सारण : एक वाटी उ डदाची डाळ, शाबुत नाही अर्धी अर्धी अस्ते ती. धने जिरे पावडर व गरम मसाला मिळून एक टे स्पून, हिंग हळ द, बारीक चिरलेली हिरवी मिरची - दोन तिखट मिरच्या घेतलेल्या मी. बारीक चिरलेले आले एक बारका चमचा. कोथिंबीर अमचुर पाव्डर. मीठ तेल फोडणी साठी. शाबुत जिरे. लाल तिखट रंगासाठी एक छोटा चमचा
पुरी/ कचोरी आवरणासाठी: कणीक मी दोन वाट्या घेतली व त्यात एक मोठा चमचा रवा घातला . मूळ रेसीपीत अर्धा किलो कणकेत शंभर ग्राम रवा आहे. रंगासाठी हळद व लाल तिखट, ओवा, मीठ, साजु क तुपाचे मोहन अर्धा किलो कणकेस चार चमचे तूप घेतले आहे.
बटाटा भाजीसाठी: उकडलेले बटाटे तीन मध्यम, हिरवी मिरची बारिक चिरलेली, एक चमचा बेसन. जिरे कोथिंबीर, बारीक चिरलेले आले एक बारका चमचा, आमचूर, शाबुत जिरे धने जिरे पूड व गरम मसाला मिक्क्ष एक छोटा चमचा. मी खडा मसाला पण घालते चक्री फूल , एक
तेजपत्ता पान, बारीक चिरलेले दोन मध्य म आका राचे टोमाटो , हिं ग, हळद, लाल तिखट आमचुर भिजवलेला मेथी दाणा एक चहाचा चमचा.
फोडणीसाठी साजूक तूप.
बेडमी/ बेडवी पुरी व हलवाई वाली आलू सब्जी , खास मथुरेत बनणारी हा उत्तर भार तातील एक फेवरिट नाश्ता आहे. शेफ अजय चोप्रा ह्यांची रेसीपी बघि तली होती. आज ती करायला मुहूर्त व वेळ सापडला. यु ट्युब वर बघुन बघुन बनवली . आपल्याकडे रविवारचे ब्रंच म्हणून किंवा पाव्हणे नाश्त्याला बोलवल्यास पोट्भरीचा नवा व सात्विक पदार्थ आहे. भिशी पार्टीला पण छान होईल. जरा मेहनत आहे पण फायनल जोडी एकदम परफेक्ट चवीची पोट भरीची होते.
पूर्व तयारी मध्ये आदल्या रात्री उडीद डाळ व मेथी दाणे भिजत घालावेत. वेगवेगळ्या भांड्यात.
दुसृया दिवशी सर्व्ह करायच्या आधी एक तास सुरुवात करावी.
सारणासाठी: भिजलेली उडद डाळ चाळणीत उपसून घ्यावी. कढईत तेल गरम करून त्यात जिरे तड्तडावेत. मग त्यात हळद हिंग हिरवी मिरची व थोडी कोथिंबीर घालुन एकदा परतून उडद डाळ घालावी व चांगले परतुन घ्यावे. मध्यम आच असावी नाहीतर डाळ करपेल.
झाकण ठेवुन थोडा वेळ शिजू द्यावे. मग मीठ आमचूर पाव्डर लाल तिखट घालावे व शिजू द्यावे. पाणी घालायचे नाही. खुटखुटीत सारण झाले पाहिजे. हे एका भांड्यात काढून गार करावे व मग मिक्सर मधून हलके फिरवून अर्धबोबडे करून घ्यावे. थोडी थोडी डाळ दिसली पाहिजे.
कोथिंबीर पण घालावी.
आवरणासाठी कणीकः परा त मध्ये कणीक घेउन त्यात रवा व इतर पदार्थ घालावेत व हलक्या हाताने मिसळून घ्यावे. साजुक तुपाचे मोहन घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे व साधारण घट्ट अशी कणीक भिजवून घ्यावी. फार सैल भिजवू नये. नाहीतर आवर् ण फाटेल व आतले सारण तळ ताना बाहेर येइल.
आलू सब्झी : साजुक तुपाची फोडणी करावी. जिरे, हिरवी मिरची, कोथिम्बीर हळद तिखट हिंग आले भिज वलेले मेथीदाणे घालावे व परतून घ्यावे. मग गॅस मंद करून बेसन घालावे व बेसन चांगले परतुन घ्यावे. खरपुस बेसन भाजल्याचा वास आला पाहिजे. मग मध्ये खळ गा करून बारीक कापलेले टोमाटो घालावे व परतुन घ्यावे. मी हे टोमाटो पण मिक्सरला कच्चेच फिरवून घेतले होते साला सकट. आता ही ग्रेव्ही चांगली परतावी व एक वाटी पाणी घालावे आणि उकळू द्यावे. चवीस मीठ आमचूर घालावे.
चांगले परतुन उकळी आल्यावर उकडलेले बटाटे हातानेच कुस्करुन घालावेत. आता ही मध्यम आचेवर चांगली शिजू द्यावी. व सिमर वर ठेवावे.
ग्रेव्ही दाट होते. कारण बेसन व बटाट्यामुळे छान दाट पणा येतो. सर्व्ह करताना एकदा परत पाणी घालुन सारखे करून उकळवून घ्यावे.
आता सर्व तयार झाले.
पुरी/ कचोरी बनवणे:
तळणीस तेल गरम करून घ्यावे. मध्यम आचेवर ठेवावे. कणकेचे पुरी साठी लाट्या कराव्यात व एक एक लाटुन घ्यावी.
मग हलका तेलाचा हात लावुन त्यात उड दाचे कोर डे सारण भरुन बंद करून हलक्या हाताने पुरी पेक्षा थोडे जाडसर लाटुन घ्यावे.
व एक एक कचोरी/ पुरी तळून घ्यावी. लालसर गुलाबी रंगा वर तळून घ्यावी.
सर्व्ह करताना मोठ्या वाड ग्यात भाजी वर कोथिंबीर व दोन् पुरी/ कचोरी द्यावी. शक्यतो ताजीच तळावी.
पार्टी असल्यास भाजी व पिठी( सारण) आदल्या दिवशी करुन ठेवता येइल. कणीक पण आधी भिजवून ठेवता येइल्. पण शक्यतो फ्रीझर मध्ये ठेवू नका. हलवाई च्या दुका नात रोज ताजी भाजी व कचोरी/ पुरी बनते तेच खरे पर्फेक्ट टेक्स्चर व टेस्ट आहे.
माहितीचा सोर्सः अजय चोप्रा यु ट्युब चॅनेल.
ह्यांच्या बाय कोनी बनवलेली व्हेज थाली व याखनी पुलाव पण फार छान रेसीपीज आहेत.
बरोबर साधा पनीर मटार घातलेला पुलाव दही रायते परफेक्ट होईल. व स्वीट म्हणून गरम गुलाब जाम.
खाऊ का?
..
खाऊ का? (फोटो दिसत नाहीत.)
खाऊ का?
(फोटो दिसत नाहीत.)
फोटो फोन वरुन अप लोड करीन.
फोटो फोन वरुन अप लोड करीन. युअर रिक्वेस्ट इज इन प्रोसेस.
अॅडमिन / वेमा प्रादेशि क मध्ये उत्तर भारतीय हा पर्याय उपलब्ध नाही तो करून द्या.
बेडमी पुरी म्हणजे शेगाव
बेडमी पुरी म्हणजे शेगाव कचोरीची मावस बहीण वाटते
मस्त
मस्त
फोटो एकदम मस्त!
फोटो एकदम मस्त!
अर्धबोबडे शब्द ऐकलेला पण आज
अर्धबोबडे शब्द ऐकलेला पण आज परत ऐकला
छान आहे रेसिपी.
Mast !!
Mast !!
सुरेख! जरा खटपट आहे, पण करून
सुरेख! जरा खटपट आहे, पण करून पाहायलाच हवी एकदा घरी.
सुरेख! जरा खटपट आहे >> +१०० .
सुरेख! जरा खटपट आहे >> +१०० . बटाटा भाजी करून बघेन.
छान रेसिपी.
छान रेसिपी.
काय मस्त फोटो आहेत....पाककृती
काय मस्त फोटो आहेत....पाककृती मस्त दोन्ही ही.
बटाट भाजी मी पण करून बघेन.
अमांच्या रेसिपी दांडग्या
अमांच्या रेसिपी दांडग्या भन्नाट असतात.... तोंपासू..!!
अमा एकदम मस्त काम आहे.
अमा एकदम मस्त काम आहे. खाणेपीणे करण्याची आवड, वाईनिंग-डायनिंग. पालखी बिलखी सर्वच प्रेझेन्स - ऐटबाज काम
आय अॅम युअर फॅन. धनु रास आहे ना तुमची? दॅट एक्स्प्लेन्स
सही आहे, फोटोही भारी पण खूप
सही आहे, फोटोही भारी पण खूप मेहनत आहे. अमा दंडवत तुम्हाला.
भारीच!
भारीच!
मी इतक्या निगुतीने नाही करत. मला ते सारण प्रकरण तितकेसे जमत नाही. माझा शॉर्टकट - उडीद डाळ भिजवून वाटून घेणे, त्यात जीरे पूड, बडीशोप पूड , हिरव्या मिरचीचा थोडा ठेचा आणि मीठ घालून मावेल तितकी कणिक+रवा (१ कप :१ टे स्पून) घालून नेहमीप्रमाणे पुर्यांसाठी जरा घट्ट कणिक भिजवणे. १५-२० मिनिटांनी पुन्हा एकदा मळून घेवून पुर्या करणे.
मस्त रेसिपी. पुर्या
मस्त रेसिपी. पुर्या टेम्प्टिंग आहेत.
मस्त रेसिपी. ही रेसिपी वापरून
मस्त रेसिपी. ही रेसिपी वापरून भाजी बरेचदा केली आहे, दरवेळी आयत्या वेळी ठरवल्यामुळे पुऱ्या मात्र ऑप्शनला टाकल्या जातात. आज भाजीचा फोटो आठवणीने काढला