Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अंजू आजच कापले तिघांनी केस.
अंजू आजच कापले तिघांनी केस. विशाल लबाड निघाला खरंच. सगळी सहानुभूती एकट्या विकासला मिळेल म्हणून याने पण केस कापले. विकासला खरे तर केस कापायची गरज नव्हती कारण स्नेहा तर जयच्याच बाजूने असणार पण नाही म्हणणे वाईट दिसेल म्हणून विकासने त्याग करायचे ठरवले पण हाय रे दैवा, सगळे मुसळ केरात सोनाली पुढच्या आठवड्याची चिंता करतेय पण या आठवड्याचं काय. दादूसला उगीच बकरा बनवतात. दादूसला पाटी टास्क द्यायला हरकत नव्हती. पहिल्या सीजमध्ये सईला तिच्या पेटचा फोटो नष्ट करायला लागला होता ते आठवले.
धन्यवाद चंपा.
धन्यवाद चंपा.
विशाल भारीच (बिचारा विकास). तसही त्याला वोटिंग जास्त असते आणि असणार, अपवाद मागे विकासला टास्कमध्ये त्रास दिला त्याने तेव्हा त्याच्यापेक्षा विकासला वोटिंग जास्त होतं.
बोकलत तुम्ही काळजी करू नका, तुमचा जय दुसरा येईल, निगेटिव्ह लोकांना दूसरा नंबर देतात. अगदी ते तिसरे असले तरी. मीनल, विकासला वोटिंग जास्त असले तरी जयला दुसऱ्या नंबरवर आणतील bb .
विशाल लबाड निघाला खरंच. सगळी
विशाल लबाड निघाला खरंच. सगळी सहानुभूती एकट्या विकासला मिळेल म्हणून याने पण केस कापले. >>> पण असे कशामुळे वाटतेय? मी आजचा एपिसोड अजून पाहिला नाही त्यामुळ खरंच विचारतेय.
मला ही एपिसोड बघण्या आधी असच
मला ही एपिसोड बघण्या आधी असच वाटल..पण खर तर ही विकासचीच आइडिया होती..विशाल ला हीरो बनवण्यात विकास चा हात आहे विकास बोलला ना..लोक वर्षभर प्रोमो बघतिल..आपण बाहेर जाऊ तेव्हा दोघांसाठी लोक विग घेउन उभे असतील... विशाल त्यावर म्हणाला काहिही सांगू नकोस ..मी तुला convience करण हा टास्क आहे तू नाही..काही असो.. smart move..लोकाना अस एन्टरटेन्मेन्ट आवडत
मला वाटत नाहि हे तो प्लॅन
मला वाटत नाहि हे तो प्लॅन करुन करतोय, तो तसाच आहे... अगदी पहिल्या आठवड्यापासुन त्याला मी कुठलही प्लॅन करुन गेम खेळताना पाहिल नाही जस उत्कर्ष आणी जय सतत बोलत असतात तस
<<<
बरोबर आहे ऑब्झर्वेशन!
फक्तं एक प्लॅन केला त्याने , जयला बघून म्हंटला ‘मी याच्या विरुद्ध खेळणार कायम’
विकास विशाल प्रोमो फार टचिंग
विकास विशाल प्रोमो फार टचिंग आहे. पब्लिक फुल फिदा. जय जिंकूनही हरला.
जय जिंकूनही हरला.>>> पेक्षा
जय जिंकूनही हरला.>>> पेक्षा मी म्हणेल विशाल हरुनही जिन्कला , जय वेल डिझर्व !! स्नेहा,दादुस अशा undeserving लोकापेक्षा जय नक्किच १०० टक्के योग्य आहे.
विशाल आवडतोच पण जय पण अनेक बाबतित चान्गला आहेच डिफरन्स येतो अॅटीट्युड मधे ,
खर तर ही विकासचीच आइडिया होती
खर तर ही विकासचीच आइडिया होती..विशाल ला हीरो बनवण्यात विकास चा हात आहे विकास बोलला ना..लोक वर्षभर प्रोमो बघतिल..आपण बाहेर जाऊ तेव्हा दोघांसाठी लोक विग घेउन उभे असतील... >>+१
उत्कर्षच्या वेळी तो खूप दोस्ती-दोस्ती करत होता. पण विविने दोस्ती काय ते दाखवून मने जिंकली.
उद्या स्नेहाला टक्कल करायला सांगितले पाहीजे
ही विकासची आयडिया असेल तर
ही विकासची आयडिया असेल तर हॅट्स ऑफ त्याला.
तळयात असताना बाकीचे मस्त पपई
तळयात असताना बाकीचे मस्त पपई खात एन्जॉय करत होते , आणि हि एकटी स्नेहाच रडत होती. ' हमसे का भूल हुई, जो ये सजा हमका मिली' म्हणत.
विशालने तर आज अनएक्स्पेक्टेड केल. सोमिवर त्याच कौतुक होत आहे.
नवीन प्रोमो पाहिला. स्नेहा विशालला मत देते ह्याचा. मिसलिडिन्ग प्रोमो असावा.
विवीला बघुन जय स्तभितच झाला,
विवीला बघुन जय स्तभितच झाला, सगळेच अवाक झाले पण तु मेरे लिए ,मे तेरे लिये बोलण वेगळ करायची वेळ आल्यावर करण वेगळ.
मठ्ठ स्नेहा टास्क चालु असताना हसत काय होती? तळ्यात बसुन रड्त काय होती, ती स्वतःला फारच सुन्दर्,छुइमुई टाइप समजते अॅज अ प्लेयर तिची इमेज काय होतिये ते कळेलच बाहेर आल्यावर तिला.
काल रडत होती की माझ्या आणी जय विषयी अस बोलल जात तस नाहिये वैगरे मॅडम !! जो दिखता है वो छपता है
विशालने स्वतः:चे केस कापून
विशालने स्वतः:चे केस कापून विकासचे नाही, तर जयचे पत्ते कापले.
जयच्या रडारडीसमोर हे जेश्चर भारी होतं.
भारी कमेंट भरत.
भारी कमेंट भरत.
जयच्या रडारडीसमोर हे जेश्चर
जयच्या रडारडीसमोर हे जेश्चर भारी होतं.>>+111 त्यांच्या रडारडी ची हवाच फुस्स करुन टाकली... उगीच कसला ओवर ऐक्टिंग करत होता जय..बघुन हसू येत होत...
मीरा ला आधी कल्पना होतीच की तिच्या अप्पु च बलिदान होणार आहे आज.. उत्कर्ष पण बोललाच टास्क चालू होण्याच्या आधी.. काहितरी गाण्यातून ..अप्पु बद्दल सुचक
ते जय वि2बाजूला राहू देत,ते
ते जय वि2बाजूला राहू देत,ते तसेही फायनलमध्ये जाणारच आहेत.
पण दादूसला बिबॉसने सिंपथी मिळवून दिली.
आता कालपर्यंत 7वर दादूस,6वर शिंदेशाहीवर नीथा आली आहे.4 वरच्या सोनाली आणि 5 वरच्या शिंदेशाहीमध्ये कांटे की टक्कर आहे म्हणे.
कालच दादूसच टक्कल त्यांना 6 वर आणायला नको,आज शेवटचा दिवस आहे वोटिंगचा.
नीथाला दादूस अगेंस्ट घालवू नका.ती खेळेल आणखी एक आठवडा मिळाला तर.
नाहीतर खरच दादूसनी सांगित्याप्रमाणे ससा कासवाच्या शर्यतीत तेच जायचे टॉप 6 मध्ये.
लास्ट सिझनला किशोरी कशी सिंपथी वोट्स मिळवून गेली होती,तसेच हे ही जायचे.
नीथाला वाचवा मग
नीथाला वाचवा मग
कलर्स मराठीच्या बिग
कलर्स मराठीच्या बिग बॉसबद्दलच्या ट्वीट्सना काहीही प्रतिसाद नसतो. अगदी दहा लाइक्स ही मिळत नाहीत.
विशाल विकासला १८०+ लाइक्स मिळालेत
https://mobile.twitter.com/colorsmarathi/status/1458780302239690757
आजच्या प्रोमोत मीरा पण हेच
आजच्या प्रोमोत मीरा पण हेच बोलते कि विकासाला लोकांच्या नजरेत मोठं होऊन द्यायचं न्हवतं म्हणून विशालने केस कापले. उत्कर्ष बोलतोय विकासाचा गेम झाला.
मुळात एकाही सॅक्रिफाईसमध्ये
मुळात एकाही सॅक्रिफाईसमध्ये दम नव्हता. रडणे वगैरे तर अपेक्षितच नव्हते. एक प्रकारे बहुमत आजमावणेच होते हे. जरा डोके लावले असते तर अधिक चॅलेंजिंग गोष्टी ठेवता आल्या असत्या.
टक्कल करायचा टास्क मुलींना
टक्कल करायचा टास्क मुलींना दिला असता तर समजलं असतं कोण किती जिवाभावाचं आहे ते. मीरासाठी गायू ने केलं असतं का टक्कल?
तसंच जय किंवा उत्क्याला निर्जळी वगैरेचं टास्क द्यायला हवं होतं. एकट्या दादूसनं केलं असतं ते बहुतेक
त्यांना औषधं घ्यायची असतात.
त्यांना औषधं घ्यायची असतात. वेळेवर जेवावं लागतं.
तुरू, खरंच की. ही कल्पना
तुरू, खरंच की. ही कल्पना विकासचीच होती. मस्त.
मिरा-गायत्रीने इतक्या प्रेमाने जयला मत दिलेले पाहून मजा वाटली.
उत्कर्ष बोलतोय विकासाचा गेम
उत्कर्ष बोलतोय विकासाचा गेम झाला.
<<
बिनडोक आहे सो कॉल्ड मास्टरमाइंड , गेम जयचा झालाय
विकास खरच खूप हुषार आहे, त्याला बाहेर काय दिसत असेल एग्झॅक्ट्ली माहित आहे, ‘हा प्रोमो वर्ष भर चालेल’ म्हंटला, खरोखर बिबॉने प्रोमो तो बनवला आणि नक्की बिबॉ च्या हिस्टरी मधे याचा उल्लेख होईल !
जयची आज अलका कुबल झाली होती पण सगळी रडारड वाया, विशाल विकास रॉक्ड
बिबॉ टिम ए एलिमिनेट होऊ नये याची काळजी घेतायेत, सोनालीला नॉमिनेट केलं, उत्क्या/गायत्री/मीराला का नाही मागितली ही कुर्बानी ? मीरा तर एकदाही नाही झालीये नॉमिनेट
गायत्रीची एक ड्रेस मधे रहायची शिक्षा तशी चॅलेंजिंग होती पण आयॅम शुअर बिबॉ लवकरच देतील कपडे पाठवून !
बाकी चॅलेंजेस सिंपल होती अगदीच !
टिम ए खूप लाचार आहेत , उत्क्या कित्तीतरी वेळा म्हंटला कि मी इथपर्यंत जयमुळे आलोय आणि ते खरच आहे!
मीरा गायत्री सुद्धा जयला करेक्ट प्रुव्ह करत आहेत, त्यांचा स्वाभिमान लिटरली ४ दिवस टिकला !
स्नेहा तर नोकरच आहे जवळपास जयची !
बोकलत सगळ्या धाग्यांवर उफराटे
बोकलत सगळ्या धाग्यांवर उफराटे प्रतिसाद देत असतात. ते जे लिहितात त्याचा उलट अर्थ घ्यायचा
नुकताच एक प्रोमो आलाय त्यात
नुकताच एक प्रोमो आलाय त्यात विकास सोनालीला पण हेच सांगतोय कि विशालने त्याला सिम्पथी जास्त मिळावी म्हणूनच टक्कल केलं. तो आपल्याविरुद्ध गेम खेळतोय. इथून पुढे आपण आपल्यासाठी खेळलं पाहिजे. विशाल त्यांना कधीही धोका देऊ शकतो. सोशल मीडियावर सगळे विशालला नावं ठेवत आहेत.
(No subject)
त्या मीरा गा दा चा
त्या मीरा गा दा चा इंडीविज्युअल गेम खड्ड्यात गेला का, मारे म्हणत होत्या. जेव्हा तेव्हा जय उत्क्याबरोबर असतात गॉसिपिंग करत.
लेटेस्ट वोटिंग ट्रेंड
लेटेस्ट वोटिंग ट्रेंड
1 विशाल.2विकास(वोट्सचा पूर आला आहे याच्यासाठी, विशालला टक्कर देत आहे.)
3 जय 4 सोनाली५ नीथा(वोट्स वाढली,शिंदेशाहीवर मात ,परत 5 वर)
6.उत्कर्ष
7 दादूस(वोट्स येत आहेत,पण 6 नंबर मिळत नाही.)
बहुतेक दिदूसच जातील.
नेक्सट विक बहुतेक एलिमिनेशन घेणार नाहीत,कारण सोनालीला मुद्दाम नॉमिनेट केल बाहेर काढण्यासाठी ,मीरा, गायत्री किंवि टीम ए ला वाचवण्यासाठी, असा आरोप नेटकरी करत आहेत आणि बिबॉसला जोडे मारत आहेत.
नेटवर बघताना बरं असतं आपल्या
नेटवर बघताना बरं असतं आपल्या हवे तेच सीन्स बघता येतात.
मी सेकंडलास्ट विकास विशाल सीन आधी बघितला. विकास छा गया, काय डोकं लढवले त्याने, विशाल आधी तयार नव्हता केस कापायला. विकास डोक्याने खरोखर हुशार आहे आणि प्रामाणिकपणे त्याने सांगितलंही की कदाचित मी शेवटचा असतो आणि माझं मत निर्णायक नसतं तर मी केस कापले नसते. शेवटचा सीन तर भारी एकदम. मला नक्कीच विकास जास्त आवडला, त्याने जिंकलं मन.
नंतर मीनलचे बघितलं. ते सोपं होतं.
विकास(वोट्सचा पूर आला आहे
विकास(वोट्सचा पूर आला आहे याच्यासाठी, विशालला टक्कर देत आहे.) >>> हे खरं असेल तर विकासचे गणित बरोबर आले म्हणता येईल. त्याला बहुतेक बाहेर विशालची क्रेझ आहे हे कळाले आहे. Calculated Move.
पण, डोकं चांगलं चालवलं आहे दोघांनी.
मास्टरमाइंड रह गया पीछे... यह दोनों खेल खेल गये.
Pages