माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.
पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या वय वर्षे ४७-४८ म्हणजे २-३ वर्षात रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपार्ट्यांत पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याने मला एवढेच सांगितले की त्याची शेयर आणि म्यूचूअल फंड मध्ये साधारण २५ लाख गुंतवणूक आहे आणि येत्या २-३ वर्षात शेअर मधील गुंतवणूक सोडून टोटल १ करोड होतील (राहत्या घराची किंमत सोडून....दुसरे घर नाही) त्यानंतर रिटायरमेंट चा प्लॅन आहे. त्याचे गणित असे की १ करोड वर येण्याऱ्या ६०-७०% व्याजावर घरखर्च चालवायचा आणि ३०-४०% सेव्ह करायचे आणि गुंतवायचे. शेयर आणि फंड मधील गुंतवणूक ही पुढील अनेक वर्षे तशीच ठेवायचा मानस आहे आणि अगदीच वेळ अली तर emergency म्हणून वापरायची.
त्याच्या म्हणण्यानुसार शेयर मधील गुंतवणूक आणि १ करोड रुपये उरलेले आयुष्य त्यांच्या जीवनशैलीनुसार जगण्यासाठी त्याला आणि पत्नीला पुरतील. पुढे काही वर्षांनी वडिलोपार्जित संपत्ती देखील मिळू शकते परंतु टी तो यामध्ये पकडत नाही. कदाचित आई वडील वयोवृद्ध असल्यामुळे पुढे ती संपत्ती त्यांच्या मेडिकल साठी लागू शकते असा विचार असावा. मला ते फारसे पटले नाही. वाढलेली life expectancy पाहता साधायची रक्कम अजून ४५ वर्षे (९०-९२ वर्षे जगेल असे धरून चालू) पुरणे अवघड वाटते. महागाई दर, कमी झालेल्या ठेवीवरील किमती, आणि प्रामुख्याने उतारवयात होणार मेडिकल चा खर्च पाहता पैसे पुरवणे सोप्पे नाही. परंतु त्याचे म्हणणे असे आहे की महागाई दार जरी वाढत असला तरी त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल त्यामुळे आयुष्याच्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी आणि जीवनशैलीसाठी ते पुरेसे आहेत. मेडिकल खर्चाचा माझा मुद्दा त्याला पटला परंतु व्याजातून मिळणाऱ्या पैशात होणारी बचत आणि शेयर आणि म्यूचूअल फंड मधील पैसा (जो लॉन्ग टर्म मध्ये वाढत जाईल) पाहता फार चिंता करायची गरज नाही. मी त्याला financial planner कडे जाण्याचा सल्ला दिला परंतु त्याला त्याची गरज वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते? १ कोटी आणि वरील काही असलेली रक्कम काय पुरेशी राहील? नसल्यास दोघांसाठी किती रक्कम लागेल?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे आणि जसेजसे पैसे साठत जातील तसा रिटायरमेंट चा विचार अधिकच प्रबळ होत जाईल एवढे नक्की. त्यामुळे चर्चा पॆसा पुरेल का आणि नसल्यास किती लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.
भारतात साधारण गेल्या १०-१२
भारतात साधारण गेल्या १०-१२ वर्षांपासून रेंट इन्कम वार्षिक ३-४ % मिळतो बहुतेक. पुणे, ठाणे, गुरगाव या ठिकाणी स्वतः बघितले आहे.
पुण्यात २५-३० लाखाच्या फ्लॅट ला रेंट ७-८ हजार आहे.
ठाण्याला १.२ करोड च्या फ्लॅट चा रेंट ३० हजार आहे फक्त.
गुरगाव ला ही साधारण सेम परिस्थिती आहे.
जि, मॉर्निंग स्टार वर
जि, मॉर्निंग स्टार वर क्रिस्टीन बेन्झचा थ्री बकेट पोर्टफोलिओ बघ. तंतोतंत नाही तर त्यानुसार राहात असलेल्या देशात जे उपलब्ध असेल तसे करता येत. थोडी जोखमीची आणि थोडी बिनजोखमीची गुंतवणूक एकदमच करायची. किमान रक्कम असेल (उदा: एखादा म्युच्युअल फंड किमान $१००० पाहिजे) तर एखादा महिना मागे पुढे चालत.
सी, ओके बघते
सी, ओके बघते
Bangalore ला 56 लाखाच्या
Bangalore ला 56 लाखाच्या फ्लॅट चा रेंट 40-42k without maintenance
पुण्यात २५-३० लाखाच्या फ्लॅट
पुण्यात २५-३० लाखाच्या फ्लॅट ला रेंट ७-८ हजार आहे.>>>>> १ बीएचकेचा रेट ९-१० हजार आहे.
५६ लाख काय आहे? करंट मार्केट
५६ लाख काय आहे? करंट मार्केट प्राइस की कॉस्ट?
नाहीतरी धागा विषय सोडून सैरावैरा पळतोच आहे तर रेंट की ओनरशिप ही चर्चाही इथेच दडवून.
भारतात साधारण गेल्या १०-१२
भारतात साधारण गेल्या १०-१२ वर्षांपासून रेंट इन्कम वार्षिक ३-४ % मिळतो बहुतेक. पुणे, ठाणे, गुरगाव या ठिकाणी स्वतः बघितले आहे.>>>>>> हि परिस्थिती सध्या घर घेतले तर असावी. ज्यांनी १०-१५ वर्षांपूर्वी घर घेतले होते तेही इन्व्हेस्टमेंटसाठी, त्यांना चांगला फायदा आहे. घराच्या किमती ज्या रेट ने वाढल्या त्याच रेटने घराचे रेंट नाही वाढले...त्यामुळेच घर हे इन्व्हेस्टमेंट म्हणून केवळ १०-१५ वर्षांसाठी घ्यायचे असेल तर सध्या कदाचित फायद्याचे पडणार नाही....त्याआधी घेतले असेल तर खूपच चांगला फायदा.
लवकरच हा धागाच रिटायटर करावा
लवकरच हा धागाच रिटायटर करावा लागेल असं दिसतंय.
ते ती म्हैस कथा आहे त्यालारखं होईल. तिथे चहामध्ये काॅफिन मग त्यात काॅफिन म्हणजे शवपेटिका मग आमाला पावर नाय करता करता म्हसचं उठून चालायला लागली तसं ते रिटायर होणार म्हणणारे आपला काय तो निर्णय घेऊन बाजुला झाले असतील आणि इथे दळणं सुरूच
Bangalore ला 56 लाखाच्या
Bangalore ला 56 लाखाच्या फ्लॅट चा रेंट 40-42k without maintenance Happy
>>>>
बापरे
नवी मुंबईला २५ हजार भाडेचा फ्लॅट विकत घ्यायला गेलो तर १.४ कोटी लागताहेत.
तेच मुंबईला १.४ कोटीच्या फ्लॅटचेच भाडे मात्र ३७ मिळतेय.
५६ लाखाला ४०-४२ हजार भाडे मात्र धमालच आहे.
बहुधा तिथे भाडेकरू जमात मुबलक असावी..
५६ लाख काय आहे? करंट मार्केट
५६ लाख काय आहे? करंट मार्केट प्राइस की कॉस्ट?
नाहीतरी धागा विषय सोडून सैरावैरा पळतोच आहे तर रेंट की ओनरशिप ही चर्चाही इथेच दडवून. >>> अनुमोदन.
Cost.
Cost.
मी आता फाटे फोडत नाही अजून
अमेरिकेत घर धागा चर्चा पण इथे
अमेरिकेत घर धागा चर्चा पण इथे वर्ग करू.
अमेरिकेतील ऑब्युअस भाग सोडले तर अजुनही समबडी पेंईंग युअर (मोस्ट पार्ट ऑफ) मॉर्गेज परिस्थिती येते. तुम्ही २०% डाऊन केलं आणि क्रेडिट वर्दी असाल की झालं. अगेन भाडेकरू कसा निघेल, तो मिळत राहिल ना इ. रिस्क असतातच. तर मग मिलेनिअल्स घर का नाही घेत? तर २० डाऊन जमत नाहीत बहुतेक. आणि स्थिरता नको असेल... कोण जाणे!
अमेरिकेत साधारण ६% कॉस्ट प्राईस इतका रेंट मिळतो.
मूळ मुद्य्यांवर येवुयात
मूळ मुद्य्यांवर येवुयात
हा म्हणतोय रिटायरमेंटला १५ कोटी लागतील...तेही आत्ताच्या काळात.....https://www.youtube.com/watch?v=RpUC2CURt6U
आधी टाकले होते त्याप्रमाणे एकजण ३ कोटी म्हणतोय तर एकजण ७ कोटी....
https://youtu.be/KLINZRYIquE
https://www.youtube.com/watch?v=8nzt-L3L5Ik
सामान्य माणसाने नक्की काय करायचे? मी माझे ५५ व्या वर्षी निवृत्त व्हायचे स्वप्न ६५ व्या वर्षी पुढे ढकलले आहे....मित्राला आत्ताच सांगणारआहे लवकर रिटायर झालास तर काही वर्षांनी पैसे मागायला येऊ नकोस...मिळणार नाहीत
मला वाटतं आता मुद्द्यावर
मला वाटतं आता मुद्द्यावर चर्चा झाली आहे. आणि उत्तर मिळालं आहे.
पुढची चर्चा जनरलाईझच/ ग्लोबलच होणार ना?
१ कोटी ते १५ कोटी.. काय रेंज
१ कोटी ते १५ कोटी.. काय रेंज आहे उत्तरांची
पण हे अपेक्षितच होते मला अगदी सुरुवातीलाच.
मी मुंबईत राहतो. ईथे पाच लाख वार्षिक उत्पन्न असणारयालाही मौजमजा करत आनंदाने जगताना पाहिलेय तर पाच लाख मासिक उत्पन्न असणारयालाही पैश्यांच्या टेंशनमध्ये पाहिले आहे.
प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते. आपल्या देशात तर कमालीची विषमता आहे.
अश्यात एक व्यक्ती जिला आपण ओळखत नाही. जिची लाईफस्टाईल माहीत नाही. जिच्या आशा-अपेक्षा माहीत नाही तिला केवळ तिच्या आजच्या उत्पनावरून काही ठोस आकडे देणे म्हणजे गरम पाण्यातून अगरबत्ती फिरवण्यासारखेच होते.
पण चर्चा खूप मस्त होतेय या निमित्ताने. जरा आजूबाजूला भरकटत असेल तर प्लीज थांबवू नका. ९नवीन माहिती मिळतेय.
हा म्हणतोय रिटायरमेंटला १५
हा म्हणतोय रिटायरमेंटला १५ कोटी लागतील...तेही आत्ताच्या काळात >> कोसो तुम्ही अशी १५,७,३ गोंधळ वाढवणारी जजमेंटल वाक्ये कशी कोट करू शकता... ?
प्रत्येक नंबर हा काही बेस ईनपूट नंबर्स अॅझ्युम करून काढला आहे. ३० लाख वार्षिक आऊटफ्लो पकडून १५ कोटी म्हणतोय तो. त्याने गणितात पकडलेले ईफ्लेशन वगैरे नंबर्स सुद्धा सांगितले आहेत. ह्या गणिताचा फॉर्म्युला शेवटी सेमच आहे.. तुम्ही त्याला माँटे कार्लो म्हणा नाही तर एक्सेल बेस्ड मॉडेल... ईट्स अ 'रेट' फंक्शन. जे तुम्हाला फ्युचर वॅल्यू, आऊटफ्लो पेमेंट्स, रेट ऑफ रिटर्न टाकल्यावर प्रेझेंट वॅल्यू देईल. कुठल्याही बँक कॅल्युलेटरवर हे फंक्शन तुम्हाला सापडेल. एक्सेल मध्ये पण सापडेल.
१५, ७,५,३,१ अशी प्रेझेंट वॅल्यू तुम्ही काय नंबर्स ईनपूट म्हणून टाकतात त्यावर ठरेल ना?... Your model is as dumb or smart as your inputs are मग तुमच्या मित्राचा अॅन्युअल आऊटफ्लो ३० लाख नसेल ३ लाखच असेल तर " रिटायर व्हायला १५ कोटी लागतात बरं का" असे म्हणून काय होते? तुमच्या मित्राला १.५ कोटीच पुरेसे होतील.
तुम्ही तुमच्या गरजा, प्लॅन आणि आर्थि सुरक्षा बघून ईनपूट नंबर्स ठरवा , मॉडेल मध्ये ते की-ईन करा आणि बघा काय आऊटपूट येते.
सामान्य माणूस, सर्वसाधारण जीवन, अॅवरेज खर्च ह्या लूज टर्म्सना काय अर्थ आहे? तुम्हाला नंबर ऑटपुट म्हणून हवा आहे ना तर लूज टर्म्स टाळून नंबर्स बद्दलच बोला. साप साप म्हणून भुई धोपटण्यात काय अर्थ आहे.
असा विचार केला तर देशातील
असा विचार केला तर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अंबानी sir सुधा पैसे कसे जास्त मिळवत येतील ह्या टेन्शन मध्ये असतात .
आपण काही टप्पे paduya.
सुरवातीला माणूस फक्त पोट भरण्या पुरते आणि काही basik गरजा भागवण्यासाठी आवश्यक लागतील तेवढेच पैसे असावेत अस स्वप्न ठेवतो.
नंतर ती स्टेप क्रॉस केली की चैनीच्या वस्तू,घर,गाडी ह्याच्या पाठी लागतो .
आता तरी शांती असावी ना पण नाही.
मग अजुन मोठ घर ,five स्टार हॉटेल्स,4/५, गाड्या हे सर्व मिळवण्याच्या पाठी .
हे सर्व मिळाली तरी शांतता नाही .
मग माझ्या पेक्षा कोण्ही श्रीमंत नको मीच सर्वात श्रीमंत राहिलो पाहिजे म्हणून जीवाची ओढाताण करणे ही वृत्ती आहे लोकांची.
गरजा 30/४५ हजारात पण भगतात आणि 40/४५, लाख सुधा गरजा भागवण्ासाठी कमी पडतात.
आपल्या इन्कम नुसार जीवनशैली ज्याला बदलता येते तो पैसे कमी पडतात म्हणून
स्वतःचे मानसिक स्वस्थ बिघडून घेणार नाही .
गरजा भागवण्ासाठी पैसा नको
गरजा भागवण्ासाठी पैसा नको असतो .
जीवनशैली खालच्या स्तरावर गेली तर लोक काय म्हणतील हेच सर्वात मोठे टेन्शन असते.
त्या मुळे सतत स्वतःला असुरक्षित वाटतं.
>>हा म्हणतोय रिटायरमेंटला १५
>>हा म्हणतोय रिटायरमेंटला १५ कोटी लागतील...तेही आत्ताच्या काळात.<<
त्यात बहुतेक विलिंग्टन क्लबची अॅन्युअल फॅमिली मेंबरशिप फी (इनिशिएशन फी नव्हे) धरलेली असावी...
हा पहा सीएफए सोसायटी ईंडिया
हा पहा सीएफए सोसायटी, ईंडिया ने हा चांगला ईनिशिएटिव घेतला आहे.
जमल्यास ह्याचा लाभ जरूर घ्यावा.
नमस्कार, मी वयाच्या ४४ व्या
नमस्कार, मी वयाच्या ४४ व्या वर्षी अर्थस्वातंत्र्य घेतले ज्याला बोली भाषेत Early retirement म्हणतात, मात्र मी त्याला financial freedom म्हणतो. ह्या निर्णयाला अार्थिक तयारी हा फक्त एक भाग झाला अर्थात तोही अवघडच अाहे, पण मुख्य भाग हा भावनिक अाहे.
वरील बऱ्याच पोस्टस् (सर्व नव्हे) मी वाचल्या. ३५ ते ५५ या टप्प्यावर जेव्हा अापण पोचतो, तेव्हा financial freedom हे १ स्वप्न खुणावू लाागते, अगदी खड्ड्यात गेले 'लोक काय म्हणतील' असे धरुन सुद्धा - पैसे किती लागतील, भविष्यात काय उलाढाली होतील , अचानक पैसे लागले तर काय? असे अनेक प्रश्न व चिंता सतावतात अाणि दुसऱ्या दिवशी कितीही इच्छा नसली तरी पुन्हा कामाला (अगदी work from home असले) तरी जावेच लागते, घरी असले तरी २४ तास कामाच्या ताणाचाच विचार अापण करत असतो.
मी स्वतःला अाळशी माणूस समजतो, नव्हे मी अाहेच अाळशी अाणि वर एका पोस्ट मध्ये लिहील्याप्रमाणे मी Inactive होइन अशी मलाही भीती होती, पण अाता मला शब्दशः वेळ पुरत नाही! म्हणजे पूर्वी जे १४-१६ तास मी केवळ पगार मिळवण्यासाठी घालवायचो, तेच फक्त अानंद मिळवण्यासाठी वापरतो अाणि हो, मला वाटले की मी तंगड्या पसरुन झोपेन तर तेही करु शकतो, तेही under no obligation/guilt.
मित्रांनी अाग्रह केला म्हणून मी त्याची १ methodology बनवली अाहे. जेणे करुन कोणीही अर्थस्वातंत्र्य मिळवू शकतो, तसेच मी अाता चक्क लिखाण करु लागलो अाहे. हे सर्व माझ्या http://www.as-44.com/ म्हणजे अर्थस्वातंत्र्य @ ४४ या साईटवर टाकले अाहे.
मग अाता मी काय करतो? तर फक्त voluntary activities ज्या माझ्या अावडीच्या असतील त्या! आणि अशा हजारो अानंददायी गोष्टी अाहेत, त्यामुळे मला शब्दशः त्या निवडाव्या लागतात, यात अतिशयोक्ती नाही. कुणाला नंतर मी काय करु असा प्रश्न पडला तर मला फोन करा!
अहो किरण सर,
अहो किरण सर,
लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे पुरेसे? या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाहीत तुम्ही. लेखकाला त्याबद्दल माहिती हवी आहे.
ओके,
ओके,
मी केलेल्या संशोधनाने व जी पद्धत मी स्वतः वापरतो ते उत्तर मी सांगतो
तुम्ही जी लाइफस्टाइल जगू इच्छिता त्याच्या महिन्याच्या खर्चाच्या 300 पट.
वरील पैकी 1 कोटी ते 10 कोटी या सगळ्या फिगर्स त्या अर्थाने बरोबर आहेत. म्हणजे 1 कोटी असतील तर तुम्ही महिन्याला आजच्या हिशेबाने 33333 रुपये खर्च करू शकता त्यात वार्षिक खर्च सुद्धा धरले पाहिजेत.
तुम्हाला महिन्याला 1 लाख लागत असतील तर 3 कोटी, 50000 साठी 1.5 कोटी असा हा साधा नियम आहे.
मात्र ह्यात प्रॉब्लेम असा आहे की एकदा ठरवलेली लाइफस्टाइल तुम्ही आणखी पैसे न कमवता अपग्रेड करू शकत नाही. मी देत असलेल्या फ्री voluntary ट्रेनिंग सेशन मध्ये खालील उदाहरण वापरतो
1988 मध्ये ब्रेड 2 रु होता, आज 30 वर्षांनी तो 22 रु आहे, या हिशेबाने inflation 8% च्या आसपास येते, पण आज 22 रु ला white ब्रेड मिळतो आणि mostly सर्वच जण मल्टि ग्रेन नाही तरी निदान ब्राऊन ब्रेड घेतात जो 33 ते 45 रु आहे, वस्तू वर वर पाहायला तीच आहे मात्र आता 33 च्या हिशेबाने जर तुम्ही inflation काढलेत तर ते 10% च्या आसपास येते. 1988 साली हे ऑप्शन च नव्हते. अशा वाढीव खर्चाला सुद्धा मी लाइफस्टाइल अपग्रेड च म्हणतो. जे अगदी नकळत आपल्या आयुष्यात येतात खरे राहणीमान उंचावले नसेल तरीही
दुसरी गोष्ट, ह्या 1 कोटी मध्ये दुसरे कुठलेही आर्थिक उद्दीष्ट, जसे मुलांचे शिक्षण, लग्न, आईवडिलांची काळजी, अकस्मात येणारे खर्च, इ धरलेले नाही, त्यासाठी वेगळी तजवीज करणे आवश्यक आहे. हेल्थ व लाईफ इन्शुरन्स चे हफ्ते मासिक खर्चातच धरलेले आहेत व ते अत्यावश्यक आहेत
3 री गोष्ट हे 1 कोटी रुपये तुम्हाला अशा ठिकाणी गुंतवायचे आहेत, जे टॅक्स पश्चात तुम्हाला महागाई वर मात करू शकतील. म्हणजे माझ्याकडे 1 कोटींची प्रॉपर्टी असून काहीही उपयोग नाही, जर मला त्यापासून दरमहा टॅक्स / मेंटेनन्स वगळून किमान 50000 भाडे/व्याज येत नसेल 6% p a च्या हिशेबाने. आणि एवढे उत्पन्न आज भारतात कुठल्याच ठिकाणी नाही
अर्थस्वातंत्र्य चे उद्दिष्ट लवकर रिटायर होणे हे नाहीच आहे, तर आपल्या खर्चांसाठी पगारावर अवलंबून राहता कामा नये हे आहे, एकदा का ही स्थिती आपल्या आयुष्यात आली की नोकरी करणे न करणे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे.
मात्र वर कुणीतरी लिहिल्याप्रमाणे त्यासाठी अतिशय शिस्तबद्धता व धैर्य या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
शिवाय, गाठीला 1 कोटी असूनही महिन्याला फक्त 33333 रु च खर्च करायचे हे अनेक लोकांना अशक्य होते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने financial freedom ची उदाहरणे खूपच कमी सापडतात.
जी काही उदाहरणे तुम्हाला पेपर मध्ये दिसतात, ते invariably trading किंवा share market related गोष्टी करतात, याला मी फक्त change of job एवढंच म्हणू शकतो कारण त्यांनी घर खर्चावर मुक्ती मिळवलेली नसते. ते या दुसऱ्या activity मधून पैसे कमवत असतात. त्यात चुकीचे काही नाही पण ती retirement किंवा financial freedom यापैकी काहीच नव्हे
कोहं सोहं10 ह्यांच्या मूळ
कोहं सोहं10 ह्यांच्या मूळ पोष्ट प्रमाणे 25000 महिन्याचा खर्चात पुण्यासारख्या ठिकाणी अगदी फ्रुगल लाइफस्टाइल धरली तरी सुद्धा भागू शकेल असे मला वाटत नाही, तसेच आणखी 1 2 वर्षात 1 कोटी कसे जमतील?
आर्थिक बाबींवर आईवडील अवलंबून नसतील या भ्रमात देखील राहू नका, जर त्यांच्याकडे कमीत कमी 2 कोटी ची मालमत्ता नसेल तर.
देव न करो, पण एखाद्या टर्मिनल illness मध्ये care taker व औषधांचा महिन्याचा खर्च 50 ते 60 हजार येतो हे मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे.
मुले जरी नसली तरी उभयतांचे उर्वरित आयुष्यात काहीच स्वप्ने नाहीत का? भ्रमंती, वाहन, इ गोष्टीसाठी सुद्धा पैसे लागतात
अनेकजण रिटायरमेंट नन्तर खर्च कमी होतील असे गृहीतक मांडतात जे सपशेल चुकीचे आहे, फारतर फॉर्मल कपडे व रोजचा जाण्या येण्याचा खर्च एवढाच वाचतो, मात्र वृद्धापकाळी, डॉ च्या भेटीगाठी वाढतात, चालत किंवा बस पेक्षा रिक्षा, ओला उबेर चा खर्च वाढतो, शिवाय जॉब मधले employee benefit schemes नसल्यामुळे इन्शुरन्स, इ चा खर्च ही वाढतो.
आज अमृत बंग चे व्याखान ऐकले.
आज अमृत बंग चे व्याखान ऐकले. तरुणांकडूनही शिकण्यासारखे खूप काही असते हे प्रकर्षाने जाणवले. नक्की किती पैसे पुरेसे हा प्रश्न तिथेही चर्चिला आहे.
प्रत्येक तरुणाला त्या त्या कालानुरुप काही प्रश्न पडत असतात. अनेक तरुण संघटना, पक्ष, सामाजिक चळवळी यांच्याशी जोडून घेउन त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.
अर्थपूर्ण आयुष्याची कास धरून जेव्हा तरुण-तरुणी वाटचाल करतात तेव्हा आपल्याला काय पहायला मिळते?
समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी युवांची काय भूमिका असावी?
निर्माण या युवांच्या विकासासाठी काम करणाऱ्या उपक्रमाची वैशिष्ट्ये काय?
अमृत बंग, प्रकल्प प्रमुख, निर्माण, हे कवी अनंत फंदी प्रतिष्ठान, सांगमनेर यांचयाद्वारे आयोजित व्याख्यानमालेत वरील मुद्द्यांविषयी माहिती देतात. निर्माणविषयी अधिक माहितीसाठी तसेच निर्माणच्या युवा विकासाच्या संकल्पनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पूर्ण पहा.
https://youtu.be/nj-dw9WapGk
याबाबतीत बंग , आमटे इ उदाहरणे
याबाबतीत बंग , आमटे इ उदाहरणे बघू नयेत , त्यांचे क्वालिफिकेशन , एन जी ओ साठी मिळालेली जागा , उत्पन्न हे त्यांचे प्लस पॉईंट्स असतात
सामान्य माणसाचे जीवन वेगळे असते
>>>>
>>>>
आमटे कुटुंबातही एक आत्महत्या की काय झाली आहे ना ?
>>>>>
हे विधान काढाल?
दुर्दैवी घटना आपण प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवल्या आहेत...
धाग्याच्या विषयाशी या घटनेचा काही संबंध नाही
निवृत्तीनंतर मी भगवी वस्त्रे
निवृत्तीनंतर मी भगवी वस्त्रे परिधान कारून जंगलात जाऊन राहण्याच्या विचारात आहे. एक पैसाही नको. कंदमुळांवर गुजराण करावी, नदीत डुंबावे, एक झोपडं असावं फक्त, अंगण सारवण्यासाठी एखादी गाय किंवा म्हैस, सोबतीला आणि राखणीला कुत्रं, कोंबड्या यांच्याबरोबर वेळ मस मजेत जाईल. रानातल्या जखमी जनावरांची सेवा करून त्यांना बरे करावे, त्यांच्याशी मैत्री करावी, त्यांच्या भाषा शिकून घ्याव्यात, पक्षांसाठी पाण्याचा एक घडा भरून ठेवावा असे बेत आहेत. सुरूवातीला या वस्तू आणण्यासाठी जेव्हढे पैसे लागतील तेव्हढेच. नंतर एक पैसाही नको. अधून मधून कुणी आलेच भेटायला तर मायबोलीवर कोणते धागे चालू आहेत, काय विषय आहे, कोणत्या आयडीने काय म्हटले याची ख्यालीखुशाली होईल. जाताना माझा रिप्लाय त्यांना परस्पर सांगत जाईन. भेटायला येताना स्वतःचा जेवणाचा डबा घेऊनच यावे.
भारतीय जन्गले वनखात्याच्या
भारतीय जन्गले वनखात्याच्या ताब्यात आहेत. त्यान्च्या परवानगीशिवाय तिथला एक दगडही उचलता येत नाही, झोपडे बान्धणे दुरचेच..
वरपर्यन्त तशीच वट असेल तरच जन्गलात बान्धकाम शक्य आहे. पण ज्याची अशी वट आहे तो कशाला मरायला जाईल झोपडे बान्धुन राहायला... त्याच्यासाठी जन्गलातही रिसॉर्ट्स आहेत .
पुष्पा बघा.
पुष्पा बघा.
https://www.youtube.com/watch?v=xxLkxn6kXD4
Pages