अंबाडीची बोंडी - 10-12
(१०-१२ हवीत. इतकी सारी नाही घ्यायची. बाकी बोंडांची चटणी करायची)
कांदा - 1 बारीक चिरून
लसूण पाकळ्या 5-6 ठेचून
सुकलेल्या लाल मिरच्या -2
जीरे -1 लहान चमचा
तेजपान -1
गूळ -1 बट्टी
मीठ चवीनुसार
क्रमवार पाककृती:
'भारत का दिल देखो' या माझ्या मध्यभारतीय लोकजीवनावर आधारित असलेल्या मालिकेत एक बालाघाट भागात केले जाणारे सार लिहिते.
१. अंबाडीची बोंडी सोलून पाकळ्या वेगळ्या करुन घ्यायच्या.
हे असे एक बोंड असते.
आतील भागात असलेली बी काढून टाकायची.
२. सोललेल्या पाकळ्या दोन कप पाण्यात किंचित मीठ व ठेचलेला लसूण घालून 2-3 मिनिटे उकळून घ्यायच्या. फार पटकन शिजतात.
३. थंड झाल्यावर गाळून घेऊन पल्प मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
४. एका पातेल्यात 2 चमचे तेल गरम करा. त्यात जीरे, लाल मिरच्या व तेजपान फोडणीला घाला. चिरलेला कांदा घालून 2 मिनिटे परता. यात वाटलेला पल्प घाला. पुन्हा परता. जरा जरा तेल सुटले की गूळ घाला.
५. 1 कप पाणी घाला आणि चव बघून मीठ घालून चांगली उकळी येऊ द्या.
आंबट गोड सार तयार आहे.
1. गाळलेले पाणी थंड झाल्यावर त्यात साखर व चिमूटभर मीठ घालून चवदार सरबत बनते.
2. पाकळ्या सोलून त्यात मीठ्, मिरच्या, लसूण व जीरे घालून वाटली की चटणी तयार.
या भागात अंबाडीच्या भाजीला कात्यायनी देवीचे रुप मानतात. त्यामुळे नवरात्रात 6व्या दिवशी देवीला पूर्ण नैवेद्य अंबाडीचा असतो. भात, अंबाडीची भाजी, अंबाडीची भाकरी, अंबाडीच्या बोंडीचे सार आणि बोंडीचीच चटणी असे ताट सजते.
'मोईआ' म्हणजे 'माई' साठी (देवीसाठी)
छान
छान
भारी आहे हे. अंबाडी ही
भारी आहे हे. अंबाडी ही भेंडीच्या कुळातलीच.
छान
छान
काय सुंदर रंग आहे साराचा आणि
काय सुंदर रंग आहे साराचा आणि सरबताचा! छान पाकृ दोन्हीही.
कल्पक आहे . सरबतचा फोटू भारी
कल्पक आहे . सरबतचा फोटू भारी
छान सार, सरबत आणि देवीनैवेद्य
छान सार, सरबत आणि देवीनैवेद्य माहिती.
छान..
छान..
लेखन व पाककृती दोन्ही आवडले.
लेखन व पाककृती दोन्ही आवडले.
छान माहिती, पदार्थ आणि फोटो
छान माहिती, पदार्थ आणि फोटो पण.
<< छान माहिती, पदार्थ आणि
<< छान माहिती, पदार्थ आणि फोटो पण. >> सहमत
ही बोंडे कुठे मिळतील?
छान सचित्र माहिती आणि पाकृ!
छान सचित्र माहिती आणि पाकृ!
चटणी करताना कोथिंबीर घातल्यास
चटणी करताना कोथिंबीर घातल्यास अजून छान चविष्ट होते. गाळलेल्या पाण्यात प्रमाणात साखर घालून शिजविल्यास सुरेख जेली/जाम तयार होतो. आंबट गोड चव व सुरेख लालसर गुलाबी रंग.
छान माहिती, पदार्थ आणि फोटो
छान माहिती, पदार्थ आणि फोटो पण....+१.
धन्यवाद सर्वाना
धन्यवाद सर्वाना
<<ही बोंडे कुठे मिळतील?
Submitted by धनवन्ती on 24 November, 2021 >>
बाजारात क्वचितच दिसतात. आम्ही शेतावरून आणतो.