आवळ्याच्या पाककृतींचे संकलन

Submitted by धनवन्ती on 17 December, 2021 - 03:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवळे, आवळे आणि अजून जास्त आवळे.
मीठ, गूळ, इ.
आणि आवळ्याच्या पाककृती माहित असणारी मंडळी Happy

क्रमवार पाककृती: 

आवळ्यासारख्या बहुगुणी फळाला यथोचित सन्मान देण्यार्या पाककृती आणि टिपा यांचा हा एक संकलन धागा आहे.

Note - युक्ती सुचवा युक्ती सांगा -भाग ४ इथून काही मजकूर copy paste केला आहे. https://www.maayboli.com/node/80670

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके..
माहितीचा स्रोत: 
मायबोलीकर सुगरणी आणि सुगरणे
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवळ्याचे लोणचे करण्यासाठी कच्च्या आवळ्याचे काप केले होते, दिरंगाई झाल्या मुळे त्या फोडी लालसर झाल्या आहेत. काय करावे ? करू की नको लोणचे?
(नाही केले तर नवर्याच्या कष्ट वाया जातील) लयचं मोठ्या पेचात पडले राव!! Sad

Submitted by ShitalKrishna on 14 December, 2021 - 20:55
माझ्या मते करायला काहीच हरकत नाही, तरी इतर कोणी नीट सांगतील. नाहीतर मीठ लाऊन वाळवा, सुपारी होईल. वाळवणार असाल तर सोबत आल्याचे पण थोडे तुकडे मिक्स करा, भारी लागेल.

Submitted by अन्जू on 14 December, 2021 - 21:47
हिंग पण आणि काळं मीठ पण.
यम्मी

Submitted by mi_anu on 14 December, 2021 - 21:54
हो यम्मी लागेल. मी श्रीरामपुरला असताना वर गच्ची होती म्हणून आलं आवळा सुपारी करायचे. हिंग वगैरे नाही लावायचे, मिरपुड कधी मिक्स करायचे. उपासाला चालायची ना अशी. उपास असला की बाकी बडीशोप वगैरे खाता नाही येत. पित्त होऊ नये म्हणून ही चघळली की झालं काम. हिंग चालत नाही ना उपासाला.

Submitted by अन्जू on 14 December, 2021 - 22:55
हम्म काय माहित.उपासाला खाल्ली नाही कधी.थोडा हिंग चांगला लागतो

Submitted by mi_anu on 15 December, 2021

धन्यवाद सगळ्यांना.
जास्त लाल झाल्या त्या वेगळ्या करून काळ मीठ, जीरा पावडर, हिंग लावून उन्हात ठेवले, बाकीचे कमी लालसरचे लोणचे केले

Submitted by ShitalKrishna on 15 December, 2021 - 11:35
कोल्हापूरला श्री अंबाबाईच्या देवळा बाहेर , बहुतेक महाद्वारासमोर जिथे दगडु बाळा भोसले यांचे पेढ्याचे दुकान आहे, तिथेच काही बायका आवळ्याच्या वाळवलेल्या चकत्या विकतात. पण त्या इतक्या पांढर्या शुभ्र कशा रहातात देव जाणे. कोणाला माहीत आहे का याबद्दल? कारण ताजी सुपारी वा चिरलेला आवळा लाल काळाच पडतो. आम्ही मागे गेलो होतो तेव्हा घेतल्या होत्या, पण विचारायचे राहुन गेले.

Submitted by रश्मी. on 15 December, 2021 - 13:28
आवळा नुसते मीठ घालून उन्हात ठेवला तर लाल किंवा काळा नाही पडत.आमचा पांढरा राहतो(पण वाळण्या पूर्वी संपतो.

Submitted by mi_anu on 15 December, 2021 - 13:34
ओके अनु. थॅन्क्स. करुन बघते.
पण वाळण्या पूर्वी संपतो.>>>> Proud सुपारी अजून मुलीने खाल्लेली नाही. बहुतेक असे केल्यावर नक्कीच संपेल.

मी आवळ्याचे पाचक मात्र करते. ताजा किसलेला आवळा+ अर्धा छोटा चमचा लिंबाचा रस + किसलेले आले + चमचा साखर आणी थोडा ओवा असे एकत्र करुन काचे च्या बाटलीत घालुन फ्रिझ मध्ये ठेवते. जास्त प्रमाणात करत नाही, कारण सर्व कच्चे आहे.

Submitted by रश्मी. on 15 December, 2021 - 14:14
रश्मी, मीठ लिहायचं राहिलं. (साध्या मिठाऐवजी रॉक सॉल्ट मस्त लागतं).
लहानपणी किंवा अगदी लग्न होईपर्यंत हे प्रकरण मला अतिशय आवडायचं. ते मुरलं की त्याला पाणी सुटतं, ते पण मी चमच्याने प्यायचे. आता हा पदार्थ पुर्ण विसरले होते. तुझ्या पोस्टने आठवण आली, आता नक्कीच करेन.

Submitted by मीरा.. on 15 December, 2021 - 18:39
रश्मी मी करताना आवळा, मध, सैंधव आणि साधं मीठ आणि आलं रस घालून करतो मस्त लागतं. लिंबू नाही. 3 आवळ्यांचं 3 दिवस आरामात पुरतं मी हापिसला ठेवतो बॉटल. पित्त थोडे दिवस तरी कंट्रोल मध्ये रहातं.

Submitted by लंपन on 15 December, 2021 - 18:55

साबा स्पेशल पदार्थ
त्याला शेणवडी म्हणतात.
आवळे शिजवून, त्याला बिया काढून कणकेसारखे मिरची, काळे मीठ,हिंग याबरोबर मळून पापड्या सारख्या आकाराच्या वड्या प्लास्टिक वर थापून वाळवायच्या. वाळल्यावर काळ्या होऊन शेणाच्या गोवरी चा रंग दिसतो.
अतिशय जबरदस्त लागतात.

Submitted by mi_anu on 15 December, 2021 - 21:16

वेगळा धागा केला, थॅंक यु.

मिठातले आवळे कोकणातल्या लोकांना माहिती असतील. वर्ष वर्ष भर चीनी मातीच्या बरणीत मिठाच्या पाण्यात घालून ठेवतात. मी इथे थोडेच घालते आणि खात बसते.

खरंतर ते फ्रोजन आवळे संपवायचे म्हणूनच लोणचे केले पण आवडले आणि पुन्हा करणारे. मी जरा कमी उकडले कारण फ्रोझन असेही कडक नसतात. त्यात मेथ्या आणि मोहरीची पूडही आहे. खूप मस्त आणि वेगळे लागले. फ्रिझमधे ठेवावे लागते, बाहेर रहाणार नाही. (टेक्ससमधे काहीच टिकत नाही).
Happy

Screenshot_20211217-135305_Gallery.jpgकबिताज् किचनवरून रेसिपी घेतली. मोहरीचे तेल न विपरता नेहमीचे वापरले.

मिठातले आवळे कोकणातल्या लोकांना माहिती असतील. >>> मी कोकणात नाही गेलो, पण केरळमध्ये पाहिलेत, बरणीत, पाण्यात घालून ठेवलेले अख्खे आवळे. आवळे टिकण्यासाठी करतात का हे?
नक्की कसे करायचे? किती दिवस टिकतात?

मानव मिठातले आवळे करणं खूप सोपं आहे
एका उभट काचेच्या बाटलीत किंवा जार मध्ये ( स्टील नको , मीठ खूप असल्याने स्टील खराब होतं. )पाणी भरायचं . त्यात भरपूर म्हणजे पाणी खूप खारट लागेल इतकं मीठ घालून ढवळायचं. मीठ विरघळलं की मग त्यात आवळे घालायचे. ते पाण्यात पूर्ण बुडतील इतकं पाणी हवं. दोन चार दिवसात ते मिठामुळे पांढरट दिसायला लागतात. असे झाले की खायला सुरवात . मस्तच लागतात कारण मीठ सगळीकडे आतून लागलेलं असत. ह्याच्या दोन चार चकत्या त्यावर थोडं तिखट भुरभुरवून जेवणात घेतल्या तरी छान लागतात. जेवण झाल्यावर आवळा सुपारी सारखी एखादी चघळली तरी मस्त लागते.

यात आम्ही आवळ्यांना छिद्रे पाडुन ठेवतो. मग ते मिठाचे पाणी आत लवकर चांग्ले मुरते. नाहीतर ५-६ दिवसात आवळे चिकट होतात. वरुन लेअर येते त्याला. खराब वास येतो.

सगळ्या तिखट च पाकृ आल्यात आत्ता पर्यंत. पण आवळ्याच् सरबत ही छान होतं.

आवळा किसायचा, मिक्सर मध्ये एकदा फिरवून त्यात थोडे पाणी घालून रस काढायचा आणि तो गाळून घ्यायचा. जरुरी प्रमाणे साखर, मीठ, पाणी, बर्फ घालून प्यायचं थंडगार .

माझ्या कडे स्वयंपाकाला येणारी मुलगी आवळ्यखची चटणी करते. आवळे थोडे उकडून घ्यावेत. ( गिच्चगाळ नाही शिजवायचे. गर निघू शकेल एवढे मऊ करायचे.)
मग बिया काढून गर, मिरची, कोथिंबीर आणि सैंधव घालून वाटून घ्यायचे.

Submitted by प्राची on 16 December, 2021 - 03:40

शिजवलेल्या आवळ्याच्या बारीक फोडी करायच्या. त्यात फेसलेली मोहरी, दही, मीठ, हवी तर थोडी साखर आणि हिरवी मिरची घालून केलेलं आवळ्याच् रायत ही छान लागत.

Submitted by मनीमोहोर on 16 December, 2021 - 05:35

https://www.maayboli.com/hitguj/messages/103383/94293.html?1163495391 सगळीकडे शोधल्यावर शेवटी हे सापडले.

Submitted by रश्मी. on 16 December, 2021 - 07:08
https://www.maayboli.com/node/52339
आवळा टक्कु/तक्कु
माझीच रिक्शा Happy

Submitted by मंजूताई on 16 December, 2021 - 09:25

कच्च्या आवळ्या आल्याची चटणी पण मस्त होते, फक्त तिखट मीठ एवढं घातलं तरी चालतं, किंचित साखर गूळ पण चालतो. आवळे जास्त आंबट असतील तर थोडा जास्त गूळ किंवा साखर घालायची. बाकी जिरं, हिंग, मीरपूड वगैरे घातलं तर अजून छान लागते.

बाकी नुसत्या मिठाच्या पाण्यात आवळे घालून ठेवतातच आमच्याकडे, मी दरवर्षी करतेच थोडे.

Submitted by अन्जू on 16 December, 2021 - 22:29

मीठ भरपूर म्हणजे भरपूरच घालावं लागत त्यात, खूप खारट लागायला हवं पाणी. आवळे पूर्ण बुडायला हवेत पाण्यात त्या साठी भांड उभं घ्यायचं. प्लस भांड काचेचं किंवा चिनी मातीचं घ्यायचं. स्टील मिठा मूळे खराब होऊ शकत.

आमच्या कडे ही मिठातले आवळे खूप आवडतात.

Submitted by मनीमोहोर on 17 December, 2021 - 08:35

संजीव कपूरच्या रेसिपीनेआवळ्याचे लोणचे करून पहा.फार सुरेख लागते.मी लोणचेवेडी नसूनही आवडीने खाल्ले.

Submitted by देवकी on 17 December, 2021 - 09:04

मी ओली हळद , थोडी आंबेहळद , आवळे किसले. त्यात मीठ, लिंबाचा रस आणि केप्र चा कैरी लोणचे मसाला घालून एक दिवस ठेवले. दुसऱ्या दिवशी मोहरी, हिंग, हळदीची फोडणी गार करून घातली. 2 दिवसांनी खायला काढले . बाहेर किती टिकेल माहीत नाही म्हणून फ्रीज मध्ये ठेवले आहे .

Submitted by अश्विनी११ on 17 December, 2021 - 10:18
आवळे आणि थोडे आले , गूळ घालून मुरांबा पण छान होतो . आवळे आणि आले कच्चेच मिक्सर ला फिरवून घ्यायचे . बारीक वाटणात गूळ जास्त , साखर कमी घालून अर्धा तास ठेवायचे . गूळ विरघळ्यावर शिजवायला ठेवायचे . साधारणपणे 15-20 मिनिटात शिजते . वरून वेलची पूड घालायची . हे आमच्याकडे पित्तावर खूप उपयोगी पडते .

Submitted by अश्विनी११ on 17 December, 2021 - 10:29

समप्रमाणात ओली हळद, आंबे हळद, आले यांचे बारीक जुलीयन्स करायचे. त्यात चवीपुरते मीठ आणि भरपूर लिंबाचा रस घालायचा. सर्व नीट मिसळून काचेच्या बाटलीत भरून फ्रीज मधे ठेवायचे. मी साधारण १०-१२ दिवसात संपेल इतकेच बनवते.
फार पूर्वी काही ज्ये नांना भाटिया हॉस्पिटलमधे रहावे लागले होते. तिथे दर जेवणात हे लोणचे असायचे आणि ज्ये नाआवडीने खात असत. तिथल्या स्टाफने सांगितलेली रेसिपी. सर्जरी झालेल्या पेशंटना आवर्जून देत असत ( म्हणे).

Submitted by मेधा on 17 December, 2021 - 15:29
याला पाचक म्हणतात, थोडे पादेलोण घातले तर अजून चांगले लागते

Submitted by BLACKCAT on 17 December, 2021 - 15:34

Pages