व्हॉट्स अॅप ग्रुपवर जुन्या मित्राचा फोन आला. त्याने पार्टीला बोलावलं होतं. मला स्पेशली लिहीलं होतं कि ओली पार्टी नाही. पण मासेपार्टी आहे.
ओल्या पार्टीचे ठिकाण वेगळे होते , ते मला कळवले नव्हते. पण मला ते इतरांकडून पाचच मिनिटात समजले. दारूवर लेक्चर द्यायचे ठरवूनच मी होकार देऊन टाकला. तर बाकीच्या मित्रांनी मला कंट्रोल करायला सांगितलं. आधी कारण तर विचार म्हणाले. शिवाय खास तुला सामील होता यावं म्हणून दारूची वेगळी पार्टी ठेवलीय ते बघ ना.
मला हे पण पटत होतं आणि दारू वाईट आहे हे पण पटत होतं. पार्टीचं कारण मला माहिती नव्हतं. ते आधी विचारू मग मासे खाऊ आणि नंतर ठरवू असा विचार पण कल्पना लाजमी था.
गेल्यावर कारण समजलं आणि मग लेक्चर बाजूला राहीलं. त्याला घटस्फोट मिळाला होता. मित्राची एक गर्लफ्रेण्ड होती. आम्ही कॉलेज मधे असल्यापासून दोघांचं अफेयर चालू होतं. त्याला पहिला जॉब मिळाला तेव्हां त्याने तिच्या घरी विचारले. ते तयार झाले. पण याच्या घरचे तयार होईनात. कारण दोघांची जात वेगवेगळी होती.
घरच्यांनी मग घाईघाईत त्याचं लग्न जातीतल्या मुलीशी ठरवलं. आईने सांगितलं की आता हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मुलीचे वडील तालेवार पार्टी आहे. आपल्याकडून शब्द गेला आहे. जर तू नाही म्हणालास तर आम्ही दोघे विष खाऊ. त्या भीतीने मुलाने मग विरोध केला नाही. त्याने गर्लफ्रेण्डला सगळं सांगून टाकलं. पण ती म्हणाली लग्न करीन तर तुझ्याशीच नाहीतर नाही. याची दोन्हीकडून जाम गोची झाली. लग्न झालं. मुलीचे होता होतील तेव्हढे लाड झाले. मुलाने ठरवलं की आता लग्न झाले आहे तर मागचे सगळे विसरून हिच्याशी प्रामाणिक राहू. मग त्याने तिला विश्वासात घेऊन त्याच्या गर्लफ्रेण्ड बद्दल सगळं खरं खरं सांगून टाकलं. आता ब्रेक अप झाला आहे हे पण सांगितलं. झालं...
ती सकाळीच माहेरी निघून गेली. काय झालं म्हणून फोन केले तर उत्तर नाही. दुसर्या दिवशी तिच्या माहेरचे पन्नास साठ पहिलवान लोक आले. यांना दम दिला. आमच्या मुलीला फसवून लग्न केलं. तिचं आयुष्य बरबाद केलं. आता तुम्ही कसे नीट राहता ते बघू म्हणाले. मग पोलीसांकडून बोलावणं आलं. पहिल्याच रात्री मारहाणीची केस लावली. फसवणुकीची पण लावली. ती निस्तरता निस्तरता यांच्या तोंडाला फेस आला. तोडपाणीत भरपूर पैसे गेले. शेवटी पोलीसांच्या सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी दोन्ही पार्ट्यांना समोरासमोर बसवून घटस्फोटाचा सल्ला दिला.
पण तिचे वडील आणि भाऊ गुश्श्यात होते. घटस्फोट देणार नाही म्हणाले.
केस कोर्टात गेली. तिथे हे गैरहजर रहायचे. पुढच्या तारखा घ्यायचे. मधूनच हजर व्हायचे आणि कायतरी पॉईण्ट काढायचे. कोर्टाने सेटलमेण्टचा सल्ला दिला. त्यासाठी भेटलं की ती तुम्हाला बरबाद करीन असं म्हणायची. यात १५ वर्षे गेली. त्याची गर्लफ्रेण्ड अजूनही लग्न न करता त्याची वाट बघत होती. तिच्याशीही लग्न करटा येत नव्हते. अनेकांनी गुपचूप लग्न करून मोकळा हो असा सल्ला दिलेला. पण मित्र म्हणाला घटस्फोट मिळाल्याशिवाय मी नाही करणार. मुलीला एकत्र येऊन झाले गेले विसरून जाऊ हे अनेकांनी सांगून पाहीले. ते ही नाही आणि घटस्फोटही नाही हेच पालुपद चालू होतं. सूडाचीच भावना जास्त होती. शेवटी वकीलांनी यांच्या गैरहजेरीचा एक रिपोर्ट बनवला. किती काळ वाया गेला यावर जोर देऊन केस हिअरिंगला टाकली. जज्जचं मत मुलाच्या बाजूने झालं. तशी ताकीद मुलीच्या वकीलांनी दिली. पण फायनल तारखेला जज्ज साहेबांना हार्ट अॅटॅक आला आणि ते मेडीकलवर गेले. त्यातच त्यांची रिटारमेंट पण आलेली. आता नवीन जज्जकडे केस गेल्याने पुन्हा पहिल्यापासून केस स्टडी करण्यासाठी त्यांनी पुन्हा हिअरिंग घेतलं. पुन्हा पुढच्या तारखा, दांड्या. अशी अजून काही वर्षे गेली. शेवटी वकीलांनी चेंबरमधे भेट घेऊन पार्ञीच्या बिहेविअरबद्दल तक्रार केली.
त्यानंतर मग पुन्हा अजून कागदपत्रं. अॅफिडेविट झाली . पुन्हा एकदा सेटलमेण्टचा सल्ला दिला. यावेळी जज्ज साहेबांनी मुलीला आणि तिच्या वकीलांना झापले. शेवटी सेटलमेण्टला ते तयार झाले. पण त्यांनी दीड कोटी रूपये मागितले. मुलाची कमाई वर्षाला पण सात लाखाच्या पुढं नाही. शेवटी हो ना करता २५ लाखावर सेटलमेण्ट ठरली. मुलाच्या वडलांनी जे असल नसंल ते विकून पैसे दिले. गेली काही वर्षे इतकं टेन्शन होतं की मित्राचे तरूणपणीच केस पांढरे व्हायला लागले होते. त्याच्या वडलांचे केस अजून काळेभीर आहेत.
तिथं अशा बर्याच प्रकरणांची चर्चा झाली.
काही काही केस मधे तर बायकोची बदनामी करतात. काही केस मधे नवर्यावर खोटे आरोप लावले जातात. नातेवाईकांना पण ओढलं जातं. सगळंच खरं असेल असं नसतं. डिव्होर्स मिळण्यासाठी आरोप करणं गरजेचं असतं.
मुलाची केस लढणारे वकील साहेब पण आले होते. ते म्हणाले हे जगात सगळीकडं चालतं.
त्यांनी सांगितलं की कालच इंग्लंडमधे एक कायदा पास झाला कि जर दोघांना एकमेकांच्या संमतीने वेगळं व्हायचं असेल तर त्यासाठी ब्लेम गेमची गरज नाही. कुणाचा दोष असण्याची गरज नाही. एकमेकांपासून वेगळं व्हायचं आहे हे कारण पुरेसं आहे. अजून कारण द्यायची गरज नाही.
ते म्हणाले असा कायदा आला तर बर्याच जणांसाठी ती सुटका होईल.
पण काही काही जण विशेष करून लेडीज म्हणाल्या की पुरूषांना मग बरंच होईल. दुसरी कुणी आवडली की दिला घटस्फोट.
पण ही सुविधा बायकांना पण असेल ना ?
मालविका अरोरा अरबाज खानपासून वेगळी झाली. तिने लगेच लग्न केले असते. अजून एका अॅक्ट्रेसने सांगितले की तिच्या नवर्याचे तिच्या ओळखीतल्या सर्व बायकांशी संबंध होते. तिला पण लगेच सेपरेट होता आले असते. प्रूव्ह करायची गरज नाही. प्रूव्ह करणं किती अवघड आहे. व्हिडीओ दाखवला तरी लोक म्हणतात हा मी नाहीच. माझा चेहरा चिकटवला आहे.
आमीर खानचं उदाहरण भारी आहे. मुलं सांभाळण्यासाठी दोघांनी एकत्र राहणं गरजेचं नाही असं म्हणत दोघे वेगळे झाले. मस्तं कारण होतं. दोघांचं कौतुक पण झालं. पण त्याने लगेच लग्न केल्याने त्या कारणाबद्दल शंका आहे.
नाहीतर मग सुखी संसार करावा.
भारतातच नाही तर तमाम जगात ज्या जोडीचे नाव आदर्श जोडपे म्हणून घेतले जाते ते म्हणजे शाहरूख खान सर आणि गौरी खान सर. या दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम आहे. शाहरूख सरांनी पडद्यावर एव्हढा रोमान्स केला पण पडद्यामागे कधी नाही केला. एव्हढ्या हॉट हिरॉईन्स सोबत इंटीमेशन सीन्स केले पण कधिच त्यांचे कुणासोबत अफेअर झाले नाही.
एक पुरूष, एक नवरा कसा असावा याचे शाहरूख सर एक ज्वलंत उदाहरण आहेत. आजच्या युगातले ते मर्यादा पुरूषोत्तम आहेत.
पण हे सगळ्यांना शक्य नसते. मर्यादा पुरूषोत्तम किंवा मर्यादा नारीत्तम कोणच नसते. म्हणून स्फोट होतात.
जर भारतात पण असा कायदा आला तर ?
भारतात काय होईल असे तुम्हाला वाटते ?
( ऋ सरांना न सांगताच धागा काढला आहे. सरांनी माफ करावे ही विनंती विषयच तसा होता. या कायद्याची बातमी षटपर्णी व्हायच्या आत धागा काढणे गरजेचे होते ).
सलमान आणि अमीर कोणते? ते पण
सलमान आणि अमीर कोणते? ते पण सुपरस्टार आहेत का?
खराखुरा सुपरस्टार एकच सिद्धार्थ जाधव
बाकी सगळे एचा बाबा आहेत त्याच्या समोर
गरीबांचा शारुकसर.. काय सुरु
गरीबांचा शारुकसर.. काय सुरु आहे तुमच्या धाग्यावर??
दिवसातुन एकदा तरी हजेरी लावा इथे.
सरांकडुन शिका काही.
सर सुद्धा गायब आहेत. शोभत
सर सुद्धा गायब आहेत. शोभत नाही हे. कुठल्या आयडीने येतात काय माहीत !
ब्लॅककॅट यांनी धाग्यातली हवाच
ब्लॅककॅट यांनी धाग्यातली हवाच काढून घेतली. व्हॉट्स अॅप आणि गावगप्पा या सोर्सेसवर धागा काढायचा चांगलाच फटका बसला.
Pages