हुकिमजा जूक उर्फ एटीकेटी पेज

Submitted by Barcelona on 7 March, 2022 - 20:39
Heukimjajuk
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ टेबलस्पून भाजलेले काळे तीळ
४ टेबलस्पून तांदूळाची पिठी
पाव टीस्पून मीठ
२.५ ते ३ कप पाणी

ऐच्छिकः
३ टेबलस्पून साखर्/गूळ
२-३ चण्यामण्या (वाळलेली) बोरं
अन्य काहीही सुकामेवा

क्रमवार पाककृती: 
  1. भाजलेले तीळ अर्धा कप पाण्यात मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. नंतर त्यातच तांदूळाची पिठी व अजून एक कप पाणी घालून फिरवून घ्यावे.
  2. मिश्रण जाड बूडाच्या पातेलीत गॅसवर गरम करत ठेवावे. अजून एक कप पाणी मिक्सरमधून काढून मिश्रणात मिसळावे.
  3. सतत ढवळावे. शिजले नि तजेलदार दिसू लागले की मीठ घालावे. ऐच्छिक पदार्थांपैकी जे हवे ते घालावे. खायला तयार. गरम-गरम छान लागते.
वाढणी/प्रमाण: 
१ व्यक्ती
अधिक टिपा: 

झालं... काय टीपा देऊ ? ह्या ३ चालवून घ्या- काळे तीळ निषिद्ध असतील तर पांढरे/लाल/तपकिरी असे इतर कुठलेही तीळ वापरू शकता. (के-ड्रामा चालतो तर के-तीळही चालवा की आता!). पाककृती कोरियन न्याहरी आहे!

भाजलेले तीळ विकत मिळत नसतील तर तीळ भाजून घ्यावे लागतील. काळे तीळ किती भाजायचे अंदाज नसेल तर त्यात जरासे पांढरे तीळ घाला. ते भाजले की काळेही भाजले.

एटीकेटी पेज नाव दिले कारण "एकप्रकारची तांदूळ-काळेतीळांची पेज" फार लांबलचक आहे. पेज इथे मराठी शब्द आहे. मात्र हे पेजेपेक्षा दाट आहे - पिठल्याइतपत.

माहितीचा स्रोत: 
https://youtu.be/2wlFyY2JCvQ
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

परदेशात तीळ बारमाही वापरतात

आपण मुळातच उष्ण कटिबंधात असल्याने तीळ सतत वापरण्याची सवय नाही , फक्त संक्रांती स्पेशल ठेवले आहे, बाकी वेळा रोज फोडणीत कधीतरी टाकायला हवे

धाग्याचे शीर्षक वाचून कॉलेज ची आठवण आली >> अगदीच आणि फोटो बघून चंद्र ताऱयांची (बाय द वे हा कॅास्ट्कोतल्या तिरामिसूचा ग्लास आहे का? माझ्याकडे सेम टू सेम आहे)

Wink Lol म्हाळसा, उसने बोला सेम छे सेम छे, मैंने बोला एम छे एम छे... हो, करेक्ट आहे.

ब्लॅक कॅट, साखर ऐच्छिक आहे. शेवटी मीठानंतर घालू शकता. मांगाचीची व्हिडीयो लिंक आहे. मी फक्त तांदूळाचे प्रमाण जरा जास्त घेतले कारण नाहीतर फारच तीळाचा स्वाद येतो.

चक्कम्मन, ( एक मिनीट) बघते करून. गमसाम्मि दा sssssssssss. (धन्यवाद) सी कोरियन रेसीपी साठी
कोरियन छुआंदे ( I like) . पण मी आत्तापर्यंतच्या सिरीयल मध्ये कधी हा पदार्थ बघला नाय. तोप्पोक्की बरेचदा खातात हे लोक.

Happy "heugimja juk" हे पोळीच्या लाडू सारखे असावे. बहुतेक मराठी घरात करतात पण कोण मराठी सिरीयलमध्ये खात नाय. आता हे वाचल्यावर कुणीतरी मराठी/कोरियन खातील अशी आशा करू Wink
जुजूबी/जुजूब म्हणून एशियन स्टोअर मध्ये मिळतात. बोरापेक्षा जरा गोडसरं असतात पण चालतंय की.

heugimja juk" हे पोळीच्या लाडू सारखे असावे. बहुतेक मराठी घरात करतात पण कोण मराठी सिरीयलमध्ये खात नाय.>>> Lol

heugimja juk" हे पोळीच्या लाडू सारखे असावे. बहुतेक मराठी घरात करतात पण कोण मराठी सिरीयलमध्ये खात नाय. आता हे वाचल्यावर कुणीतरी मराठी/कोरियन खातील अशी आशा करू Wink>>>>>> Lol आरास्सू आरास्सू, आणि तो ग्लास सोजु ग्लास सारखा दिसला हो मला जास्त

तिरामिसूचा ग्लास… माझ्याकडे सेम टू सेम आहे>>+१
सोपी आहे एटीकेटी.
काय टीपा देऊ ? >>>>अ्म्म…. खाऊन झाल्यावर दात घासायला नाही सांगितले तुम्ही : )

वा! कोरियनांतही व्हेजिटेरियन पाककृती असतात का? (हा प्रश्न मी 'म्हशीचाही एक्स रे निघतो का?' या साप्रूप साश्चर्य चालीत विचारतो)

छान दिसतेय रेसिपी.

चण्यामण्या >>> म्हणजे चीनीमिनी ना. बरेच दिवसात खाल्ली नाहीत ती, आता खायला हवीत. कुठल्या तरी शाळेच्या बाहेर असेल गाडी, शाळा सुरू झाल्याना.

कुणाला रेसिपीचे, मला आपलं बोराचे.