Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जयला म्हणता आले असते की तो
जयला म्हणता आले असते की तो नुसताच रडत होता पण तो एकालाही म्हणाला नाही की तुम्ही टास्क नका करु ! विशाल म्ह्णणाला ना निथाला की नका कापु लेटर म्हणुन.
ए टीमवाले काहीजण पण रडून रडून
ए टीमवाले काहीजण पण रडून रडून सिंपथी गोळा करत होते, जय काय मीरा काय. मी थोडंच बघितलं म्हणून एवढीच नावं घेते. पाणी पडले त्याच्यावर दोन वि मुळे.
त्या सोनालीला एवढं काय लागलं, त्या पाटीचे. नकार द्यायचा होतास मग. विकास छान समजावत होता पण हिचे आपलं मी मोठी गोष्ट केली सुरू.
मीराला वाटतंय विशालने केस कापून विकासचा पत्ता कट केलाय, त्यामुळे म मां नी विकास विशाल व्हीडीओ ए टीमला नक्की दाखवावा.
विकास विशाल संभाषण काल मला
विकास विशाल संभाषण काल मला नीट कळले नव्हते, विकासने विशालला केस कापायला सांगितले ते. आज मीनल का चिडली विशालवर. सोनालीला खरंच असे वाटते का की ती घरात राहण्यास पात्र आहे. औषधं विकण्याऱ्या कंपनीने काय गिफ्ट दिले ते बघायची उत्सुकता होती. खजिन्यात काय होते ट्रीट, हल्दीरामची पाकिटे होती का. जयला दिले का ट्रीट मधले खायला. मी नीट सलग बघत नाही म्हणून विचारतेय.
हो मिनल आणि विशालच काय भान्डण
हो मिनल आणि विशालच काय भान्डण झाल ते कळलच , मिनलची एकदम सटकलीच होती.
गायत्री एक विकेण्ड जरा बर्या कॉमेन्टस घेतल्या आता फिरुन भोपळे चौकात आजच्या एपिसोड मधे जयचा हात दाबुन देत होती ते बघुन विकास म्हटला गायत्री एवढी पॉप्युलर आहे घराघरात तर अशी का करतेय? मिरा निदान हे तरी नाही करत, विकासचे निरिक्षण आणी अॅनॅलिसिस व्यवस्थित असतात.
या विकमधे पुर्णवेळ गायत्रीच्या मिराच्या मागे मागे करत फिरत होती ते मेरी हॅड अ लिटल लॅम्ब तस मिरा हॅव अ लिटल लॅम्ब! पुर्वी सगळे महत्वाचे डिस्कशन गायत्रीबरोबर होते आता मास्टरमाइण्ड बरोबर असतात.
आज मीनल का चिडली विशालवर.>>
आज मीनल का चिडली विशालवर.>>>नंतर ती नीथाला सांगत होती कि विशाल तिला नेहमीच इमोशनल टार्गेट करतो म्हणून ती त्याच्यावर चिडली.
चपलान्च्या टास्कमध्ये
चपलान्च्या टास्कमध्ये मीनलची टिम विशालच्या टिमच्या विरोधात खेळत होती. तिची टिम हरली. त्याचा राग ती विशालवर काढत असेल. तसही ती आता टिम ए कडे ओढली जात आहे.
मीरा ट्रीट खायला मिळाली नाही म्हणून धुसफुसत होती. तिच्या खान्दयान्ना कॅप्टनशीप पेलता आली नाही. गरम पाण्याच्या पिशवीने खान्दे शेकत होती.
आजच्या एपिसोड मधे जयचा हात दाबुन देत होती >>>>>>> गायत्री इथे मसाजर म्हणून आलीये का? कधी मिराच्या पाठीला मसाज कर, तर कधी जयचे हात दाब.
विशाल किव्वा विकासला मीराने केलेली कमेण्ट ( विशाल केस कापून विकासपेक्षा मोठ बनायची) दाखवावी चुगलीबॉक्समध्ये.
जय आज पॉझिटिव्ह वाटला टास्कमध्ये.
ममा उदया जय- स्नेहा साठी कुठले गाणे म्हटतील? लेटस सी!
जय आज पॉझिटिव्ह वाटला
जय आज पॉझिटिव्ह वाटला टास्कमध्ये.>>+१
>>जय आज पॉझिटिव्ह वाटला
>>जय आज पॉझिटिव्ह वाटला टास्कमध्ये.
मास्टरमाईंड त्याच्या आजूबाजूला नसला की बरा असतो जय!!
त्यातून ते टास्क कॅप्टन्सी किंवा नॉमिनेशनचे नव्हते
गायत्री आणि सोनाली अज्जिबातच फ्रंटफूटवर खेळत नाहीत..... मीनल खेळत होती पण ती पण मागच्या चावडीवर कॅप्टन्सीसाठी लाचार झाल्यावरुन तिला बोलणे पडल्यापासून परत बॅकफूटवर गेली..... खांबांच्या टास्कमध्ये शेवटी तिघे उरलेले असताना जयशी भिडण्यापेक्षा तिने विशालला सांगायला हवे होते की तू आणि जय एका खांबासाठी भिडा आणि मीनलला उरलेला खांब घेऊ द्या!! दोन्ही उमेदवार बी टीमचे येण्याची जास्त शक्यता होती त्यात!! पण मीनल बॅकफूटवर खेळली!!
काल तो लसणाच्या फोडणीवाला सीन
काल तो लसणाच्या फोडणीवाला सीन भारी होता!!
विशाल आणि विकास दोघेही टकलू लूक मध्ये चांगले दिसतायत
नीथाची वेलक्रोवाली कमेंट पण मस्त होती!!
विकास काल त्या चप्पलच्या टास्कमध्ये फुल्ल मस्करी मोडमध्ये होता..... अजुन बझर वाजत नाही म्हणजे बिग बॉसना आपल्याकडून अजुन काही तरी अपेक्षित आहे म्हणे!!

काल चपलांच्या टास्कला तुपारे
काल चपलांच्या टास्कला तुपारे पत्रक वाचत होती त्यात बिग बॉसनेच लिहिलं होतं की बिग बॉसच्या घरात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. ती लढून झगडून घ्यावी लागते. म्हणजे बिग बॉसला सगळ्या टास्क मध्ये राडा अपेक्षित आहे. वरवर फक्त सांगायचं युक्ती वापरा. आणि कंटेस्टंट लढले झगडले की मांज्या आहेच तासायला शनिवारी.
सोनालीला डोक्यात जरा पाच पैसे
सोनालीला डोक्यात जरा पाच पैसे कमी असल्यासारखीच वाटते. जय स्नेहाला लाडात म्हणत होता तू घरात नुसती पात्र नव्हे तर राज्य करायला पात्र आहेस वगैरे तर सोनाली मधेच म्हणे असं माझ्याही बाजूने का नाही बोलत कधी ? सिरियसली विचारत होती ते! ती, मीनल या मुलींना का त्या जयला धरून काही डिल्यूजन आहेत मनात काही कळत नाही. मीनल चे भांडण समजलेच नाही. काहीही असले तरी एकदम कानाखाली खेचेन वगैरे म्हणण्याइतके? फारच निगेटिव वाटले ते. हा म्हणजे सेल्फ गोल होईल आत्ता आपल्यच टीम शी भांडण वगैरे केले तर.
बिग बॉसच्या घरात कोणतीही
बिग बॉसच्या घरात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. ती लढून झगडून घ्यावी लागते... हो आणि ते करत असताना वाईट दिसणार नाही याची काळजी घ्यावी हे अलिखित आहे.
ए वाले रडतात ते फार नाटकी वाटते. त्यापेक्षा त्यांची व्हीलनगिरी परवडली. कदाचित एडिटिंग टीमने त्यांचे लिमिटेड ऍक्टिंग स्किल बघूनच त्यांना खलनायक प्रोजेक्ट करायचा निर्णय घेतला असणार.
सोनालीला डोक्यात जरा पाच पैसे
सोनालीला डोक्यात जरा पाच पैसे कमी असल्यासारखीच वाटते. .. ती वेळोवेळी ते सिद्ध करते. विशाल विकास तिला सांभाळुन घेतात तिचा बिंडोकपणा.
मिनलने धाकड टास्क खेळावेत फक्त. पब्लिक खूश आहे.उगाच नवीन स्ट्रॅटेजी वापरून आतापर्यंत कमावले ते क्षणात गमावेल ती.
सिरियसली विचारत होती ते! ती,
सिरियसली विचारत होती ते! ती, मीनल या मुलींना का त्या जयला धरून काही डिल्यूजन आहेत मनात काही कळत नाही. >> अगदी, सोनालीला सगःळ्यासाठी त्याच्याकडून अप्रुव्हल हवे असते, मला वाटत स्नेहा पेक्षा तो आपल्याशी फ्लर्ट का करत नाही अस तिला वाटत असत..
काल तो कॅप्टन झाला म्हणुन हिने खिर बनवली तर दोन्ही टिम तिला नाव ठेवत होत्या.
मीनलला कॅप्टनपदासाठी साधे नॉमिनेशन पण मिळत नाहिये त्यामुळे ती फ्रस्टेटेड वाटते आहे पण विशालला ति जे बोलली ते अतीच झाल जरा
मीनलला कॅप्टनपदासाठी साधे
मीनलला कॅप्टनपदासाठी साधे नॉमिनेशन पण मिळत नाहिये त्यामुळे ती फ्रस्टेटेड वाटते आहे पण विशालला ति जे बोलली ते अतीच झाल जरा.. तिला कळत कसे नाहीये की तीला कॅप्टनसीची गरज नाही आहे. मला वाटलं होतं की नीताने तिला सांगितले असेल ती किती पॉप्युलर आहे बाहेर.
सोनालीला सगःळ्यासाठी
सोनालीला सगःळ्यासाठी त्याच्याकडून अप्रुव्हल हवे असते>>>
तिला थोडा न्युनगंडपण असावा... उगाच. ती सुरूवातीला एकदा विकासशी याबाबत बोलत होती की मी इकडे मिसफिट वाटते का? वगैरे.
त्यातूनच अतिबडबड, अटेंशन सीकिंग दिसते तिचे.
तर राज्य करायला पात्र आहेस
तर राज्य करायला पात्र आहेस वगैरे तर सोनाली मधेच म्हणे असं माझ्याही बाजूने का नाही बोलत कधी ? >>> अगदीच काही बोलत राहीली ती. जयने जास्त लक्षही दिले नाही. बोलत बोलत तो बाहेर निघून गेला लगेच. उलट हीने बोलायला हवे होते कि घरावर राज्य करायला आधी घरात रहावे लागेल. त्यासाठीच पात्र नसेल तर राज्य कुठून करणार?
सोनाली काही विशेष करताना दिसत नाही. विशालने तिला गेम सुधार असे सांगितलेलेही तिला आवडत नाही. उलट मी तुझ्यात टाईम इनव्हेस्ट करते तर तू तसे रिटर्न देत नाहीस, माझ्या बाजूने बोलत नाही असा वाद घालत फुगून बसते. असेच चालू राहीले तर लवकर बाहेर पाठवतील तिला.
हो, ती सोनाली काही केल्या
हो, ती सोनाली काही केल्या सुधारत नाही, जयच्या मागे लाचार !

मीनलचं भांडण मलाही अजिबात कळलं नाही, इतकी खुन्नस विशालला? मग कुर्बानी का दिली ?
मीनलने बाकी १ काम बेष्ट केलं, टास्क मधे उत्क्याकडे फेकलेल्या चप्पल थेट त्याच्या टाळक्यात बसल्या
आज जय खूप पॉझिटिव दिसला, असा वागला तर व्हिलन नाही दिसणार आणि टॉप २ मधे नाही येणार
पण जयला या आठवड्यात चावडीवर काही ऐकावे लागणार नाही , व्य्॑वस्थित वागला फिजिकल टास्क नसल्यामुळे !
या सिझनला टॉप ४ अगदीच प्रेडिक्टेबल झालेत.. विशाल, विकास, मीनल, जय हे अगदी फिक्स आहेत, क्रम बदलु शकतो.. उरलेला १ कोण असेल हेच फक्त अनिश्चित आहे ! मीरा असावी असा माझा अन्दाज आहे पण उत्क्या आणि स्नेहा जयला इतके चिकटलेत कि बिबॉ कनफ्युज होणार कोणाला टाकावे !
जय आवडला कालच्या एपिसोडात..
जय आवडला कालच्या एपिसोडात.. हसरा चेहरा, अन जोकिंग मूड मध्ये! नेहमी असा कपटी, खुनशी दिसतो.
मीनल सोनाली ला सांभाळून घेता घेता स्वतःच चक्रम सारखी वागायला लागलिय की काय! मध्येच सटकते काय तिची? विविची वाढती लोकप्रियता पाहून फ्रस्टेट झाली असेल!
खरंय, तिने फक्त धडाकेबाज खेळावं, बाकी कशात डोकं आपटू नये!
मी काल म्हटल्याप्रमाणे मीनलला
मी काल म्हटल्याप्रमाणे मीनलला समजलं की विशाल त्यांचा गेम करतोय म्हणून ती त्याला थोबाडीत मारेन बोलली.
चावडीच्या प्रोमोत स्नेहाला
चावडीच्या प्रोमोत स्नेहाला भरपुर ओरडा बसलाय असा व्हिडियो आलाय्
मांजरेकर समोर डायरी घेवून
मांजरेकर समोर डायरी घेवून बसलेत. नोट्स. काढल्यात.
मांजरेकरांच्या रॅंकिंगमध्ये स्नेहा, गायत्री, सोनाली ९-१०-११
जय, विशाल, दादूस सेफ.
मांज्या नेहमीप्रमाणे चापटवतोय
मांज्या नेहमीप्रमाणे चापटवतोय मीराला.
दादूस सेफ.कासव चालल हळूहळू
दादूस सेफ.कासव चालल हळूहळू पुढे.
मग जाणार कोण,नीथा की शिंदे.
खरतर दादूस शेवटी होते.शिंदेंना नीथापेक्षा कमी वोट्स आहेत.
छोट्या शिंदेंना जे जोडे पडत आहेत सोमिवर त्यामुळे गायक शिंदे पितापुत्रांना सुपार्या मिळत नसाव्यात म्हणून ,छोट्यांना काढतील कि बाहेर
की आदिशला काढून शिव्या पडल्या म्हणून नीथाला काढून,बघा आम्ही या वाईल्ड कार्डला पण काढल अस दाखवून बिबॉस सेब ठेवेल स्वत:ला.?
सोनालीला ११ नं दिलाय तर ती
सोनालीला ११ नं दिलाय तर ती जाईल बहुतेक.. दादुस खरच कासव झालाय !
दादूस सेफ.. केसदान पावलं
दादूस सेफ.. केसदान पावलं म्हणायचं
उद्या सोनाली ला बाय बाय करतील. आधीच मीनल आणि विशाल भांडण झालेय. सोना गेली की अजून एकटी पडेल आणि मग अजून सिपंथी. आणि मग निथा आणि मीनल ची जवळीक पण वाढू शकेल अजून. निथा खेळते चांगली ते दिसलं होतं खांब टास्क मध्ये. मीनल आणि निथा एकत्र आल्या तर टक्कर देऊ शकतात सगळ्यांना चांगली.
तसाही सोनाली ने या वीक मध्ये काहीही केले नाहीये किचन भांडण सोडून.त्यामुळे तिचे जायचे जास्त चान्सेस आहेत.
खरंतर उतक्या गेला तर जास्त मजा येईल.पण तो ठेवतील काड्या करतो तो चांगल्या.
दादुस सेफ, पहीले आले तरी
दादुस सेफ, पहीले आले तरी आश्चर्य वाटणार नाही आता. बाकी पब्लिक मात्र झोडेल शोधुन बिग बॉस टीमला, हाहाहा.
तसाही सोनाली ने या वीक मध्ये
तसाही सोनाली ने या वीक मध्ये काहीही केले नाहीये किचन भांडण सोडून.त्यामुळे तिचे जायचे जास्त चान्सेस आहेत.
खरंतर उतक्या गेला तर जास्त मजा येईल.पण तो ठेवतील काड्या करतो तो चांगल्या.
<<<
+१
सोनाली पेक्षा दादुसचं कन्टेन्ट नक्कीच जास्तं आहे , सध्या सोनाली फार अनॉयिंग वाटतेय.. फक्त तिच्या आधी स्नेहा जावी असं वाटत होतं मला !
दादूस कोळी गीत फॅन क्लब असणार
दादूस कोळी गीत फॅन क्लब असणार. मला उत्कर्ष माणूस म्हणून नाही आवडत पण मिरा पेक्षा जास्त डिझर्विंग वाटतो.
त्याच स्वतंत्र प्लानिंग सुरू असते गेममध्ये. जयचा पूर्ण मांडलिक नाही वाटत. मीरा गायत्री दोघी असतात तेव्हा बोलबच्चन असतात. ह्या दोघांसमोर बोलती बंद.
मांजरेकरांनी क्रम सांगुन गम्मत घालवली.
उद्या सोनाली आउट
उद्या सोनाली आउट
Pages