गोविंदभोग तांदूळ - पाऊण वाटी
मूग डाळ - पाऊण वाटी
आले पेस्ट - १ टे स्पून
जिरे पूड - १ टी स्पून
हळद - १ टी स्पून
ओले खोबरे - ३ - ४ टे स्पून
लाल मिरची - २
लवन्ग , वेलदोडा - २
दालचिनी , तमालपत्र - १
बटाटा , टोमॅटो - १ (लहान)
फ्लॉवरचे तुरे - ३/४
मटार दाणे - पाव वाटी
तूप - २ टे स्पून
गरम मसाला - १ टी स्पून
साखर - १ टे स्पून
हिरवी मिरची - १ उभी कापून
जिरे - १ टी स्पून
मीठ चवीनुसार
पाणी - ६ -७ कप
मोहरी तेल - २ -३ टे स्पून खिचडी फोडणीसाठी
शेंगदाणा तेल - बटाटा आणि फ्लॉवर परतण्यासाठी आणि तांदूळ परतण्यासाठी
प्रथम तांदूळ २ वेळा स्वच्छ धुवून पूर्ण पाणी उपसून एका परातीत घ्यावा.
मूग डाळ मंद आचेवर ६-७ मिनिट परतून घ्यावी, गुलाबीसर रंग येइतोवर. आता मूग डाळ एका भांड्यात काढा , थोडी गार झाली की एकदाच पाण्याने धुवून घ्या आणि पाणी काढून टाका.
एका कढईत १ टे स्पून शेंगदाणा तेल घेऊन तांदूळ २-३ मिनिट परतून घ्या आणि परातीत काढा. त्याच कढईत ३-४ टे स्पून शेंगदाणा तेल घेऊन आधी बटाटा मग फ्लॉवरचे तुरे परतून घ्या.
आले, हळद आणि जिरे पावडर एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून एक पेस्ट बनवा.
आता खिचडी ज्या भांड्यात करायची आहे ते भांडे घ्या त्यात मोहरी तेल घ्या, तेल तापले की त्यात जिरे, दालचिनी , तमालपत्र, लाल मिरची, ओले खोबरे, लवंग, वेलदोडा घाला. २ मिनिट परतून त्यात आले, हळद आणि जिरे पावडर पेस्ट घाला. हे मंद आचेवर करायचे आहे, मसाले जळू नयेत म्हणून. हवे असल्यास थोडे पाणी घाला मसाले जळू नयेत म्हणून.
आता अजून २-३ मिनिटे परतून त्यात तांदूळ आणि मूग डाळ घाला. हिरवी मिरची घाला. थोडे परतून त्यात चवीनुसार मीठ घाला आणि ६-७ वाट्या पाणी घाला.
एक उकळी आली की त्यात परतलेला बटाटा आणि फ्लॉवर घाला आता झाकण ठेवून १० मिनिटे खिचडी शिजत ठेवा.
१० मिनिटांनी त्यात टोमॅटो , मटार दाणे, साखर आणि गरम मसाला घाला. अजून ८-१० मिनिटे मंद आचेवर खिचडी शिजवा. शेवटी त्यात तूप सोडा. आणि अजून १ मिनिट शिजून घ्या.
पुण्यात गोविंदभोग तांदूळ दोराबजीमध्ये मिळतो, बिग बास्केट वर पण मिळतो. एकदम उत्तम प्रतीचा आणि अत्यंत चविष्ट तांदूळ आहे, महाग आहे (१५० ते २०० प्रति किलो). तांदूळ गोविंदभोगच वापरा शक्यतो. फोडणीला मोहरी तेलच वापरायचे आहे. पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता, पळीवाढ कन्सिस्टन्सी असावी. दुर्गापूजा / नवरात्रीत बंगाली पन्डालामध्ये मिळते साधारण तशीच चव येते. आपल्या नेहेमीच्या मूग डाळ खिचडी पेक्षा बरीच हटके आणि छान चव आहे.
पौष्टिक खिचडी. नवीन गोविंदभोग
पौष्टिक खिचडी. नवीन गोविंदभोग तांदूळ ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. बंगाली मित्रांसोबत अशी खिचडी खायला मिळाली होती.
मस्त मस्त. माझी जुनी कलीग
मस्त मस्त. माझी जुनी कलीग अपराजितो सिन्हा ह्या बनवत असत. व त्यांच्या बरोबर पूजो बाडी मध्ये पण एकदा खाल्ली होती. भोग पण लागतो मला वाट्टॅ ह्या खिचुरीचा. मी मूग डाळ खिचडी फॅनच आहे त्यामुळे ही रेसीपी नक्की बनवेन.
मस्त डिश. याच्याबरोबर तेल
मस्त डिश. याच्याबरोबर तेल आलेल्या लोणच्याचा पण फोटो पाहिजे होता.
( सवय नसेल तर मोहरीच्या तेलाचा आपल्याला उग्र वास येतो ).
मस्त रे मित्रा ...
मस्त रे मित्रा ...
छान
छान
ह्याच्याबरोबर, टोमॅटो-खेजुर
ह्याच्याबरोबर, टोमॅटो-खेजुर चटणी मस्त लागते.
मस्त प्रकार, छान फोटो.
मस्त प्रकार, छान फोटो.
ही स्पेशल डिशमध्ये येईल कारण वेळ द्यायला हवा. आपली खिचडी झटपट, फार वेळ नसेल तेव्हा घरी उपलब्ध असणाऱ्या मसाल्यात होणारी असते.
किशोर अमा रानभूली chrps ब्लॅक
किशोर अमा रानभूली chrps ब्लॅक कॅट देविका अंजू खूप धन्यवाद. अमा हो ही खिचडी भोग म्हणून असते. रानभूली लोणचे फोटोमध्ये नाही फक्त, पण खाल्ले फोडणीसाठी तेल फार कमी वापरायचे आहे आणि चांगले कडकडीत तापले की फोडणी करायची आहे , नाहीतर वास येईल. देवीका त्याची रेसिपी बघितली आहे करेन आता नक्कीच, बऱ्याच व्हिडीओ मध्ये वांग्याची भजी आहे ह्याबरोबर आणि एक दोन व्हिडिओत ऑम्लेट अंजू, आपल्या खिचडी पेक्षा नक्कीच जास्त वेळ लागतो कारण ही प्रसाद ह्या प्रकारात मोडते पण चव मस्त आहे.
झकास.
झकास.
ही तर भोगेर खिचुरी
मोहरीच्या तेलाबद्दल सहमत. त्याचा वास तीव्र असतो, म्हणून ते जास्त तापवून काळपट धूर निघून गेल्यानंतरच फोडणीतले जिन्नस टाकतात तेलात.
शिवाय लवंग, वेलदोडा, दालचिनी, तमालपत्र, जिरं आणि वरून शुद्ध तूप या सर्वांच्या सुवासामुळे मोहरी तेलाच्या वासाचा डॉमिनन्स कमी व्हायला मदत होते.
काय लंपन सध्या मस्त प्रयोग
काय लंपन सध्या मस्त प्रयोग चाललेत. खिचडी आणी पापडाचा फोटो सॉलिड्ड Tempting आलाय. मस्त कृती आहे. ओके, बिग बास्केट वरुन मागवेन गोविंद भोग.
झकास तोंपासू फोटू .
झकास तोंपासू फोटू .
मस्त फोटो.
मस्त फोटो.
बंगाली लोक फक्त मोहरीचे तेलच
बंगाली लोक फक्त मोहरीचे तेलच वापरत असतील ना? इकडे शेंगदाणा तेलात भाज्या परतणे, फोडणीला मोहरी आणि शेवटी तूप हा प्रकार करतात?
अनिंद्य, जाई, रश्मी, मृणाली
अनिंद्य, जाई, रश्मी, मृणाली धन्यवाद. अनिंद्य , बंगाल तुमचा जिव्हाळ्याचा विषय रश्मी धन्यवाद, सध्या नाही हो मी बरीच वर्षे करत आहे कुकिंग, माबोवर रेसिपीज आता देत आहे Srd मी युट्युब चॅनेल वर बघितली रेसिपी आणि केली आहे, तुमच्या प्रश्नाचे उत्तर एखादा बंगालीच देऊ शकेल किंवा कदाचित अनिंद्यना माहीत असेल. पैकी तूप अन मोहरी तेल नक्की वापरतात, शेंगदाणा तेलाचं माहीत नाही.
मस्तच चित्र व कृती.
मस्तच चित्र व कृती.
डिश पण मस्त आहे.. कुठून आणलीत
डिश पण मस्त आहे.. कुठून आणलीत?
अरररर चुकीच्या वेळी धागा
अरररर चुकीच्या वेळी धागा उघडला. जबरदस्त दिसतेय. आता माझा डबा कसा खाऊ? आजच करून बघते. लंपन सही दिसतेय खिचुरी
छान पाकृ , फोटो ही छान
छान पाकृ , फोटो ही छान
सीमंतिनी, नानबा, धनुडी ,
सीमंतिनी, नानबा, धनुडी , वर्णिता धन्यवाद. धनुडी केली का खिचुरी? नानबा, ती प्लेट दोराबजीमधून घेतली आहे 4 एक महिन्यांपूर्वी. कॅश काउंटरपाशी सेल म्हणून क्रॉकरी आयटम ठेवले होते खूपच स्वस्त म्हणून घेतल्या
अरे वा - धागा परत वर आला आणि
अरे वा - धागा परत वर आला आणि परत एकदा भूक लागली फोटो बघून...
लंपन डायट वर आहेस का.. त्या प्लेट मध्ये केवढुशी खिचुरी आहे... मी तर एकाच घासात खाईन
शेंगदाणा तेल नाही वापरत.
शेंगदाणा तेल नाही वापरत. मोहरीचं तेलच. बंद करताना/ शेवटी वरून फोडणी किंवा तूप या पैकी एक.
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी