Submitted by BLACKCAT on 3 May, 2022 - 05:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
दोन आंबे रस काढून
पाव वाटी तांदूळ , लांबट अखंड शीत
गूळ कापून
मनुका , काजू , बदाम , 2 प्रत्येकी।
क्रमवार पाककृती:
भात अर्धवट करून घेतला, मग त्यात नारळाचा किस , गूळ , ड्राय फ्रुट घालून ढवळून पुन्हा थोडे शिजवले.
एका वाटीने मूद पाडा, मग पेल्याने त्यावर एक लहान विहीर तयार करून त्यात आमरस घाला . आमरस आंबट असल्यास त्यातही थोडा गूळ घालू शकता.
वाढणी/प्रमाण:
1
अधिक टिपा:
थायलंडमध्ये मँगो राईस करतात. नारळाचे दूध, साखर घालून भात शिजवतात आणि त्यावर आंब्याच्या फोडी ठेवून सर्व्ह करतात.
त्यापेक्षा सरळ गूळ , नारळाचा कीस घालून गोड भातच करायचा आणि वरून आमरस ओतायचा. This is Indian version. म्हणून आज हे केले.
हे फ्रीजमध्ये थंड करून घेतल्यास अजून छान लागेल.
माहितीचा स्रोत:
गुगल, यु ट्युब
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी यात तेल तूप काहीच वापरलेले
मी यात तेल तूप काहीच वापरलेले नाही, पण वापरण्यास हरकत नाही.
कशी चव आहे?
कशी चव आहे?
नारळी भात, आमरसाबरोबर खायचा
नारळी भात, आमरसाबरोबर खायचा आहे.
सरळ आमरसात शिजवलेला भात आमच्याकडे करतात.
छान लागतो
छान लागतो
नक्कीच चविष्ट लागणार.
नक्कीच चविष्ट लागणार.
युट्युबवर आमरस भातात घालून
युट्युबवर आमरस भातात घालून शिजवलेही आहे
मस्त कृती. ही थाय आवृत्ती.
मस्त कृती आणि फोटो. जमेल वाटते.
ही थाय आवृत्ती. ह्यात मीठ बर्यापैकी घालतात, फरसाणात मिठाळपणा असतो तितपत. आवडली होती चव.
छान दिसत आहे.
छान दिसत आहे.
थाई राईस खुप आवडतो , भारतीय
थाई राईस खुप आवडतो , भारतीय पध्दतीने करुन बघणार...
छान.
छान.
सीमंतिनी, फोटो जिंकलेला आहे!