एकटेपणा- सत्य कथा

Submitted by मार्गी on 13 April, 2022 - 08:35

मी प्लॅटफॉर्मवर पोहचलो. भरपूर लोक दिसत आहेत. थोडी गर्दी आहे. पण माझ्यासारखा कोणीच नाही. मला एकटेपणाची तीव्र जाणीव झाली. कोणीही माझ्यासारखा दिसत नाहीय. असह्य एकटेपणा! मला खूप अस्वस्थ व बेचैन वाटतंय. नकळत मी सारखा बघतोय कोणी माझ्यासारखा दुसरा आहे का.

किती तरी वेळ गेला. गर्दीतही मी एकटाच. भीड में भी अकेला. असह्य एकटेपणा मला अस्वस्थ करतोय. मनात विचार सुरू आहे की माझ्यासारखा दुसरा कधी येईल, कधी येईल.

आणि दूरवर एक जण दिसला. त्याचं येणं मला दिलासा देतंय. तोही एकटा असावा. तोही मला शोधतोय. आणि अखेर त्याची व माझी नजरानजर झाली. आता आम्ही दोघंही निश्चिंत झालो. आता आम्ही एकटे नाही. असा माझा एकटेपणा संपला जेव्हा मला भेटला दुसरा मास्कवाला.

- निरंजन वेलणकर.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults