Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षिणे कडच्या एका राज्यातून
दक्षिणे कडच्या एका राज्यातून येणाऱ्या एका पुरुष कलीग ने लग्नाकरता बोलणी चालू असताना मी हुंडा घेणार नाही असे जाहीर केले.
या गोष्टीचा होणाऱ्या नवऱ्या मुलीच्या बापाने फार मोठा इगो इशू करून लग्न मोडण्या पर्यंत गोष्ट पुढे गेली.
मी सोशलसाईटवर पोरांचे भरमसाठ
मी सोशलसाईटवर पोरांचे भरमसाठ फोटो टाकतो ते बघून बरेच जण मला बोलतात की नजर लागेल, नजर लागेल.. अर्थात ते माझे हितचिंतकच असतात. फक्त आमचे विचार जुळणारे नसतात.>>>
खरंय, मी पोराचे काय, आमच्या ओडीन चे फोटोही तो एक वर्षाचा होईपर्यंत सोशल मीडियावर टाकले नव्हते
नजर लागेल म्हणून
फक्त मायबोली वर टाकलेला एक
आपल्याकडे नजर लागणे हे प्रकरण
आपल्याकडे नजर लागणे हे प्रकरण फार असते. एकदा आमच्या लंच टेबलवर सर्व बायका मिळून गाडीला लिंबू लावणे या प्रकाराची टिंगल उडवत होत्या. जवळपास पंधरावीस मिनिटे यावर चर्चा चालू होती. माझ्याकडे लिंबू बांधायला गाडीच नसल्याने मी मुकाट जेवत होतो. पण शेवटी न राहवून मी त्यांना विचारले, बायांनो तुम्ही आपल्या मुलांची नजर काढता का.. तर नालायका तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही म्हणून सगळ्या आया उठून निघून गेल्या.
विश्वास ठेवा. पण तो आपला आपल्यापाशी ठेवा. दुसर्यावर लादायला जाऊ नका. तसेच दुसर्यांचा आणखी कश्यावर विश्वास असेल, तर त्या विश्वासाची टिंगल उडवू नका.
नजर लागते की नाही लागत ह्याचे
नजर लागते की नाही लागत ह्याचे उत्तर कोणालाच माहीत नाही.
नजर लागणे म्हणजे दुसऱ्याची चांगली गोष्ट बघून त्या व्यक्ती बद्दल असूया मनात निर्माण,द्वेष निर्माण होणे ,तिरस्कार निर्माण.
ह्या मधून निर्माण झालेल्या निगेटिव्ह लहरी .आणि त्या मुळे होणारे नुकसान.
Wifi सारखे कनेक्शन आहे.दिसत नाही पण अस्तित्वात असते.
तुमचे विचार तुम्ही दुसऱ्यावर
तुमचे विचार तुम्ही दुसऱ्यावर धोपवया लं गेला की समोर चा त्याच्या वागण्यातून प्रतिक्रिया देणार.ती कोणत्या ही स्वरूपात असू शकते.अगदी हिंसक पण.किंवा कटू शब्द वापरून तुमचा अपमान करणार.
त्या मुळे असले उद्योग न करणे उत्तम.
प्रत्येकाला स्वतचं स्वार्थ नीट समजतो.
निगेटीच लहरी वा विचार हे
निगेटीच लहरी वा विचार हे मान्य आहे हेमंत. फक्त त्यामुळे होणारे नुकसान हे ज्याच्या मनात असूया, द्वेष निर्माण होतो त्याचे स्वतःचे होऊ शकते. त्याची मनःशांती काही काळापुरता ढासळते. त्यामुळे आपणही उगाच बडेजाव करायला नशीबाने जे आपल्याला दिलेय त्याचे प्रदर्शन मांडू नये, आणि कोणाच्या मनात अश्या भावना उत्पन्न होण्यास जबाबदार ठरू नये.
नजर लागू नये म्हणून
नजर लागू नये म्हणून
https://www.maayboli.com/node/26718
इथे जरा नजर टाका
हा धागा मस्त आहे. माहिती पण
हा धागा मस्त आहे. माहिती पण मिळाली व मजा पण येते आहे. आमचे शॉक्स नंतर येतील पण साधे आहेत हो तुमच्या शॉकांच्या मानाने.
2 3 दिवसाच्या बाळाला घेऊन फूड
2 3 दिवसाच्या बाळाला घेऊन फूड कोर्ट मध्ये बसणं किंवा शॉपिंग करत चालणं त्या आईला कसं जमतं?>>> होना अगदी अगदी.. मला नॉर्मल डी. होउन ही प्रचंड वेदना व्हायच्या हालचाल करताना.
भले व्यायम केला होता शेवटच्या दिवसा पर्यंत..रीकव्हरी लवकर झाली त्याने पण तरी दुसर्या तिसर्या दिवशी बाळाला कांगारू सॅक मधे ठेऊन फिरणे म्हणजे
बहुधा नाईलाज असावा.
दोन तीन दिवसांचे बाळ.
दोन तीन दिवसांचे बाळ.
हे मात्र अशक्य वाटत.
कोणी प्रत्यक्ष बघितले आहे का?
यूट्यूब व्हिडिओ बघून कोणी बोलत असेल तर मला नाही वाटत ते खरे असेल.
आमच्याकडच्या म्हणजे साधारण
आमच्याकडच्या म्हणजे साधारण कोकणात होणार्या लग्नात खर्च निम्मा निम्मा करायची पद्धत आहे. आणि वरपक्ष काही एक्स्ट्रा रुबाब दाखवतो असे कधी वाटले नाही. लहानपणापासून कुटुंबात ईतकी लग्ने पाहिली. कधी आम्ही वराकडचे असू तर कधी वधूकडचे. पण कधीच काही फरक जाणवला नाही. दोन्ही वेळा तितकीच धमाल केलीय. एवढ्या गोतावळ्यात एखादे आजोबा तिरसट असू शकतात, पण त्यांना दोन्हीकडचे लोकं मिळून सांभाळून घेतात. वराची बाजू डोमिनेटींग कधी वाटली नाही.
हुंडा मानपान वगैरे अनुभव घरच्या लग्नातून नाही तर चित्रपटातूनच समजत आलेय.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 23 May, 2022 - 06:04 >>>> आमच्याकडेही सारखेच .
एका फिटनेस गृपात मँगो चिकन
एका फिटनेस गृपात मँगो चिकन सलाड ची जाहिरात वाचून आताच कल्चरल शॉक बसला आहे
कोणी प्रत्यक्ष बघितले आहे का?
कोणी प्रत्यक्ष बघितले आहे का?>>> होय मी पहिलेय..एकाच होस्पिटलात एकाच दिवशी डीलेव्हरी साठी अॅडमिट होतो..मी घरी जाताना तिला पाहिले आणि माझ्या आई ला हे पाहून क.शॉ. बसला असे वर लिहिलेय
सिंगापूर मलेशिया च्या काही
सिंगापूर मलेशिया च्या काही भागांत मुलगी हुंडा देत नाही, लग्ना चा सर्व खर्च नवरा मुलगा किंवा त्याच्या घरचे करतात आणि उलट मुलगा भारी दागिने मुलीला देतो..हे कळाले तेंव्हा क.शॉ. बसला होता. मलेशिया च्या काहि लोकांत मुलगा मुली च्या घरी शिफ्ट होतो लग्ना नंतर :आश्चर्य:
मलेशिया च्या काहि लोकांत
मलेशिया च्या काहि लोकांत मुलगा मुली च्या घरी शिफ्ट होतो लग्ना नंतर >> हे आपल्याकडे पण आहे.. म्हणजे मेघालय नागालँड साइडला... मातृसत्ताक पद्धती..
मुलीच्या प्रॉपर्टी मध्ये
मुलीच्या प्रॉपर्टी मध्ये अर्धा हिसा मिळतो का मग तिथे.तसे असेल तर भारी आहे
मुलाच्या नावात मिडलनेम आणि
मुलाच्या नावात मिडलनेम आणि सरनेम कसे लिहितात मातृसत्ताक पद्धतीत. तसेच नवऱ्याचे आडनावही बदलते का लग्नानंतर?
>> 2 3 दिवसाच्या बाळाला घेऊन
>> 2 3 दिवसाच्या बाळाला घेऊन फूड कोर्ट मध्ये बसणं किंवा शॉपिंग करत चालणं त्या आईला कसं जमतं?
हो, अगदी लहान बाळाला बाबागाडीत घेऊन प्रचंड थंडीत फिरत असतात ते पाहून मलासुद्धा कल्चरल शॉक बसला होता.
ऋनमेष *****(काय सुनीता,अनिता
ऋनमेष *****(काय सुनीता,अनिता असेल ते )आणि आडनाव .
असेच लिहणार .
आणि वेगळे काय असणारं.
मुलीच्या घरी जायचे.राहण्यास तेथील सर्व सुख साधनाचा वापर करायचा.गाडी,टीव्ही,एसी,बंगला सर्व.
अशी एक गाडी खरेदी करायला काय काय करावे लागते.
घरातील सर्व काम करायची.
म्हणजे जेवण,सफाई इत्यादी .
बस.
त्या नंतर बायको येई पर्यंत office मधून पेग आणि आपण.
बायको कामावरून आली की रोमान्स .
खुप सोप आहे.
हो, अगदी लहान बाळाला
हो, अगदी लहान बाळाला बाबागाडीत घेऊन प्रचंड थंडीत फिरत असतात ते पाहून मलासुद्धा कल्चरल शॉक बसला होता
मला वाटतं हे चुकीचं असावे .शरीर शास्त्र नुसार.
प्राणी पण मुल जन्माला आल्या नंतर काही दिवस त्यांची काळजी घेतात.
अगदी कुत्र्याची पिल असतील किंवा मांजरीची.
ते प्राणी त्यांच्या पिलांना थंडी वाऱ्या पासून सुरक्षित ठेवतात.
सुरक्षित जागेतून काही काळ बाहेर काढत नाहीत.
तीन दिवसाच्या मुलाला बाहेर फिरवणे जे नैसर्गिक भावणे विरुद्ध पण आहे.
अनेक समस्या पुढे आई आणि मुल ह्यांना येत असतील.
मुलीच्या घरी जायचे.राहण्यास
मुलीच्या घरी जायचे.राहण्यास तेथील सर्व सुख साधनाचा वापर करायचा>> मतं अ तिशय एककल्ली आहेत.. जग पाहिलं नसावं बहुधा!
एका फिटनेस गृपात मँगो चिकन
एका फिटनेस गृपात मँगो चिकन सलाड ची जाहिरात वाचून आताच कल्चरल शॉक बसला आहे>>> आंब्याच्या फोडी घातलेली चिकनची डिश थाई रेस्टॉरंटमध्ये घाबरत घाबरत मागवली होती. अशी काही नजाकतदार बनवली होती की बास! वन ऑफ द टॉप टेन थिंग्स आय एव्हर एट.
>> मतं अ तिशय एककल्ली आहेत..
>> मतं अ तिशय एककल्ली आहेत.. जग पाहिलं नसावं बहुधा!
मुलगा मुलीच्या घरी लग्न झाल्या नंतर राहिला जातो हे पहिले नाही.
आदिवासी लोकात अशी पद्धत असेल तर जास्त काही फरक नसेल असे पण आदिवासी लोकांचे आर्थिक आणि सामाजिक स्थान ह्या जगात अतिशय नगण्य आहे.
त्यांची दखल पण मनापासून कोणी घेत नाही.
पण आर्थिक बाबतीत उच्च ,किंवा मध्यम आर्थिक गटात ही रीत असेल तर कशी असेल ह्या बाबत खरेच माहिती नाही.
मुली सासरी गेल्यावर तेथील सर्व सुख साधनांवर त्यांचा हक्क असतो,घरातील काम करावी लागतात .घर चालवणे हे नवऱ्याचे काम असते घर सांभाळणे बायकोचे.हे माहीत आहे.
असेच असणार ना मुलगा मुलीच्या घरी नांदायला गेल्यावर.
की वेगळे असेल.
म्हणजे मुलीचा बंगला असला तरी नवरा बंगल्याच्या आवारात झोपेल बंगल्याचा उपभोग घेणार नाही.
मुलीची मोठी car असली तरी नवरा पायी जाईल.
Car वापरणार नाही.
नक्की कशी असते मातृसत्ताक पद्धत खरेच माहीत नाही.
आदिवासी जमाती मधील उदाहरणे नको.
Pls सर्वांस सांगा.
वन ऑफ द टॉप टेन थिंग्स आय
वन ऑफ द टॉप टेन थिंग्स आय एव्हर एट
>>>>>
अँड आय कान्ट इमॅजिन साईट अँड टेस्ट ऑफ द डिश
आय क्नो. तुम्ही वर लिहिलंय
आय क्नो. तुम्ही वर लिहिलंय ऑलरेडी!
मँगो / पायनॅपल अगदी कॉमन आहे
मँगो / पायनॅपल अगदी कॉमन आहे एशियन सॅलड्स्, करीज मधे. फक्त अगदी रस करण्याइतका पिकलेला आंबा नाही वापरत त्यात, जरा क्रन्च असेल इतपत. इतर पदार्थाची स्पायसी टेस्ट कट करायला पर्फेक्ट. आपण कैरी वापरतो कितीतरी तिखट पदार्थात. साधारण तसे इमॅजिन करा. फक्त जरा अजून थोडा गोडसर.
सिझन मध्ये राजधानी रेस्टॉरंट
सिझन मध्ये राजधानी रेस्टॉरंट मध्ये अक्खी आंबा थाळी मिळते,
गुजराती कढी , भाजी पासून सगळ्यात आंबा वापरलेला असतो.
आपण कैरी वापरतो कितीतरी तिखट
आपण कैरी वापरतो कितीतरी तिखट पदार्थात. साधारण तसे इमॅजिन करा. फक्त जरा अजून थोडा गोडसर.
>>>
असेच असावे
तसेही कितीतरी ठिकाणी गोडूस बटर चिकन गिळलेय.
ओ.. ते गोडुस बटर चिकन भारताची
ओ.. ते गोडुस बटर चिकन भारताची राष्ट्रीय डिश, ओळख इ.इ. आहे असं आम्रविकेत मानतात.
तीन दिवसाच्या बाळाला चेकप ला घेऊन गेल्यावर येतायेता फूड कोर्ट मध्ये खाऊन मग स्ट्रोलार/ कार सीट वरून बाळाला हिंडवून आम्ही आणलेलं आहे. बाहेर स्नो सुद्धा पडत होता. सो तो चेक मार्क ही मिळेल. इथे कधीकधी ८ महिनेही स्नो पडतो, म्हणून काय तितकं घरी ठेवणार का? शक्यच नाही ते. वेड लागेल.
मैत्रेयी, मला चिकन प्लस आंबा
मैत्रेयी, मला चिकन प्लस आंबा हे कॉम्बो विचित्र वाटले.
सिम्बा, आंब्याची भजी मुंबई स्वयपाकघर या फेसबुक गृपत बघितली आहे
त्यामुळे भाजी/करी वगैरेला इम्यून झालेय
Pages