कमळ काकड्यांच्या चकत्या
लसूण पाकळ्या 5-6
आलं
मिरच्या -2
जीरे -१ लहान चमचा
हिंग -१/४ चमचा
बेसन - २ मोठे चमचे
लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड (प्रत्येकी १ लहान चमचा)
मीठ चवीनुसार
लिंबू रस - १ लहान चमचा
'भारत का दिल देखो' या माझ्या मध्यभारतीय लोकजीवनावर आधारित असलेल्या मालिकेत एक कमळ काकडीपासून झटपट बनणारा पदार्थ ..
कमळ काकड्यांची साले काढून स्वच्छ धुवून घ्या.
त्याच्या बारीक चकत्या करून घ्या.
चकत्या केल्या नंतर पुन्हा एकदा स्वच्छ धुवा.
एका पातेल्यात चकत्या बुडतील इतके पाणी घेऊन व थोडे मीठ घालून उकळायला ठेवा
चकत्या जरा जरा मऊ झाल्या पाहिजेत. एकदम लगदा व्हायला नको.
एकीकडे आले+ लसूण + मिरच्या ठेचून घ्या.
चकत्या शिजल्या की थंड पाण्यातून रोळून घ्या.
कढईत २ मोठे चमचे तेल गरम करा.
कडकडीत गरम झाले की त्यात जिरे व हिंगाची फोडणी घाला. यात आले लसूण मिरचीचा ठेचा घाला.
त्यातच आता बेसन घाला व ५ मिनिटे खरपूस परतून घ्या.
लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड व मीठ घालून परता
आता यात रोळून ठेवलेल्या कमळ काकड्यांच्या चकत्या व किंचित पाणी घालून सुके होईपर्यंत शिजवून घ्या.
जरा थंड झाल्यावर वरून लिंबूरस घाला व नीट मिसळून घ्या
कमल ककडी का सुख्खा तय्यार हैं.
या जेवायला
तलावांच्या प्रदेशातील पदार्थ (बालाघाटी)
क का च्या दुसऱ्या प्रकारासाठी
https://www.maayboli.com/node/67830
छान
छान
मला एकदा उल्हासनगरला मिळाली होती
पाकृ छानच. पण इथे मुंबईत
पाकृ छानच. पण इथे मुंबईत कमलकाकडी फारच दुर्मीळ.
मस्तच
मस्तच
कुलब्याच्या कैलाश परबत च्या
कुलब्याच्या कैलाश परबत च्या बाहेर असते नेहमी विकायला.
छान ! मला लक्ष्मीपूजन सोडून
छान ! मला लक्ष्मीपूजन सोडून याचा इतर उपयोग माहिती नव्हता.
छान सोपी रुचकर पाकृ. कल्याण
छान सोपी रुचकर पाकृ. कल्याण भाजी बाजारात सहज मिळते. थंड पाण्यातून रोळून ..... हा नवीन शब्द आहे की गाळून असे पाहिजे. छायाचित्रे तोपासू आहेत. धन्यवाद.
खूप छान आहे तुमची ही पूर्ण
खूप छान आहे तुमची ही पूर्ण मालिका..
पहिल्यांदाच कमळाचे इतके सुंदर पदार्थ माहित झाले.
मस्त!
मस्त!
रोळून म्हणजे निथळून का? निथळायला रोळी नावाचं टोपलीसारखं विणलेलं असतं.
मस्त पाककृती आहे. मागे
मस्त पाककृती आहे. मागे दिनेशदांनी एक कमल काकडीची पाककृती टाकली होती. ही एकदम वेगळी आहे त्यापेक्षा. करून बघायला हवी.
धन्यवाद . गरम पदार्थ
धन्यवाद . गरम पदार्थ (कडधान्य वगैरे) जेव्हा गाळणीत घालून त्यावर थंड पाणी घालतात. त्याला रोळणे म्हणतात. यानी पदार्थ शिजण्याची क्रिया एकदम थांबते
मस्त..
मस्त..
म्हणजे blanching का??
म्हणजे blanching का??
नवीन रेसिपी, छान दिसतेय डिश.
म्हणजे blanching का?? हो
म्हणजे blanching का??
हो
Submitted by मनिम्याऊ on 21
Submitted by मनिम्याऊ on 21 December, 2021 - 20:25
>> ओह! नवीन शब्द कळला
मस्त रेसिपी. पहिला फोटो अगदी
मस्त रेसिपी. पहिला फोटो अगदी यमी आहे.
पहिला फोटो पहिल्यावर भाजीपेक्षा मला डाळीचं पीठ लावुन शॅलो फ्राय केलेल्या चकत्या वाटल्या, मग रेसिपी वाचली. मला आवडतील क्रिस्पी स्पायसी चकत्या. अशी काही रेसीपी असेल तर प्लिज लिहा.
मला आधी कमलकाकडी माहित नव्हती, मी आता गुगल करून पाहिल्यावर कळलं की पुण्यात हातगाडीवर विकायला भरपूर असतात. भरपुर म्हणजे पुर्ण हातगाडीवर फक्त या काकड्या. अर्थात ती कोणती भाजी आहे हे माहित नसल्याने कधी विकत घेतल्या नव्हत्या. वाटलं होतं की आपण साधी काकडी खातो त्यातलीच वेगळी व्हरायटी आहे.
अशी काही रेसीपी असेल तर प्लिज
अशी काही रेसीपी असेल तर प्लिज लिहा.
Submitted by मीरा.. on 21 December, 2021 - 20:57>>>
क का चिप्स
मस्तच
मस्तच
फोटो, रेसिपी दोन्ही मस्तच.
फोटो, रेसिपी दोन्ही मस्तच.
मस्त, तुमच्या पाकृ युनिक
मस्त, तुमच्या पाकृ युनिक असतात
छान रेसीपी. रोवळी असे एक
छान रेसीपी. रोवळी असे एक पात्र असते . पूर्वी वर्याचे तांदूळ / भगर न निवडलेली मिळायची तेव्हा आईचा उपास अस्ला की मे हे काम केलेले आहे. जास्तीच्या पाण्यात वरी भिजवायची. मग कचरा दगड गार चे खडे वर येतात ते पाणी बदलू बदलून वर चे वरचे काढत राहायचे रोळीत घालुन. शेवट्चे पाणी स्वच्छ निघाले की काम झाले.
रोळुन घेणे / रोवळणे असे
रोळुन घेणे / रोवळणे असे क्रियापद आहे.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/61189?page=61
मला कमळदांडे व लोटस पॉड दोन्ही उल्हासनगरात मिळाले होते
अरे वा blackcat! मस्त! लोटस
अरे वा blackcat! मस्त! लोटस पॉडस च्या बिया काढून सोलून त्यांची उसळ करतात बरं का बिरड्या सारखी.
(रेसिपी देऊ का??)
मखाणे तर common आहेत. मखाण्यान्ची भाजी, खीर आणि snack बनवतात.
( खूपच अनवट रेसिपीज देते का मी?)
खूपच अनवट रेसिपीज देते का मी?
खूपच अनवट रेसिपीज देते का मी?> मस्तच रेसिपी. पहिला फोटो अगदी यम्मी आहे. आता शोधावी लागणार कमलकाकडी .
मखाणे तर common आहेत. मखाण्यान्ची भाजी, खीर आणि snack बनवतात.> मखाणे मला आवडतात. भाजी ची रेसिपी पण दे ना ग. रोस्टेड मखाण्याची भाजी करतात का?
मखाणे मला आवडतात. भाजी ची
मखाणे मला आवडतात. भाजी ची रेसिपी पण दे ना ग. रोस्टेड मखाण्याची भाजी करतात का? >>
मखाणे आहेत घरात. एक दोन दिवसात बनवते.
मस्त, छानेय, अलग है
मस्त, छानेय, अलग है
क का चिप्स
क का चिप्स
Submitted by मनिम्याऊ on 21 December, 2021 - 22:26 >>>>> चिप्स रेसीपीसाठी आभारी आहे.