भ्रष्ट नक्कल करण्याची पण पातळी ओलांडतात आपली माध्यमे. हॉलीवूड हे मूळ नाव. आपल्या इथे कोणत्यातरी महाभागाने त्यातला H काढून Bombay मधले B घातले आणि "बॉलीवूड" केले. आणि तेच पुढे प्रचलित झाले. आणि आता तर ते अधिकृतच झाले आहे. हे नाव म्हणजे "आपले बहुतेक सिनेमे हॉलीवूडपटांपासून प्रेरित असतात" ह्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केल्याचाच प्रकार.
.
तीच गत अतिरेकी हल्ल्यांची. मुंबईचे ९३ चे बॉम्बस्फोट झाले त्याला आपण तारखेने ओळखत नाही. पण अमेरिकेत ट्वीन टोवर हल्ला झाला त्याला त्यांनी ९/११ नाव दिले. आणि आपल्या माध्यमांनी लगेच त्या नंतरच्या मुंबई मधील हल्ल्यांना २६/१०, ११/७ अशी नावे दिली.
.
तसेच खूप पूर्वी अमेरिकेत वॉटरगेट हे राजकीय कांड घडले होते. त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. हे प्रकरण वॉटरगेट नावाच्या कार्यालयीन इमारतीत घडले म्हणून तेथील माध्यमांनी त्याला ते नाव दिले. पण आपल्याकडे भ्रष्ट नक्कल करण्याच्या "बॉलिवूडी" वृत्तीने त्यातला फक्त "गेट" शब्द उचलून आपल्याकडच्या कुंभाडांना तशी नावे देणे सुरु केले. त्यामुळे कोळसा व्यवहारातील कांड झाले त्याला कुणीतरी "कोलगेट" नाव दिले आणि आता ललित मोदी प्रकरणाला "ललितगेट" म्हणत आहेत. कधी कधी खरेच शिसारी येते बातम्या वाचायची. तरी नशीब अमेरिकेतल्या "त्या" इमारतीला "युगांडा", "प्रपोगंडा" असे काहीबाही नाव नव्हते. नाहीतर त्यातली शेवटची दोन अक्षरे घेऊन आपल्याकडच्या महाभागांनी इथल्या प्रकरणांची काय काय नाव ठेवली असती याची नुसती कल्पनाच केलेली बरी.
ललितगेट? कोलगेट? बॉलीवूड?
Submitted by अतुल. on 25 June, 2015 - 01:50
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तं विषय! आपल्या
मस्तं विषय!
आपल्या भारतीयांमध्ये काय ओरिजिनॅलिटीच नाय.
कायतरी मस्तं संस्कृतप्रचूर नावे द्यायला हवी होती नै!
जसं की आमच्या लाडक्या काँग्रेसवाल्यांनी बीजेपीच्या या कांडाला
'ललितकलाकेंद्र' नाव दिलंय.
कोलगेटला काय नाव द्यावं बरं?
नाही मी म्हणतो आपल्याकडे
नाही मी म्हणतो आपल्याकडे कांड, कुंभाड असे एकेक इरसाल शब्द आहेत ना. कशाला इतरांचे शब्द हवेत आपल्या कडे इतके साजरे शब्द असताना.
"कोळसा कांड", "ललित कुंभांड" अशी नावे देता आली असती ना![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नाही हो अतुल. हे राजकारणी आता
नाही हो अतुल.
हे राजकारणी आता इतकी कांडे करतात की कांड /कुभांड शब्दं वापरून वापरून लई डाऊन मार्केट झालेत.
म्हणजे इंग्रजीत नुसतं फ्रॉड किंवा स्कॅम म्हटलं तर ग्लॅमरस वाटेल का?
म्हणून असे सुंदर नवे शब्दं शोधावे.
उदा. हर्षद मेहताचा शेअर घोटाळा.
भारतीय प्रसारमाध्यमे व
भारतीय प्रसारमाध्यमे व त्यातील पत्रकार नावांच्या पगारी कारकुनांच्या अकलेचे दिवाळे वाजलेय यात दुमत नसावे.
जसं की आमच्या लाडक्या
जसं की आमच्या लाडक्या काँग्रेसवाल्यांनी बीजेपीच्या या कांडाला
'ललितकलाकेंद्र' नाव दिलंय. <<
नाव कुणीही दिलेले असो. काही महत्वाच्या आणि चांगले काम करणार्या संस्थांची व कलांची अशी बदनामी निषेधार्ह.
साती, >> कोलगेटला काय नाव
साती,
>> कोलगेटला काय नाव द्यावं बरं?
कोळसाकलाकेंद्र कसं वाटतं? यावरून शाळेतल्या विशिष्ट खोलीच्या भिंतीवर कोळशाने लिहिलेल्या कलाकृती आठवल्या तर या नावाचं सार्थक होईल!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
आ.न.,
-गा.पै.
काल पेपरम्ध्ये LAMO शब्द
काल पेपरम्ध्ये LAMO शब्द वाचला .
NAMo , RAGA झाले आहेत , आता काहितरी वेगळं वापरा .
>> भारतीय प्रसारमाध्यमे व
>> भारतीय प्रसारमाध्यमे व त्यातील पत्रकार नावांच्या पगारी कारकुनांच्या अकलेचे दिवाळे वाजलेय यात दुमत नसावे.
हे मात्र अगदी खरंय. मी सहज कल्पना केली अशी नावे का व कशी पडत असतील? आजकाल कार्पोरेट पद्धतीने न्यूज च्यानल्स चालवतात. अशाच एखाद्या टुकार च्यानलच्या ऑफिसात डायरेक्टर शेजारी प्रोग्र्याम मॅनेजर येऊन उभा असणार. त्यांच्यातला संवाद असा काहीसा होत असेल...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
डायरेक्टर: न्यूज चलायी क्या तूने?
मॅनेजर: नहीं सर. वो... नाम नहीं पता. मेरा मतलब... क्या बोलना है इस स्कॅंडल को?
डायरेक्टर: अरे यार क्या कर रहा है? हम पहले है यार जो ये न्यूज चलाएंगे. दे ना कुछ भी नाम. लेकिन कुछ ढासू नाम दे.अमेरिका का वाटरगेट था ना, वैसा टाइप का
मॅनेजर: ... नहीं समझ आ रहा है... !
डायरेक्टर: ओके रुक. क्या नाम है इन साब का?
मॅनेजर: ललित मोदी...
डायरेक्टर: हां फिर ठीक है "ललित गेट" बोल... चल जा. जल्दी कर यार. अभी तीन मिनिट के अंदर अंदर ये न्यूज चलनी चाहिये. नही तो कोई और चलायेगा यार.
मॅनेजर: ठीक है सर
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
झाले. देशभर ललित गेट, ललित गेट सुरु
![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
हि नक्कल पुढेही झालीच कि.
हि नक्कल पुढेही झालीच कि. तॉलीवूड, नॉलीवूड वगैरे. पण बाकी वरचा किस्सा खरा असावा.
कांड मात्र चालणार नाही, रामायणात सगळी कांडे येऊन गेलीत !
>>तरी नशीब अमेरिकेतल्या
>>तरी नशीब अमेरिकेतल्या "त्या" इमारतीला "युगांडा", "प्रपोगंडा" असे काहीबाही नाव नव्हते. नाहीतर त्यातली शेवटची दोन अक्षरे घेऊन आपल्याकडच्या महाभागांनी इथल्या प्रकरणांची काय काय नाव ठेवली असती याची नुसती कल्पनाच केलेली बरी.<< हा हा हा हा हा हा
हे भारीच सगळी प्रकरणे गुज्जु झाली असती की मग....
येस्स आपल्याकडे आपली कल्पकता
येस्स आपल्याकडे आपली कल्पकता नेहमी राखली पाहिजे.
पण आपले सगळे रिअॅलिटी शो तिथूनच उचललेले असतात, कित्येक गाणी, चित्रपट, तंत्र आधी तिथे वापरले गेले असते..
हे तर सोडा..
आपण भाषाही त्यांचीच वापरतो..
काय तर म्हणे ब्रेकींग न्यूज ब्रेकींग न्यूज .. अरे बातमी तुटली फुटली गळपटली काय झाले तिला??
. अरे बातमी तुटली फुटली
. अरे बातमी तुटली फुटली गळपटली काय झाले तिला??>>:हहगलो:
इंग्लिश भाषा बोलणे किंवा
इंग्लिश भाषा बोलणे किंवा त्यांच्यासारखे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करणे यात व्यक्तिगत मला तरी आक्षेपार्ह असे काही वाटत नाही. पण इतरांनी बनवलेले (किंवा इतरत्र बनलेले) Brand Words त्यात थोडाफार फरक करून केवळ आव आणण्यासाठी व खोटी जाहिरात करण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीने वापरणे ही वैचारिक दिवाळखोरी.
केम्ब्रिज, ऑक्सफर्ड हे अजून काही शब्द. त्यांना स्वत:चे असे वलय आहे आणि ते एका रात्रीत नाही तर अनेक वर्षात निर्माण झालेले आहे. पण म्हणून आपल्याकडे कुठेतरी कोपर्यावर एखादी शाळा सुरु करायची आणि त्याला "केम्ब्रिज स्कूल" किंवा "ऑक्सफर्ड विद्यालय" अशी नावे द्यायची ह्याला काय म्हणावे? पालक सुद्धा अशा शाळेत मुलाला अॅड्मिशन घेतात आणि पाहुण्यांच्यात बसून रुबाबात सांगतात "त्याला मी केम्ब्रिज ला घातले". बोंबला!
बिल्डर लोकांच्यात तर अजून जास्त क्रेझ आहे. साधे फडतूस अपार्टमेंट बांधायचे आणि नावे द्यायची "विंडसर कौंटी", "रॉयल कॅसल" ... अरे ? तुम्ही तुमची स्वत:ची वेगळी नावे द्या ना. हा उसना आव कशासाठी. "रॉयल कॅसल" मध्ये राहतो म्हणून सांगायचे आणि पुढचे वाक्य "आज आमच्याकडे नळाला पाणीच नाही आले". ऐकायला कसे वाटते?
आणी केम्ब्रिजच्या नर्सरीसाठी
एक जुनी लाट - कुठून कुठे आली
एक जुनी लाट - कुठून कुठे आली माहीत नाही .
ब्रॅड पीट - अन्जेलिना जोली ~ ब्रॅन्जेलीना
टॉम क्रुज - कॅटी होम्स ~ टॉमकॅट
म्हणून
सैफ अली खान - करीना कपूर ~ सैफीना
आणि आता क. ह. र.
शाहीद कपूर - मीरा राजपूत ~ शिरा .
http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Sh...
अतुल पाटिल - इथे
अतुल पाटिल - इथे सिंगापुरमधेही अमेरिका आणि इतर देशांचे कॉपीकट होते. आता इथे ट्रेनचे जे कलरकोड आहेत ते मी डीसीमधे पाहिले आहेत. तीच नावे इथेही दिलीत.
आता याच धर्तीवर "अर्णब चाट
आता याच धर्तीवर "अर्णब चाट गेट" हॅशटॅग सुरु केलाय (#ArnabChatGate)![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
https://timesofindia.indiatimes.com/videos/news/arnabchatgate-did-arnab-...
खरोखर, कमाल आहे ह्या लोकांची![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कोरोना लसीकरण सुरू झाले त्या
कोरोना लसीकरण सुरू झाले त्या दिवशी बातम्या चे मथळे
'देशात लसोत्सव सुरू'
'लस'स्वी भव!'
काल अँड्र्यु सायमंड चे अपघाती
काल अँड्र्यु सायमंड चे अपघाती दुःखद निधन झाले. त्या निमित्ताने २००८ मध्ये झालेल्या 'मंकीगेट' प्रकरणाची चर्चा आज पुन्हा एकदा माध्यमातून होत आहे.
हरभजन सिंगने त्याला मंकी म्हटले असा त्याचा आरोप होता. आपल्या मीडियाने याला मंकीगेट नाव दिले होते!
थोडाफार फरक करून केवळ आव
थोडाफार फरक करून केवळ आव आणण्यासाठी व खोटी जाहिरात करण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीने वापरणे ही वैचारिक दिवाळखोरी.
>>> अ ग दी . +११
छान
छान