यापूर्वीचा लेखः १. गुलाबी त्रिकोणात कैद
यानंतरचा लेखः ३. समज आणि गैरसमज
हा लेख मराठीत लिहिणं काहीसं अवघड असणार आहे. त्याचं कारण माझ्या माहितीनुसार मराठीत मुळात sex आणि gender यांसाठीसुद्धा निरनिराळे शब्द नाहीत. आणि आपण लिंगभान, लिंगाभिव्यक्ती आणि लैंगिक कल (gender identity, gender expression आणि sexual orientation) यांबद्दल तपशिलात बोलणार आहोत.
मला वाटतं, सध्या मी गोंधळ टाळण्यासाठी इंग्रजी शब्दप्रयोगच वापरते. आपल्यापैकी कोणाला जर यात आलेल्या संज्ञांसाठी चपखल मराठी प्रतिशब्द सापडले तर त्यानुसार लेखात बदल करू.
तर सेक्स म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक जडणघडणीनुसार ठरणारं लिंग. यात पुनरुत्पादनाशी निगडीत अवयव, अन्य बाह्य लक्षणं (उदा. दाढीमिशा), गुणसूत्रं आणि संप्रेरकं (हॉर्मोन्स) आली. बहुतांशी हे स्त्री अणि पुरुष या दोन गटांत विभागलं जातं. काही बाळांना जन्मतःच दोन्ही प्रकारचे पुनरुत्पादनाचे अवयव असतात. यांना 'इन्टरसेक्स' असं म्हणतात. तरी असं म्हणता येईल की शारीरिकदृष्ट्या ढोबळमानाने हे तीन गट होतात.
जेन्डर हा त्यामानाने थोडा गुंतागुंतीचा भाग आहे.
एखाद्या शरीरात राहणारी व्यक्ती तिच्या चेतासंस्थेच्या (neurological) जडणघडणीनुसार (मेंदू, मज्जारज्जू आणि चेतापेशी) कोणत्या लिंगाची आहे याचं उत्तर म्हणजे जेन्डर आयडेन्टिटी असं म्हणता येईल. ‘मानसिक’ लिंग असं म्हणायचं मी मुद्दाम टाळते आहे कारण त्यातून ‘हे मनाचे खेळ आहेत’ असा चुकीचा अर्थ लागू नये.
व्यक्तीचे तिच्या अंतःप्रेरणेनुसार होणारे आहारविहार/आचारविचार हे झालं तिचं जेन्डर एक्स्प्रेशन.
जेन्डर आयडेन्टिटी आणि एक्स्प्रेशन यांचं सेक्सप्रमाणे दोनतीन रकान्यांत वर्गीकरण करता येत नाही - ते एक रंगपटल (स्पेक्ट्रम) आहे. १००% स्त्रीत्व आणि १००% पुरुषत्व यांच्या अधेमधे कुठेतरी आपण सगळे असतो.
त्यातही गंमत अशी की कोणाचं जेन्डर एक्स्प्रेशन कसं असावं याबद्दल समाजाचे शारीरिक लिंगाधारित काही ठोकताळे असतात. ते स्थलकालानुसार बदलतात. म्हणजे लांब केस ठेवले म्हणून शीख मुलगा 'बायकी' दिसतो असं कोणी म्हणणार नाही आणि पॅन्ट घातलेली बाई आता आपल्याला 'पुरुषी' वाटत नाही. पण एखाद्या पुरुषाला नेहमी साडी नेसावी वाटली तर?
बहुतेकांच्या बाबतीत कमीजास्त प्रमाणात सेक्स, जेन्डर आयडेन्टिटी आणि जेन्डर एक्स्प्रेशन हे साधारणपणे पारड्याच्या एकाच बाजूला झुकतात. अशांना सिसजेन्डर (cisgender) असं म्हणतात. पण काही व्यक्तींच्या बाबतीत तसं होत नाही.
कधीकधी पुरुष स्त्रीच्या शरीरात जन्माला येतो किंवा त्याउलटही. या व्यक्तींना ट्रान्सजेन्डर असं म्हणतात.
हा फरक अगदी नैसर्गिक (natural variation) आणि अंगभूत (hard-wired) असतो.
(चित्र श्री. दिलीप नगरकर आणि देसी रेनबो पेरेन्ट्स अॅन्ड अॅलाइज या संस्थेच्या सौजन्याने)
काही व्यक्तींची जेन्डर आयडेन्टिटी स्त्री आणि पुरुष अशा दोन टोकांच्या मध्ये हालणाऱ्या लंबकाप्रमाणे बदलत राहते - हे झाले जेन्डर-फ्लुइड लोक.
तर काही व्यक्ती या जेन्डर आयडेन्टिटी स्पेक्ट्रमच्या पूर्णपणे बाहेरच असतात - त्या स्वतःला नॉन बायनरी म्हणवतात.
अजून विषय 'स्व'पुरता मर्यादित आहे आणि एव्हानाच गणिताच्या भाषेत बोलायचं तर त्यात ढोबळमानानेसुद्धा (३ सेक्स * किमान ३ जेन्डर आयडेन्टिटीज * किमान २ जेन्डर एक्सप्रेशन्स = ) अठरा प्रकार झाले.
हे किमान.
यानंतर येतं सेक्शुअल ओरिएन्टेशन आणि रोमॅन्टिक ओरिएन्टेशन.
हेदेखील स्पेक्ट्रम्स असतात.
ज्या व्यक्तीला फक्त भिन्नलिंगी (other sex) व्यक्तींशी शरीरसंबंध ठेवावेसे वाटतात तिला हेटेरोसेक्शुअल किंवा बोलीभाषेत 'स्ट्रेट' म्हणतात.
याचं दुसरं टोक म्हणजे होमोसेक्शुअल व्यक्ती - यांना केवळ समानलिंगी (same sex) व्यक्तींशीच शरीरसंबंध ठेवावेसे वाटतात.
पुरुष होमोसेक्शुअल्सना गे तर स्त्री होमोसेक्शुल्सना लेस्बियन असंही म्हणतात.
काहींना समानलिंगी आणि भिन्नलिंगी दोहोंतही रस असतो - हे झाले बायसेक्शुअल.
काहींना सर्व सेक्स, आणि सर्व जेन्डर आयडेन्टिटीज शरीरसंबंधांसाठी आवडतात. त्यांना पॅनसेक्शुअल असं म्हणतात.
एसेक्शुअल लोकांना कोणाशीही शरीरसंबंध ठेवावेसे वाटत नाहीत.
लैंगिक कलातील हे फरक(variations)सुद्धा नैंसर्गिकरीत्या घडून आलेले आणि अंगभूत (hardwired) असतात.
(चित्र श्री. दिलीप नगरकर आणि देसी रेनबो पेरेन्ट्स अॅन्ड अॅलाइज या संस्थेच्या सौजन्याने)
१९४८मध्ये 'लैंगिकता-क्रांतीचा जनक' समजल्या जाणार्या डॉ. अल्फ्रेड किन्सी यांनी त्यांच्या सर्वेक्षणावर आधारित 'सेक्शुअल बिहेवियर इन द ह्यूमन मेल' या पुस्तकात 'किन्सी स्केल' प्रथम प्रकाशित केली. पुढे १९५३मध्ये त्यांचंच सेक्शुअल बिहेवियर इन द ह्यूमन फीमेल' प्रकाशित झालं. दोन्ही पुस्तकं एकत्रितपणे 'किन्सी रिपोर्ट्स' म्हणून ओळखली जातात.
बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की १००% हेटेरोसेक्शुअल या वर्गवारीत कोणीच येत नाही. किन्सीच्या निरीक्षणांनुसार सर्वांनाच आयुष्यात कधी ना कधी समानलिंगियांबद्दल आकर्षण वाटलेलं असतं.
मर्यादित स्वरूपाचं का असेना, पण अशा प्रकारचं हे पहिलंच सर्वेक्षण/संशोधन सामान्य जनतेसमोर येत होतं. पाश्चात्य समाजमनात लैंगिक अल्पसंख्यांकांच्या स्वीकारार्हतेतली ही पहिली पायरी होती, म्हणूनच डॉ. किन्सींच्या उल्लेखाशिवाय हे लेखन अपूर्ण ठरेल.
लैंगिक अल्पसंख्यांकांच्या सगळ्या प्रकारांसाठी सर्वसमावेशक नाव म्हणून आता 'क्विअर' (Queer) ही संज्ञा वापरतात. क्विअरचा मूळ शब्दार्थ विचित्र किंवा बिघडलेला असा होतो. खरंतर ही समाजाने त्यांना दिलेली शिवीच होती. पण एकविसाव्या शतकात त्यांनी हे संदर्भ पालटवून तीच संज्ञा अभिमानाने मिरवायला सुरुवात केली आहे.
जेन्डर आयडेन्टिटी आणि सेक्शुअल ओरिएन्टेशन यात संबंध असेलच असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक ट्रान्सजेन्डर व्यक्ती होमोसेक्शुअल असेलच असं काही नसतं आणि प्रत्येक होमोसेक्शुअल व्यक्ती ट्रान्सजेन्डर असेल असंही नाही.
त्याउलट असंही होऊ शकतं की एखाद्या शारीरिकदृष्ट्या स्त्री असणाऱ्या व्यक्तीची जेन्डर आयडेन्टिटी पुरुष ही आहे आणि हा पुरुष होमोसेक्शुअलही आहे, म्हणून या व्यक्तीला पुरुष आवडतात. पण याचा अर्थ ती 'स्ट्रेट स्त्री' आहे असा नसतो.
रोमॅन्टिक ओरिएन्टेशन हे सेक्शुअल ओरिएन्टेशनहून निराळं असू शकतं. म्हणजे एखाद्या सेक्शुअली स्ट्रेट मुलाला स्त्रियांविषयी शारीरिक ओढ वाटते, पण रोमॅन्टिक जवळीक फक्त पुरुषांशीच होते असंही होऊ शकतं.
एव्हाना L(esbian), G(ay), B(isexual), T(ransgender), Q(ueer), I(ntersex) या संज्ञा काही प्रमाणाततरी आपल्याला समजल्या.
यापुढची पायरी त्यांचे प्रश्न आणि त्यांचा संघर्ष समजून घेण्याची.
नैसगिकरीत्त्या चारचौघांपेक्षा वेगळं असण्याची खूप मोठी किंमत या व्यक्ती मोजतात. मुळात स्वतःच्या शरीराशी आणि मनाशी जुळवून घेतानाच त्यांची ओढाताण होते, विशेषत: लहान वयात. असं असणं त्यांनी ठरवून निवडलेलं नसतं. आपण निराळे म्हणजे नक्की काय आणि कसे आहोत, आपल्या जाणिवा, संवेदना, आकर्षणं आपल्या समवयस्कांसारखी का नाहीत, आपल्याला झालंय तरी काय, आपल्याला हवंय तरी काय - हे आपलं आपल्यालाच नीट समजत नाही, ते कोणाला सांगून कळायची शक्यता किती?
कुटुंब आणि समाज त्यांना द्विमित (बायनरी) रकान्यांपैकी कुठल्यातरी एकात कोंबून बसवायचा प्रयत्न करतो. आपली म्हणावीत तीच माणसं समजून घ्यायचं नाकारून धाक दाखवण्यापासून सक्तीने अघोरी उपचार करण्यापर्यंत काहीही करायला धजावतात - केवळ अज्ञानापोटी आणि लोक काय म्हणतील या भीतीने! यात अनेकदा दुर्दैवाने वैद्यकीय व्यावसायिकही सामील होतात.
हा आजार नाही, औषधा-शस्त्रक्रियांनी तो ‘बरा’ तर होत नाहीच, उलट अशा ‘औषधां’च्या कॅन्सरपासून ते त्वचारोग, शारीरिक विरूपता (disfiguration) यांसारख्या दुष्परिणामांना त्यामुळे सामोरं जावं लागू शकतं.
शारीरिक आणि मानसिक पातळीवर या जखमा भरून येणं अवघड असतं.
स्वत्व झाकून नैसर्गिक उर्मी मारत निमूट चारचौघांसारखं जगणं किंवा उघडपणे आपलं निराळेपण व्यक्त करून त्याचे असले परिणाम भोगणं हे दोन्ही पर्याय तितकेच भयंकर असतात. त्यामुळेच लैंगिक अल्पसंख्यांकांत नैराश्य (major depression or generalized anxiety disorder), व्यसनाधीनता, आत्महत्येचे विचार यांसारख्या मानसिक विकारांनी ग्रासलं जाण्याची शक्यता जवळजवळ तिपटीने वाढते.
माणसासारखी माणसं, ज्यांनी कोणाचंही काहीही वाईट केलेलं नाही, जी आनंदाने सुंदर आयुष्य जगू शकली असती, प्रेम देऊ आणि घेऊ शकली असती, ती या नसत्या चक्रांत अडकतात, फरफटतात! केवळ तुम्हीआम्ही त्यांना समजून आणि सामावून घ्यायला कमी पडतो म्हणून!
एखादा माणूस डावखुरा आहे किंवा एखाद्याला सहा बोटं आहेत हे आपण किती सहज स्वीकारतो! तितक्या सहज लैंगिक अल्पसंख्यांकांना स्वीकारत नाही.
का?
(क्रमशः)
तळटीप:
१. आधी लिहिल्यानुसार मी या विषयात तज्ज्ञ नाही, तसंच माझ्या निकटच्या परिचयातील कोणी लैंगिक अल्पसंख्यांकांत मोडत असल्यास मला त्याबद्दल कल्पना नाही, मी इथे देत असलेली माहिती सर्वसामान्यांसारखी गूगल करून मिळवली आहे (जिथून घेतली ते दुवे खाली दिले आहेत). ती काही अंशी चुकीची किंवा अपूर्ण असूच शकते. तुम्हाला त्यात काही त्रुटी आढळून आल्या तर त्या जरूर नोंदवा.
२. आधीच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये किन्नर किंवा ज्यांना आपण 'हिजडे' किंवा तॄतीयपंथी म्हणून ओळखतो त्यांचा उल्लेख आलेला दिसला. इंग्रजीत यांना eunuch म्हणतात. यांत काही वर उल्लेख आलेले इन्टरसेक्स लोक, तर बहुतांशी लहान वयात बळजबरीने खच्चीकरण केले गेलेले लोक यांचा समावेश असतो. अशा प्रकारे खच्चीकरण झाल्यामुळे त्यांच्या हॉर्मोनल बॅलन्सवर परिणाम होतो. हा प्रकार वरील चर्चेत घेतला नव्हता कारण तो त्यांच्या नैसर्गिक जडणघडणीत आणि वाढीत केल्या गेलेल्या मानवी ढवळाढवळीमुळे निर्माण झाला आहे. त्यांचं जीवनही अवघड असतंच, पण तो विषय मोठा आणि या लेखाच्या कक्षेबाहेरचा आहे.
यानंतरच्या लेखात लैंगिक अल्पसंख्यांकांबद्दलच्या प्रचलित गैरसमजांबद्दल लिहायचा मानस आहे.
संदर्भः
https://schools.au.reachout.com/articles/gender-and-sexuality
https://www.vox.com/2015/4/24/8483561/transgender-gender-identity-expres...
https://www.nytimes.com/2015/08/23/opinion/sunday/richard-a-friedman-how...
हे आणखी ईंटरेस्टींग आहे. मग
हे आणखी ईंटरेस्टींग आहे. मग स्त्रियांच्या बुद्धीबळ स्पर्धेत पुरुष का नाही..
लोकल ट्रेनसारखी महिलांचा डब्बा जनरल डब्बा सिस्टम का?
फक्त पुरुषांच्या अशा बुद्धिबळ
फक्त पुरुषांच्या अशा बुद्धिबळ स्पर्धा नसतात. स्पर्धांत सगळेच भाग घेऊ शकतात. फक्त स्त्रियांच्या काही बुद्धिबळ स्पर्धा होतात, त्याचं कारण वेगळं आहे - शारीरिक किंवा मानसिक क्षमता हे नाही. बुद्धिबळात स्त्रिया स्पर्धक खूपच कमी आहेत. त्यामुळे स्त्रियांत ह्या खेळाचा प्रसार व्हावा आणि नव्या स्त्री स्पर्धकांना आकृष्ट करावं म्हणून त्या काही स्पर्धा होतात.
हरचंद पालव, धन्यवाद. पण ईथे
हरचंद पालव, धन्यवाद. पण ईथे प्रश्न विचारल्यावर गूगल केले तेव्हा आपण सांगितलेले जसेच्या तसे उत्तर मला एके ठिकाणी सापडलेले. पण सोबत अशी कैक उत्तरे मिळाली. बुद्धीबळ खेळायला आवश्यक बौद्धीक क्षमताही स्त्रियांची आणि पुरुषांची भिन्न असल्याने असे केले जाते अशीही बरेच उत्तरे होती. त्यामुळे यापैकी कुठल्याही उत्तराला ठोस आधार असेल तर जाणून घ्यायला आवडेल.
>> त्रियांच्या स्पोर्ट्समध्ये
>> त्रियांच्या स्पोर्ट्समध्ये एखाद्या पुरुषाने 'मनाने मी स्त्रीच आहे' म्हणून भाग घेणं योग्य नाही.
शारीरिक क्षमतेतील किंवा आकारमानातील फरकांमुळे म्हणताहात का?////
लिंग वेगवेगळे आहे हे कारण पुरेसे आहे. स्त्रियांची वेगळी स्पर्धा आहे तर तिथे स्त्रियांना भाग घेऊ द्यावा. ट्रान्स लोकांची हवं तर तिसरी कॅटेगरी करावी.
जिथे स्त्री पुरुष अशा वेगळ्या स्पर्धा नाहीत, सर्व एकत्रच आहे तिथे हा प्रश्नच नाही.
स्पोर्ट्स बद्दल तरी WHITEHAT
स्पोर्ट्स बद्दल तरी WHITEHAT यांचे म्हणणे पटते. नुकत्याच झालेल्या एका पोहण्याच्या स्पर्धेचा व्हिडिओ पहा. त्यात पेन स्टेट ची ट्रान्स्जेंडर मुलगी इतर मुलींना इतकी मागे टाकते की It is unfair ! ती ३५ सेकंदाने जिंकते ! शिवाय अनेक विद्यापीठात स्पोर्ट्स मध्ये पहिल्या तीन मुलींना शिष्यवृत्ती वगैरे असते. ट्रान्स जेंडर मुलींच्या तुलनेत सिस जेंडर मुली अजिबात टिकणार नाहीत.
ऋन्मेऽऽष >> मी फार बुद्धिबळ
ऋन्मेऽऽष >> मी फार बुद्धिबळ बघत नसलो तरी थोडीफार रुची आहे. ज्युडिथ पोल्गार, कोनेरू हंपी इत्यादींच्या पुरुषांशी झालेल्या लढती ऐकिवात आहेत. एक अॅगॅड्मेटर नावाचं युट्युब चॅनल आहे, ज्यावर बुद्धिबळावर खूप छान समीक्षा चालते. ती मी आवडीने बघतो. त्यातही बर्याच स्त्री-पुरुष लढती पाहिल्या आहेत. बुद्धिबळात महिला नवीन असताना त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवत असावी ह्याचं चित्रण (गोष्ट काल्पनिक असली तरी खेळ व दाखवलेली परिस्थिती काही सत्यांच्या आधारे असलेली) 'द क्विन्स गॅम्बिट' ह्या वेब मालिकेत आढळेल. त्यातही ती नायिका अनेक मातब्बर पुरुष प्रतिस्पर्ध्यांशी खेळताना दाखवली आहे व शेवटी आपला दबदबा निर्माण करते.
नव्या दमाची तानिया सचदेव पण चांगली खेळते. तिचेही अनेक खेळलेले डाव गूगलवर असू शकतील. शिवाय ती बोटेझ आणि तिची बहिण बरेच व्हिडिओ टाकत असतात. बर्याचदा ते फ्रेंडली मॅचचे असतात. पण त्यांचे आंतर्राष्ट्रीय डावही (पुरुषांविरुद्ध) बघायला मिळतील.
पुरुषांमध्ये येणारी शारीरिक
पुरुषांमध्ये येणारी शारीरिक शक्ती टेस्टस्टोरोन हार्मोन मुळे येते,
स्त्रियांमध्ये सुद्धा हे हार्मोन नैसर्गिक रित्या असतेच मात्र पुरुषांच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात. त्यामुळे सारखेच मसल मिळवण्यासाठी बायकांना पुरुषांच्या तुलनेत जास्त व्यायाम करायला लागतो.
जेव्हा एक पुरुष स्त्री बनू इच्छितो तेव्हा त्याला T ब्लॉकर घेऊन हे शरीरातील टेस्टस्टोरोन कमी करावे लागते, आणि स्त्री हार्मोन वाढवावे लागते. ही ट्रीटमेंट झालेल्या लोकांनाच वैद्यकीय दृष्ट्या ट्रान्सस्त्री म्हणून मान्यता मिळते .री-कॉन्स्त्रकटिव्ह सर्जरी झालेली असली किंवा नसली तरी ( ट्रान्स स्त्री म्हणवणाऱ्या व्यक्तीचे बाह्य स्वरून पुरुषाचे असू शकते ) अर्थात हे हार्मोन्स बदलल्यावर स्नायूंची वाढ सुद्धा बदलते.
ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत स्पर्धक येताना अर्थातच हा ड्यु डिलीजन्स झालेला असतो, त्यामुळे " मला मनातून मी स्त्री आहे असे वाटते" अश्या अर्ग्युमेंट ने कोणी पुरुष स्त्रियांच्या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही.
तसेही स्त्री अथलिट्स नि पुरुष हार्मोन्स घेऊन परफॉर्मन्स मध्ये सुधार केल्याच्या घटना वाचनात येतातच.
वरच्या चर्चेत मला एक कळीचा
वरच्या चर्चेत मला एक कळीचा मुद्दा वाटतोय
बहुतेकांना ट्रान्स मॅन/ वूमन म्हणजे ज्यांचे नैसर्गिक लिंग त्यांच्या gender identity बरोबर मॅच होत नाहीत ते असे वाटते आहे.
मर्यादित विचार करताना हे बरोबर आहे,
मात्र सरकारी योजना, वैद्यकीय दृष्ट्या केवळ इतकेच पुरेसे नाही, तर त्याचा पुढचा भाग महत्वाचा होतो, " ज्याने उचित औषध उपचार/सर्जरी करून आपले नैसर्गिक लिंग आणि indentity इन लाईन आणली आहे " ते ट्रान्स पुरुष/स्त्री ठरतात
वर लिहिल्याप्रमाणे एकदा वैद्यकीय उपचाराने पुरुषाची स्त्री झाली, की ती इतर मुलींवर अत्याचार करेल वगैरे भीती अनाठायी आहे,
सेम सेक्स गुन्हे जितके होत असतील आणि त्यांच्याकडे जसे पाहिले जाईल तसेच अश्या घटनांकडे पाहिले जायला हवे.
मनाने स्त्री आहे , हे प्रकरण
मनाने स्त्री आहे , हे प्रकरण राजकारणी जास्त मनावर घेतील
मतदार संघात बायकांचे आरक्षण पडले की पुरुष साडी नेसून फॉर्म भरतील
सिम्बा, अगदी नेमका मुद्दा
सिम्बा, अगदी नेमका मुद्दा मांडलात, धन्यवाद.
'मनाने स्त्री' म्हणजे काहीतरी काल्पनिक किंवा मुद्दाम केलेली धूळफेक असा गैरसमज तर होत नाहीये ना अशी वरील काही पोस्ट्स वाचून शंका आली.
इन लाईन जर सर्जरी करून आणली
इन लाईन जर सर्जरी करून आणली आहे तर मग पुन्हा ट्रान्स का म्हणायचे ? ते तर मग सिसच झाले ना ?
मला वाटते त्यात ट्रान्स चा अर्थ transitioned असा असणार
जे आत बाहेर भिन्न आहे , तेही ट्रान्सच
शस्त्रक्रिया करून in line
शस्त्रक्रिया करून in line आणले जाते ते बाह्य रूप आणले जाते,
ते functional नसते.
पुरुषाची बाई झाली तर ते त्याच्यात गर्भाशय, ओवरीज निर्माण होत नाहीत, ते बाईपण हार्मोन्स घेऊन टिकवले जाते.
हेच पुरुषांबाबत सुद्धा
त्यामुळे CIS आणि ट्रान्स यात फरक असणारच आहे,
बहुतेक ट्रान्स व्यक्तींना आपल्याला स्त्री किंवा पुरुष म्हणूनच ओळखले जावे अशी इच्छा असते , पूर्वीच्या अवताराची सावली आता त्यांच्यावर पडू नये, म्हणून राहते गाव सोडणे , सोशल मीडिया वरून गायब होणे वगैरे कॉमन आहे. नव्या ठिकाणी त्यांची ओळख स्त्री किंवा पुरुष म्हणून करून देणे सोपे असते जर अगदीच बाह्यरुप अजून मेळ खात नसेल अगदीच नाईलाज असेल तर रिव्हील करतात.
मात्र सरकार दरबारी जिकडे जन्म दाखला, स्कुल लिविंग सर्टिफिकेट इत्यादी ठिकाणी जुने लिंग असते ते जस्टीफाय करायला त्यांना ट्रान्स स्त्री/पुरुष म्हणून सांगावे लागते.
स्वाती, दुसऱ्या धाग्यावर
स्वाती, दुसऱ्या धाग्यावर वैद्यबुवांनी दिलेला रोलिंगचा लेख पहा. कसलीही सर्जरी न करता 'आजपासून मी स्त्री' असं एखाद्या पुरुषाने जाहीर केल्यावर त्याला कायद्याने स्त्री मानावं असा ट्रान्स लॉबीचा हट्ट आहे. रोलिंगने या गोष्टीला विरोध केला म्हणून त्यांनी तिची अशी वाट लावली आहे.
दुसरं- एखाद्याने सर्जरी केली- तरीही तो व्यक्ती आणि खरीखुरी स्त्री यात मेजर फरक तर असणारच आहे. मग त्याला थर्ड जेंडर म्हणावं. स्त्रिया ऑलरेडी पिढ्यानपिढ्या systemic oppression, resource crunch, obstacles to advancement याचा सामना करत आहेत. मग त्यात ट्रान्स लोकांचं ओझं त्यांच्यावर टाकू नका. ट्रान्सना त्यांची वेगळी स्पेस, वेगळे रिसोर्सेस अवश्य द्या. पण स्त्रियांच्या तोंडचा घास काढू नका. पूर आला, भूकंप झाला तर आपण लाखो रुपये मदतीची अपेक्षा क्रिकेटर, बॉलिवूड, राजकारणी, टाटा बिर्ला यांच्याकडून करतो. चाळीतल्या गरीब कुटूंबाने ५ लाख रुपये द्यावे असा दबाव आणतो का?
स्त्रियांच्या सेफ स्पेसेसवर, रिसोर्सेसवर अतिक्रमण नको.
वर जसं कुलकर्णी म्हणतात तशी एखादी स्पोर्ट्स शिष्यवृत्ती मुलींसाठी असेल तर ट्रान्स व्यक्तीला त्याचा access देऊ नका. त्यांच्यासाठी वेगळी शिष्यवृत्ती ठेवा, वेगळी युनिव्हर्सिटी काढा, काहीही करा.
मी तूम्हि म्हणताय तो लेख
मी तूम्हि म्हणताय तो लेख वाचला नाही, पण कोणतीही लॉबी, कीतीही अग्रेसिव्ह असली तरी "आज पासून मी स्त्री/पुरुष" असा स्टँड घेणार नाही असे वाटते, either misquote केले असेल, किंवा मिसइंटरप्रिटेशन झाले असेल.
औषधे घेऊन हार्मोन्स बदलले- मात्र बाह्यस्वरून बदलले नाही , या केस मध्ये बाहेरून पाहणाऱ्याला याने ओव्हर नाईट बाई चे कपडे वापरायला सुरवातकरून, स्वतः ला बाई डिक्लेर केले असे वाटू शकते,
पण त्याची ट्रीटमेंट त्या आधी कित्येक महिने चालू असेल.
अगदी आपल्याकडे सुद्धा ट्रीटमेंट चे प्रमाणपत्र असे तर बाह्यरुप वेगळे असले तरी त्या व्यक्तीला प्रमानपत्रातील लिंगानुसार वागायची परवानगी आहे. ( माझ्या कडे आत्ता नेमका कायद्याचा संदर्भ नाही, मागे एका व्यक्तीशी झालेल्या गप्पातून हे मुद्दे पुढे आलेले)
जर एखाद्या पुरुषाकडे वैद्यकीय उपचार पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असेल, आणि जरी तिचे बाह्यरुप स्त्री चे नसेल तरी त्याला स्रियांच्या सुविधा वापरण्याची परवानगी आहे.
विमानतळावर सुरक्षा तपासणीत तो स्त्रियांच्या रांगेत जाऊ शकतो, स्त्रियांचे स्वच्छतागृह वापरू शकतो.
(हे कागदोपत्री आहे, प्रत्यक्षात प्रत्येक ठिकाणी स्पष्टीकरण देण्याचा त्याचा पेशन्स किती टिकतो, तो किती बोल्ड आहे, आणि ऑडियन्स कोणता आहे यावर तो हा हक्क बजावणार की नाही हे अवलंबून असेल.उदा, हे तो एअरपोर्ट वर करण्याचे धाडस करेल, पण शहाजानपूर च्या बस स्टँडवर हे करायचे धाडस तो करणार नाही )
स्त्रीया आणी पुरुष यांच्या
स्त्रीया आणी पुरुष यांच्या शरीर रचनेतच मूलभूत फरक असतो. केवळ एक दोन वर्षे टी ब्लॉकर्स घेऊन हे लेव्हल प्लेइंग फील्ड होणार नाही. सुरुवातीची पंधरा सोळा वर्षे मिळालेला अॅडव्हान्टेज अनडू करता येतो का?
जगातील सर्वात जोरात धावणारी मुलगी निवडू, आता तिला मुलांच्या जागतिक स्पर्धेत भाग घ्यायला लावू. तिचा कितवा नंबर येइल ? २००० च्या पुढे ! ती बिचारी क्वालिफाय ही होणार नाही. काही वर्षांनी मुलींच्या स्पर्धा निरर्थक होतील कारण सर्व बक्षिसे ट्रान्स मुलीच घेऊन जातील.
1) लोकसंख्येत ट्रान्स ची
1) लोकसंख्येत ट्रान्स ची टक्केवारी किती?
2) त्यातले कंपेटीटीव्ह स्पोर्ट्स खेळणारे किती?
3) ऑलिम्पिक मेडल मिळवण्यासाठी लिंगबदल करून घ्यायला किती पुरुष तयार होतील?
असो, तुमचा मुद्दा कळला, पण पुढचा भाग जागतिक ऑलिम्पिक संघटना, मेडिकल फॅटर्निटी आणि ऍक्टिव्हिस्ट यांच्यावर सोडून देऊ
जागतिक पातळीवर टक्केवारीवर
जागतिक पातळीवर टक्केवारीवर असे पुरुष कमी असतील
पण प्रत्येक स्पर्धेत असे फक्त 2 सामील झाले तरी तेच सगळीकडे जिंकतील
मी तूम्हि म्हणताय तो लेख
मी तूम्हि म्हणताय तो लेख वाचला नाही, पण कोणतीही लॉबी, कीतीही अग्रेसिव्ह असली तरी "आज पासून मी स्त्री/पुरुष" असा स्टँड घेणार नाही असे वाटते, either misquote केले असेल, किंवा मिसइंटरप्रिटेशन झाले असेल.
ते सगळे लेख खूप मोठे आणि बोअर आहेत. मीही नाही वाचू शकत. पण एखादा वाचा म्हणजे कळेल
असो. Stonewall संघटनेच्या साईटवरून हे कॉपी पेस्ट करत आहे-
What process do you have to go through to be recognised as trans in daily life?
In most cases, you don’t need to go through any legal or formal process. Transition can be any steps you take to express your gender identity, such as changing your pronouns. The Equality Act 2010 protects anyone proposing to undergo, is undergoing, or has undergone a process of ‘reassigning their sex’ from discrimination based on ‘gender reassignment’. You do not have to have taken any medical steps in your transition in order to be protected by this legislation. You can use the bathroom that fits your gender, expect your employers to recognise your gender, and access gender-specific public services.
हे युकेत आहे. भारतात कट्टरवादी सरकार असल्यामुळे असले चाळे होपफुली खपवून घेतले जाणार नाहीत.
पण woke लोकांच्या या अतिरेकी भूमिकेमुळे feminist women + conservative right wing men अशी एक वेगळीच युती तयार होण्याची चिन्हे दिसताहेत. More power to them!
व्हाइटहॅट, तुम्हाला 'विकृत',
व्हाइटहॅट, तुम्हाला 'विकृत', 'चाळे' अशा प्रकारचे तिरस्कार/तुच्छतादर्शक शब्द न वापरता लिहिता येईल का? कारण त्याशिवाय ऑब्जेक्टिव चर्चा होऊ शकत नाही. केवळ आपल्यासारख्या नसणार्या लोकांच्या नावाने, त्यांचेही काही प्रॉब्लेम्स किंवा निराळी विचारसरणी असू शकेल हे लक्षात न घेता थुंकून जाणं इतकाच उद्देश असेल तर तो ऑलरेडी साध्य झाला आहे.
>>व्हाइटहॅट, तुम्हाला 'विकृत'
>>व्हाइटहॅट, तुम्हाला 'विकृत', 'चाळे' अशा प्रकारचे तिरस्कार/तुच्छतादर्शक शब्द न वापरता लिहिता येईल का? कारण त्याशिवाय ऑब्जेक्टिव चर्चा होऊ शकत नाही. केवळ आपल्यासारख्या नसणार्या लोकांच्या नावाने, त्यांचेही काही प्रॉब्लेम्स किंवा निराळी विचारसरणी असू शकेल हे लक्षात न घेता थुंकून जाणं इतकाच उद्देश असेल तर तो ऑलरेडी साध्य झाला आहे.
+ १०० !
या नाजूक व गुंतागुंतीच्या विषयावर प्रामाणिक चर्चा करणे अपेक्षित आहे.
ट्रान्स लोक आधीच प्रचंड समस्यांना सामोरे जात असतात. त्यात असली शेरेबाजी !
सर्वसामान्य ट्रान्स, LGBTQ ++
सर्वसामान्य ट्रान्स, LGBTQ +++ लोक जे निरुपद्रवी आहेत त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आणि सहानुभूती आहे.
ज्यांनी अतिरेक आरंभलेला आहे त्यांच्याबद्दल सहानुभूती नाही.
केवळ आपल्यासारख्या नसणार्या लोकांच्या नावाने, त्यांचेही काही प्रॉब्लेम्स --//
हाच मुद्दा आहे जो स्त्री कार्यकर्त्या सांगत आहेत की स्त्रियांचे ऑलरेडी प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना सेफ प्लेसेस ची गरज आहे. ते समजून न घेता ट्रान्स लोकांनी स्वतःला स्त्री डिक्लेअर करून स्त्रियांच्या ऑलरेडी तुटपुंज्या रिसोर्सेसवर हक्क सांगू नये. हा मुद्दा मांडणाऱ्या बायकांच्या नोकऱ्या घालवल्या गेल्या आहेत. एका बाईंचा ट्विटर अकाउंट सस्पेंड केला होता पण तिने कायदेशीर कारवाईची तयारी केल्यावर restore केला. रोलिंगसारख्या मोठ्या लेखिकेला कॅन्सल केलं गेलं आहे. एका स्टँड अप कोमेडियनने रोलिंगला सपोर्ट केलं आणि ट्रान्स लोकांबद्दल जोक्स केले म्हणून त्याचा शो काढून टाकावा असा दबाव नेटफ्लिक्सवर आणला गेला. (नेटफ्लिक्स बधले नाही). तो माणूस स्वतः ब्लॅक आहे.(तरी बरं ट्रान्स लोकांना मराठी येत नाही. नाहीतर अमेरिकेत अशीही बनवाबनवी बघण्यावर बॅन आणतील.)
जे आम्हाला विरोध करतील त्यांच्या नोकऱ्या,करियर संपवू, तोंड बंद करु- या लोकांबद्दल सहानुभूती कशी ठेवणार.
Whitehat, तुच्छतेने सतत
Whitehat, टोकाची आक्रस्ताळी भूमिका घेणारे काही लोक सगळीकडेच असतात. आपण त्यात का उत्साहाने सामील व्हायचं?
Transgender बद्दल थोडे अधिक -
ट्रान्स लोक नॉन बायनरीसुद्धा असू शकतात. म्हणजे ट्रान्स असल्यावर ट्रान्स पुरुष किंवा ट्रान्स स्त्री एव्हडेच options नाही आहेत. Transfeminine non-binary or transmasculine non-binary असू शकतात. असं शक्य आहे कारण समजा मी ट्रान्सस्त्री आहे पण स्त्री या लेबल मधे माझी gender Identity capture होत नाही. माझ्या gender चा कल स्त्री कडे आहे किंवा ओळख स्त्रीपणाकडे झुकली आहे पण माझ्यातला पुरुष ओळखीचा अंश मला पुसता येत नाही/ पुसून टाकायचा नाही. किंवा माझी ओळख पुरूष/स्त्री या बायनरी मधे पकडताच येत नाही. तेव्हा मी माझी ओळख transfeminine non-binary अशी निवडते (किंवा जे काही रास्त क्रियापद रूप आहे)
व्हाइट हॅट
व्हाइट हॅट
तुम्ही जे लिहिले आहे त्यावरून तसा कायदा *ऑलरेडी आहे* असे वाटते आहे.
मग प्रचलित कायद्याचा* आधार घ्या असे सांगितले तर काय चूक आहे?
* कायद्याचे इंटरप्रिटेशन जे लिहिले आहे तसेच होते असे गृहीत धरले आहे
लोक स्वत:ला ट्रान्स किंवा
लोक स्वत:ला ट्रान्स किंवा कुठल्याही LGBTQ प्रकारात गंमत म्हणून मोजत नाहीत.
उलट अशा शेर्यांचा सामना करावा लागू नये म्हणून अनेक लोक क्लोजेटमधून बाहेरच येऊ धजत नाहीत.
'मनाने' ट्रान्स म्हणजे आपण ट्रान्स आहोत अशी 'फक्त कल्पना' नव्हे. तो चॉइस नसतो.
असता तर इतकी तुच्छता आणि भेदभाव सोसून कोणी हा चॉइस सिलेक्ट केला असता का?
पौगंडावस्थेतलं सिस्जेन्डर्ड स्ट्रेट मूलही त्या स्थित्यंतरातून जाताना गडबडतं. मग आपल्या 'निराळेपणा'शी रुळणं किती अवघड असेल?
>>> एका स्टँड अप कोमेडियनने रोलिंगला सपोर्ट केलं आणि ट्रान्स लोकांबद्दल जोक्स केले म्हणून त्याचा शो काढून टाकावा असा दबाव नेटफ्लिक्सवर आणला गेला.
असंवेदनशील जोक्स कुठल्याही मायनॉरिटीबद्दल केले गेले तर जगात कुठेही हेच होईल, आणि व्हावंही.
https://www.rocanews.com
<< प्रत्येक स्पर्धेत असे फक्त 2 सामील झाले तरी तेच सगळीकडे जिंकतील >>
शक्यता नाकारता येत नाही. एक उदाहरण:
https://www.rocanews.com/wraps/the-lia-thomas-controversy
In the case of Lia Thomas, who was a 6-time finalist at the Ivy League men’s championships, her times are slower than when she was on the men’s team. Compared to 2019, this year, her times have been 16 seconds (6%) and 65 seconds (6.9%) slower in 2 of her main events, the 500-free and 1650-free.
Yet compared to other women swimmers, she’s dominant.
स्वाती ,
स्वाती ,
ट्रान्स लोकांबद्दल आणि एकूण सर्वच LGBT लोकांबद्दल सहानुभूती आहे. फक्त- जन्माने पुरुष आणि मनाने स्त्री असलेल्यांच्या सुखसोयी , त्यांचे हक्क हे सामान्य स्त्रियाना त्रास होईल, सुरक्षितता धोक्यात येईल अशा पद्धतीने implement व्हायला नक्कीच विरोध आहे. In that case, they will be perceived as threats and enemies of women's rights Movement.
They should fight their own battles instead of claiming right to safe places that generations of women and men feminists have fought for.
साधं उदाहरण- मुंबईत लोकल ट्रेनमध्ये १२ पैकी ३ डब्बे बायकांना असतात. आता देव न करो पण उद्या हे लोण भारतात आलं तर शरीराने पुरुष पण मनाने स्त्री असलेल्या पुरुषांनी त्या बायकांच्या ३ डब्यातच गर्दी करायची का? त्यापेक्षा पुरुषांच्या ९ डब्यांचे ८ करा आणि १ डबा या तिसऱ्या गटाला आरक्षित करा. तिथे बायका फिरकणार नाहीत.
समजा एक मुलींसाठी जिम,
समजा एक मुलींसाठी जिम, स्विमिंग पूल आहे. तिथे पुरुषांना प्रवेश नाही. त्याना ऍक्सेस कार्ड देत नाहीत, शिवाय तिथला स्टाफ लक्ष ठेवून असतो. किंवा जिम सर्वांसाठी असली तरी मुलींच्या चेंजिंग रूम्स तर वेगळ्याच असतात.
आता कोणीही शरीराने पुरुष असलेली व्यक्ती 'मी मनाने स्त्री आहे' असं म्हणून आत घुसेल. (ट्रान्स ग्रुपना हेच हवं आहे. Unrestricted access.) कायद्याने थांबवता येणार नाही. आत जाऊन चेंजिंग रुममध्ये त्या व्यक्तीने आतल्या एखाद्या कोवळ्या मुलीला एकटं बघून inappropriate touching , flashing , forcing upon असे प्रकार केले तर? ट्रान्स च्या हक्कांसाठी त्या मुलींनी सहन करावं का? की घरीच बसावं? परत २०० वर्ष मागे जावं?
<< असंवेदनशील जोक्स कुठल्याही
<< असंवेदनशील जोक्स कुठल्याही मायनॉरिटीबद्दल केले गेले तर जगात कुठेही हेच होईल, आणि व्हावंही. >>
असंवेदनशील आहे की नाही, हे कोण आणि कसं ठरवणार? सरदारजी आहे की नाही, नवरा आहे की बायको आहे, काळा आहे की गोरा, लठ्ठ आहे की नाही, धार्मिक आहे की नाही, ज्यू आहे की नाही वगैरे असंख्य गोष्टींवर जोक्स केले जातात आणि ते कुणालाही असंवेदनशील वाटू शकतात.
व्हाइटहॅट, तुम्ही बहुतांशी
व्हाइटहॅट, तुम्ही बहुतांश पोस्ट्समध्ये स्त्रियांच्या सेफ्टीबद्दल बोलला आहात, त्यावरून पुरुष मंडळी ट्रान्स असल्याची तात्पुरती बतावणी करून सेफ स्पेसमध्ये घुसू पाहतील ही तुमची भीती असावी. ती भीती व्हॅलिड आहे, कारण एखादी व्यक्ती खरंच ट्रान्स आहे की नाही हे सिद्ध करणं अवघड आहे. याबद्दल अधिक माहिती मिळवता आली तर पाहाते, इतर कोणाला माहीत असेल तर कृपया लिहा.
उपाशी बोका, तुमचा नेमका मुद्दा काय आहे ते मला कळलेलं नाही. 'चलता है' असं म्हणताहात, की मग अशा सगळ्याच विनोदांवर आक्षेप घेतला गेला पाहिजे असंच तुम्हालाही वाटतंय?
आता देव न करो पण उद्या हे लोण
आता देव न करो पण उद्या हे लोण भारतात आलं तर.
वरील बोल्ड केलेल्या शब्दामधून ट्रान्स लोक हे वाईटच असतात असा पूर्वग्रह दिसून येतो. गे लोकांनाही सुरुवातीला याच दिव्यातून जावे लागले होते.
Pages