नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .
इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला
पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?
शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?
संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा .
बॉडीशेमिंगचे मुख्य कारणhttps:
बॉडीशेमिंगचे मुख्य कारण
https://www.maayboli.com/node/74787
आता या कोण ताई?
आता या कोण ताई?
टोमणेवाल्या ताई. यापेक्षा
टोमणेवाल्या ताई. यापेक्षा जास्त सांगू शकत नाही. नाहीतर लगेचच पाठवणी होईल. ब्लॉक.
ओके
ओके
सर भक्तांवर नाराज होऊ नका सर.
सर भक्तांवर नाराज होऊ नका सर.
तुम्ही जे तुम्हाला इग्नोर करतात त्यांचाही पिच्छा पुरवता. त्यांना उकसवण्यासाठी त्यांनी जे म्हटलेचि नाही ते कोट करून आता यावर तुमचे मत काय असे विचारता. ज्यांना तुमचा राग येतो त्यांनाही उत्तरे देता.
पण धागे वर काढणार्यांकडे ढुंकूनही बघत नाहीत. तुमच्या भक्तांना आदमताईंनी उडवले तरी तुम्ही शांतच.
देवा तूच जर असा रूसलास
तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पहायचं ?
खरे त शाहरुखचा ही राग येत
खरे त शाहरुखचा ही राग येत नाही. पण हा ऋन्म्या सारखा सारखा शाहरुख करुन लोकांना पिसाळुन सोडतो.
शाहरूख खानचा लोकाना इतका राग
शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?
Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 12:21
>>>>
ऋन्मेषमुळे - हे उत्तर लॉक करून धागा क्लोज करूया का?
शांत मानुस तुमची भक्ती पाहुन
शांत मानुस तुमची भक्ती पाहुन डोळ्यात पाणी आले.
नुसते पाणी, मला तर गदगदून
नुसते पाणी, मला तर गदगदून आलंय
अंग नुसतं गदगदून हलतय
घरच्यांना वाटलं मला झटका आला काय म्हणून कांदा लावायला निघाले होते नाकाला
शांत माणूस सांभाळा स्वतःला
जसे सम्लान च्या वाटेला गेल्या व्यक्तीला परत बॉलिवूड मध्ये कोणी उभे करत नाही तसेच असेल हे
सर हे बॉडी शॉपिंग ऐकलं होतं,
सर हे बॉडी शॉपिंग ऐकलं होतं, बॉडी शेमिंग काय असतं?
यावर एक धागा काढाच
खूप दिवस झाले एकाच विषयावर बोलून
नवा माल आणा की काहीतरी बाजारात
ऋन्मेषमुळे - हे उत्तर लॉक
ऋन्मेषमुळे - हे उत्तर लॉक करून धागा क्लोज करूया का?>> धागालेखकाची परवानगी न घेताच? दुसऱ्यांच्या धाग्यांना परस्पर कुलूप लावायचे हे अती नाही का होत सर?
मला तो झबा (झपाटलेला बाहुला)
मला तो झबा (झपाटलेला बाहुला) वाटतो. ठेवण विग वगैरे वगैरे.
Happy Birthday SRK..
Happy Birthday SRK..
शाहरूख का आवडतो. एक वेगळाच दृष्टीकोण
https://www.bbc.com/marathi/india-59472935
रानभुली हा खूप छान लेख आहे.
रानभुली हा खूप छान लेख आहे.
ईथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
लेख जरी शाहरूखबद्दल असला तरी प्रत्येक पुरुषाने वाचावा असा आहे. यावर स्वतंत्र धागा हवा. स्वतंत्र चर्चा व्हायला हवी.
खूप छान लेख आहे... खरंच!
खूप छान लेख आहे... खरंच!
शारुकचा बड्डे तरीही माबो वर
शारुकचा बड्डे तरीही माबो वर इतकी शांतता!!
पुर्वीचे दिवस राहीले नाही हेच खरं ...
शाहरूख खान बद्दलचा एक लेख वर
शाहरूख खान बद्दलचा एक लेख वर शेअर केला होता. आता हा व्हिडीओ. यातही महिला आहेच.
पण...
https://www.youtube.com/watch?v=2XiEmHl2NVU
लोकांच्या भावना शी खेळून
लोकांच्या भावना शी खेळून कलाकार फक्त पैसे कमावत असतात.
रिअल लाईफ आणि रील लाईफ मध्ये खूप अंतर असते.
उगाच कोणाला डोक्यावर घेवू नका.
200 रुपये देवून अडीच तास मनोरंजन इतकीच किंमत ध्या .
आणि तिथेच संबंध तोडा .
व्यवहार आहे हा..
उगाच भावनिक होण्यात काही अर्थ नाही.
उदाहरणे खूप आहेत .
नका द्यायला लावू
Reel लाईफ पुरतेच कलाकार लोकानची स्तुती करा .real life मध्ये नाहीं
Reel life आणि रिअल लाईफ ह्या मध्ये खूप फरक असतो
रानभुली विडिओ शेअर बद्दल
रानभुली विडिओ शेअर बद्दल धन्यवाद
माझ्या फार आवडीचा विडिओ
हा फुल्ल एपिसोडही पाहिला आहे.
पण या विडिओची जागा या धाग्यावर नाही. तर शाहरूख महिलांना का आवडतो या धाग्यावर आहे.
मी हा तिथे पळवून नेतो
Pages