नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .
इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला
पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?
शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?
संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा .
शाखाला तुझ्या मुलांची पिढि
शाखाला तुझ्या मुलांची पिढि ओळखणार नाही
>>>>
गल्लत्त
माझ्या मुलांची पिढी तर आताच ओळखू लागली आहे.
मागच्या पानावर तर यासंदर्भात पोस्टही टाकली आहे.
दोनेक महिन्यांपूर्वीच कभी अलविदा ना केहना पिक्चर पाहिला. आणि जाणवले की तो कसा काळाच्या पुढचा पिक्चर बनवला होता. मला आठवतेय कि थिएटरात लोकं शिव्या घालत बाहेर पडत होते कारण दुसर्याची बायको पळवलेली त्यात दाखवली होती. पण आज कळतेय की प्रेमच नसेल तर त्या नवराबायकोच्या नात्याला काही अर्थ नसतो. ते दुसर्याची बायको पळवणे नव्हते तर एकमेकांना हवे असलेले प्रेम मिळवणे होते. अन्यथा त्या चौघांमध्ये कोणीही सुखी नव्हते. पण तेव्हा हे समजावे ईतकी प्रगल्भता भारतीय प्रेक्षकांमध्ये नव्हती. आज येत आहे असे वाटते
ईट ईज अॅज दॅट अॅज सिंपल>>>>
ईट ईज अॅज दॅट अॅज सिंपल>>>> तुम्ही लिहिलेला वाक्प्रचार हा ईट ईज अॅज सिंपल अॅज दॅट असा आहे.
काही आधार आहे का याला?
काही आधार आहे का याला?
शाहरूख हे खरे खोटे करायला ईथे येणार नाही म्हणून काहीही आरोप>>> माझा आरोप खरा नाही याला काय आधार? दर्दे दिस्को मधे त्याने बोटोक्स केलेले स्वतः कबूल केलेय ..पण दुवा दिला तरी तुमचं आपलं तुणतुणं चालुच राहणार सो आधी माझ्या आरोपा ला खोटे पाडा.
नेहमी दुसर्यांना कामा ला लाऊन दुवे शोधवत बसू नका, तितका वेळ तुमच्या कडे नक्की आहे (धागा/प्रतिसाद संख्या बघून)..सो कामाला लागा.
कभी अलविदा सारख्या बिंडोक सिनेम्याची भलावण करताना जरा स्वतःला अभिषेक ब. च्या जागी ठेवून बघा..तो ही बेस्ट च नवरा दाखवलाय.
तुमच्या सारखे लोक क दर्जाचे सिनेमे बघून वाह वाह करतात म्हणुन करण जोहर सारखे अजून तसेच सिनेमे बनवतात.
जरा अभिरूची असलेले सिनेमे शा खा ने केलेत त्यांचं कौतुक च होणार जसे चक दे, डियर जिंदगी..
पण तेव्हा हे समजावे ईतकी
पण तेव्हा हे समजावे ईतकी प्रगल्भता भारतीय प्रेक्षकांमध्ये नव्हती. आज येत आहे असे वाटते>> तेव्हा प्रगल्भता नव्हती!!
सर सुसाट निघालेत.
किती गरळ ओकाल, मान्य आहे
किती गरळ ओकाल, मान्य आहे तुम्हाला शाखा चा तिरस्कार आहे पण थोडा कंट्रोल करा की राव>>>>>> अरे देवा !
ऋन्मेष, अरे शाहरुखला सुद्धा उबग येईल रे . तुझ्यासारखे फॅनच या कलाकारांची वाट लावतात.
ईट ईज अॅज दॅट अॅज सिंपल>>>>
ईट ईज अॅज दॅट अॅज सिंपल>>>> तुम्ही लिहिलेला वाक्प्रचार हा ईट ईज अॅज सिंपल अॅज दॅट असा आहे.
>>>>>
येस्स सर, आय माय सॉरी. माईन ईंलिश ईज वेरी पूअर. आई विल रीअली अॅप्रिशिएट ईफ रिच पीपल्स ईन ईंग्लिश लाईक यू हेल्प मी अ लॉट
दर्दे दिस्को मधे त्याने
दर्दे दिस्को मधे त्याने बोटोक्स केलेले स्वतः कबूल केलेय .. पण दुवा दिला तरी तुमचं आपलं तुणतुणं चालुच राहणार सो आधी माझ्या आरोपा ला खोटे पाडा.
>>>>>>
बोटॉक्स, फोटोग्राफी, स्पेशल एफ्फेक्ट्स, अॅक्शन रीटेक्स, ड्रग्स वगैरे हजारो सिक्रेट्स आहेत
>>>
नुसते बोटॉक्स नाही तर ईतर सर्वांचा आणि ड्रग्सचाही दुवा द्याल.
कभी अलविदा सारख्या बिंडोक
कभी अलविदा सारख्या बिंडोक सिनेम्याची भलावण करताना जरा स्वतःला अभिषेक ब. च्या जागी ठेवून बघा..तो ही बेस्ट च नवरा दाखवलाय.
>>>>>
यही सोच तो बदलनी है,
अभिषेक माणूस म्हणून, नवरा म्हणून चांगला असेलही. पण ज्यासोबत आयुष्य काढायचे आहे त्यासोबत केमिस्ट्री जुळायला नको?
आज जे डिव्होर्स होतात त्यातील एक जण वाईट असतो असेच म्हणायला हवे मग
याचमुळे डिव्होर्स हे गॉसिपिंगचा विषय बनतात, कारण लोकं कोणाची चूकी आहे कोण वाईट हे शोधत बसतात.
त्या दोघांना आपण एकमेकांच्या टाईपचे नाही आहोत हे रिअलाईज झाल्याने ते वेगळे झाले हे कोणी समजूनच घेऊ शकत नाही.
सॉरी करन जोहर, आजही हा चित्रपट काळाच्या पुढेच आहे असे वाटते.
जरा अभिरूची असलेले सिनेमे शा
जरा अभिरूची असलेले सिनेमे शा खा ने केलेत त्यांचं कौतुक च होणार जसे चक दे, डियर जिंदगी..
Submitted by aashu29 on 22 December, 2021 - 07:21
>>>>>
आपल्याकडे धागा आहे डिअर जिंदगी चित्रपटाचा
https://www.maayboli.com/node/60941
https://www.mensxp.com
https://www.mensxp.com/grooming/celebrity-grooming/81150-male-indian-cel...
https://www.youtube.com/watch?v=ycM3YEcPr3Q
शाखा च्या चित्रपटात त्याचा
शाखा च्या चित्रपटात त्याचा रोल ए के हंगल यांनी केला असता तरी चालले असते. अमिताभच्या भूमिकेत हंगल साहेब ईमॅजिन पण करता येत नाही.
आठवा -
पीटर तुम मुझे बाहर ढूंढ रहे हो और मै तुम्हारा यहां इंतजार कर रहा हूं
अब ये चाबी तुम मेरी जेब से निकालोगे.
हे संवाद हंगल साहेब कसे म्हणाले असते?
बेटा पीटर, मुझे ढुंढने के लिये क्युं दर दर कि ठोकरे खा रहे थे. जैसे ही मुझे पता चला मै खूद ही मिलने चला आया.
अब शांती से बात करते है. बातचीत खत्म होने के बाद अगर तुम्हे लगा तो इस चाबी से दरवाजा खोल देना. फिर मै अपने घर तुम किसी के भी घर चले जाना.
शाहरुख खान चे संवाद मात्र हंगल साहेबांनी जसे आहे तसे म्हटले असते.
बडे बडे शहरों मे छोटी छोटी बाते होती है.
(No subject)
हनगल नजरेसमोर आले.
हनगल नजरेसमोर आले.
शाहरूखच्या या वयातील सळसळत्या
शाहरूखच्या या वयातील सळसळत्या उत्साहाचे रहस्य काय असावे हे एक सिक्रेटच राहणार..
>>>>
याचे उत्तर म्हणून लोकं बोटॉक्स घेऊन येत आहेत.
हे कसे काम करते आणि त्याला कसा उत्साह देते कोणी सांगेल का?
बडे बडे शहरों मे छोटी छोटी
बडे बडे शहरों मे छोटी छोटी बाते होती है.
Submitted by शांत माणूस on 22 December, 2021 - 12:51
>>>>
शाहरूखचा एक डायलॉग लिहून थांबने फाऊल आहे.
किमान ३ लिहावे लागतात
याचे उत्तर म्हणून लोकं
याचे उत्तर म्हणून लोकं बोटॉक्स घेऊन येत आहेत.>>>>> नाही, आम्ही नाही बोटॉक्स घेऊन आलो.
हे कसे काम करते आणि त्याला कसा उत्साह देते कोणी सांगेल का?>>>>>> आम्ही ते घेतलेच नाही तर कसे सांगणार? शाहरुखलाच विचार ना. हाकानाका !
शाहरूखच्या या वयातील सळसळत्या
शाहरूखच्या या वयातील सळसळत्या उत्साहाचे रहस्य काय असावे हे एक सिक्रेटच राहणार..
>>> सुट्टा
सुट्टा????? मिन्स व्हॉट? की
सुट्टा????? मिन्स व्हॉट? की सुटा एकदाचे इथुन?
सुट्टा????? मिन्स व्हॉट?
सुट्टा????? मिन्स व्हॉट?
>>> सिरियसली??
### सुट्टा, मुझे सुट्टा ना
### सुट्टा, मुझे सुट्टा ना मिला...
या गाण्यावर आमचा कॉलेजचा निरोप समारंभ झाला..
पण सुट्टा काही त्याच्या उत्साहाचे रहस्य नाही हो, उलट ते नसते तर विचार करा पडदा फाडून थिएटरमध्ये अवतरला असता तो.
सिरियसली??>>>>> हो च्रप्स.
सिरियसली??>>>>> हो च्रप्स. खरच मला माहीत नाही.
रश्मी - सुट्टा म्हणजे सिगरेट.
रश्मी - सुट्टा म्हणजे सिगरेट...
मलाही नव्हते माहिती.
मलाही नव्हते माहिती.
सुट्टा म्हणजेआख्खी सिगरेट
सुट्टा म्हणजेआख्खी सिगरेट नाही बहुतेक. काॅमन मधे फिरणा-या
थोटकातल्या एखादा झुरका म्हणजे सुट्टा असा माझा समज आहे.
चुकीचा समज आहे कदाचित
चुकीचा समज आहे
कदाचित तुमच्या मित्र परिवारात त्या अर्थाने वापरत असतील म्हणून असे वाटू शकते.....आम्हीतर पूर्ण सिगरेट अर्थाने वापरतो...
झुरका ला कश म्हणतात...
चाय सुट्टा खूप कॉमन आहे ...
रश्मी - सुट्टा म्हणजे सिगरेट.
रश्मी - सुट्टा म्हणजे सिगरेट...>>>> ओके, धन्यवाद !
अमीर,सल्लु आणी शाहरुख तर अजून भयानक दिसतात. माधुरीला लोकसत्तात एका फोटो बघीतले, खूप डेंजर दिसली होती
चांगल्या सर्जरी नसीब का खेल .
चांगल्या सर्जरी नसीब का खेल ...
याबाबतीत अनिल कपूर लकी आहे... सगळे फेसलिफ्ट छान झालेत...
धन्यवाद च्र्स. उगीच शंका
धन्यवाद च्र्स. उगीच शंका रहायला नको.
सुट्टा म्हणजे सिगरेट...>>
सुट्टा म्हणजे सिगरेट...>> नाही. सुट्टा म्हणजे फुंकणे. मग बिडी असो, चिलीम, सिगरेट, पाईप काहीही.
नुसते बोटॉक्स नाही तर ईतर
नुसते बोटॉक्स नाही तर ईतर सर्वांचा आणि ड्रग्सचाही दुवा द्याल.>>>
नाही देणार, तरी ठाम राहणार & मी आधीच उत्तर दिलय..
>>पण दुवा दिला तरी तुमचं आपलं तुणतुणं चालुच राहणार सो आधी माझ्या आरोपा ला खोटे पाडा.>>
सॉरी करन जोहर, आजही हा चित्रपट काळाच्या पुढेच आहे असे वाटते.>>> डोंबलं.. की तो समलिंगी आहे म्हणुन की दर्जाहीन चित्रपट बनवतो म्हणुन? दोस्ताना किती उथळ बनवलाय.. स्वतः त्याच कम्युनिटितला असून ही.. एनीवेज माबो करांनी एखाद्या ला वाईट म्हणावं आणि तू त्याला उचलून मखरात ठेवावं हे नेहमीचंच आहे सो चालु द्या!
Pages