Submitted by Srd on 1 May, 2022 - 04:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ दिवस
लागणारे जिन्नस:
दोन सूप बोल भरून कलिंगड फोडी बिया काढून.
कन्डेन्स्ड मिल्क
व्हिप क्रिम
क्रमवार पाककृती:
फोटो (१)
- साहित्य. कलिंगड फोडी फ्रोझन, थंड condensed milk, थंड व पातळ व्हिप क्रीम
फोटो (२)
- मिक्सरमध्ये
फोटो (३)
- मिश्रण
फोटो (४)
- प्लास्टिक डब्ब्यात
फोटो (५)
- सर्व्ह
फोटो (६)
- तयार
वाढणी/प्रमाण:
चार जणांना
अधिक टिपा:
गोडीसाठी कन्डेन्स्ड मिल्क कमी अधिक करणे.
माहितीचा स्रोत:
रसोई शो, कलर्स गुजराती टीवी -
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त.. दिसतेय
मस्त.. दिसतेय
पाकृ छान लिहीलीय.. झपझप वाचली.. झपझप करून बघता येईल
साधे दूध वापरून कसे करतात ?
साधे दूध वापरून कसे करतात ?
मस्त.
मस्त.
कलिंगडात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आईस्क्रीम पाणचट होणं किंवा बर्फाचे खडे होणं असं काही झालं नाही का?
सचित्र पाककृती आवडली.
सचित्र पाककृती आवडली.
आईस्क्रीम पाणचट होणं किंवा
आईस्क्रीम पाणचट होणं किंवा बर्फाचे खडे होणं असं काही झालं नाही का?
नाही. पॉट आइस्क्रीमसारखे लागते. इतर फळांची असतात ना चिकू, आंबा,शहाळे त्यापेक्षा अधिक कलिंगड आपला वेगळेपणा राखते.
कलिंगड आणले की बिया काढलेल्या मोठ्या फोडी सील bag मध्ये फ्रिझरमध्ये ठेवायच्या. आईस्क्रीम हवे असेल त्याआधी पाच तास क्रीम व कंडेन्सड मिल्क घुसळून फ्रिझात ठेवले की तयार.
नुसत्या दुधाबाबत कुणीतरी लिहा
नुसत्या दुधाबाबत कुणीतरी लिहा हो
सचित्र पाककृती आवडली.>>> +१
सचित्र पाककृती आवडली.>>>
+१
मस्तं दिसतंय आईस्क्रीम.
मस्तं दिसतंय आईस्क्रीम. कलिंगडाची टेस्ट तर खासच
कलिंगड आणि दूध एकत्र चालते ना ?
छान दिसते आहे आईसक्रीम.
छान दिसते आहे आईसक्रीम.
<<<मस्तं दिसतंय आईस्क्रीम. कलिंगडाची टेस्ट तर खासच
कलिंगड आणि दूध एकत्र चालते ना ?>>>हा विचार केलात तर कोणतंच आइस्क्रीम खायला नको.
दुधाचे आईस्क्रीम
दुधाचे आईस्क्रीम
म्हणजे Softy किंवा फुसफुस.
Softy चा बेस बनवायचे साहित्य.
फोटो (१)
अर्धा लिटर म्हशीचं दूध,
GMS powder,
कॉर्न फ्लोर,
मिल्क पावडर.
थोड्या दुधात केशर विरघळवून रंगासाठी. किंवा फूड कलरचे दोन थेंब नंतर टाकायचे.
बेस
फोटो (२)
हे सर्व एकत्र करून थोडे खळीसारखे करून घ्यायचे
३) हा बेस प्लास्टिक डब्यात ओतून फ्रिझरात पाच तास ठेवल्यावर दगड होतो.
४) हा घट्ट बेस एका मोठ्या पातेल्यात घेऊन इलेक्ट्रिक ब्लेंडर फिरवत ठेवायचा. दहा मिनिटांनी बेस फुगून दुप्पट अडिचपट होईल. तेव्हा दोन तीन थेंब फुड कलर आणि दोन चार थेंव फुड एसन्स टाकून अर्धा मिनिट फिरवायचे. लगेच मोठ्या प्लास्टिक डब्यात पसरवून फ्रिझरमध्ये ठेवा. [ही कृती न थांबता करावी लागते अन्यथा फुललेला बेस जातो. मग पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवून करावा लागतो.]
पाच तासांनी सेट झाल्यावर स्कूपने काढून खायला तयार. #किंवा बिस्किट कोन तयार मिळतात त्यात टाकून मुलांना देता येईल.
बाजारातील सॉफ्टीसारखे लागते पण फारच कृत्रिम चव असते.
----------
कुल्फी
चांगले दूध आटवून शेवटी किंचिंत साखर घालून डब्यात पसरवून फ्रिझरात ठेवा. एक दीड तासाच्या अंतराने ते काढून ढवळून परत ठेवायचे म्हणजे खडे कमी होतात. पण कुल्फीची चव फार चांगली लागते.
नुसत्या दुधाने कलिंगड आईसी
नुसत्या दुधाने कलिंगड आईसी स्लश सारखं बनेल.... आईस्क्रिम चा टेक्स्चर नाही मिळणार
मस्त दिसत आहे एकदम
मस्त दिसत आहे एकदम
@ Srd ----
@ Srd ---- मस्त दिसतेय, पाणीदार फळांचे केले नाही कधी.
कन्डेन्स्ड मिल्क १ टिन दिसतेय; व्हिप क्रिम किती घ्यायचे?
दिसणारा रंग कलिंगडाचाच आहे की खायचा रंग लागेल १-२ थेंब ?
नुसत्या दुधाबाबत कुणीतरी लिहा हो >>>>
BLACKCAT, कलिंगड पाणीदार फळ आहे. आंबा / चिकू / सीताफळ याप्रमाणे घट्ट गर नसतो.
म्हणून कलिंगड घातल्यावर एकूण मिश्रण इतर आईस्क्रीम्सच्या मानाने जास्त पातळ होईल.
आणि तयार आईस्क्रीम मुलायम, दुधाळ न लागता, चरबरीत लागेल.
म्हणून कलिंगडाचे पाणीदारपण मुरवून घेईल इतक्या दाट वस्तूंचा बेस लागेल उदा - कन्डेन्स्ड मिल्क // व्हिप क्रिम
नुसत्या दुधाचे करायचे झाल्यास ---
** फुल क्रीम दूध आटवून घ्यावे लागेल रबडी / बासुंदी इतके
** दूध -- मिल्क पावडर किंवा ताजा खवा किंवा भिजवलेल्या काजू-बदामाच्या पेस्टसह -- उकळून दाट करावे लागेल
** व्हिप क्रिम ऐवजी ताजी साय (थोड्याश्या दुधासह) फ्रीझरमध्ये थंड करून फेटून घालता येईल
# भिजवलेल्या काजू-बदामाची पेस्ट दुधासोबत पूर्णवेळ उकळून चालेल. पेस्ट गंधगोळी वाटायची.
# मिल्क पावडर दूध निम्मे आटल्यावर ( मसाला दुधाइतके) मग थोड्या दुधात भिजवून घालायची
# खवा शक्य तितका ताजाच हवा. आंबूस वास वगैरे नको नाहीतर दूध फाटेल. तोही दूध निम्मे आटल्यावर थोड्या थंड दुधात खलून घालायचा. गुठळ्या नकोत. खव्याऐवजी उरलेले पेढे बर्फी पण वापरता येईल.
खवा खूप आधी घालून उकळले तर तुपाचा तवंग येईल.
साखर थोडी जास्त लागेल. मिश्रणाचा गोडवा गोठल्यावर जिभेला कमी झालेला जाणवतो.
( हे BLACKCAT >> नुसत्या दुधाचे >> यासाठी आहे. मूळ कृतीनुसार कन्डेन्स्ड मिल्क वापरणार्यांनी याची नोंद घेऊ नये, प्लीज. )
थोडा व्याप आहे. कन्डेन्स्ड मिल्क + व्हिप क्रिम लौकर होईल.
कन्डेन्स्ड मिल्क किती?
कन्डेन्स्ड मिल्क किती?
तीन टी स्पून.
व्हिप क्रिम किती?
तीन टी स्पून.
दिसणारा रंग कलिंगडाचाच आहे का?
होय.
धन्यवाद Srd
धन्यवाद Srd
फक्त तीन-तीन टी स्पून? मिश्रण त्यामानाने दाट दिसतेय. एकदा करून पहावे लागेल. मग अंदाज येईल.
कन्डेन्स्ड मिल्कचे प्रमाण
कन्डेन्स्ड मिल्कचे प्रमाण वाढवू नका. गोड होईल फार.
ओके. ते मी BLACKCATना
ओके. ते मी BLACKCATना नुसत्या दुधाचे करायचे आहे (कन्डेन्स्ड मिल्क शिवाय) --- त्यासाठी लिहीले. बदलते.
मस्त सजावट.
मस्त सजावट.
दुसर्या फोटो कंडेन्सड मिल्क
दुसर्या फोटो कंडेन्सड मिल्क आणि व्हिप्ड क्रीम तीन तीन टीस्पून वाटत नाही. बरंच जास्त आहे.
फोटोत दाखवायला डबे ठेवले आहेत
फोटोत दाखवायला डबे ठेवले आहेत.
टी स्पून की टेबल स्पून.??
टी स्पून की टेबल स्पून.??
2 सूप बाउल्स चा मोठा ग्लासभर रस होईल .
एवढा दाट बेस पुरतो ??
कन्डेन्स्ड मिल्क किती?
कन्डेन्स्ड मिल्क किती?
तीन टी स्पून.
व्हिप क्रिम किती?
तीन टी स्पून....... फक्त इतकेच?
होय.
होय.
कसलं सुरेख दिसतंय.
कसलं सुरेख दिसतंय.
मिल्क पावडर वापरली तर दाटपणा
मिल्क पावडर वापरली तर दाटपणा येईल.
झ-का-स!!
झ-का-स!!