नवीन आयकर रचना २०२०

Submitted by वलय on 1 February, 2020 - 13:38

नवीन आयकर रचने बद्दल बरंच उलट सुलट वाचायला मिळतय. नवीन रचना फायदेशीर आहे की जुनी? मायबोलीवरील तज्ञ मंडळींनी जरा इस्कटून माहिती दिली तर बरं होईल.

https://m.economictimes.com/wealth/tax/what-you-will-lose-if-you-opt-for...
https://www.livemint.com/budget/news/new-income-tax-rate-will-giving-up-...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुनी पध्दत सोडून नवी पध्दत फक्त एक वर्ष वापरता येईल का?
म्हणजे दरवर्षी ठरवता येईल का की कोणती पध्दत वापरायची? का पध्दतीतला बदल कायमस्वरूपी असेल?

चांगली योजना आहे , 30 च्या खालचे व 60 च्या वरचे असतील तर त्यांना बहुदा होम लोण इन्शुरन्स वगैरे नसतील भरायचे , पीपी एफ वगैरे भरायचे नसेल तर ही योजना त्यांना उपयोगी ठरेल

वैयक्तिक
नोकरदार लोकांना दर वर्षी पर्याय निवडता येईल. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पर्याय निवडावा लागेल आणि त्याची माहिती सुरुवातीलाच नोकरीच्या ठिकाणी द्यावी लागेल म्हणजे त्यांना उगमीच करसंकलन करणे सोयीचे होईल. काही उद्योजक आणि धंदेवाईकांना मात्र एकदा निवडलेला पर्यायच पुढे वापरावा लागेल. त्यात बदल करता येणार नाही.
" ज्या करदात्यांचे धंदा- व्यवसायाचे उत्पन्न आहे, अशांना या ( एकदा निवडलेल्या)विकल्पातून बाहेर आल्यास पुन्हा हा विकल्प निवडता येणार नाही "-्- प्रवीण देशपांडे@ लोकसत्ता

दोन चार ड्युआयडीज् काढुन प्रत्येकी चाळीस चाळीस हजार असा विभागता येईल का पगार?

सॅलरी इन्कम पेक्षा प्रोफेशनल इन्कम घेणे जास्त सोईचे आहे. मालकाला म्हणायचे, त्याच्या PF contribution च्या ५०% वाचवतो. ते ५०% + पगाराचे असे मासीक बील देतो. Professional fees म्हणून बुक कर.
आपला धंदा म्हणून दाखवले की जास्ती प्रकारचे खर्च दाखवता येतात. ज्याचा फायदा सॅलरी समोर घेता येत नाही.

>>मुलींचं लग्नाचं वय अठरा वर्षे आहे तर नवू नवू वर्षाच्या दोन मुलींबरोबर लग्न करता येईल का?>>
आजही अनेक अजाण बालीकांसाठी बालविवाह हे दु:खद वास्तव आहे. तेव्हा असे असंवेदनशील प्रतिसाद टाळलेत तर बरे होईल.

जी मंडळी अ‍ॅक्युनमुलेशन फेज मधे आहेत त्यांना नवा पर्याय फायद्याचा होणार नाही पण जे लोकं निवृत्त झालेत त्यांना नवा पर्याय सोईचा असेल ना?

अहो स्वाती ताई माझा प्रतिसाद <<दोन चार ड्युआयडीज् काढुन प्रत्येकी चाळीस चाळीस हजार असा विभागता येईल का पगार?
Submitted by मानव पृथ्वीकर on 2 February, 2020 - 03:12>> यांना उद्देशून होता. अन् मी लिहिलेलं दादा कोंडके यांचा डायलॉग आहे. मनोरंजन म्हणून पहा त्याकडे.

जी मंडळी अ‍ॅक्युनमुलेशन फेज मधे आहेत त्यांना नवा पर्याय फायद्याचा होणार नाही पण जे लोकं निवृत्त झालेत त्यांना नवा पर्याय सोईचा असेल ना?
>>>
रिटर्नमध्ये 2 ओळी कमी लिहाव्या लागणं हाच काय तो नव्या पर्यायाचा फायदा Lol

सॉरी! दादा कोंडकेंचा डायलॉग असला तरी तो असंवेदनशीलच आहे. अशा गोष्टींकडे मी तरी मनोरंजन म्हणून नाही पाहू शकत.

मनोरंजन म्हणून पहा त्याकडे.

नवीन Submitted by अरुणकुमार शिंदे on 2 February, 2020 - 22:21

म्हणून त्या वाक्याचा असंवेदनशीलपणा कमी होत नाही.

अजून फार लोकांच्या ध्यानात एक गोष्ट आलेली नाही. ती म्हणजे, नवीन प्रकारची करव्यवस्था ही पूर्णत: वैकल्पिक आहे. त्यामुळे वर ज्या कॉमेन्ट्स आहेत - आवळा देऊन कोहळा काढणे वगैरे - या गैरलागू ठरतात.

आता नवीन करव्यवस्था फायदेशीर ठरेल किंवा नाही, हे प्रत्येकाच्या उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून आहे.

समजा तुमचे 'क्ष' हे आजचे (जुन्या पद्धतीप्रमाणे) करपात्र उत्पन्न आहे. नवीन पद्धतीमध्ये त्यात खालील गोष्टी वाढवाव्या लागतील :-
१. पगारापासूनचे उत्पन्न
सर्व करमुक्त भत्ते
घरभाडे भत्ता
रु. ५०,००० /- (प्रमाणित वजावट किंवा स्टंडर्ड डिडक्शन)
व्यवसाय कर किंवा प्रोफेशन टॅक्स
लीव्ह ट्रॅव्हल असिस्टन्स
प्रॉव्हिडन्ड फंड
ग्रूप इन्शुरन्स

२. घरापासूनचे उत्पन्न
३०% भाडे - जे पूर्वी प्रमाणित वजावट म्हणून मिळत होते
गृहकर्जावरील देयक व्याज (भाड्याने दिलेल्या घरासाठी भाड्यापेक्षा जास्त व्याज)

३. व्यापार-उदीम किंवा व्यवसायापासूनचे उत्पन्न
डिप्रिसियेशन

४. अन्य स्रोतापासून उत्पन्न
फॅमिली पेन्शन वरील प्रमाणित वजावट

५. कलम ८० च्या सर्व वजावटी

वरील गोष्टी पाहिल्या तर; नवीन करपद्धती त्या लोकांसाठी उपयुक्त आहे; ज्यांना कुठलीही गुंतवणूक करण्याची इच्छा नाही. असे अनेक लोक असतील; ज्यांचा 'गुंतवणूक' या शब्दावरील विश्वास उडाला आहे. असे अनेक लोक असतील; ज्यांचे सर्व काही करून झाले आहे आणि आता कुठल्याही त्रासाशिवाय फक्त मस्त आयुष्य जगायचे आहे. असे अनेक लोक असतील; ज्यांचे उत्पन्न नगद स्वरूपात असेल.

नवीन करपद्धतीकडे लोकांना वळविण्यासाठी सरकारला प्रत्येक व्यक्तीला कराच्या जाळ्यात कसे आणता येईल ते पहावे लागेल. सरकारकडे नक्कीच तशी योजना असणार याचा मला विश्वास वाटतो.

.

आपल्याकडे निवृत्तीनंतरच्या सामाजिक अथवा आर्थिक सुरक्षितता योजना अगदीच तुटपुंज्या आहेत. आयुष्यभर बचत केली तरच म्हातारपण सुखाचे होते. परवडण्याजोगे आणि पुरेसे वृद्धाश्रम नाहीत. वृद्धांना राहाण्यास जागा नाही, मुलाबाळांना नोकरीधंदा नाही, शेती बुडितखाती. अशामुळे बचतीचे महत्त्व वाढते.

Calculation and compare of income tax in both regime
PL click the following link .
https://rviju.github.io

By simply feeding the total Annual Income and Total deductions and Age group ,one can get the total tax liability in both regimes and find which regime is beneficial .One can also view which regime is better for various values for the selected age group.
हे एक फॉरवर्ड चिकटवत आहे.

करपात्र आहे माझं. मी ऐकलंय की टॅक्स भरला नाही की परदेशात जाताना पकडतात. मी सध्या परदेशात जाणार नाही त्यामुळे मी लक्ष नाही देत. झेरोधात पण कायतरी भरायला सांगत होते. ते पण नाही भरलंय. पोलीस पकडायला आले तर नेट स्लो होतं म्हणून भरलं नाही हे कारण सांगणार आहे.