Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37
सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.
या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
संपतेय कुठची? आता ती मधुरा
संपतेय कुठची? आता ती मधुरा म्हणे ह्या दोघांचं लग्न झालं तर मी घर सोडून निघून जाईन. जाणार कुठे ह्याचा विचार केलेला दिसत नाहीये. >>> आल्या का सासू कम नणंद बाई मध्ये. हेच पाणी घालत बसण्यापेक्षा संपवायला हवी होती.
जाऊदे मग तिला घर सोडून स्वत:
जाऊदे मग तिला घर सोडून स्वत: प्रेम करून थेट लग्न करूनच घरी सांगितलं ना. मग आता का अडवणूक. आणि स्वत: वेगळं घर मांडत असेल तर बरंच आहे की. मल्हार लहान म्हणून आईजवळ राहून झालं. अजूनही तो मोठा झाल्यासारखं वागत नाही ते सोडा, पण तसंही दुसऱ्या कुणाच्या लग्नाचं ही कोण ठरवणार!
काल आदीला अयोग्य वर्तनास्तव
काल आदीला अयोग्य वर्तनास्तव क्लिनिक सोडून जाण्याची नोटीस मिळाली. निखिलच्या मावशीचे क्लिनिक असल्याचे आदीच्या लक्षात आहे. आदी आणि मीरा निखिलशी भांडायला गेले. आदी आणि निखिल हाणामारीच्या गोष्टी करू लागले म्हणून मीराने मध्यस्थी करून निखिलला चांगले खडसावले. स्वागतिका निखिलसाठी ढोकळा बनवून घेऊन आली होती. इकडे आदी भगिनीने जाहीर केले की मीरा आगाऊ आहे आणि सतत पुढे पुढे करते म्हणून ती या घरात नको. मनू मुळूमुळू रडायला लागली. मनूला घेऊन आदिमाय देसाई घरी आली. आदिमायची साडी छान होती. मनुचा ड्रेस भयंकर होता. अश्विनी आणि सौरभ भांडत असतात. अश्विनी कौतुकाने सौरभसाठी इन्स्टंट नूडल्स बनवते त्यावरून दोघांचं वाजतं. आजचा भाग बघितला नाही.
आदि मीराला लग्न करायचे आहे तर
आदि मीराला लग्न करायचे आहे तर आदि भगिनीच्या पोटात का दुखतेय, स्वत: अठरा वर्षाची असताना लवमॅरेज केलं ना, मीराचा स्वभाव ही दुय्यम गोष्ट पण हिला काय अधिकार. उगाच सिरियल वाढवतात. आदीबाबा पण आक्षेप घेत नाहीयेत.
अरे वा! मस्त पातळ रस्सा करणं
अरे वा! मस्त पातळ रस्सा करणं सुरू आहे तर....अस करत करत बिनलग्नाचे आदीरा वयाच्या 70 व्या वर्षी परत भेटतात आणि हे सगळं आठवत असतात आणि मग 75व्या वर्षी लग्न करतात असा काहीसा प्लॉट असावा... बरसात होतेच आहे पाणी वाढतच आहे
(घ्या मालिकेच्या लेखक महाशयांना नवीन प्लॉट दिला )
हाहाहा.
हाहाहा.
मालिका बघण कधिच सोडल कारण इतक
मालिका बघण कधिच सोडल कारण इतक बाळबोध कथानक आणी अॅक्तिन्ग अगदी बालनाट्यातसुद्धा नसेल, एकतर कथेचा जिव फारतर १३-१४ भागाचा होता त्यात भरमसाठ पाणी घालत वाढवत, खेचत ,ताणत ,ओढत इथवर आणली आणि अजुन बाद्लया बादल्या पाणी ओतत आहेतच.
खरतर उका आणी मुक्ता साठीच बघायला घेतली होती पण त्याचीही मजबुरी असावी, पॅनडेमिकने चित्रपट-नाटक सगळच बन्द त्यामुळे त्याचीही आर्थिक गणित बिघडलेली असतिल.
भयंकरच आहे मालिका. आम्हाला
भयंकरच आहे मालिका. आम्हाला जुनं दिसतं. त्यात एक सीनमधे आदिनाथच्या जिजाला त्याची बायको ‘काय करतो आहेस तु?‘ असे दटावून विचारते तेव्हा तो वैतागुन म्हणतो, ‘चहा पितोय. तो झालाकी सासुबाईंच्या मांडीत झोपणार आहे‘. आँ?
आयतं गिळून गिळून मधुरा आणि
आयतं गिळून गिळून मधुरा आणि अमोलचे डोके फिरले आहे. अमोलला जोकच्या नावाखाली काहीही सुचतं आणि मधुरा स्वतःचं घर असल्यासारखी दादागिरी करते. सानिकाचे नाव विसरण्याचा अमोलचा बाष्कळपणा तरी आता सानिका कायमची गेल्यामुळे बंद होईल. सानिका मीरापेक्षा चांगली होती दिसायला आणि श्रीमंतपण. तिलाही आदी आवडला होता पण आदिला प्रॅक्टिकल विचार म्हणून नाही.
भावाच्या सुखाशी काही देणं
भावाच्या सुखाशी काही देणं घेणं नाही मधुराला.
मला वाटतं आता अश्विनी, मधुरा, निखिल, sanika प्लस तिचे बाबा अशी व्हिलन टीम तयार होईल आणि त्यांच्या कारवाया सुरू होतील आदि मीराला वेगळं करायच्या आणि सिरियल वाढता वाढता वाढेल.
सायो यु आर करेक्ट. सिरियल संपत नाहीये. मला उगाच hopes होते. तरी मी आठ मिनिटं youtube वर बघते अधूनमधून, आता त्याचाही कंटाळा आला.
मुळात ही बाई नवरा, मुलगा आणि
मुळात ही बाई नवरा, मुलगा आणि आई वडील यांना सोडून घरातून निघाली आहे, कुठं जाणार, कुठं राहणार, कोण हिला पोंसणार काही म्हणजे काहीही विचार करत नाही कोणी
बर आणि जाण्याचे कारण पण इतकं फालतू आहे की खिककन हसूच येतं
होनं दात ओठ खाउन म्हन ते काय
होनं दात ओठ खाउन म्हन ते काय तर मीराचे सगळे कौतुक करत आहेत ती आल्यापासून ते हिला झेपत नाही. पन्नाशीची लाडु बै कुठली
दोघींछी वयं जवळपास सेमच असतील
दोघींची वयं जवळपास सेमच असतील म्हणुन राग आला असावा..!
आता ती निखिल आई व्हिलन होतेय,
आता ती निखिल आई व्हिलन होतेय, छान. मुलाच्या प्रतापाचा व्हीडीओ दाखवा तिला.
बाय द वे हा प्रोमो बघितला, खरा असुदे.
https://www.youtube.com/watch?v=QidZEHJYYRs
वरील लिंक मधला व्हिडीओ नाही
वरील लिंक मधला व्हिडीओ नाही दिसत. आज मीरा आणि मितुचे बोलणे निखिलने परत चोरून ऐकले. मीरा आदीची प्रेयसी होती हे तो आदिमायला सांगायचे ठरवतो. सार्वजनिक फोनवरून (हे फोन अजून अस्तित्वात आहेत?) रुमाल ठेवून तो आदिमायला चुगली करतो. आदिमाय आणि मीरामाय लग्नाच्या तयारीला लागल्या आहेत आणि कित्ती कामं पडलीत असे एकमेकांना कौतुकाने सांगत आहेत. इकडे आदी, माझी आई कशी तुझ्याशीच जास्त बोलते असे मीराला कौतुकाने लाडेलाडे सांगत आहे. मल्हार आणि मनू आनंदाने वेडे होतात कारण त्यांना आता कसलीच जबाबदारी घ्यावी लागणार नाही. आनंद व्यक्त करायला ते पी एन जी ची जाहिरात करून एक दागिना मागवतात. मल्हार कमवायला लागल्यावर मनू अजून भरपूर दागिने घेणार आहे.
निखिलच्या चुगलीचा परिणाम सोमवारी दिसेल.
बेस्ट वे पळून जाऊन लग्न करा,
बेस्ट वे पळून जाऊन लग्न करा, मनु मल्हारसारखं.
वरील लिंक मधला व्हिडीओ नाही दिसत. >>> मलाही दिसत नाहीये आता, लग्नविधी सुरु होते आदीमीराचे.
मीराचा फोटो बघितला मी
मीराचा फोटो बघितला मी लग्नातला नवरीच्या वेशातला बातमीमध्ये. मीरा आणि पळून जाऊन आदी असं बोलला तरी ती आदिला परत सोडून देईल निखिलची चुगली मीराच्या पथ्यावरच पडेल. असंही तिला लग्नाच्या आधी सांगितलं नाही आदिमायला तर पोटात दुखत राहील. सत्यवचनी आहे ना ती.
मल्हार कमवायला लागल्यावर मनू
मल्हार कमवायला लागल्यावर मनू अजून भरपूर दागिने घेणार आहे.>>>आणि कोणाला घालणार, बाळाला? अजून काही कमवत नाही, बाळाची जबाबदारी डोक्यावर आहे आणि दागिने घेऊन कुठे मिरवणार आहे?
मीराच्या क्लिनीकमध्ये
मीराच्या क्लिनीकमध्ये डोळ्यांचे फोटो लावले आहेत ते किती वाईट आहेत , लाल वगैरे. निरोगी दिसणारे डोळे असते तर पेशंटस् ना बघायला बरं वाटलं असतं ना.
काही काळजी करू नका लोकहो! काल
काही काळजी करू नका लोकहो! काल बघितलेल्या कोणत्यातरी क्लिपमध्ये आदिराच्या लग्नाचा बार उडाला आहे आणि 30 तारखेला आपल्या सगळ्यांनाही लग्नाचं आमंत्रण मधुराने दिलेलं आहे
ती आणि त्या अनुषंगाने फीडमध्ये आलेल्या अजून एक की दोन क्लिप्स पण बघून टाकल्या! त्यानुसार कलाकारांनी सेटवर लग्नघरासारखी मजा केल्याचं लक्षात आलं. ते शूट काही दिवस चाललं असावं. तेव्हढे दिवस त्या कलाकारांना विशेषतः बायकांना ते कपडे, दागिने, गजरे घालून मिरवावं (?) लागलं. शिवाय खतापिताना कपडे खराब होऊ नयेत म्हणून ppt kits सारखं काही तरी घालून बसावं लागत होतं म्हणे. ते सगळं ऐकून मला त्या सगळ्याच कलाकारांची कीव आली! म्हणून मी तो एपिसोड तरी बघायचं अस ठरवलं आहे!
बिचारे खरोखरच अंगमेहनत घेतात. रोज एव्हढा मेकअप करा, लाईटचा झोत सहन करा, संवाद पाठ करा, प्रॅक्टिस करा, रिटेक करा...... वर आपण इथे अशी टिंगलटवाळी करणार ती पण सहन करा! अशा बिनडोक सिरियली काढण्याचं श्रेय कथालेखक, डायरेक्ट, स्क्रीन प्ले लेखक आणि प्रोड्युसर यांनाच द्यावं! ही मंडळी आपल्याला वेड्यात काढतात! कलाकारांचा त्यात काही दोष नाही! सध्याच्या परिस्थितीत तर त्यांना अशा सिरीयल करण्याशिवाय पर्याय पण नाही. त्यामुळे त्यांना माफ करून टाकू!
बेस्ट अभिनेत्री मधुरा त्यानंतर मिताली मग आदिमाता (त्यांची वर्जिनल नावं लक्षात नाहीत)
आणि बेस्ट अभिनेता उका.
बरसात होतेच आहे पाणी वाढतच
बरसात होतेच आहे पाणी वाढतच आहे >>>> हे अगदी परफेक्ट लिहीलंय.
हल्ली मी ही मालिका बघणं सोडलं आहे. कधीतरी 'coming up next' पाहते यूट्यूब वर. आता काल पाहिलं की त्यात प्रिया बापटला आणत आहेत आदिची पहिली बायको म्हणून कुठल्याही ट्रॅकवर चाललं आहे सगळं. चांगली प्रेमकथा फुलवण्याऐवजी नेहमीची कटकारस्थानं आणलीच पाहिजेत का? त्या नादात मालिकेचे लेखक मेंदू उडून गेल्यागत वागतायत. मुळात त्या अश्विनीला या दोघी बहिणी घरातून बाहेर जाव्यात इतकंच वाटत असतं ना? असंच दाखवलंय सुरूवातीला. मग मीरा निखिलच्या घरी गेली काय किंवा आदिच्या... तिला काय फरक पडतो? पण आता ती त्यांचा फोटो काढून निखिलला पाठवते, मग तो अजून कारस्थानं शिजवतो हे कशासाठी?
मी बघितलं तेव्हा निखिल
मी बघितलं तेव्हा निखिल आदीच्या फेबुमधून त्यांचा फोटो शोधतो आणि screenshot घेतो. फेबुवरून बहुतेक आता screenshot घेता येत नाही, याने कसा घेतला माहित नाही. आज पांचटपणा होता. प्रिया आली नाही का अजून? मी रोज बघत नाही.
मी हल्ली आठ आठ मिनिटं पण बघत
मी हल्ली आठ आठ मिनिटं पण बघत नाही. लग्न झालं नक्की समजलं की बघेन. प्रिया प्रोमो बघितला, कसली भयानक दिसतेय त्यात.
एकदम पाणचटपणा आणि बालिशपणा
एकदम पाणचटपणा आणि बालिशपणा आहे!
पहिली बायको ही मीराची मैत्रीण असते! आणि त्या आदीची खेचत असतात! मीरा इतकी निर्बुद्ध असेल (पर्यायाने मालिकेची लेखिका/लेखक) असं वाटलं नव्हतं!
हल्ली युट्युबवरही एपिसोड्स
हल्ली युट्युबवरही एपिसोड्स अपलोड होत नाहीयेत पूर्वी सारखे. बरंच आहे म्हणा. निर्बुद्धपणा दाखवण्यात कशाला वेळ वाया घालवा!! ४ पात्रांपैकी एकही पात्रं डॉक्टर वाटत नाही. वेड्यांचा बाजार आहे.
मी हल्ली आठ आठ मिनिटं पण बघत
मी हल्ली आठ आठ मिनिटं पण बघत नाही. >> हा हा, मी तर ते ३० सेकंदवाल्या चित्रफितही बघणे सोडले.
हल्ली मालिका वेळेत संपत नाहीत, तेव्हा आपल्यालाच त्या बघायच्या सोडून द्याव्या लागतात.
प्रिया बापट मला फारशी आवडत
प्रिया बापट मला फारशी आवडत नाही पण इतक्यातल्या इतक्यात तिचे काहि व्हिडीयो इन्स्टा वर पाहिलेत त्यात तिच्यात छान सुखद बदल जाणवतोय.अगदी छान स्टाइलिश वाटत होती.
मी आज सकाळी इथे लिहिलेला
..
किती ते कल्पना दारिद्र्य
किती ते कल्पना दारिद्र्य लेखनाचं... मुक्ता बर्वे नऊवारी नेसून आणि तो केसांचा टोप लावून काय दिसत होती। आणि लाजण वैगेरे तर अजिबातच जमत नाही तिला. प्रिया बापट ही नाही आवडली. सर्वात बेस्ट मधुराच आहे.
कधी संपणारे देव जाणे ...
हो मधुरा छान दिसतेय, अभिनय
हो मधुरा छान दिसतेय, अभिनय सहज करते. मुक्ताला नथ शोभत नाहीये नवीन प्रकारची. टीपिकल छान दिसली असती, नऊवारीवर तशीच नथ हवी, आपली जुनी पारंपारीक असं माझं पर्सनल मत.
Pages