व्हॉट्स अॅप ग्रुपवर जुन्या मित्राचा फोन आला. त्याने पार्टीला बोलावलं होतं. मला स्पेशली लिहीलं होतं कि ओली पार्टी नाही. पण मासेपार्टी आहे.
ओल्या पार्टीचे ठिकाण वेगळे होते , ते मला कळवले नव्हते. पण मला ते इतरांकडून पाचच मिनिटात समजले. दारूवर लेक्चर द्यायचे ठरवूनच मी होकार देऊन टाकला. तर बाकीच्या मित्रांनी मला कंट्रोल करायला सांगितलं. आधी कारण तर विचार म्हणाले. शिवाय खास तुला सामील होता यावं म्हणून दारूची वेगळी पार्टी ठेवलीय ते बघ ना.
मला हे पण पटत होतं आणि दारू वाईट आहे हे पण पटत होतं. पार्टीचं कारण मला माहिती नव्हतं. ते आधी विचारू मग मासे खाऊ आणि नंतर ठरवू असा विचार पण कल्पना लाजमी था.
गेल्यावर कारण समजलं आणि मग लेक्चर बाजूला राहीलं. त्याला घटस्फोट मिळाला होता. मित्राची एक गर्लफ्रेण्ड होती. आम्ही कॉलेज मधे असल्यापासून दोघांचं अफेयर चालू होतं. त्याला पहिला जॉब मिळाला तेव्हां त्याने तिच्या घरी विचारले. ते तयार झाले. पण याच्या घरचे तयार होईनात. कारण दोघांची जात वेगवेगळी होती.
घरच्यांनी मग घाईघाईत त्याचं लग्न जातीतल्या मुलीशी ठरवलं. आईने सांगितलं की आता हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मुलीचे वडील तालेवार पार्टी आहे. आपल्याकडून शब्द गेला आहे. जर तू नाही म्हणालास तर आम्ही दोघे विष खाऊ. त्या भीतीने मुलाने मग विरोध केला नाही. त्याने गर्लफ्रेण्डला सगळं सांगून टाकलं. पण ती म्हणाली लग्न करीन तर तुझ्याशीच नाहीतर नाही. याची दोन्हीकडून जाम गोची झाली. लग्न झालं. मुलीचे होता होतील तेव्हढे लाड झाले. मुलाने ठरवलं की आता लग्न झाले आहे तर मागचे सगळे विसरून हिच्याशी प्रामाणिक राहू. मग त्याने तिला विश्वासात घेऊन त्याच्या गर्लफ्रेण्ड बद्दल सगळं खरं खरं सांगून टाकलं. आता ब्रेक अप झाला आहे हे पण सांगितलं. झालं...
ती सकाळीच माहेरी निघून गेली. काय झालं म्हणून फोन केले तर उत्तर नाही. दुसर्या दिवशी तिच्या माहेरचे पन्नास साठ पहिलवान लोक आले. यांना दम दिला. आमच्या मुलीला फसवून लग्न केलं. तिचं आयुष्य बरबाद केलं. आता तुम्ही कसे नीट राहता ते बघू म्हणाले. मग पोलीसांकडून बोलावणं आलं. पहिल्याच रात्री मारहाणीची केस लावली. फसवणुकीची पण लावली. ती निस्तरता निस्तरता यांच्या तोंडाला फेस आला. तोडपाणीत भरपूर पैसे गेले. शेवटी पोलीसांच्या सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी दोन्ही पार्ट्यांना समोरासमोर बसवून घटस्फोटाचा सल्ला दिला.
पण तिचे वडील आणि भाऊ गुश्श्यात होते. घटस्फोट देणार नाही म्हणाले.
केस कोर्टात गेली. तिथे हे गैरहजर रहायचे. पुढच्या तारखा घ्यायचे. मधूनच हजर व्हायचे आणि कायतरी पॉईण्ट काढायचे. कोर्टाने सेटलमेण्टचा सल्ला दिला. त्यासाठी भेटलं की ती तुम्हाला बरबाद करीन असं म्हणायची. यात १५ वर्षे गेली. त्याची गर्लफ्रेण्ड अजूनही लग्न न करता त्याची वाट बघत होती. तिच्याशीही लग्न करटा येत नव्हते. अनेकांनी गुपचूप लग्न करून मोकळा हो असा सल्ला दिलेला. पण मित्र म्हणाला घटस्फोट मिळाल्याशिवाय मी नाही करणार. मुलीला एकत्र येऊन झाले गेले विसरून जाऊ हे अनेकांनी सांगून पाहीले. ते ही नाही आणि घटस्फोटही नाही हेच पालुपद चालू होतं. सूडाचीच भावना जास्त होती. शेवटी वकीलांनी यांच्या गैरहजेरीचा एक रिपोर्ट बनवला. किती काळ वाया गेला यावर जोर देऊन केस हिअरिंगला टाकली. जज्जचं मत मुलाच्या बाजूने झालं. तशी ताकीद मुलीच्या वकीलांनी दिली. पण फायनल तारखेला जज्ज साहेबांना हार्ट अॅटॅक आला आणि ते मेडीकलवर गेले. त्यातच त्यांची रिटारमेंट पण आलेली. आता नवीन जज्जकडे केस गेल्याने पुन्हा पहिल्यापासून केस स्टडी करण्यासाठी त्यांनी पुन्हा हिअरिंग घेतलं. पुन्हा पुढच्या तारखा, दांड्या. अशी अजून काही वर्षे गेली. शेवटी वकीलांनी चेंबरमधे भेट घेऊन पार्ञीच्या बिहेविअरबद्दल तक्रार केली.
त्यानंतर मग पुन्हा अजून कागदपत्रं. अॅफिडेविट झाली . पुन्हा एकदा सेटलमेण्टचा सल्ला दिला. यावेळी जज्ज साहेबांनी मुलीला आणि तिच्या वकीलांना झापले. शेवटी सेटलमेण्टला ते तयार झाले. पण त्यांनी दीड कोटी रूपये मागितले. मुलाची कमाई वर्षाला पण सात लाखाच्या पुढं नाही. शेवटी हो ना करता २५ लाखावर सेटलमेण्ट ठरली. मुलाच्या वडलांनी जे असल नसंल ते विकून पैसे दिले. गेली काही वर्षे इतकं टेन्शन होतं की मित्राचे तरूणपणीच केस पांढरे व्हायला लागले होते. त्याच्या वडलांचे केस अजून काळेभीर आहेत.
तिथं अशा बर्याच प्रकरणांची चर्चा झाली.
काही काही केस मधे तर बायकोची बदनामी करतात. काही केस मधे नवर्यावर खोटे आरोप लावले जातात. नातेवाईकांना पण ओढलं जातं. सगळंच खरं असेल असं नसतं. डिव्होर्स मिळण्यासाठी आरोप करणं गरजेचं असतं.
मुलाची केस लढणारे वकील साहेब पण आले होते. ते म्हणाले हे जगात सगळीकडं चालतं.
त्यांनी सांगितलं की कालच इंग्लंडमधे एक कायदा पास झाला कि जर दोघांना एकमेकांच्या संमतीने वेगळं व्हायचं असेल तर त्यासाठी ब्लेम गेमची गरज नाही. कुणाचा दोष असण्याची गरज नाही. एकमेकांपासून वेगळं व्हायचं आहे हे कारण पुरेसं आहे. अजून कारण द्यायची गरज नाही.
ते म्हणाले असा कायदा आला तर बर्याच जणांसाठी ती सुटका होईल.
पण काही काही जण विशेष करून लेडीज म्हणाल्या की पुरूषांना मग बरंच होईल. दुसरी कुणी आवडली की दिला घटस्फोट.
पण ही सुविधा बायकांना पण असेल ना ?
मालविका अरोरा अरबाज खानपासून वेगळी झाली. तिने लगेच लग्न केले असते. अजून एका अॅक्ट्रेसने सांगितले की तिच्या नवर्याचे तिच्या ओळखीतल्या सर्व बायकांशी संबंध होते. तिला पण लगेच सेपरेट होता आले असते. प्रूव्ह करायची गरज नाही. प्रूव्ह करणं किती अवघड आहे. व्हिडीओ दाखवला तरी लोक म्हणतात हा मी नाहीच. माझा चेहरा चिकटवला आहे.
आमीर खानचं उदाहरण भारी आहे. मुलं सांभाळण्यासाठी दोघांनी एकत्र राहणं गरजेचं नाही असं म्हणत दोघे वेगळे झाले. मस्तं कारण होतं. दोघांचं कौतुक पण झालं. पण त्याने लगेच लग्न केल्याने त्या कारणाबद्दल शंका आहे.
नाहीतर मग सुखी संसार करावा.
भारतातच नाही तर तमाम जगात ज्या जोडीचे नाव आदर्श जोडपे म्हणून घेतले जाते ते म्हणजे शाहरूख खान सर आणि गौरी खान सर. या दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम आहे. शाहरूख सरांनी पडद्यावर एव्हढा रोमान्स केला पण पडद्यामागे कधी नाही केला. एव्हढ्या हॉट हिरॉईन्स सोबत इंटीमेशन सीन्स केले पण कधिच त्यांचे कुणासोबत अफेअर झाले नाही.
एक पुरूष, एक नवरा कसा असावा याचे शाहरूख सर एक ज्वलंत उदाहरण आहेत. आजच्या युगातले ते मर्यादा पुरूषोत्तम आहेत.
पण हे सगळ्यांना शक्य नसते. मर्यादा पुरूषोत्तम किंवा मर्यादा नारीत्तम कोणच नसते. म्हणून स्फोट होतात.
जर भारतात पण असा कायदा आला तर ?
भारतात काय होईल असे तुम्हाला वाटते ?
( ऋ सरांना न सांगताच धागा काढला आहे. सरांनी माफ करावे ही विनंती विषयच तसा होता. या कायद्याची बातमी षटपर्णी व्हायच्या आत धागा काढणे गरजेचे होते ).
बरंच झालं की. धागाही काढता
बरंच झालं की. धागाही काढता आला!
असा असा कायदा झाला आहे एव्हढं
असा असा कायदा झाला आहे एव्हढं सुद्धा चाललं असतं की. सगळ्या बॉलीवूडची उदाहरणं कशाला दिलीत ? त्यात पुन्हा शाहरूख खानचा झेंडा वर कशाला पाहीजे ? मायबोलीकरांनाच पाल्हाळ चालतं तर मग कोण काय करणार ? यावेळी फेसबुक, व्हॉट्स अॅप हे सोर्स नाहीत बातमीचे. थेट पार्टीच. काय पण टायमिंग !
एक शंका , ते आदर्श कपल गे कपल आहे का ?
त्यांनी सांगितलं की कालच
त्यांनी सांगितलं की कालच इंग्लंडमधे एक कायदा पास झाला कि जर दोघांना एकमेकांच्या संमतीने वेगळं व्हायचं असेल तर त्यासाठी ब्लेम गेमची गरज नाही. कुणाचा दोष असण्याची गरज नाही. एकमेकांपासून वेगळं व्हायचं आहे हे कारण पुरेसं आहे. अजून कारण द्यायची गरज नाही.
भारतातही अशी सोय आहे की.
What is divorce by mutual consent? When you and your spouse have amicably resolved terms of separation to part ways, you can dissolve the marriage by filing a mutual consent divorce petition (under Section 13B of the Hindu Marriage Act, 1955) (under Section 28 of the Special Marriage Act, 1954) before the Family Court.
https://www.news18.com/news/india/explained-how-to-get-a-mutual-consent-...
ब्लॅककॅट सर , माझ्या मित्राची
ब्लॅककॅट सर , माझ्या मित्राची केस एकदम खरी आहे. त्याला इतकी वर्षं का लागली ? वकील तर म्हणाले ऑटसाईड सेटलमेण्ट बेस्ट. मुलीची पार्टी नंतर तयार झाली तरी काऊन्सलिंग पण झालं. हे कसं ?
तुमच्या मित्राच्या केस मध्ये
तुमच्या मित्राच्या केस मध्ये म्युच्युअली ऍग्रीड फॉर डायव्होर्स नव्हते.
बायको सूड घ्यायचा म्हणून घटस्फोट देत नव्हती , तीही जर तेंव्हाच बोलली असती की आपण घटस्फोट घेऊ तर लगेच झाला असता
( आम्हीही चार तारखा पाहिल्या आहेत)
प्रथमाच्चापज्यार्धाद्यैरूनं
प्रथमाच्चापज्यार्धाद्यैरूनं खण्डितं द्वितीयार्ध ।
तत्प्रथमज्यार्धाशैस्तैरूनानि शेषाणि ॥
चतुरधिकं शतमष्टगुणं द्वापष्टिस्तथा सहस्त्राणां ।
अयुतद्वय विष्कम्भस्यासन्नो वृत्तपरिणाह: ॥
माझ्या एका मित्राच्या घरी
माझ्या एका मित्राच्या घरी जवळपास असेच झाले
मित्राचे अफेयर होते पण घरचयानी जबरदस्तीच्या दुसरिकडे लग्न लावून दिले
याचे प्रकरण कळताच त्या मुलीने पोलिसात डोमेस्टिक व्हायोल्सन ची केस टाकली, मित्र त्याचे आई वडील आणि बहीण याना पोलीस चौकीच्या खेट्या मारायला लावल्या
बरेच वर्षे हे सुरू होते
मग त्यांनी रितसर डिव्होर्स घेतला
आणि त्याने त्या आधीच्या प्रेयसी शी लग्न केले
आता दोघे सुखात राहत आहेत, एक मूल पण आहे
अॅकोस्टिक व्हायोलीनची केस
अॅकोस्टिक व्हायोलीनची केस म्हणायचंय का तुम्हाला ?
नई ओ, ते आपल्या सनई सोबत
नई ओ, ते आपल्या सनई सोबत वाजवतात मृदुग सारखं
यात १५ वर्षे गेली.
यात १५ वर्षे गेली.
अरे मग मायबोलीकर काय करणार होते? पार्टी तुम्हाला दिली तशी प्रेयसीलाही प्रत्येक पिकनिकला बोलवायला हवं.होतं.
आदर्श जोडपे म्हणून घेतले जाते
आदर्श जोडपे म्हणून घेतले जाते ते म्हणजे शाहरूख खान सर आणि गौरी खान सर>> ???
शाहरूख सरांनी पडद्यावर एव्हढा रोमान्स केला पण पडद्यामागे कधी नाही केला.>> तुमचे षारुकसर काय तुम्हाला सांगुन सगळ्या गोष्टी करतील का हो सर?
आणि मग क क क करण कुणाची बायको
आणि मग क क क करण कुणाची बायको ?
इंडस्ट्रीतच नाही तर संपूर्ण
इंडस्ट्रीतच नाही तर संपूर्ण विश्वात जुही चावला आणि त्यांच्या मैत्रीची उदाहरणे दिली जातात. दोन सभिन्नलिंगी व्यक्तींची निकळ मैत्री कशी असावी हे या दोघांकडे बघून समजते. त्याला गेण्डरलेस मैत्री म्हणतात.
शारूक सरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा नको प्लीज. त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप आहे. त्याबद्दल आपण बोलू शकतो. त्यात आपलाच फायदा आहे. आपण विषयावर बोलू.
कुणीही जाऊन घटस्फोट मागितला तर काय होईल ?
वकील साहेब म्हणतात कि आपल्याकडे कायदा असून पण जज्ज कौन्सिलिंग घ्यायला सांगतात. लग्नं वाचवता आलं तर बघावं असं जज्ज म्हणतात. तर मुलीवर दबाव नाही ना असं पण काही जज्जना वाटतं. जे जज्ज बिनधास्त असतात ते लगेच घटस्फोट देतात. एका जोडप्याला चौदा दिवसात मोकळं केलं.
सर बरे आहात ना तुम्ही.
सर बरे आहात ना तुम्ही.
इंग्रजी साहित्यात गेंडरलेस या
इंग्रजी साहित्यात गेंडरलेस या शब्दाची भर घटल्याबद्दल अभिनंदन
वर वर पहाता सरांनी चूक केली किंवा मुद्दाम चूक केली आहे असे वाटू शकेल पण त्यात एक खोल अर्थ आहे
गेंडरलेस म्हणजे गेंड्याच्या कातडीचा नाही असे लोक
जे व्यथित होतात, ज्यांना त्रास होतो आणि जे आपला राग, त्रास वेगळ्या आयडीने येऊन न काढता त्याच आयडीने काढतात आणि मग सारे जग त्यांना नावे ठेवतात असे लोक
आला आला. शेवटी शाहरुख खान
आला आला. शेवटी शाहरुख खान आला. मग आता ऋन्मेऽऽष सर यायला कितीसा वेळ?
या सरोके सर ऋन्मेऽऽष सर या आणि आपल्या अमोल कॉमेंट द्या. सावधान मोठे सर येत आहेत.
तो पहा हेलीकापटरचा पटर पटर आवाज आला, म्हणजे अस आहे शाहरुख खानपेक्षा ऋन्मेऽऽष सर महान झाले आहेत.
गेण्डरलेस मैत्री म्हणजे
गेण्डरलेस मैत्री म्हणजे मैत्रीत गेंडा नसलेली ? गेंड्यावर का राग सर्र ?
तीव्र निषेध गेंड्याला अशी वागणूक दिल्याबद्दल.
आलो.. पुन्हा एक दा
आलो.. पुन्हा एक दा
हेलि कॉप्टरमधून
बिजी आहे मित्रांनो, रात्री भेटूया.. धागा खेचत राहा
सर प्लास्टीक सर्जरी केली की
सर प्लास्टीक सर्जरी केली की काय?
आणि मागे हेलीकॉप्टरचा कटआउट आहे का?
जत्रेत फोटू काढतात तस
जत्रेत फोटू काढतात तस?काहीच्या काही. दोन आहेत पण पेट्रोल महाग झाल्यामुळे एकाच घेऊन आले आहेत.
केशवकूल काय दोन आहेत?
केशवकूल काय दोन आहेत? हेलिकॉप्टर की हेलिपॅड?
हेलिपॅड चार आहेत आमच्याकडे, आणि हेलिकॉप्टर उद्या मोजून सांगतो..
पण हे काय, पेट्रोल महाग झाले?
धागा काढा यार मग कोणीतरी.. आम्हा गर्भश्रीमंतांना समजणार कसे हे..
निदान मला विपू तरी करत जा. मी धागा काढेन, वा कोणाला तरी काढायला सांगेन
आणि मागे हेलीकॉप्टरचा कटआउट
आणि मागे हेलीकॉप्टरचा कटआउट आहे का?
>>>
आजूबाजूच्या कॉलेजातील पोरं पोरी आमच्याकडे येतात.. हेलिकॉप्टर्स सोबत सेल्फ्या काढून घ्यायला.
चित्रातला झबा सारखी दिसणारी
चित्रातली झबा सारखी दिसणारी व्यक्ती आजूबाजूच्या कॉलेजमधे (अजून) शिकतेय का ?
( आज झबाच्या परस्पर धुलाईचा बेत आखलेला असावा हे ठाऊक असूनही )
विषयाला धरुन बोला. गारंबेसर
विषयाला धरुन बोला. गारंबेसर नाराज होतील.
अरे देवा....
अरे देवा....
वरच्या फोटोत ते आहेत ते
वरच्या फोटोत ते आहेत ते गरिबांचे शरूख खान का?
रात्रभर भिजवून फुगलेला चणा ..
रात्रभर भिजवून फुगलेला चणा ...
चित्रातली झबा सारखी दिसणारी
चित्रातली झबा सारखी दिसणारी व्यक्ती
>>>
झबा म्हणजे?
सुपर्रस्टार का?
इंग्लंडात नवीन कायदा आल्याचे
इंग्लंडात नवीन कायदा आल्याचे वाचून बरे वाटले. (हे विषयाला धरूनच आहे).
शाहरूख खान दिलीपकुमार आणि अम्ताभ बच्चन यांच्यापेक्षा ग्रेट आहे हे सरांचे आणि उपसरांचे मत वाचून वाचून वाचून आता म्हटले कि एकदा यांच्या बाजूने विचार करूयात. तेव्हां खालील बाबी आढळल्या ज्या या आधी कधीच लक्षात घेतल्या नव्हता. जी आपल्याला शक्तीस्थाने वाटली तीच कदाचित कमजोरी असावी.
१. अमिताभ बच्चन व त्यांचे आदर्श दिलीपकुमार हे अभिनय करू शकत होते.
२. हे दोघेही दोन पायांवर चालत असत.
३. ते नेहमी तोंडाने संवाद बोलत असत.
४. अमिताभ बच्चन यांचा आवाज वाघाच्या डरकाळीसारखा तर दिलीपकुमार यांचा आवाज प्रेमळ पण संवादफेकीच्या वेळी करारी असे.
५. अमिताभ व दिलीपसर यांनी कधीही पडद्यावर हिरॉईनचा पिच्छा करून तिला त्रास दिला नाही. तिचे जिणे हराम केले नाही. दोघे प्रसंगी देवदास झाले पण नायिकेबद्दल कितीही नाराजी असली तरी तिला त्यांनी नेहमीच सुरक्षाचक्र प्रदान केले.
६. अमिताभ बच्चन व दिलीप सर यांनी नायिकेला गच्चीवरून ढकलून दिले नाही.
७. त्यांच्या संवादफेकीत सायलेन्स ऑफ द लँब्ज जाणवत असे.
८. त्यांनी ग्लिसरीनचे अश्रू वापरून चेहर्याला व्हायब्रेशन देत चब्बी चिक्स थरथरवले नाहीत.
९. दोघांच्याही पत्नीचे नाव गौरी नव्हते आणि मैत्रिणीचे नाव जुही नव्हते. त्यांच्या मैत्रिणीचे लग्न झालेले नसल्याने टकला दाजीमित्र त्यांना मिळाला नाही.
या गोष्टींमुळे ते मागे पडले कदाचित आणि शाहरूख सर यांना अॅडव्हान्टेज मिळाला कदाचित.
( झबा का कित्ता भी फोटु लगाओ, हम छोडेगा नही जी, पकडके रखेगा).
अमिताभ नको.. अमिताभ क्लियर
अमिताभ नको.. अमिताभ क्लियर विनर होता...
राजेश खन्ना पण काही काळ क्लियर विनर...
दलिप कुमार ला राज कपूर आणि देव आनंद नेहमीच टफ देत आले आणि शाहरुख ला सलमान आणि आमिर...
Pages