मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सोना-मिराचा भान्डण झाल्यावर मिरा प्रचन्ड हायपर झाली होती एकदम मेल्टडाउन दिसुन येत होते. बाकी बीबॉ टिम महाचालु आहेत, खाबान्चा टास्क एकदम गुण्यागोविन्दाने एन्ड झाला म्हटल्यावर परत रात्री उठवुन दोघा-दोघात लावली झुन्ज, बसले सगळे एकमेकाच्या झिन्ज्या उपटत.
स्नेहा आणी मिरा यात जास्त इरिटेटिन्ग कोण याची स्पर्धाच चालु होती, गायत्री-सोनाचही सेम तरी मिरा स्नेहा पेक्षा परवडली अस म्हणता येइल.
बाकी मिराची कॅप्टनसीची पुरी हौस फिटली एकतर तळ्यात-मळ्यात करुन ती दमली वर निम्म पब्लिक तळ्यात म्हणजे कामही वाढली.

आज काही धक्काबुक्की राडा न होता टास्क पार पडला, डिझर्विंग २ कॅप्टन्सीचे दावेदार !
अतापर्यन्तचे टास्क्स बघता जय होईल बहुतेक कॅप्टन , अर्थात दोघांपैकी कोणालाच कॅप्टन्सीने मिळणार्‍या इम्युनिटीने फरक पडत नाही !
डिबेट टास्क म्हणजे नुसती मंडई.. स्नेहा, तिची बडबड, चेहरा, चेहर्‍यावरचे वेडसर भाव, कपडे, मेकप सगळे अनबिअरेबल आहे, बघवत आणि ऐकवत नाही Uhoh
त्यातल्या त्यात जय-विकास व्यवस्थित आणि मुद्देसूद बोलले !

अंजु, प्राची thanks.
प्राची, छोटा मस्त.
आता तितका छोटा नाहीये.
14 वर्षांचा झाला.

रेवा,
हो काहीवेळा तसंही वाटतं सोनालीबाबत.

आता गेम फास्ट झालाय.

बाय द वे,
सगळ्यात भारी प्लेयर बिगबॉस च आहे.
बॉक्स टास्क मध्ये गोल्डन बॉक्स फंडा आणणे.
तळ्यात मळ्यात निर्णय वेळी तर मीराला वाटलं असेल झक मारली आणि कॅप्टन झाले. लोकं तर बोलणारच काही केलं तरी.
टीम मध्ये फूट पाडण्यासाठी सिलेकटेड चुगल्या दाखवणे,
वीकेंड वार मध्ये सिलेकटेड hints देणे.
मीरा कॅप्टन झाली त्याच्या दावेदारचा तो टास्क असा आणला की आधी केलेले प्लानिंग दोन्ही टीमचं वाया गेलं.
सगळ्यांचा गेम प्लान बघून वेगळाच गेम खेळवतात बिग बॉस.

बाय द वे, एडिटिंग टीम वर खूप लोड असेल अशा कार्यक्रमात असं वाटतं. आणि कोणाला बाहेर कसं प्रोजेक्ट करायचं हे ही त्यांच्यावर अवलंबुन आहे. त्यांना तशा सूचना मिळत असणार. 24 तासातले सगळच नाहीत दाखवता येत. त्यामुळे आपणही गोंधळतो कधी कधी हा किंवा ही अचानक असे का वागत आहेत.

बाकी मिराची कॅप्टनसीची पुरी हौस फिटली एकतर तळ्यात-मळ्यात करुन ती दमली वर निम्म पब्लिक तळ्यात म्हणजे कामही वाढली. >> हेच सेम काल माझ्या मनात आलं.... बिबॉ ने तिची पुर्ण वाट्च लावुन टाकली...तळ्यात मळ्यात लोकांना पाठवायचं काम म्हणजे कोणाचा ना कोणाचा राग ओढवुन घेणंच झालं...वर आणि कामं करा पब्लिक ची...कॅप्टन ने काम करायचं नसतं ना खरतर...मागे तृप्ती झाली तेव्हा म्हणाल्यासारखं वाटलं मला की मी कॅप्टन नसते तर मीच केला असता स्वयंपाक असं.
मीरा काल बहुतेक म्हणुनच फ्र्स्ट झाली होती...पण ते दिसायला खुप वाइट दिसलं...राग व्यक्त करण्याची पद्धत एकदम हिंसक वाटली...असं वाटलं की तिच्या हातात एखादं शस्त्र असतं तर कोणाचा खुन केला असता हिने... मधेच राग मधेच रडं ....सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असं झालय तिचं ......हौस आहे ना कॅप्ट्न्सी ची...भोगा आता.... Wink
विशाल कॅप्ट्न झालेला आवडेल मला...पण जय आणि कंपनी पूर्ण प्रयत्न करणार...विशाल ची गँग त्याला दगा देणार असं फार वाटतय...

स्नेहा किती भरभर आणि विचित्र अंगविक्षेप करत भयाण टोनमधे बोलते. हिस्टेरिया झाल्यासारखीच वागते. >>> पब्लिकला इरीटेट करायलाच ठेवलंय बहुतेक तिला.

मीरा खाणार शिव्या आणि यावेळी उगाचच नाही, डीझर्व करते.

बाकी स्नेहा, गा दा पेक्षा मीरा फायनल पाचमध्ये असावी अस मला अजूनही वाटतं.

बघायच्या आधी इथे समजतं, थॅंक यु माबोकर्स तास दीड तास वाचतो माझा.

जयलाच करतील कॅप्टन मग स्नेहा आराम करेल, हाहाहा.

डीजे कमेंट आत्ता वाचली, गंगेत माकड न्हाले म्हणायचं.

जय होणारच होता कॅप्टन. त्याचे सपोर्टर्स ५ आणि विशाल चे ४ ना?! मग कशाला ते त्याग फुकटच?
मीराचा टेडी वगैरे अगदी प्रेडिक्टेबल. काल की परवाच त्या टेडी ला फूटेज दिले तेव्हाच हे आले होते मनात. दादुस बिचारा सहन करतो म्हणून त्याची परीक्षा बघतात. टक्कल केले वाटते त्यांनी. बाकी गळ्यात पाट्या घालणे , टेडी, फोटो फाडणे अगदीच फुसके त्याग वाटतात मला.
आत्ता अजून एक प्रोमो पाहिला त्यात विकास ने विशाल साठी टक्कल केले, आणि त्याने केले म्हणून विशालने पण केले!!

आत्ता अजून एक प्रोमो पाहिला त्यात विकास ने विशाल साठी टक्कल केले, आणि त्याने केले म्हणून विशालने पण केले!!>> हो आत्ता च बघितला... कसला एडिट केलाय..ही दोस्ती तुटायची नाय च sad version लावलं.. विशाल ला गेम भारीच कळला आहे..फक्त विकास ने त्याग केला असं दिसायला नको...हिरो म्हणुन भारी पोट्रे करतोय स्वताला...पब्लिक अजुन फिदा...

हो जय ला कॅप्टनशिप मिळूनही आता लँडस्लाइड येणार विशाल अन विकास च्या पॉप्युलॅरिटीचा - असे दिसतेय Happy
बिबॉ मला सेक्सिस्ट वाटतात. का बरं मुलींना टेडी अन गळ्यात पाट्या टाइप फालतू टास्क देतात? सांगायचे की त्यांनाही हेड शेव्ह करायला.

हो ना. सोनाली आणि स्नेहा ला सांगायचे होते. मग दूध का दूध आणि पानी का पानी झाले असते. वरून ' मी कॅप्टन नाही झालो तरी चालेल पण सोना तू केस कापायचे नाहीत' वगैरे डायलॉग पण मारता आला असता विशालला.
पण मागे मिरावर इतके चिडले होते लोक मिनलला केस कापायला सांगितले म्हणून... की बिग बॉस घाबरले असतील यावेळी.

अरे काय चाल्लय काय हे , विकास आणि आपल्या विशाल हिरोनेही पण टक्कल केलं ?? Biggrin
म्हणजे शिवजी महाराज परसनॅलिटीला एकदम बाजीराव केलं कि काय Happy
एका घरात ३ टकले अचानक?
दादुस उत्कर्ष लेटेस्ट वोटिंग प्रमाणे बॉटमला आहेत पण टक्कल केलेल्या दादुस वर दया करून नं. ४ च्या सोनालीला घालवतील कि काय ?? आणि जर दादुस ला घालवायचे असेल तर दुष्टपणे टक्कल करून कशाला घालवायचं जाताजाता?

म्हणजे शिवजी महाराज परसनॅलिटीला एकदम बाजीराव केलं कि काय >>> Lol धीरे बोल नही तो पणतू आ जाएगा Wink

बिबॉ मला सेक्सिस्ट वाटतात. का बरं मुलींना टेडी अन गळ्यात पाट्या टाइप फालतू टास्क देतात? सांगायचे की त्यांनाही हेड शेव्ह करायला.
<<
+१
स्नेहाला जय साठी सांगायचे टक्कल करायला किंवा दररोज हेवी व्यायाम !
सोनालीला बिन मेकपचे फिरायला सांगायचे आठवडा भर.
ज्याला जे जमत नाही ते द्यायचे, मीनलला आठवडा भर स्वयंपाक, गायत्री किंवा मीराला आठवडा भर मौन व्रत !
तो मीराचा अप्पु बघून शंका आलीच होती कि हा शहिद होणार Wink

उत्क्याला पण गळ्यात पाटि चे फुसके टास्कच होतं असं दिसतंय, म्हणाजे बिबॉ ने मुद्दाम वि + वि ला शाइन करायला संधी दिली म्हणावे का Happy

हिरो म्हणुन भारी पोट्रे करतोय स्वताला...पब्लिक अजुन फिदा...>> मला वाटत नाहि हे तो प्लॅन करुन करतोय, तो तसाच आहे... अगदी पहिल्या आठवड्यापासुन त्याला मी कुठलही प्लॅन करुन गेम खेळताना पाहिल नाही जस उत्कर्ष आणी जय सतत बोलत असतात तस , विकास तरी गेम विषयी बोलत असतो, स्टॅटर्जी ठरवतो पण विशाल इज नॅचरली लाइक धिस आणि त्यावरच पब्लिक फिदा आहे.
निथाला किती वोट मिळतायत माहिती नाही पण ती पण जाउ शकते, तिचा कन्टेट कमिच आहे.

विशालला मी साधा समजत होतो पण खूपच चाप्टर निघाला. विकास लोकांच्या मनात बसायला नको म्हणून याने पण केस कापले. विकास आतून चरफडला असेल पण काय करणार शेवटी बापडा. मग तो जय परवडला फुल्ल क्रेडिट दादूसला दिलं.

उत्कर्षला दोन आठवडे कॅप्टन होता येणार नाही. एवढ्यावर ज्याने दोन बादल्या पाणी गाळलं.
नीथाला मुलीने पाठवलेलं कार्ड नष्ट करावं लागलं.

मीरा गायत्री बाजू बदलणार नसतील तर टास्कला काही अर्थ नाही.
गेल्यावेळी हीनाने रूपालीसाठी टॅटू काढला होता.

बोकलत Lol जावा तिकडं गब्बसा. ( असं सोनाली म्हणेल)
मला वाटत नाहि हे तो प्लॅन करुन करतोय, तो तसाच आहे >>> +१
हो टॅटू अ‍ॅक्चुअली मोठी कमिटमेन्ट आहे, टक्कल करण्यापेक्षा जास्त.
प्राची - पाट्यांचा टास्क बर्‍याच जणांना दिला हिता, उत्क्या, सोनाली , मीनल , आणि स्नेहा

गायत्री, स्नेहा आणि उत्क्यापैकी एकाला तरी "पुढचे २ आठवडे नॉमिनेटेड " होण्याचा टास्क द्यायला हवा होता Happy

Pages