१.250ग्राम चिकन (शक्यतो बोनलेस)
२.दही- 1 मोठा चमचा
३.आले लसूण पेस्ट- 1.5 चमचा
४.लाल मिरची पावडर
५.हळद
६.तेल
7.मीठ
८.लिंबू-1
९.सजावटीसाठी कोथिंबीर
1.चिकन स्वच्छ धुवून घ्या
2.एका भांड्यात चिकन,दही, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट,लाल मिरची पावडर, जराशी हळद,थोडं मीठ लावून दोन तास मॅरीनेट करून घ्या.
3.दोन तासानंतर,गॅस स्टोव्ह चालू करा.
4.त्यावर फ्राईंग पॅन ठेवा, पॅनमधे एक चमचा तेल टाका
5.तेल गरम झाले की एक चमचा आले-लसूण पेस्ट टाका.
6.आले-लसूण पेस्ट छान परतून घ्या.
7.आता मॅरीनेट केलेले चिकन पॅनमधे टाका, फूल गॅस करून दोन मिनिटे चिकन परतून घ्या असं केल्याने चिकन ज्युसेस चिकनमधेच लॉक होतात.
8.दोन मिनटानंतर गॅस सिम करा, आणि चिकन झाकून निवांत शिजू द्या पाणी आटेपर्यंत.
9.मधे मधे बघा पाणी आटले का ते.
10.चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची पावडर टाकून 10 मिनिटे परतून घ्या.
11.गॅस बंद करा. वरून एक लिंबू पिळून टाका.कोथिंबीर टाकून सजवा.
लेमन चिकन फ्राय तयार.
स्टेप 10 मध्ये variation
- चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची
पावडर, एक चमचा मीरे पावडर टाकून 10 मिनिटे परतून घ्या.
पेप्पर चिकन फ्राय तयार.
-चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची
पावडर, पुदिन्याची पाने कापून टाका,10 मिनिटे परतून
मिन्ट चिकन फ्राय तयार.
मस्तच नानबा, वेळ पण कमी लागला
मस्तच नानबा, वेळ पण कमी लागला असेल ना?
फोटो टाकायचा होता ना..
मी पण करून बघेन पनीर आणि भाज्या वापरून.
धन्यवाद.
पनीर -रंगीबिरंगी ढब्बू मिरची
पनीर -रंगीबिरंगी ढब्बू मिरची - फ्लॉवर वगैरे ..........ही आयडिया मस्त आहे नानबा! माझ्यासाठी उद्या हे करून बघणार.
आज केलेलं. छान लागलं. धन्यवाद
आज केलेलं. छान लागलं. धन्यवाद.
आवर्जून करून इथे कळवल्याबद्दल
आवर्जून करून इथे कळवल्याबद्दल थँक्स.
धन्यवाद webmaster
धन्यवाद webmaster
लेखन 'पाककृती' मध्ये हलवल्याबद्दल.
छान व सोप्पी रेसीपी. हे
छान व सोप्पी रेसीपी. हे चिकन ६५ नाही.
थँक्स अमा..
थँक्स अमा..
हे चिकन 65 नाहीये, मला माहिती नाही ते कसं बनवतात.. रेडिमेड मसाला मिळतो माहित आहे पण कधी बनवलं नाहिए..
आज केले. मस्त झाले होते.
आज केले. मस्त झाले होते.
वॉव माऊमैया.. मस्त छान खरपूस
वॉव माऊमैया.. मस्त, छान खरपूस दिसतंय..उचलून खावेसे वाटतंय..
बनवून इथे कळवल्याबद्दल धन्यवाद.
झकास रेसिपी..
झकास रेसिपी..
खरंच चॅनल्/ब्लॉग असं काही
खरंच रेसिपीचा चॅनल्/ब्लॉग असं काही सुरू कर. ही रेसिपी करून बघेन.
घोंगुरा == आंबटचुका का?
घोंगुरा == आंबटचुका का?
रेसेपी मस्त दिसतेय. पण चिकन ड्राय होत नाही का ?
<<>घोंगुरा == आंबटचुका का?>>>
<<>घोंगुरा == आंबटचुका का?>>>
घोंगुरा == आंबाडी
हैदराबाद कडे याचे लोणचे पण करतात. अतिशय स्वादिष्ट लागते.
धन्यवाद निरू, सी, आदिती,
धन्यवाद निरू, सी, आदिती, धनवन्ति !
असं म्हणतेस सी, विचार करते मग
@आदिती, ड्राय होत नाही.. दह्यामुळे ओलसर राहते.
एप्रिल फूलला मी खरंच फसले
एप्रिल फूलला मी खरंच फसले होते त्या चॅनल लिंकला..... बाकी कुणा थोर व्यक्तीने म्हणले आहे - "पण ते च तर माणसाची शोकांतिका आहे,ज्या गोष्टी सतत स्मरणात ठेवायला हव्यात त्या गोष्टी मानव विसरून जातो आणि ज्या खरोखरीच विसरून जायला हव्यात त्यांच्या वरच मनातल्या मनात मंथन करीत बसतै.."
(No subject)
Pages