माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.
पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या वय वर्षे ४७-४८ म्हणजे २-३ वर्षात रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपार्ट्यांत पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याने मला एवढेच सांगितले की त्याची शेयर आणि म्यूचूअल फंड मध्ये साधारण २५ लाख गुंतवणूक आहे आणि येत्या २-३ वर्षात शेअर मधील गुंतवणूक सोडून टोटल १ करोड होतील (राहत्या घराची किंमत सोडून....दुसरे घर नाही) त्यानंतर रिटायरमेंट चा प्लॅन आहे. त्याचे गणित असे की १ करोड वर येण्याऱ्या ६०-७०% व्याजावर घरखर्च चालवायचा आणि ३०-४०% सेव्ह करायचे आणि गुंतवायचे. शेयर आणि फंड मधील गुंतवणूक ही पुढील अनेक वर्षे तशीच ठेवायचा मानस आहे आणि अगदीच वेळ अली तर emergency म्हणून वापरायची.
त्याच्या म्हणण्यानुसार शेयर मधील गुंतवणूक आणि १ करोड रुपये उरलेले आयुष्य त्यांच्या जीवनशैलीनुसार जगण्यासाठी त्याला आणि पत्नीला पुरतील. पुढे काही वर्षांनी वडिलोपार्जित संपत्ती देखील मिळू शकते परंतु टी तो यामध्ये पकडत नाही. कदाचित आई वडील वयोवृद्ध असल्यामुळे पुढे ती संपत्ती त्यांच्या मेडिकल साठी लागू शकते असा विचार असावा. मला ते फारसे पटले नाही. वाढलेली life expectancy पाहता साधायची रक्कम अजून ४५ वर्षे (९०-९२ वर्षे जगेल असे धरून चालू) पुरणे अवघड वाटते. महागाई दर, कमी झालेल्या ठेवीवरील किमती, आणि प्रामुख्याने उतारवयात होणार मेडिकल चा खर्च पाहता पैसे पुरवणे सोप्पे नाही. परंतु त्याचे म्हणणे असे आहे की महागाई दार जरी वाढत असला तरी त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल त्यामुळे आयुष्याच्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी आणि जीवनशैलीसाठी ते पुरेसे आहेत. मेडिकल खर्चाचा माझा मुद्दा त्याला पटला परंतु व्याजातून मिळणाऱ्या पैशात होणारी बचत आणि शेयर आणि म्यूचूअल फंड मधील पैसा (जो लॉन्ग टर्म मध्ये वाढत जाईल) पाहता फार चिंता करायची गरज नाही. मी त्याला financial planner कडे जाण्याचा सल्ला दिला परंतु त्याला त्याची गरज वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते? १ कोटी आणि वरील काही असलेली रक्कम काय पुरेशी राहील? नसल्यास दोघांसाठी किती रक्कम लागेल?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे आणि जसेजसे पैसे साठत जातील तसा रिटायरमेंट चा विचार अधिकच प्रबळ होत जाईल एवढे नक्की. त्यामुळे चर्चा पॆसा पुरेल का आणि नसल्यास किती लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.
माणसाची पहिली वीस वर्ष आणि
माणसाची पहिली वीस वर्ष आणि शेवटची वीस वर्ष ही दुसऱ्या वर अवलंबून जातात.
वृद्धाश्रमाला इस्टेट देणगी
वृद्धाश्रमाला सगळी इस्टेट देणगी देणार हे तर अगदी हास्यास्पद आणि पोरकट आहे.
वृद्धाश्रम या व्यावसायिक संघटना असतात , त्या त्यांच्या बेनेफिशरीकडून त्याची कॉस्ट वसूल करतातच , देणग्याही येत असतील , पण म्हणून देणग्या इतक्या येतात की कुणीही गरीब तसाच येऊन फ्री रहात असेल असे होत नाही , तसे असते तर रस्त्यावर गरीब म्हातारे दिसलेच नसते, म्हणून वृद्धाश्रमाला सगळी इस्टेट देणगी देणार वगैरे मूर्खपणा आहे, त्याने काहीच समाजसेवा वगैरे होत नसते. थोडेफार अन्नधान्य देणे , वस्तू देणे , पैसे देणे इ ठीक आहे, सगळे देऊन फार मोठे समाजकार्य घडणार नसते, ते पुन्हा त्यांचे बेनेफिशयरी ( उर्फ बकरे) हे त्यांची कॉस्ट वसूल होऊ शकणारेच निवडणार असतात.
आमच्या एका पेशंटची मुले अमेरिकेत आहेत, कंटाळून वृद्धाश्रमात गेला , डिपॉझिट भरले , 3 महिन्याची फी भरली
शेजारचा म्हातारा सारखा टीव्ही लावतो , म्हणून चार दिवसात भांडण करून पुन्हा घरी आला ,
आता 3 महिन्याची फी बुडाली , डिपॉझिट 6 महिने मिळणार नाही.
आता पूर्वीसारखाच स्वतःच्या घरी एकटा रहातो , ह्याचे स्वतःचे घर मुंबईत , ते सोडून कर्जत की तिकडे कुठे वृद्धाश्रमात गेला होता !!
मुलांना उभं करावं आणि मदत
मुलांना उभं करावं आणि मदत करावी म्हणजे परावलंबी करावं असं नाही. पण ती आपली आहेत आणि त्यांनी आपलं म्हातारपण करावं म्हणून आपण त्यांना जन्म दिला नाहीही ह्याचं भान ठेवावं.
केलं तर ठीक. नाही केलं तरी ठीक असं असावं. आपण अगदी पाट देऊ नये पण घासातला घास नक्की द्यावा. रक्ताचं नातं वेगळं असतं ह्यावर अजूनही विश्वास आहे.
आपण पैशानं करू शकू अशी स्वतःच्या म्हातारपणाची सोय करून ठेवावी. हल्ली ओला, उबर, स्विगी, ऑनलाईन बॅन्कींगमुळे बाहेर जायच्या वेळा कमी झाल्या आहेत त्याचा फायदा घ्यावा. मला अस्संच लागतं तस्संच लागतं वगैरे लाड पुरे करावेत. गरजा पण कमी कराव्यात.
पुढे जाऊन, शेवटचे काही दिवस /महिने/वर्षे त्रासाची जाऊ शकतात....ती काढता आली पायजेत अशीही मनाची तयारी ठेवावी असं वाटतं.
कर्मफळं ह्या जन्मी भोगली तर बरंच.
मुलांना जन्म देण्याचा काय
मुलांना जन्म देण्याचा काय उध्येश असेल.
1)नैसर्गिक उर्मी.
२)सर्वच मुलांना जन्म देत आहेत आपण पण द्यावा नाही तर वेगळे पडू.
३) कुटुंबाला वारस.
म्हणजे संपत्ती चा वारस असावा .मेल्यावर पण संपती ची हाव काही जात नाही.
४) आपल्या म्हातारं पनी आधार असावा हा हेतू.
जशी आई वडिलांची काही कर्तव्य असतात तशी मुलांची पण काही कर्तव्य असतात.
अधिकार आणि कर्तव्य हे जोडी नीच असतात.
फक्त कर्तव्य आणि फक्त अधिकार असे नसते
अधिकार वर विषयी सर्वच जागरूक असतात पण कर्तव्य विषयी बिलकुल जागरूक नसतात.
सर्वांना अधिकार हवेत पण कर्तव्य नको.
मुल त्यांची कर्तव्य पार पाडत नसतील तर कठोर होणे हा योग्य मार्ग आहे.
आजच्या बहुतांश पिढी कडे करोडो ची संपती आहे काही तर अब्जा वदी किंमतीच्या संपत्ती चे मालक आहेत.
मुल कर्तव्य करत नसतील तर ही संपत्ती कोणालाच द्यायची ह्याचा हक्क मरे पर्यंत सोडू नका.
भावनेच्या आहारी जावून सोडला अधिकार तर कुत्र पण विचारणार नाही
.
आपल्या म्हातारपणी आधार वगैरे
आपल्या म्हातारपणी आधार वगैरे जुन्या काळात सर्वाना शक्य होते
आताही ज्यांना शक्य होईल त्यांनी करावे,
पण आपली पुढची पिढी बघेलच ह्याची शाश्वती नाही
अपेक्षा तर अजिबातच नाही
Submitted by मेधावि on 29
Submitted by मेधावि on 29 March, 2022 - 10:53 >>> मेधावि, छान पोस्ट. अगदी practical
मुलांना वाऱ्यावर सोडून दिलंय
मुलांना वाऱ्यावर सोडून दिलंय आई वडिलांनी आपला स्वार्थ पाहिला अशी किती उदाहरणे असतील?
उलट मुलांसाठी सगळं काही करून ठेवलं शिक्षण, नोकरीचीची व्यवस्था, लग्नाचा खर्च वरून घर अशी कित्येक उदाहरणे दिसतील. हे मुलांना स्वतःच्या पायावर उभे करणे नव्हे तर त्यांना खंबीरपणे उभे राहता येण्या आधीच व्हीलचेअरची सवय करून दिल्या सारखे आहे.
आपल्याकडे कितीही पैसा असेल तरीही मुलांना उच्चशिक्षण आणि आपले लग्न, घर स्वतःच्या कमाईवर करू द्या. उच्च शिक्षणासाठी आपणच कर्ज द्या, एखादा पार्टटाइम जॉब करू द्या शक्य असल्यास, कुठला जॉब यात कमीपणा न मानता. या काळात त्यांना मानसिक पाठींबा देत रहा. त्यांची कमाई सुरू झाली की त्यातूनच बचत/गुंतवणूक कशी करायची हे ही शिकवा, त्यातूनच त्यांना त्यांच्या आयुष्याची सगळी सोय करायची आहे असे सांगून.
पायावर खंबीरपणे उभे करण्याची ही प्रॅक्टीकल पद्धत आहे.
पुढे मग करा त्यांच्या नावे जे काय करायचे ते.
त्यांच्या मुलांना त्यांनी कसं पायावर उभे करायचे याचेही ट्रेंनिंग त्यांना यातून मिळेल.
थोडक्यात आपल्या कडील परिस्थिती बघता मुलांचे सगळे करण्याच्या नादात त्यांना पंगु करू नका असे सांगण्यास जास्त वाव आहे, मुलांचे करण्यात कमी पडताय, अजून करा असे सांगण्यापेक्षा.
स्वतःच्या पायावर उभे करा ,
स्वतःच्या पायावर उभे करा , कष्ट करा , हे सगळे मिडल क्लासवर इथल्या व्यवस्थेने चतुराईने लादलेले आहे.
उभे राहणे कष्ट यांच्या व्याख्याही बदलत आहेत , पूर्वी विहिरीतून पाणी शेंदत होते , लिफ्ट नव्हती , मोबाईल नव्हते , आज नवीन सुविधा वापरतातच ना ? पेपर टाकायचे काम करून डिग्री वगैरे पूर्वी झालेही असेल , आज होईल का ?
--
सगळे राजघराण्यातील लोक राजेशाही , ब्रिटिश काळात पेन्शन घेऊन घरेदारे भरून आहेत , त्यांचे कुणीही कष्टकरी जॉब करत नाहीत , नाईट ड्युटी , सिक्युरिटी जॉब करत दारात उभा आहे , असे जॉब करत नाहीत. जमीनदारी , ज्वेलरी विकणे , दुबईत हॉटेल काढणे , सिनेमात काम करणे , मॉडेलिंग , सेनेत असेल तर पायलटच , आर्मीत नाही , एकदम मोठ्या ब्यांकेचा डायरेकटर मजा मजा करतात, दारुडा असला तरी बिग बॉसमध्ये एकदम एडमिशन मिळते.
आणि सामान्य लोक अजूनही पोरांना कोण दिव्याखाली अभ्यास करत होता, कोण पेपर टाकून डिग्री होल्डर झाला हे सांगत बसतात आणि तशा अपेक्षाही बाळगतात.
मानव बरोबर आहे.
मानव बरोबर आहे.
आपली कर्तव्य पूर्ण करून मुलांना उभे करा.
पण तुमची करोडो रुपयांची संपत्ती मुलांना देवू नका.
(स्थावर मालमत्ता आणि कॅश)
ती तुमची संपती कोणाला द्यायची ह्याचा निर्णय व्यवहारिक विचार करून घ्या.
देशात खूप गरीब लोक आहेत त्यांचे जीवन समृध्द होईल .
आणि आपले म्हातारपण पण सुखात जाईल.
निर्णय घेताना भावनिक होवू नका व्यवहारिक व्हा.
ब्लॅककॅट संदर्भहीन आणि
ब्लॅककॅट संदर्भहीन आणि पूर्वग्रहदूषित पोस्ट.
परिस्थिती बदलली म्हणून मुल
परिस्थिती बदलली म्हणून मुल बदलत असतील तर पालकांनी का बदलू नये.
मी तर असा विचार करतो.
अंबानी नी त्याच्या मुलांना संपत्ती दिली नाही तर त्याचा मुलगा आर्थिक बाबतींत कोणत्या स्तरावर असेल
One BHK घर तरी घेवू शकेल का.
मारुती ८०० तरी खरेदी करू शकेल का.
मी नुकत्याच लिहिलेल्या
मी नुकत्याच लिहिलेल्या वरच्या प्रतिसादात काही बोचरे शब्द होते, ते मी काढून टाकले आहेत
ब्लॅक cat.
ब्लॅक cat.
तुम्ही फक्त मुस्लिम धर्म ग्रंथात काय लिहल आहे तीच उदाहरणे द्यावीत.
मुस्लिम धर्म म्हणजे जागतिक मागास धर्म आहे
हिंदू च्या निती मत्ता, निती ह्या वर तुमची मत नकोत..
तुम्ही फक्त मुस्लिम धर्म त्यांची निती मत्ता ह्या वरच बोलावे.
ते शब्द मी काढून टाकले आहेत
ते शब्द मी काढून टाकले आहेत
राजे या शब्दात राजे , नवाब , हर हायनेस इ सगळेच सामील आहेत
खरी परिस्थिती आहे वयाच्या
खरी परिस्थिती आहे वयाच्या तीसी पर्यंत मुल आई वडिलांवर पूर्ण अवलंबून असतात..
लग्न झाले थोडे स्थिर झाले की ज्यांनी आधार दिला आज पर्यंत सर्व गरजा पुरवल्या हे विसरून आई वडिलांची जबाबदारी घेत नाहीत.
अमेरिकेत राहणारे भारतीय तिकडे maid परवडत नाही म्हणून आई ल नोकरांनी म्हणून घेवून जातात .मुल होतात तेव्हा.
गरज संपली की आई वडील मेले तरी येत नाहीत.
मेल्यावर अधिकार मागायला मात्र येतात.
ही खरी स्थिती आहे
ह्यांना अधिकार का द्यावा .
त्या पेक्षा देशातील कोणी गरजू असेल त्यांना संपत्ती दान करावी.
मग गरजू आहे , त्याला दान का
मग गरजू आहे , त्याला दान का देताय ? तुमची कामे करायला त्याला मेड म्हणून ठेवून घ्या आणि पगार द्या
उरलेला हिस्सा तुमच्या मुलांनाच द्या.
(No subject)
कारंत चिंतन या पुस्तकातून..
छान विचार
छान विचार
मुलांमधे पण प्रकार असतात.
मुलांमधे पण प्रकार असतात. कर्तृत्ववान, मध्यम, बेताची.
कर्तृत्ववान असतील पैसा द्यायची गरज नाही.
ती लोन काढू आणि फेडू शकतात.
त्यांना मानसिक आधार आणि जिद्द पुरवत रहा.
खूप हुशार नसलेली सामान्य मुलंही असतात. त्यांना प्रेम आणि लागेल तसा हळूहळू पण सतत आर्थिक आधार लागतो. संपूर्ण नाही पण थोडीफार मदत करावी त्यांना.
माझे अजून इतके वय झाले नाही
माझे अजून इतके वय झाले नाही पण आजू बाजू la जे दिसते .
त्या वरून काही मत पक्की केली आहेत.
सिनेमा,सिरियल बघून आज ची मुल आणि जास्त करून मुली .वास्तव जग. पासून खूप दूर गेलेली आहेत .त्यांना त्यांची लायकी समजणे खूप गरजेचे आहे.
आताच्या पिढी नी रीवाज म्हणून लग्न केली मुल जन्माला घातली..
असे पण इतकी अवास्तव विचार आहेत आता च्या पिढी चे की रिअल मध्ये कधीच होणार नाही
लग्नात २५ ते तीस लाख खर्च करण्या पेक्षा .
स्किन sensitivity असणारे रोबी स्त्री किंवा पुरुष हे विकत घ्यावेत.
सेक्स ची गरज भागेल च उलट घरातील सर काम ते रोबोट करतील
पाहिजे तर अजून पन्नास एक लाख खर्च करा.
म्हणजे सांगायचं मुलांना की
म्हणजे सांगायचं मुलांना की अशी अशी अपेक्षा आहे बुवा, तुला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. आम्हीच तुला कर्ज देऊ वगैरे.
नसेल एखाद्या/दीला जमत ज्याला तशी योग्य कारणे आहेत, तर आपण काय लगेच ते काही नाही आमचे कर्ज आताच परत केलेच पाहिजे, असे थोडीच म्हणणार आहोत. नसेल कुठलेच स्किल एखाद्या अपत्यामध्ये तर त्याला काय वाऱ्यावर थोडीच सोडणार आहोत.
तत्वतः काय दृष्टिकोन असावा याबद्दल आहे ते. अगदी असेच घडले पाहिजे असा काही आग्रह नाही. आपली मुले कशी आहेत परिस्थिती काय आहे याची पालकांनाच जाणीव असेल यावरून त्यात आवश्यक ते बदल ते करतीलच.
मी एक केंद्रीय क्लास वन ऑफिसर
मी एक केंद्रीय क्लास वन ऑफिसर आहे , मीही २-३ वर्षांनी स्वैच्छिक निवृत्तीचा विचार करीत आहे. मला पेन्शन असणार आहे शिवाय इतर रिटायरमेंट बेनिफिट्स असतील . माझ्याकडे एक ते दीड एकर जमीन आहे. त्यामध्ये मी थोडीशी आवडीची झाडे लावणार आहे. एक छोटीशी rabbitary , विविध जातीच्या कोंबड्या , एक गाय , ५-१० चांगल्या जातीच्या बकऱ्या , १-२ मांजर , १-२ कुत्रे अश्या सर्व परिवारा सोबत राहणार आहे. यामध्ये कुठलाही कमर्शियल अँगल नाही. फक्त आवडीसाठी प्राणी ठेवणार आहे. याने माझे उर्वरित आयुष्य आनंदात जाईल असे वाटते . वरील महानुभावांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे असे मला वाटते . त्यांच्याकडे असलेली रक्कम उर्वरित आयुष्य आनंदात घालवण्यासाठी पुरेशी आहे असे माझे मत आहे.
खूप खूप शुभेछया !
जीजी
मला दत्तक घ्या
मला दत्तक घ्या नैतर मांजर सांभाळायला ठेवून घ्या
मला दत्तक घ्या नैतर मांजर
मला दत्तक घ्या नैतर मांजर सांभाळायला ठेवून घ्या
Submitted by BLACKCAT on 29 March, 2022 - 16:26
मला एक बायको आणि एक मुलगा आहे , तुम्हाला आणखी पोसणार कोण ?
मी सध्या या विषयावर बऱ्याच
मी सध्या या विषयावर बऱ्याच जणांशी बोलते आहे, मी इन्शुरन्स मध्ये आहे. विविध लोक आणि विविध गरजा.. मज्जा येते आहे.
मात्र तरुण पिढी आपल्या निवृत्ती आणि त्यानंतर लागणाऱ्या पडणाऱ्या आर्थिक गरजेबद्दल सजग आहे, चांगली गुंतवणूक करत आहे. सध्या बऱ्याच तरुण मुलामुलींशी बोलल्यावर हे जाणवले आहे.
नवी पिढी मुलं नको असं
नवी पिढी मुलंच नकोत असं म्हणायला लागलीये.
वरची मुले केंद्रीत चर्चा
वरची मुले केंद्रीत चर्चा वाचून धाग्याचे शीर्षक किती पैसे पुरेसे याऐवजी किती मुले पुरेशी अस बदलाव .
आपण भारतात रहातो अफगणिस्तान, सिरीया, इराक , आफ्रिकेतील अनेक अस्थिर देश इथली लोक काय आणि कसा विचार करत असतील ? त्यात आता युक्रेनची भर . अशा ठिकाणी कल क्या होगा किसको पता अभी जिंदगीका लेलो मजा अशीच विचारसरणी असेल . मग वाटल की आपल्याकडे पण तेच बरोबर .
काही घटना अशा घडतात . आमच्या मंडळींची एक मैत्रीण . थोडी लहानच . ९ २ वर्षाच्या सासूबाई आणि ९१ वर्षाची आई यांच आनंदाने व्यवस्थित करणारी . दोन जुळी मुल नीट शिकून लग्नाची. नवऱ्याचा जम बसलेला व्यवसाय. सगळ काही अगदी व्यवस्थित . सकाळी हिला फोन आला, कामासाठी चांगली बाई असेल तर सांग. आमच्या ताईंना विचारून संध्याकाळी फोन करे पर्यंत त्या मैत्रीणीची यात्रा संपलेली.
हललो . कसली नियोजन आणि कसल काय . असेलही अस होण्याची शक्यता १ टक्का . उरलेल्या ९९ टक्क्यांसाठी मात्र आहे ते व्यवस्थित गुंतवावे . मजा करावी. मुलांनी संभाळल तर ठिकच नाहीतर आपली पर्यायी योजना मनात तयारी करून असावी . उद्याची चिंता करू नये.
फेसबुकवर एक ग्रुप आहे. तिथे
फेसबुकवर एक ग्रुप आहे. तिथे याबद्दल दोन्ही बाजूंनी पोस्ट्स येत असतात. काही मासले चिकटवतो.
१. "हल्लीची पिढी व्यवहारी आहे, भावानेच्या आहारी जात आहे,हिशोब करते,हिशोब ठेवते पण ती निष्ठुर नाही, व्यवहारी आहे परंतु ती भावनाशून्य नाही. पालकांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवते. आणि त्याची दामदुपटीने परतफेड करते.
परतफेड पाहिजे असल्यास गुंतवणूक करणे आलेच.मग ती गुंतवणूक सर्वात खात्रीच्या आणि सर्वात प्रिय ठिकाणी का करू नये ? जोखीम कमी आणि परतावा दामदुप्पट!
मुलांचे शिक्षण, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक पाठबळ आणि भावनिक आधार देणे हीच सर्वात मोठी investment आहे. ही तरुणपिढी व्यवहारी आहे, हिशोब ठेवणारी आहे आहे ती प्रेमाने नसू द्या,पण व्यवहाराने returns (परतावा ) देणारी आहे.
आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा."
२. "मात्रुत्वाचं पेन्शन खाण्यासाठी चटावलेल्या आयांना वठणीवर आणलं नाही तर त्यांच्या सुनांचे संसार उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. "
Hemant bhau you have gone in
Hemant bhau you have gone in a loop. We got your point that kids are useless. Move on bhai
१. "हल्लीची पिढी व्यवहारी आहे
.
Pages