गोकर्ण चहा

Submitted by मनीमोहोर on 17 December, 2021 - 10:38
अपराजिता , ब्लु टी
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आमच्या लहानपणी घरं स्वतःची किंवा भाड्याची कशी ही असली तरी सभोवती चार तरी फुल झाडं असतंच . तगर, जास्वंद , गुलबक्षी अनंत, गोकर्ण ही सहज जगणारी फारश्या निगराणीची गरज नसलेली आणि कायम फुलणारी झाडं असतच असत. देवांसाठी फुलं कधी विकत आणावी लागत नसत.
काळ बदलला . घरं लहान झाली. अंगण जवळ जवळ कल्पनेतच उरलं. पण माणसाची झाडं लावण्याची हौस कमी नाही झालीय. बाल्कनीत, गॅलरीत ,गच्चीत छोटी छोटी झाडं लावून लोक त्याचा आनन्द घेऊ लागले.
माझ्याकडे ही सध्या एक गोकर्णीचा वेल बहरला आहे. गायीच्या कानाच्या आकाराची, एक पाकळीची निळी जर्द फुलं गॅलरीची शोभा वाढवतायत.
त्या फुलांचा चहा किंवा काढा म्हणा हल्ली खूप फेमस झालाय म्हणून मी ही करून बघितला. आता कृतीकडे वळू या.
जिन्नस

गोकर्णीची सहा सात फुले
पाणी
लिंबू .

क्रमवार पाककृती: 

गोकर्णीच्या फुलांच डेख आणि मधला भाग काढून टाकून फक्त पाकळ्या एक कप पाण्यात बारीक गॅस वर पाच मिनिटं उकळवाव्यात.
नंतर गाळून घेऊन त्यात आवडेल एवढा लिंबाचा रस घालावा , आवडत असेल तर साखर घालावी आणि गरम गरम घ्यावा.

लिंबू पिळायच्या आधी असा होता रंग मग वरच्या फोटो मध्ये दिसतोय तसा जांभळा झाला.

20211231_173842~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक कप
अधिक टिपा: 

1) ह्याची चव न्यूट्रल च होती. लिंबाची चवच लागत होती. पण मला आवडला.
2) हवा असेल तर पातीचा चहा किंवा थोडं आलं ही घालू शकता.
3 ) लिंबू पिळायच्या आधी रंग चिंतामणी होता , नंतर निळा / जांभळा झाला.
4) रंग पूर्ण नैसर्गिक आणि अतिशय सुंदर दिसत होता.
5) गोकर्ण ताप दमा , सर्दी खोकला , बुद्धी ह्यावर गुणकारी आहे म्हणे त्यामुळे त्या दृष्टीने हा चहा औषधी आहे.
6) फुलं मिळाली तर नक्की करून बघा , बाकी कशासाठी नाही तरी रंगासाठी तरी.
7) फुलं ताजी किंवा सुकलेली कशी ही चालतात. त्यामुळे मी जनरली शेंगेच्या टोकाला जे सुकलेलं फुल असतं तेच वापरतेय.

माहितीचा स्रोत: 
नेट वरून
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतोय. फोटोतला चहा लिंबू पिळल्यानंतरचा आहे ना? जांभळा मॅझेंटा रंग दिसतोय कारण. चिंतामणी पण छान दिसला असेल

सुन्दर चहा.
यावरून आठवलं, मला जास्वंदाचा चहा आवडतो.
ऑर्डर करायचाय, कारण इथे नाहियेत फुलं.

रंग सुंदरच दिसतोय!
पण मला प्यायला खरा चहाच आवडतो>>>> मी पण याच गटात

फुलं मिळाली तर नक्की करून बघा , बाकी कशासाठी नाही तरी रंगासाठी तरी.>>> मस्त दिसतोय चहा. या रंगाचे सरबतही मस्तच दिसेल.

आहाहा एकदम, सुरेख रंग.

नवरा करतो गोकर्ण चहा पण फक्त साखर घालतो. सांगते त्याला लिंबू घालून बघ. तो काय एरवीच्या चहात पण गोकर्ण फुलं, बेल, तुळस घालतो.

पण गोकर्ण फुलं, बेल, तुळस घालतो.>>>> परवा पुण्यात एका बंद दुकानाबाहेर पान चहा बोर्ड होता
मग काय घरातल्या नागवेलीचे छोटे पान घातले नेहमीच्या चहात... कधीतरी ठिकाय!

मस्त दिसतोय चहा.

बाजारात मिळतो. गोकर्णाची फुलं सुकवलेली असतात. Butterfly pea flower tea नावाचा.

गोकर्ण भात खरोखरच करतात

युट्युबवर blue rice सर्च करा

https://youtu.be/2HDB5QHBGkw

मी एकदा volcano rice करणार आहे
निळा भात करून मध्ये खड्डा करून त्यात गरम टोमॅटो+ मटार रस्सा घालायचा

Actual volcano rice कसा करतात माहीत नाही

भाताच्या ढिगाऱ्याखाली फुग्यात गरमागरम सांबार टच्च भरून ठेवायचा अन् ते पाहुण्यांसमोर ठेवायचं. पाहुण्यांनी भातात हात/चमचा घातला की फुगा फुटून सांबार उसळून बाहेर निघेल. वाफाळता सांबार भात बघून हात भाजलेला पाहुणा भयभीत होईल. हाच तो व्होलक्यानो राईस..!!

@DJ...... Lol Lol Lol

काय सुंदर दिसतोय! करून बघायला हवा हा निळा जांभळा चहा.

लिंबू पिळायच्या आधी रंग चिंतामणी होता , नंतर निळा / जांभळा झाला. >> ही जादू आवडेश!

वर तुम्ही निळी जर्द असं म्हटलंय, ते मजेशीर वाटलं. जर्द ह्या शब्दाचा अर्थच पिवळा असा होतो. मराठीत जोडशब्द पिवळी-जर्द आणि निळी-शार असे आहेत. (खरं पिवळा जर्द म्हणणे हे पिवळं पीतांबर म्हणण्यापैकी आहे, पण आता प्रघात पडून गेला आहे)

आ के अब तो चांदनी भी जर्द हो चली हो चली
ह्यामधे जर्द म्हणजे गडद की फिकट?
आणि जर्दा म्हणजे तंबाखू, जो पिवळा असतो, असेच ना?

रंग खूपच छान आहे चहाचा... माझ्या घराजवळ आहेत गोकर्णी फुले... करून बघेन एकदा त्यांचा चहा..!

म्हणजे चांदनीला कावीळ झाली हो! Wink

जर्दा ह्या शब्दाची व्युत्पत्ती माहीत नाही. आपण जो जर्द म्हणतो त्याचा उच्चार बहुधा मूळ फारसी शब्दापेक्षा वेगळा आहे. मुळात खाली नुक्ता असलेला ज आहे बहुतेक.

हिंदी जर्द मध्ये ज खाली नुक्ता असतो आणि उच्चार जाळले मधल्या ज सारखा. झ च्या जवळ जाणारा. आपण जगातल्या ज सारखा करतो.

जर्दाळूमध्ये पण जर्द आहे.
(पुलंनी 'खाद्यजीवन'मध्ये म्हटलंय की हा पिवळा म्हणून जर्द, आणि आलू हे नाव उत्तरेत कुठल्याही फळाला मिळतं. )
चांदनी भी जर्द>> हे गुलजारांच्या 'पतझड का पीला सा चांद' सारखं आहे का?

Pages