश्रद्धा, अन्नाचे पौष्टिकतेच्या दृष्टीने उष्ण आणि थंड असे पारंपरीक वर्गीकरण वगैरेंमुळे समतोल आहार मिळत नसे. शरीराचे सर्वांगीण निकोपपणा राखण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे ही कल्पना नुकती कुठे रुजते आहे. पण तळागाळापर्यंत पोचलेलीच नाही. सामाजिक उन्नयनामुळे शारीरिक कष्ट कमी झाले तरी त्यांची जागा व्यायामाने घेतलेली नाही. समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणार संदेश, विशेषत: व्हॉट्स अप लेखन आणि अलीकडे वाढलेले व्हिडिओ ब्लॉग पाहिले तर अजूनही ह्याविषयी किती अज्ञान आणि चुकीच्या समजुती आहेत ते दिसते. पारंपरिक सुशिक्षित वर्गात न मोडणारी सर्वसामान्य माणसे,महिला ह्यांच्याकडून हे v ब्लॉग्ज येत असतात आणि ते त्या त्या समाजातला आहार, खाणेपिणे, याविषयीच्या समजुतींना धरून असतात. गरोदर बाईने कोणते नवस करावे, दिवस रहात नसलेल्या बाईने नारायण नागबली कसा करावा, काय खावेप्यावे ह्याविषयी अनंत सूचना कमेंट्स मध्ये असतात. थोडक्यात, भरपूर खाऊन पिऊनही बाई कुपोषित राहाते. त्यामुळे काटकपणा कमी होतो. बाळंतपणानंतरही असे प्रकार चालू राहातात. ह्यातल्या काहींना लगेचच कामाला जुंपून घ्यावे लागत असले तरी बाळ आणि बाळंतीण कुपोषित रहातात. ह्याचा परिणाम काही वर्षांनंतर दिसतो.
यातलाच एक गट नवश्रीमंत झालेला आहे, त्यामुळे पूर्वी उ म व जे करीत असे त्याचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. शेक शेगडी, दोन तीन महिने confinement वगैरे प्रकार वाढला आहे. अजूनही अनेक महिला पूर्वीप्रमाणे कापडाच्या झोळीमध्ये मुलाला छातीशी बांधून कामाला निघतांना दिसतात, पण आता हे फक्त अगदी तळागाळापुरते मर्यादित असते. त्यातूनही भटक्या जातीजमातीपुरते.
बाईने बाळंतपणानंतर शक्यतो लवकर, लगेचच आपल्या रोजच्या दिनचर्येला लागावे यासाठीचे वातावरण आणि मानसिकता अजूनही नाही. वरच्या स्तरात कोडकौतुक आणि खालच्या स्तरात काबाडकष्ट असेच चालू आहे.
त्या खालच्या स्तराला योग्य
त्या खालच्या स्तराला योग्य विश्रांती मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू.त्यांनाही हौस नसेलच लगेच बाळ झोळीत बांधून पाट्या उचलायची.अगदी कान बांधणे वगैरे अति असले तरी थोडी विश्रांती मिळालेली केव्हाही चांगलीच.
अनु +१
अनु +१
) कुठल्याही संस्कृतीत परंपरेने चालत आलेलं अन्न चांगलंच असणार. त्याशिवाय समाज टिकून कसा राहिला असता? हां, तसं अन्न पुरेशा प्रमाणात दुर्दैवाने सगळ्यांना परवडत नव्हतं, नाही. पण काय खायचं, काय नाही (बाळंतपणातच असं नाही, एरवीही) हे लोकांना माहीत नव्हतं असं नाहीये.
हीरा,
चौरस आणि पौष्टिक आहाराबद्दल प्रचंड अज्ञान हे काही तितकंसं पटलं नाही. (ऋजुता दिवेकर तर सांगत असते की तुमची आजी जे खात असे ते खा
पारंपरिक सुशिक्षित वर्गात न मोडणारी सर्वसामान्य माणसे,महिला ह्यांच्याकडून हे v ब्लॉग्ज येत असतात आणि ते त्या त्या समाजातला आहार, खाणेपिणे, याविषयीच्या समजुतींना धरून असतात.
हेही कळलं नाही.
विश्रांती घेणे ही मूळ समस्या
विश्रांती घेणे ही मूळ समस्या आहे का ? की "बाईने" विश्रांती घेणे ही समस्या आहे ?
बाईने बाळंतपणानंतर शक्यतो
बाईने बाळंतपणानंतर शक्यतो लवकर, लगेचच आपल्या रोजच्या दिनचर्येला लागावे >> तुमची किती बाळंतपणे झाली? कधी उठून दिनचर्येला लागावे हे प्रत्येक केस मध्ये वेग वेगळे असते ना . त्या स्त्री ची प्रतिकार शक्ती, तिचे आरोग्य मानसिक स्थिती, नवजात बाळाचे आरोग्य प्रेन्गन्सी डिलिव्हरीतली काँप्लिकेशन्स इन्फेक्षन झाले असल्यास ते, शक्ती भरून यायला लागणा रा काळ हे प्रत्येक बाईसाठी वेगळे आहे ना. तिचा सोशल क्लास काही का असेना. गरज असल्यास आराम केलाच पाहिजे नाहीतर दूर गामी वाइट परि णाम होतात तब्येतीवर. पुढे चाळीशी पन्नाशीत भोगावे लागतात.
मिळतोय एखादीला आराम कराय ला, बाळाला बघायला फॅमिली मेंबर्स आहेत तर करु देत की तिला आराम . सर्व छान असेल तर फिरू देकी बालाला घेउन. पण हे प्रत्येकीच्या तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून आहे.
माझे वडील, काका, आत्या सारे
माझे वडील, काका, आत्या सारे पकडून आठ भावंडे होती. म्हणजे आजीला आठ अपत्ये होती. पहिल्या आणि शेवटच्या मुलातील अंतर वीस वर्षे. वरची बाळंतपणाची चर्चा वाचून सहज हे आठवले. कारण आजच्या पिढीतील मुलींसाठी हा कल्चरल शॉकच असेल
गंमत म्हणजे आजी आजोबा आणि आठ अपत्ये चाळीतील १० गुणिले १२ साईजच्या दोन रूम्समध्ये राहायचे. २४० स्क्वेअरफीटमध्ये १० जण. म्हणजे माणशी २४ चौरस फूट. आणि तरीही सातव्यानंतर आठव्याचा विचार केला गेला. अश्यात बाळंतपण कसे होईल वगैरे काहीच चिंता नाही. ती पिढीच वेगळी होती
ऋन्मेष, पूर्वी आपल्याकडे
ऋन्मेष, पूर्वी आपल्याकडे बालमृत्यूंचं प्रमाण खूप होतं. (आताही आहे दुर्दैवाने, पण पांढरपेशा समाजात नक्कीच खूपच कमी आहे) त्यामुळे आपल्या आजीआजोबांच्या पिढीपर्यंत भरपूर मुलं होऊ द्यायची साहजिकच प्रवृत्ती होती. मोठ्या मुलीचं लग्न झालं तरी आईची बाळंतपणं संपलेली नसत. म्हणून तर तेव्हा मामापेक्षा भाचा मोठा वगैरे प्रकार असत.
ह्या साठी खरंच वेगळा धागा हवा
ह्या साठी खरंच वेगळा धागा हवा.
मी पहिल्या बाळंतपणाच्या वेळेस भारताबाहेर होते.
अगदी शेवटपर्यंत योगासनं, नियमित चालणं चालू होत, ऑफिसला जात होते.
तिथे असताना salads, eggs वगैरे जास्त खाल्ल गेलेलं बाळंतपणात.
मी पाच दहा दिवसाच्या बाळाला घेऊन फिरताना बाळंतिणीला पाहिलं होत अनेकदा. दुसर्या दिवशी चहा करून घेऊन बाहेर येणार्या, आई वडिल वगैरे सपोर्ट शिवाय दोनदोन बाळंतपण करणारी भारतीय मैत्रिण वगैरे माहित होत्या.
आपण एवढे व्यवस्थित वागतोय, शिस्तीत खातोय, व्यायाम करतोय तर आपल्याला नोर्मलाला यायला वेळ लागणार नाही ह्याची खात्री होती.
मुलं 20-20 तास झोपतात मग आपल्याला काय काम, आपली व्हेकेशन असणार आहे अशी काहीशी समजूत होती.
"गांधीनी अखंड भारत का नाकारला" हे आणि अशी अनेक पुस्तकं आण, अस आईला सांगितलेलं.
ती म्हणाली बाळंतिणीच डोक हल्लक झालेलं असतं, अस काही वाचू नकोस, ह्यावरून खूप वाद घातलेले.
मग तो दिवस आला..
१७-१८ तास कळा सोसल्यावर अखेरीस बाळाचे हार्ट्बीटस लो व्हायला लागले म्हणून इमर्जन्सी सी सेक्शन ला दॉक्टर न घेतलं.
तिथे बाळ सुखरूप बाहेर आलं पण मा झा रक्त स्त्राव थांबेना. बाळाबरोबर नारळाएवढा वाढलेला फायब्रोईड असा सी सेक्शन च्या दरम्यान काढत नाहीत, पण आयत्या वेळेस काढावा लागला.
हे सगळ वर आरशात दिसत होतं, डॉक्टर तिथेच डिसिजन्स आपल्यालाच विचारत असतात (अमेरिकेमधे तरी)..
आतून प्रचंड थंडी वाजत होती, फिजिकली विकनेस जाणवत होता. आपण आता वर चाललोय अशी मनाची जवळपास खात्री झालेली.
अखेरीस रुममधे आले, वा वा झालं. फोनाफोनी झाली आणि थोडयाच वेळानं श्वास घेता येत नाहिये असं जाणवलं..
डोक्टरांना रुम मधे ये ईपर्यंत नवर्याला ताबडतोब जा , ताबडतोब जा असं सांगत राहिले..
मग कळलं ऑक्सिजन लेवल ड्रॉप होतेय .. फुफुसांमधे पाणी शिरलेलं.
मग पुढचे अनेक तास पुन्हा पळापळ.. नॉर्मल सी सेक्शनपेक्षा २ दिवस जास्त राहून घरी परत आले.
२-३ दिवसांनी चालायला बाहेर पडले तर लिटरली ५ मिनिटामधे ब्रह्मांड आठवलं.
)त्यांना घेऊन बसावं लागतं..
मला बर्यापैकी एनर्जी परत यायला जवळपास १.५ पे क्षा जास्त वर्षे लागली.
मी शेक शेगडी, मसाज वगैरे केले नाही. पण पाण्यात हात घातल्यावर हाडं दुखणं हे अनुभवलं (पारंपारिक ज्ञान), त्या वर्षात काहीही वाचू शकले नाही, मेंदू खूप शिणलेला, फॉगी झालेला हे अनुभवलं.
सगळीचं मु लं वीस वीस तास झोपत नाहीत ( आपली तर नाहीच नाही.
सतत च्या कमी झोपेमुळे शरीरावर खूप परिणाम होतो.
हेच दुसर्या बाळंत पणाच्या वेळेस मी तिसर्या दिवशी उभी होते आणि एका महिन्यात बर्यापैकी नॉर्म ल ला आलेले.
तरीही, ब्रेस्ट फिडिं ग, जागरण, सतत दुस र्या व्यक्तीची पूर्ण काळजी घेणं, शरीरातून गरोदरपणात, बाळंतपणाच्या वेळेस,, फीडींग दरम्यान गेलेलं सत्व, बसून बसून पाठ जाणं अशा अनेक गोष्टीमुळे आयुष्य आणि तब्येत नॉर्मल ला यायला साधारण ८-१२ महिने जातातच.
ज्यांनी हे स्वतः अनुभवलय त्यांनाच हे कळू शकतं.
नॉनव्हेज खाणं/न खाणं, कुठल्या वयात बाळंतपण झालय, काय कॉम्प्लिकेशन्स होती, तुमची मुळात तब्येत कशी आहे, नॉर्मल डिलिवरी का सि सेक्शन - असे हजार मुद्दे येतात.
कष्टकरी स्त्रिया काही हौसेने करत असतील असं नाही आणि त्याचे त्यांच्यावर अॅडवर्स परिणाम होत नसतील असही नाही.
उतार वयातल्या स्त्रिया आणि पुरुष बघितले ( मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय) तर बाई आणि पुरुषांच्या तब्येतीच्या तक्रारी, पोश्चर्स वगैरे पहा, तुम्हाला फरक दिसून येईल.
परदेशातल्या बायकांच उदाहरण देताय, तिथे मुल खूप रडायला लागलं आणि सपोर्ट नसेल, सहन होत नसेल तर बाळाला एकट ठेवून (सेफ पद्धतीन) कुणी मदत देऊ शकत का बघून , काही काळाकरता बाहेर पडा अशा सुचना असतात. स्वतःला आणि बाळाला इजा करू नये म्हणून डॉक्टर्स सतर्क असतात (पीपीडी करता) आणि एकटं रेझ करताना ओढाताण होतेच त्यांचीही. हेल्थ इन्शुअरन्सच्या रिस्ट्रिक्शन पायी शरीराकडे दुर्लक्ष करून ही ६ आ ठव्ड्यात पिणार्या बाळाला लांब ठेवून कामावर हजर व्हावं लागणार्या आया पाहिल्यात. त्यांना ते आवडतं असं नाही, पर्याय नसतो. बाळाच्या दृष्टीनंही हे योग्य नाहीये.
आपल्या इथे दुसर्या बाजूला "दूध येतच नाहीये, कमीच पडतय, रडवू नका तिला, द्या छाती तोंडात, फॉर्म्युला देऊच नका, पॅसिफायर देणार्या आया नालायक" असले फंडे नसतात. अमेरिकेत, ५ तासापर्यंत बाळ रडलं तरी नॉर्मल आहे असं सांगितलेलं, आपल्याकडे त्या आईला कसली गिल्ट ट्रिप देतील लोकं असं रडू दिलं तर ह्याचा विचारच न केलेला बरा.
तुमच्या कुठल्या भागाच ऑपरेशन झालं तर दुसर्याकडून सेवा करून घेत पडून रहाता का दुसर्या माणसाची देखभाल करणे, फिडींग, डायपर बदलणे,रात्री अपरात्री घेऊन बसणे, (दोन मुलं असतील तर दुसर्याचे डबे, त्याचही बघणं, अभ्यास घेण् वगैरे) असले उद्योग करता? मग सि सेक्शन्/बाळंतपण झालेल्या बाईकडून, जी ऑलरेडी हे सगळं करत असते, ह्याहून अधिकची अपेक्शा का? भरून येऊदेत की तिचं शरीर पण.
त्याला बाळंत"पण" का म्हणतात ह्याला कारण आहे.. खरच "पण" असतो तो.. त्यातून दरवेळेस सर्वजण बाहेर येतातच असं नाही!
माझा खूप इन्टिमेट अनुभव शेअर करतेय पण "चोचले" हा शब्द फारच टोचला. वी नीड टू स्टॉप गिविंग गिल्ट टू न्यु मॉम्स. अॅनी वे हे होतच काही झालं तरी वेगवेगळ्या स्वरूपात. पण जरातरी विचार करुयात ५०% संख्या असलेल्या माणसांचा!
नानबा, तूच काढ एक धागा
नानबा, तूच काढ एक धागा
हो, बालमृत्यु कारण एक असू
हो, बालमृत्यु कारण एक असू शकेल ज्याने होतात तितके मुले होऊ द्यायची संस्कृती रुजली असेल. जिथे बालमृत्यु होत नसतील ते देखील मग काही वेगळा विचार करून थांबत नसतील. प्रवाहासोबत जात असतील.
पण आजच्या तारखेला जिथे स्कूल फिज हे तिसरे अपत्य होऊन न देण्याचे एक कारण ठरू शकते तिथे त्याकाळी एका माणसाच्या पगारात आठ अपत्यांपर्यंत जाताना खर्चाची जी प्लानिंग ते करत असतील आणि ते परवडतही असेल ते पाहता अचंबा वाटतो. भले मग आजची पिढी कितीही भौतिक सुखे उपभोगत असली तरी त्या पिढीसमोर गरीबच म्हणायला हवे
माणशी २४ चौरस फूट. आणि तरीही
माणशी २४ चौरस फूट. आणि तरीही सातव्यानंतर आठव्याचा विचार केला गेला. >>>>>
कळत्या वयातील 7 व्यक्ती आजूबाजूस घेऊन तो विचार अमलात कसा आणला गेला याबद्दल कुतूहल आहे
माणसाच्या च मस्ती मुळे
माणसाच्या च मस्ती मुळे .सारख्या आपसात लढाया करून,जमीन बळकावणे चालू झाली तेव्हा च कुपोषण आणि अन्न न मिळणे ह्या समस्या निर्माण झाल्या.
मध्य युगात च हे प्रकार जास्त होते.
रोज लढाया .रोज कोणावर तरी हल्ला .
पण निसर्ग चक्रात पृथ्वी वर माणसाला अन्न खूप उपलब्ध होते आणि आज पण आहे.
कुपोषण,ही आजकाल ची समस्या आहे.
जास्त मुल त्या वेळी असायची पण तो आजारानं मरत असतील किंवा जंगली जनावर हल्ल्यात.
अन्न वाचून नाही.
माणसासाठी प्रचंड खाद्य पृथ्वी वर निसर्गाने उपलब्ध करून दिलेले आहे.
हिरा यांच्या प्रतिसादावरून
हिरा यांच्या प्रतिसादावरून अकबर बिरबलची गोष्ट आठवली.
शिकारीला जंगलात गेलेला अकबर एक बाळंतीण आदिवासी बाई पाहतो, ती स्वतः चे बाळंतपण स्वतः करून, बाळाला आंघोळ घालून , पाठीशी बांधून कामाला लागते.
ते पाहून आपल्या बेगमा फार नखरे करतात असे त्याला वाटते आणि तो आपल्या हरम मधले सगळे प्रिव्हिलेजेस बंद करतो.
हैराण झालेल्या बेगमा बिरबल कडे येतात
बिरबल गुलाबाच्या बागेचे पाणी बंद करतो, सुकलेली बाग बघून अकबर बिरबलाला रागावतो,
तेव्हा बिरबल सांगतो , तशीही रानात फुलझाडे वाढतातच, मग आपल्या बागेतील गुलाबांना इतके चोचले कशाला हवेत?
अकबराला आपली चूक अर्थात उमगते
नानबा बिग हग. शरीराची झीज
नानबा बिग हग. शरीराची झीज होतेच बाळंतपणा त. आमच्या कडे नैसर्गिक आईला वेळ नाही( दुसरी बहीण पण तेव्हाच ड्यु होती) . दत्तक आईला शक्ती नाही( वयस्कर सत्तरीच्या पुढे) व सासवेस उत्साह पण अनुभव आजिबात नाही. ह्या सर्व गायब झाल्यावर मी सुत्रे हातात घेतली. मस्त स्वयंपाकीण शोधली ( हिला अनुभव होता व फार शांत सालस होती असा कणकेचा शिरा परत खाल्ला नाही. ) बाळास काखोटीस बांधून बाहेरची कामे करून येत असे.
मी करते म्हणणा री नणंद स्वतःच दोन पोरेघेउन आली व आर्मीच्या घोड्यावरून . क्रॉफर्ड मार्केट शॉपिन्ग कर गेटवे बघ हे खा तेखा करत. जिवाची मुंबई करायला.
हे सर्व गायब झाले तेव्हा मी खरे एंजॉय केले. आमचा जलाराम वाणी पण सामान आणायला गेले तर म्हणे क्या गांव गये थे क्या. म्हटल नाही बच्चा
पैदा किया!!! ये देखो!!
घरात इतर बायका असल्या तरी त्यांना धड नॉलेज / अनुभव / इच्छाशक्ती / करेक्ट अॅटिट्युड असेलच असे नाही . तशी काही अपेक्षा पन नाही.
नानबा, डेंजर अनुभव आहे तुमचा.
नानबा, डेंजर अनुभव आहे तुमचा. मुळात पहिल्या वेळी एवढा त्रास होऊन दुसरं मूल होऊ देणं आणि निभावून नेणं ही हिंमत आहे!
बाळास काखोटीस बांधून बाहेरची
बाळास काखोटीस बांधून बाहेरची कामे करून येत असे. >> बापरे. नक्कीच अवघड गेलं असणार.
मला भरभक्कम सपोर्ट सिस्टिम (आई आणी नवरा) होती, तरीही जर शरीर गंडलं तर जे व्हायचं ते होतच आणि जिथे मुलांना आई लागते तिथे लागतेच! ( उदा फीडींग किंवा तुमच्या शिवाय थांबतच नसतील, आईच हवी असेल).
तुमची परिस्थिती इमॅजिन करू शकते.. हग!
@ नानबा यांच्या प्रतिसादाला
@ नानबा यांच्या प्रतिसादाला अनुमोदन....
माझ्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळेस मला वाढलेल्या बीपी मुळे शेवटचे ३ महिने सक्त bedrest होती तरीही डिलिव्हरी नॉर्मल झाली.नंतरही फार त्रास झाला नाही. फक्त थकवा खूप होता..
दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळेस अगदी डिलिव्हरी च्या दिवसापर्यंत नॉर्मल होते..ऑफिसला जात होते..पण अर्जंट मध्ये सिझर करावं लागलं कारण नाळ बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळली गेली होती... खूप त्रास झाला...blood bottles लागल्या...नंतरही recover व्हायला फार वेळ लागला.
Actual त्या वेळेस काय होईल काहीही सांगता येत नाही...तुमची तब्येत कितीही नॉर्मल आणि धडधाकट असू देत... वाट लागते.
पारंपरिक आहार हाच उत्तम आहार
पारंपरिक आहार हाच उत्तम आहार .
Food vlogs चे ज्ञान चुकीची माहिती पसरवत असतात.
आता चे सो कॉल्ड आहार तज्ञ दिशाभूल करत असतात.
मी मूळ सातारा जिल्ह्यातील आहे.
तेथील पारंपरिक अन्न.
१)ज्वारी ची भाकरी.
२) घुट म्हणजे उडीत डाळ हिरव्या मिरचीे मध्ये.
३) चवळी, मूग,वाटाणा,घेवडा, पावटा ही कड धान्य.
४) भात अगदी कमी.
५)तिळाची चटणी,लसूण चटणी.
६) हुळग्याच्च madage.
७) नाचणी,बाजरी ह्यांच्या भाकऱ्या.
८ ) गाजर, मुळा, शेवग्याच्या शेंगा,शेवग्याच्या पानांची भाजी,चवळी ची पाले भाजी, भुई फोड हे पावसात येणारे मश्रुम आहे.
दुधी,karle, दोडका,उन्हाळी घेवडा.
हा आहार होता सातारा जिल्ह्यात पारंपरिक
आणि शिवारात हे सर्व उपलब्ध असायचे.
फळं मध्ये.
आंबा,बोर,जांभळं,पेरू,.
नॉन वेज मध्ये..
नदी मधील मासे,खेकडे, देशी कोंबडी.,बकरा,बोकड ह्यांचे मटन.
हे सर्व पदार्थ शरीराला जी गरजेचे आहे ये सर्व पुरवतात.
चोरस आहार च आहे हा..
सफरचंद,बेरी, लीच्ची,मसाला डोसा,इडली,सँडविच,नुडल्स,पिझ्झा,.
ह्या पेक्षा नक्कीच उत्तम दर्जा असणारे अन्न हे आपले पारंपरिक अन्न होतें
पोहे आणि उपमा राहिलाच.
मिसळ,पावभाजी, वडा पाव,हे काही महाराष्ट्र चे पारंपरिक अन्न नाही.
गोड जेवण फक्त काहीच दिवस.
आर्थिक गरिबी होती पण अन्न खूप उपलब्ध होते.
तळून केलेले पदार्थ हे खूप कमी पहिली लोक खात असत.
आंबवलेले पदार्थ पण खूप कमी.
पूर्वी लोक चोरस आहारच घेत आता आपण चुकीचा आहार घेत आहोत.
म्हणून २० वर्षात चष्मा आणि तीस वर्षाच्या आत .
मधुमेह,उच्च रक्त दाब. heart अटॅक.
आणि असे अनंत विकार आता कमी वयात होत आहेत.
आठ मुल सिझर न करता नॉर्मल डिलिव्हरी होत होती आता पहिलेच मुल सिझर केल्या शिवाय जन्म घेत नाही.
प्रगती की अधोगती..
नानबा >>>>> लव यु आणि हॅट्स
नानबा >>>>> लव यु आणि हॅट्स ऑफ पण. खरंच आपल्याकडे न्यु मॉमला फारच गिल्ट देतात.
नानबा, डेंजर अनुभव आहे तुमचा.
नानबा, डेंजर अनुभव आहे तुमचा. मुळात पहिल्या वेळी एवढा त्रास होऊन दुसरं मूल होऊ देणं आणि निभावून नेणं ही हिंमत आहे! >> वो एक लंबी कहानी है!
नानबा >>>>> लव यु आणि हॅट्स
नानबा >>>>> लव यु आणि हॅट्स ऑफ पण. खरंच आपल्याकडे न्यु मॉमला फारच गिल्ट देतात.>>>>>>> +१
मुळात पहिल्या वेळी एवढा त्रास
मुळात पहिल्या वेळी एवढा त्रास होऊन दुसरं मूल होऊ देणं आणि निभावून नेणं ही हिंमत आहे!
>>
अगदी हेच मनात आले, ग्रेट आहात नानबा !
अर्थात अश्या बाळंतपणाच्या अनुभवानंतर पुढचे त्या बाईला स्वतःला हवे असते की घरच्या प्रेशरमुळे पुन्हा सामोरे जावे लागते हे केस बाय केस बदलू शकते. पण दोन्ही केस मध्ये तिच्या हिंमतीची दाद द्यायला हवी.
मी स्वतः एकुलता एक याच कारणाने आहे. मुलाला वाचवावे की आईला हे डॉक्टरांनी त्या वेळी विचारलेले. लिहून द्यावे लागले होते. अर्थात आईला वाचवा असेच लिहून दिलेले. पण आपण जन्म घेताना आपल्या आईवर अशी वेळ आणू शकतो याची त्यामुळे कल्पना आहे.
पारंपरिक आहार हाच उत्तम आहार
पारंपरिक आहार हाच उत्तम आहार .
भारतात डायबिटीस फोफावण्यास ह्या आहाराचा सिंहाचा वाटा आहे असे बरेच एक्स्पर्ट म्हणतात.
नानबा >>>>> लव यु आणि हॅट्स
नानबा >>>>> लव यु आणि हॅट्स ऑफ पण. खरंच आपल्याकडे न्यु मॉमला फारच गिल्ट देतात.>>>>>>> +१११
बाळंतीण बाईला, विश्रांती हवी, चांगला सकस आहार हवा , घरात तिच्या मदतीला घरचा किंवा पेड सपोर्ट हवा अस माझं ही मत आहे. नसेल तर वेळ निभेलच , कारण आला सेकंद राहत नाही पण ती वेळ कशी निभावली जाते हे ही महत्वाचं आहे.
माझ्या मुलीच्या वेळेस आम्ही तिथे होतो . मिडवाईफ आली होती मुलीला तपासायला, तर ती म्हणली ही ...तुला चांगला सपोर्ट आहे , i am happy for this. पटकन नॉर्मल लाईफ सुरू करशील.
कल्चरल शॉक कडे गाडी वळवू.
कल्चरल शॉक कडे गाडी वळवू.
अमेरिकेमध्ये एकीकडे गर्भपाताला विरोध. बायकांवर मूल जन्माला घालायची सक्ती पण सपोर्ट सिस्टिम आजिबात नाही. किंवा असलेली त्या बाईच्या आवाक्यात येउ द्यायची नाही. इन्शुअरन्स तिला मिळू द्यायचा नाही. ( आफ्रिक न अमेरि कन किंवा लॅटिना असली तर त्यांच्या जीवनाचीच काही किंमत नाही) दुसरी कडे आहेत ती मुले नीट वाढवायची तर बेबी फॉर्मुला उपलब्ध नाही. तो मिळवून द्यायला सिनेटरांनी विरोध केला व हाणून पाडले प्रपोजल
पुढे जाउन शाळेतील मुलांवर गोळीबार व त्यांच्याबरोबर शिक्षकांचे पण मृत्यु तरी सिनेटर भाउ गडबडीत गन कंट्रोल आणू नका म्हणतात.
गन लॉबी व रिपब्लिकन लोकांचे एकेक मुक्ताफळे रोज वाचली ही हा प्रगत देश!! असे का म्हणावे असा कल्चरल शॉक बसतो.
क्यु अॅनॉन समजवणारे पॉड्का स्त ऐकले तर लैच मनोरंजन होते पण शॉक ही बसतो की डोके वापरत नाहीत का?
Pages