एका धाग्यावर ऋन्मेष सरांनी त्यांचे सखोल निरीक्षण मांडले आहे कि
पूर्वी मायबोलीवर पुण्याचं वर्चस्व होतं पण आता मुंबईचं आहे. तिथे त्यांनी सूचना केली कि यावर नवीन धागा काढा. पण त्यावर जे प्रतिसाद आले त्यामुळे वाद होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे. हा विषय तसा खेळीमेळीने घ्यायचा आहे.
ऋन्मेष सरांचे निरीक्षण म्हटल्यावर वादच नाही. पण काही जणांना त्यांच्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे कळत नाही. म्हणतात ना एखाद्याचे नाव गालफाड्या पडले की पडलेच. त्याने आईनस्टाईनचा गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगितला तरी लोक खोटेच म्हणणार.
अगदी शेक्सपीअरचे जगप्रसिद्ध वचन "व्हेन अ रोमन डूज अ फिडेल डू इट अगेन " हे ऐकवले तरी त्यात सुद्धा खोट काढतात लोक. मग सांगावे लागते कि हे शेक्सपीरचे वचन आहे. मी शेक्सपीअरचे काही वाचलेले नाही. पण प्रसिद्ध नाटककार जयंत नारळीकरांचा एक लेख वाचलेला त्यात होतं हे.
तर विषय असा होता कि
त्या आधी मला हे सांगायचे आहे की मुंबई ही खरी कोळ्यांची. आम्ही इथले खरे रहिवासी. पण आम्हालाच आता जागा राहिली नाही. आमच्या पणजोबाच्या आधी इथे डोंगर आणि मोकळी मैदाने होती. खापर पणजोबा आणि त्यांचे मित्र मैदानातल्या गवतात लपा छपी खेळत. विट्टी दांडू खेळत. त्यांनी डोंगरावर मातीचे किल्ले बांधले होते. समुद्रात जाणे हा तर रोजचा कार्यक्रम होता. मोठ मोठी जहाजे आणि माशाच्या जाळ्या घेऊन ते जात. समुद्रावर फेकत आणि मासे घेऊन येत, नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ वाढवण्याचा कार्यक्रम असायचा.
मी पण लहान असताना मसे पकडले आहेत आणि नारळी पौर्णिमेला कोळी गीतांवर नाचलो आहे. "गळ्यात साखळी सोन्याची" या गाण्यावरच्या माझ्या डान्सला आमच्या ग्रुपला सोन्याची साखळी मिळाली होती.
तर सांगायचा मुद्दा असा कि मुंबई काय, पुणे काय ही शहरे ज्यांच्या मनगटात तलवार होती आणि डोक्यात मेंदू होता त्यांनी वसवली. पुणे पूर्वीपासूनच मावळे आणि मराठी लोकांचे आहे. पण मुंबईत पहिल्यापासून गुजराती, पारशी, पंजाबी अशा लोकांचे वर्चस्व आहे. दादर, विले पार्ले या भागात मराठी वस्ती होती. पण आता तिथले लोक जागा विकून अमेरिकेत किंवा वांगणीच्या पुढे गेल्याने तिथेही अमराठी लोक आले आहेत. मुंबईची गती वेगवान आहे. पुण्याची गती पहिल्यापासून १० ते १ आणि ४ ते ८ अशी आहे. तब्येतीने काम हे पुण्याचे वैशिष्ट्य आहे.
यावरून काही लोक म्हणतात कि पुणेकरांचे सांस्क्रुतिक वर्चस्व आहे. काही जण त्याला दहशतवाद मानतात. पण मी तर लहानपणापासून मुंबईत पुण्यापेक्षा चांगले कार्यक्रम पाहत आलो आहे. पुल देशपांडे मूळचे मुंबईचे, असे अनेक थोर साहीत्यिक मूळचे मुंबईचे आहेत.
मग मायबोलीवर पूर्वी पुण्याचे वर्चस्व होते असे ऋ सरांनी निरीक्षण नोंदवले आहेत त्यांची कारणे काय असतील ? पार्लेकरांनी या वर्चस्वाला घोडा कसा घातला नाही ? त्यांनी ते कसे काय मुकाट्याने मान्य केले ? नागपूरकर त्या वेळी काय करत होते ?
आता हे वर्चस्व मोडून काढल्याने पुणेकर मायबोलीवर येत नाहीत का ? जुनी मायबोली राहिली नाही असे ते म्हणतात का ?
अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची तर या खेळीमेळीच्या धाग्यावर हलकी पुलकी चर्चा व्हायलाच पाहीजे.
( मायबोलीवर आवाज तर वेमा, अॅडमिन आणि त्यांना मदत करणारे पराग सर, जेबॉ सर, रॉहू सर, चीनूक्स सर आणि आश्चिग सर व इतर यांचाच आहे. ते मनावर घेणार नाहीत ही आशा आहे.).
हेलिकॉप्टर उतरल्यावर येईन
हेलिकॉप्टर उतरल्यावर येईन टांग्याने.
धुण्यात पेट्रो मावू लागल्याने
धुण्यात पेट्रो मावू लागल्याने उंबईत माग.
मर्नॉलच्या बागणीत विक्रमी वाढ.
सरांना प्रश्न विचारावे तर ते
सरांना प्रश्न विचारावे तर ते उत्तर देत नाही. आमचे जनरल क्नॉलेज कसे वाढणार?
सगळ्या मुंबईतील गावांचं मूळ
सगळ्या मुंबईतील गावांचं मूळ माझगाव आहे. तिथे कोणत्या
माबोकराचं माहेर आहे हे सांगायला नको.
आता तुमचा लेख सोन्याच्या चेनीने सुरवात केलेला आहे. झळाळी कायम राहणार.
पारशी आणि बोहरी व्यापारी येण्या अगोदरचे रहिवासी कोळी होते. सुखी समाधानी लोकं. एकमेकांना मदत करणे कोळ्यांचा स्वभाव. गाणी त्यांचीच. आगरी भंडारींची कमीच.
पोर्तुगिजांकडे ही बेटं होती. ते पक्के खलाशी, नावाडी आणि हौशीसुद्धा. तर त्यांनी या बंदराला 'बॉम बे' म्हटलं. ( गुड हार्बर). ते त्यांनी एका लग्नात ब्रिटिशांना आंदण दिलं. आणि हुशार व्यापारी ब्रिटिशांनी ते वाढवलं. मुंबादेवी होती म्हणून मुंबई आणि त्याचे रुपांतर 'बॉम्बे' केलं हा एक गैरसमज.
आता बंदरं हवीच होती व्यापारासाठी आणि जहाजं येईपर्यंत माल साठवून ठेवण्याच्या वखारी ( गोडाऊनस) बांधण्यात आली. कंपन्यांची कार्यालये असलेल्या मैठ्या इमारती आल्या. खैबर खिंडीतला जुना व्यापारी मार्ग या समुद्री मार्गाने बंद पडायला आलेलाच. तर पारशी,बोहरी,इराणी,राजस्थानी व्यापाऱ्यांनी इकडे जागा घ्यायला सुरुवात केली. (काही गेले कोलकाता,कोचीला )काहींनी कापूस व्यापाराबरोबरच नवीन यंत्रे असलेल्या कापड गिरण्या सुरू केल्या. आणि मराठी माणूस त्यात कामगार म्हणून आला. खणखणीत आवाज काढण्याची हौस भागवायला संधी मिळाली. गिरण्यांच्या कामगार चाळी गिरगाव ते परळपर्यंत पसरल्या. कामगारांची मुलं शिकून हुशार झाली, म्यानेजर झाली. त्यांची मुलं आणखी शिकून परदेशात गेली. ब्रिटिशांना विरोध हा फक्त कागदोपत्री आणि स्वातंत्र्य समारंभापुरताच उरला. त्यांच्या मांडीवर बसण्यात महाराष्ट्रातील मराठी लोकांनी बराच वेळ घेतला. तोपर्यंत बंगाल,पंजाब,कर्नाटक पुढेच गेले. इकडे पुण्यातल्या पेशव्यांनीही शेवटी ज्याक लावला. शिंदे,होळकर, गायकवाडांनी काळाची पावले फारच अगोदर ओळखली. आपल्या डरकाळीचं म्यांऊ कधी झालं ते कळलंही नाही. पण ललितात उरलं.
आता पुढे चालू ठेवू इथे.
रिपब्लिक ऑफ डोंबिवली चा
रिपब्लिक ऑफ डोंबिवली चा उल्लेख नसल्यामुळे निषेध...
आणि विदर्भाला का बगल दिलीय.. पी एल यांचा एक व्हिडीओ आहे पुणेकर मुंबईकर आणि नागपूरकर...
रिपब्लिक ऑफ डोंबिवली
रिपब्लिक ऑफ डोंबिवली
पूर्व का पश्चिम?
आव्वाज (चूक) = आवाज (बरोबर
आव्वाज (चूक) = आवाज (बरोबर)
आईनस्टाईनचा गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत - हे काय असतं ?
गालफाड्या - ??? क्नकोंड्या, कानफाट्या यातलं काही म्हणायचंय का ?
व्हेन अ रोमन डूज अ फिडेल डू इट अगेन == याचा अर्थ काय ? आणि हे शेक्सपीअरने कधी म्हटलंय ?
When in Rome, Do as Romans DO आणि रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता यातलं काय नेमकं ?
प्रसिद्ध नाटककार जयंत नारळीकरांचा एक लेख -- Really ? वसंत कानेटकर आठवलं नाही ?
सध्या इतकेच. बाकीचे नंतर बघू.
(No subject)
मी मारली रे एंट्री ... हेलिकॉप्टरमधून
येऊ द्या आता मर्द टांगेवाला
कब आया तू? मुझे पताही नही चला
कब आया तू? मुझे पताही नही चला - जभा
जर त्या माऊलीला लेक इंग्लंडच्या विलायतेतून हेलिकॉप्टरने आलाय हे कळत नसेल तर खालील शक्यता उद्भवतात.
1. ती बहिरी असेल
2. हेलिकॉप्टरच्या पंख्यांना सायलेन्सर लावला असेल.
3. माऊलीच घर साउंड प्रूफ असेल
4. माऊली खोटे बोलत आसेल
5. पुत्ररत्न खोटं बोलत असेल. हेलिकॉप्टर ट्रकमधून उतरवलं असेल. तो वडाप मधूनच आला असेल कॅंटावरून.
विलायत ते भारत एवढी झेप घेणारं घरगुती हेलिकॉप्टर कोणतं?
एसटी स्टॅंड ला गावाकडै कॅंट
एसटी स्टॅंड ला गावाकडै कॅंट म्हणतात. त्या स्टॅंडच्या कोपऱ्यात कॅंटीन पण आहे.
आधी माझ्या प्रश्नांची उत्तरे
आधी माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ द्या.
पूर्वी मायबोलीवर पुण्याचं
पूर्वी मायबोलीवर पुण्याचं वर्चस्व होतं पण आता मुंबईचं आहे. >> कुठेतरी वाचलं होतं की इंग्लंड अमेरिकेचं माबोवर वर्चस्व होतं. पण आता प्रत्यक्ष सर म्हणताहेत तर असेल बुवा पुण्याचं वर्चस्व. किंवा इंग्लड अमेरिकेतली मंडळी मुळ पुणेकर असतील, कमीतकमी त्यांच्याकडे पुण्याचं रेशनकार्ड तरी असेल.
केंटुकी हे शहर कटकची
केंटुकी हे शहर कटकची अमेरिकेतली शाखा आहे. ज्यो बायडेन मूळचा बावधनचाच.
आईनस्टाईनचा गुरूत्वाकर्षणाचा
आईनस्टाईनचा गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत - हे काय असतं ?
>>>जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी... या सिद्धांताचा एक इम्प्लिमेंटेशन गुरुत्वाकर्षण बद्धल आहे.. याच सिद्धांताने न्यूटन चुकीचा ठरला...
गुरुत्वाकर्षणशक्तीचा शोध एका
गुरुत्वाकर्षणशक्तीचा शोध एका आईनं लावला.
सफरचंदावरुन नव्हे. तर स्टाइन मुळे.
तिच्या हातून स्टाइन निसटून फुटला. दोनदा. एवढा सुंदर, कष्टाने बनवलेला आपल्या हातातून स्टाइन पडतोच कसा याचा विचार करताना तिला गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला तो "आई न स्टाइन"चा शोध.
ती आई मुंबईतली की पुण्यातली यावर मतभेद आहेत.
धमाल आहे हे, प्रतिसाद तर
धमाल आहे हे, प्रतिसाद तर
मुळातच हा प्रश्न चुकीचा आहे.
मुळातच हा प्रश्न चुकीचा आहे. एक तर आव्वाज वगैरे असा काही नाही पुण्यात. आवाज आहे. आणि पुणेकरांना आवाज आवडतंच नाही. उगाच ओरडून घसा बसला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
. याच सिद्धांताने न्यूटन
. याच सिद्धांताने न्यूटन चुकीचा ठरला...
चुकीचा नव्हे हो. त्या काळी वेगळ्या परिमितीच नव्हत्या तुलना करायला. सिद्धांत हे ठराविक चौकटीत ( frame of reference )बरोबरच असतात.
खूप दूरच्या देशात मी मुंबई/पुणे/नाशिक सांगण्यापेक्षा भारतातून आलो हे पुरेसं. पण अगदी लोणावळामध्ये मुंबईतील का पुण्यातील . तर पुण्यातच नदीच्या अलिकडे/पलीकडे .
तिच्या हातून स्टाइन निसटून
तिच्या हातून स्टाइन निसटून फुटला. दोनदा. एवढा सुंदर, कष्टाने बनवलेला आपल्या हातातून स्टाइन पडतोच कसा याचा विचार करताना तिला गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला तो "आई न स्टाइन"चा शोध. >>>
आईने अकबरी आठवलं
कृपया गंभीर उत्तरे देऊन धागा
कृपया गंभीर उत्तरे देऊन धागा भरकटवू नये ही विनंती.
आई न स्टाईन म्हणजे तीच माऊली
आई न स्टाईन म्हणजे तीच माऊली असणार. लेक बाहेरच्या हिरवळीत हेलिकॉप्टर घेऊन उतरत असताना तिच्या हातातून चिनीमातीचं भांडं फुटल्याने जो आवाज झाला त्यात हेलिकॉप्टरचा आवाज तिला आला नसणार आणि कप खालीच का गेला यामुळे गुरूत्वाकर्षणाचा शोध लागत असल्याने तिच्या आ़ंखो का तारा आलेला तिला कळला नसणार.
करण जोहर तर नोलान सोडा गेला बाजार नागराज मंजुळेच्या पण शंभर पावलं पुढं निघाला कि. इथून पुढे त्याचे सिनेमे बघताना सायन्स, हिस्ट्री, मॅथ्सचा अभ्यास करूनच जावं लागणार.
मुळात गुरुत्वाकर्षण हा शब्दच
मुळात गुरुत्वाकर्षण हा शब्दच मराठी असल्यामुळे त्याचा शोध एका मराठी व्यक्तीने लावला हे सिद्ध होते.
गुरू बद्दलचे आकर्षण भारतीय
गुरू बद्दलचे आकर्षण भारतीय संस्कृतीत निषिद्ध ठरवले असले तरी ही नैसर्गिक क्रिया थांबवता येत नाही.
धाग्याचा विषय आवाज कुणाचा असा
धाग्याचा विषय आवाज कुणाचा असा आहे. माझ्या प्रश्नांना अजून उत्तर मिळालेले नाही. - रिमाईण्डर तीन.
गुरू बद्दलचे आकर्षण भारतीय
गुरू बद्दलचे आकर्षण भारतीय संस्कृतीत निषिद्ध ठरवले असले तरी..>> अध्यक्षमहोदय मलापण बोलु द्या.
'आवो गुरु करे पीना सुरु' या सुप्रसिध्द गाण्यातुन गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आहे. हे दोन शब्द बोलुन मी आता थांबतो.
पारशी आणि बोहरी व्यापारी
पारशी आणि बोहरी व्यापारी येण्या अगोदरचे रहिवासी कोळी होते. सुखी समाधानी लोकं. एकमेकांना मदत करणे कोळ्यांचा स्वभाव. गाणी त्यांचीच. आगरी भंडारींची कमीच. >>> मी जातीयवादाच्या सख्त खिलाफात आहे. इथे कोळी हा शब्द मी वैशिष्ट्यांसाठी वापरला आहे. यात आगरी - कोळी, मच्छिमार कोळी, भंडारी असे सगळे लोक आले. समुद्राकाठीचे मूळचे लोक हेच आहेत. यातले काही नंतर ख्रिस्ती पण झाले. पण मुंबई कोळ्यांची अशी मुंबईची ओळख नाही हे मी सांगत होतो. मुंबईवर सांस्क्रुतिक वर्चस्व मूळच्या लोकांचं कधीच नव्हतं. ती मिनी भारत आहे. त्यातला जो मराठी टक्का आहे त्यात पुणेकरांचेच वर्चस्व असेल.
च्रप्स यांनी
च्रप्स यांनी गुरूत्वाकर्षणाच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. सध्या बिझी आहे. नंतर येईन.
वाल्या कोळ्याने तर रामायण
वाल्या कोळ्याने तर रामायण लिहिलं!
@ शांत माणूस,
@ शांत माणूस,
शंका कसल्या काढत आहात.
बॉलीवूडमध्ये हिरोच्या एंट्रीला एक वेगळेच ग्लॅमर असते. अश्यात ती बॉलीवूडच्या ईतिहासातील आजवरची सर्वोत्तम एंट्री आहे.
माझेही बालपणीचे स्वप्न होते. मी डॉकयार्ड, भायखळा किंवा मुंबई सेंट्रल स्टेशनवर चालत्या ट्रेनमधून ऊतरावे आणि खांद्यावर बॅग झुलवत घरी धावत यावे. आईने दरवाजा उघडावा आणि तिच्या हातात गरमागरम चहाचा कप... आणि मी म्हणावे. हे मां, हर बार मेरे आने से पहलेही तुम्हे कैसे पता चल जाता है... लव्ह यू शाहरूख.. तू आम्हाला नुसता गर्लफ्रेंड आणि बायको सोबतचा रोमान्सच नाही तर आईमुलाच्या नात्यातही अशी गोड स्वप्ने बघायला शिकवलेस
हेलिकॉप्टर घराच्या बाहेर
हेलिकॉप्टर घराच्या बाहेर उतरतं आणि माउलीला टोणगा म्हणतो कि "हे मां ! मै आने से पहले उम्हे हमेशा कैसे पता चल जाता है ?" हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू "आला नाही का तिला ? या संवादामुळे ही एण्ट्री एका सेकंदात फुस्स झाली होती. माऊली पण आधी तिला टोणगा आल्याचा भास होतो आणि नंतर जायला वळते, पण नंतर पुन्हा आशेवर तो येईल म्हणून घुटमळते. हेलिकॉप्टरचा आवाज आजूबाजूला प्रचंड होतो हे गृहीत धरलेलेच नाही. टोणगा दाराच्या आडून येऊन सअप्राईज देतो.
https://www.youtube.com/watch?v=r5_idg1zvm4
Pages