कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजच्या उपावसाच्या फराळासाठी ही चटकन होणारी पाककृती करून पाहा.
...
उपासाच्या शेवया - दोन वेटोळे ,
दूध - साधारण ४ कप ,
साखर - चवीनुसार, ५-६ टे स्पून,
साजूक तूप - ३-४ टे स्पून,
वेलची पुड - चिमूटभर
शिंगाड्याच्या पिठाच्या शेवया विकत मिळतात, त्या आणाव्यात.
१. शेवयांचे वेटोळे उकलून हातानेच चुरा करा. खूप कडक असतात. थेट भाजताना तोडायला गेल्यास इकडे तिकडे उडून पडतात. त्यामुळे आधीच शेवया एका टोपात उडणार नाहीत अशा बेताने काळजीपूर्वक तोडून घ्याव्यात.
2. ह्या तोडलेल्या शेवया खमंग मंद आचेवर जाड बुडाच्या भांड्यात तुपावर भाजून घ्या.
३. एकीकडे दूध तापण्यासाठी ठेवून द्या, कमी आचेवर.
४. भाजताना शेवया फुलतील. लगेच लाल होऊन काळ्या पडू शकतात. त्यामुळे सतत हलवत राहून भाजायचे आहे. साधारण लालसर झाल्या की आच बंद करा.
..
भाजलेल्या शेवया :
..
५. भाजलेल्या शेवयांवर हळूहळू गरम दूध ओता.
६. आता त्यावर साखर घाला.
७. खिरीचे मिश्रण नीट ढवळून घ्या. झाकण ठेवा.
८. जरा वाफ आली की त्यावर वेलचीपूड व तुमच्या आवडीचा सुकामेवा घालू शकता.
..
खीर :
..
ही खीर गरम किंवा थंड कशीही छानच लागते. एवढंच की थंड झाल्यावर लगेच आळते आणि घट्ट होते.
..
पूर्वप्रकाशित
स्पंदन दिवाळी २०२१ इ अंक
टीप : संपूर्ण पाककृती मंद आचेवर करायची आहे.
फायनल प्रॉडक्ट मस्त दिसतंय.
फायनल प्रॉडक्ट मस्त दिसतंय.
छान दिसतायेत शेवया!
छान दिसतायेत शेवया!
पण ह्या शिंगाड्याच्या पिठाच्या मिळतात का शेवया?
धन्यवाद भरत आणि कृष्णा
धन्यवाद भरत आणि कृष्णा
हो, मिळतात.
वेटोळे स्वरूपात असतात.
पुण्यात मंडईत मिळतील
नांदेड ला एक ओळखीच्या काकू आणून देतात
झकास ! उपासाच्या पण मिळतात हे
झकास ! उपासाच्या पण मिळतात हे माहीत नव्हते, धन्यवाद !
धन्यवाद रश्मी
धन्यवाद रश्मी
शेवयांची खीर मस्त दिसतेय.
शेवयांची खीर मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय खीर!
मस्त दिसतेय खीर! शेंगाड्याच्या पीठाची खीर खाल्ली आहे. शेवया मिळतात हे माहीत नव्हते.
Thanku देवकी, जिज्ञासा
Thanku देवकी, जिज्ञासा
खीर मस्त दिसतेय , उपासाच्या
खीर मस्त दिसतेय , उपासाच्या शेवया असतात आणि त्या बाजारात विकत मिळतात हे अजिबात माहीत नव्हते. पाहिली रेसिपी तेव्हा वाटलं साबा नी घरी बिरी केल्या किल्लीच्या
धन्यवाद मनिमोहोर
धन्यवाद मनिमोहोर
साबा करूच शकतात
पण हल्ली होत नाहीत त्यांना फार काही व्याप
साबा करूच शकतात Proud
साबा करूच शकतात Proud
किती अवघड रेसीपी. कसं जमतं
किती अवघड रेसीपी. कसं जमतं बाई.
कशाला चेष्टा करता गरीबाची अमा
कशाला चेष्टा करता गरीबाची अमा
ह्याहून अवघड रेसेपी आहे इथे माझीच, दालगोना ताक
शिंगाडा शेवयी खीर रूपी उपवास
शिंगाडा शेवयी खीर रूपी उपवास पदार्थ संख्येत वाढ केल्याबद्दल धन्यवाद. साबुखीरीला छान पर्याय आहे.
<< किती अवघड रेसीपी. कसं जमतं
<< किती अवघड रेसीपी. कसं जमतं बाई. >>
अगदी अगदी, हाच विचार आला होता मनात. आता मसाला चहाची पाककृती टाका किल्लीतै
छान दिसतेय खीर किल्ले.
छान दिसतेय खीर किल्ले. शिंगाड्याच्या पिठाच्या शेवया मिळतात ही न्यूज आहे. मग उपमा ही होईल ना?
मस्त आहे कृती . शेवटचा फोटू
मस्त आहे कृती . शेवटचा फोटू तोंपासू
छान रेसिपी किल्ली
छान रेसिपी किल्ली
मस्त फोटो, मस्त रेसिपी.
मस्त फोटो, मस्त रेसिपी.