या आधी ही भाजी बहुतेक मैत्रेयी नी लिहिलेली आहे बहुतेक. पण तरीही पुन्हा टाइपतोय. जरा मोठ्या प्रमाणावर आहे ही रेस्पी.
३ वाटया तूरडाळ
अर्धा किलो आंबटचुका
साडेतीन वाटया मिर्चीचे तुकडे (यात पोपटी मीरची अर्धी वाटी. बाकी तिखट मिरच्या)
तीन मध्यम मोठे कांदे
दोन लसूण गड्ड्या सोलून
दोन इंच आल्याचा तुकडा
एक नारळ खोवून
अर्धी/पाऊण वाटी शेंगदाणे, जाडसर कूट करून
३-४ चमचे गोडा मसाला
मीठ चवीनुसार
दीड ते दोन वाट्या तेल
चुका, तूर आणि मिर्ची कुकरमध्ये शिजवायची. नेहेमीप्रमाणे.
कांदे; आल+लसूण यांची वेगवेगळी पेस्ट करायची
तेल तापवून मोहोरी, हळद घालून फोडणी करायची. यात आधी कांद्याची पेस्ट नंतर लसूण पेस्ट अन त्यानंतर खोबरे, दाणेकूट घालून तेल सुटेस्तो परतायाचं. यावर शिज़लेला माल घालून, जरा पाणी घालोन बर्यापैकी पातळ करायच. भरपूर उकळ येउ द्यायची आणि मग गोडा मसाला, मीठ add करून अजून जरावेळ आचेवर ठेवायचं.
भाजी तय्यार.
ही भाकरीसोबत चुरूनच खाण्यात मज़ा आहे.
आजच्या भाजीला पालक नव्हता
या प्रमाणात १२ लोक अगदी पोटभर जेवले.
सणसणीत तपलेली लोखंडी कढई ?
सणसणीत तपलेली लोखंडी कढई ? त्या शिवाय तुमची रेसिपी म्हणजे माशा शिवाय जागू यांची रेसिपी !
3.5 वात्या मिरच्या?आपला पास!
3.5 वात्या मिरच्या?आपला पास!
देवकी +१
देवकी +१
छान
छान
मला वाटले होते या असतील , पण ह्यांनी तिखट मिरच्याच वापरल्या आहेत
https://www.maayboli.com/node/77625
देवकी केया - साडेतीन वाटी
देवकी केया - साडेतीन वाटी मिरच्या बारा जणांसाठी प्रमाण आहे... एका माणसासाठी नाही.. सो ठीक असेल...
फोटू टाकले असते तर बरे झाले
फोटू टाकले असते तर बरे झाले असते
नैतर अर्थाचा अनर्थ होईल
एक पूर्ण नारळ आणि एक वाटी कूट घातलाय म्हणजे मिरच्या बॅलन्स झाल्या असतीलच.
खरं सांगायचं तर, पाणिपुरी
खरं सांगायचं तर, पाणिपुरी कश्या प्रकारची तिखट असते; त्या टाईप तिखट भाजी असते ही. नेहेमीपेक्षा जरा तिखटच पण खूपही नाही होत.