मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काल आणि आजच्या दोन एपिसोड मधून शनिवार साठी खूप मटेरियल मिळालं मांजरेकरांना.. स्नेहा बाई कुठल्या बेसिस वर 1 नंबर.काहीही...
आज परत तोच जुना टास्क... निथा- गायत्री वाद, मीरा - निथा वाद
.. मीरा परत शिव्या खातेय आता...संचालक असल्याचा फायदा घेतला तिने.. निथा पोचली होती आधी माझ्या मते.
उतक्या ला काहीही कारण नसताना उचकवला मिराने. गायत्री काडी टाकून गप्प.. मीराने पाहिले पण नव्हते त्याला खुणा करताना तरी गायत्री ला म्हणाली मी मी सांगीन पाहिलं म्हणून..
आता उद्या परत मीरा ची सटकलेली दाखवली आहे

एका ग्रुप ची पोस्ट पेस्ट करतेय :
तमाम महिला वर्गाला काही प्रश्न...

१- जसं "स्त्री दाक्षिण्य" असतं तर "पुरुष दाक्षिण्य" नसतं का...?

२- पुरुष म्हणजे नेहमीच वाईट आणि बाई म्हणजे सत्याचा पुतळा असते काय .?

३- स्वतःच्या स्त्रीत्वाचा असा "वारंवार" गैरवापर करणे कितपत योग्य...?

४- असं नीच वर्तन कुणी समज देऊनही वारंवार करत असेल तर ती विकृती नाही का...?

५- आज कुणातरी महिला स्पर्धकाने हार सहन न झाल्याने चिडून विकासच्या छातीवर रागाने ते स्टिकर चिकटवलं तेच जर देव न करो विकास किंवा अन्य पुरुष स्पर्धकाने केलं असतं तर ...?

स्नेहा वागली...जाम इरिटेट करतेय सध्या ती...तिने च धक्का दिला विकास ला खांबा च्या टास्क मध्ये आणि वर कांगावा..बर एवढं झाल आणि रागात स्वातच स्टीकर विकास च्या खांद्यावर चिकटवल..हेच उलट घडल असत तर...हा विडियो फेस बूक च्या विविध ग्रुप्स मध्ये चांगलाच पसरला आहे

आज सगळ्यात चांगले क्षण म्हणजे विकासने तळ्यात असताना म्हंटलेली गाणी ,चिडवाचिडवी आणि उत्कर्ष ची त्याला साथ.. असे हलके फुलके क्षण मजा आणतात..या सिजन ला कमीच आहेत अशी लोक..जय तेव्हा पण तोंड फुगवून बसला होता..

ओहह तुरू, स्नेहा कित्तीतरी वाईट आहे. तरीही म मां तिला काहीही बोलणार नाहीत.

आविष्कार आणि तिच्या पर्सनल नात्याबद्दल मला बोलायचं नाही, भाष्य करणेही बरोबर नाही पण स्नेहा काही दूधकी धूलि वगैरे वाटत नाही, तिचा स्वभाव बेकार वाटतो, निदान इथेतरी.

खांबाच्या टास्कमधे स्नेहाला आधी विकासचा धक्का लागला किंवा त्याने मारला मग तिने धक्का मारला. व्हिडीओ स्लो मोशन मधे पाहताना स्पष्ट दिसते.

टास्कमध्ये धक्काबुक्की होते थोडीफार. पण स्नेहाने वुमन कार्ड खेळायची गरज नव्हती.

बादवे, जय- विशालच पॅचअप झालय म्हणे तळयात असताना.

उत्क्याचे वाईट दिवस चालू झाले वाटतं. >>>>>> जाता जाता तृप्तीताईन्नी शाप दिला असेल, तो भोवला असेल.

खांबाच्या टास्कमधे स्नेहाला आधी विकासचा धक्का लागला किंवा त्याने मारला मग तिने धक्का मारला. व्हिडीओ स्लो मोशन मधे पाहताना
स्पष्ट दिसते.>>
हा टास्कच असा आहे की धक्का लागणारच स्नेहा कशाला त्याच भान्डवल करतेय.
निथाने गायत्री आणी मिराच धक्का देवुन त्याच स्तिकर काढुन/फाडून स्वतःच लावल तेही काही सेकदात! वॉव सुपरवुमनच आहे की ही काय पण मिराच डोक आहे.
मिराला गायात्रिलाच बाद करायच जिवावर आल होत आणी स्वतः सन्चालक झाल्यावर तर ती सुटलीच.
धक्का लागला का? स्टिकर आधी कोणि लावल हे इतक्या लाबुन सन्चालक म्हणून काय कप्पाळ कळणार आहे पण नाही बीबॉलाही राडाच हवा असतो, खरतर क्रिकेट सारख स्क्रि वर स्लोमो रिप्ले दाखवायचा म्हणजे किस्साच खतम पण नाही त्याने भान्डण थोडिच होतिल? काल बघितल की स्नेहा फक्त म्हटली की मला तळ्यात पाठवल तर गायत्रीला पाठवाव लागेल की बीबॉने हिन्ट घेवुन अदलाबदल करायला लावली.
मला काहिवेळेस वाटायला लागलय की शो स्क्रिप्टेड आहे का? कारण टास्क जिन्कण्यापेक्षा प्रेक्षकाची सिम्पथि मिळवा हे आता फक्त मोठ्या अक्षरात बोर्डावर लिहायचे राहिलय तरी सगळे बसतात भान्डत.
स्नेहाने विशालच्या अन्गावर स्टिकर चिकटवण अगदिच नाही पटल.
बाकी मिरा एकदम मेरे मन को भाया मै .. मोड मधे आहे, विकेन्डला शाळा घ्यायला किलोकिलोने मटेरियल आहे ममाकडे.

हो स्नेहाने अतीच कांगावा केला. तो दरवेळी मला धक्का देतो, मला माझीच लाज का काय वाटते हे असे घाण बोलायची गरज नव्हती. दुसऱ्या बाईचा धक्का लागला असता तर ती एव्हढे बोलली नसती.
स्नेहाने वुमन कार्ड खेळायची गरज नव्हती.>>+१
हि स्वत: गेम मधे विशेष कष्ट घेत नाही. पण स्वत:साठी खेळायला जय, उत्कर्षला गोडगोड बोलून तयार केले आहे. विशालला सुद्धा गोड बोलून खेळायला लावले.

गेल्या सीझनमध्ये तीन खांब राहिले असताना शिव आणि आरोहच्या झटापटीत एक खांब उखडला गेला होता.
शेवटचे दोघे उरतात, तेव्हा कोणता खांब बाद होतो यावर विजेता ठरतो.
बहुतेक किशोरी संचालक होती आणि तिने निर्णय तीनचार वेळा फिरवला होता.

काल दुपारी मी लाइव्ह पाहिलं त्यात मीनल उत्कर्षशी खांबाबद्दल सेटि़ग करायचा प्रयत्न करत होती आणि तो मुसंडी उत्तरं देत होता.

हो स्नेहाने अतीच कांगावा केला. तो दरवेळी मला धक्का देतो, मला माझीच लाज का काय वाटते हे असे घाण बोलायची गरज नव्हती. दुसऱ्या बाईचा धक्का लागला असता तर ती एव्हढे बोलली नसती.>>>
हो ना. केवढी केकाटते ती. लोक घाबरूनच गप्प बसत असतील. समोरच्याला बोलूच देत नाही.
हा टास्कच असा आहे की धक्का लागणारच >>> बरोबर.
या आठवड्यात सगळीकडे फक्त स्नेहा ची चर्चा आहे. एकदम फ्रंटवर आली आहे ती.

यावरून आठवलं की आदिशनी हा मुद्दा काढला होता वीकेंडला की स्नेहा, गायत्री आम्हांला मारतात टास्क करताना. पण आमचा हात लागला की आरडाओरडा करतात.
पण तो त्याच आठवड्यात बाहेर गेला.

हे २-३ आठवठे गेम खुप कंटाळवाणा आणि प्रेडिक्टेबल होत जाणार आहे. आदीश असता तर चित्र काहीसे वेगळे असते.
स्नेहा एनी पब्लीसिटी इज गुड पब्लिसिटी हा सुविचार फॉलो करते. तीचे कलिग्जपण तीच्याबद्दल फार बरे बोलत नाहीत, मला नाही वाटत तीला काही फरक पडतो.

स्नेहाचा सो कॉल्ड गेम खूपच चीप आहे, कायम वुमन कार्ड आणि त्यात काल पासून एक अनॉयिंग बडबडीचा सूर लावलाय , फार असह्य होतेय !
एक तर ती अजिबात अ‍ॅथलेटिक वगैरे नाहीये, पळता येणे वगैरे फिजिकल टास्क्स जमत नाहीत वर ध्क्का लागला म्हणून रडारड !
आज नीथानेही फुटेज खाल्लं, थोडं ओव्हर रिअ‍ॅक्ट केलं तिनी पण स्वतःचं प्रेझेन्स दाखवून दिलं आज, मलाही वाटल कि मीरा आधी ती पोचली होती, मीराशी पंगा घेतल्यानी सिंपथी आणि पब्लिक वोट्सही मिळणार तिला !
मीरा प्रचंड अनफेअर होती संचालक म्हणून , त्या उत्क्या मीनलची काय इशारेबाजी झाली नाही कळलं मला पण मीरा न पहाताच आली होती वाद घालायला .. मीरने भरपूर कन्टेन्ट् दिलय ममांना.. नेहेमीची बकरी मिळाली हलाल करायला चावडीवर Biggrin
मीरा गायत्री कोणालाच आवडत नाहीयेत घरात सध्या !

हॅलो
फार फार दिवसांनी माबो वर लिहितोय.
हा धागा फॉलो करायला मजा येतेय.
सगळे भारी विश्लेषण करतात.
मी फ्री app वर बघतो त्यामुळे एक दिवस।लेट बघतो एपिसोड.

स्नेहा बावळट नाहीये.
येडा बनके पेढा खातेय.
हळूहळू पत्ते ओपन करतेय ती.
पहिला नंबर पकडून अजिबात सोडला नाही तिने.
जयला पकडून ठेवेल ती. जय आणि उत्कर्ष मध्ये हळूहळू भांडण लावण्याचा।प्रयत्न करेल असं वाटतंय. नंबर टास्क मध्ये मला थोडीशी मेघासारखी वाटली. फक्त मेघाच्या पुढची आवृत्ती.जास्त annoying. हेच तिचं हत्यार बनेल बहुद्धा.

उत्कर्ष म्हणजे तेल लावलेला पैलवान आहे.
सगळ्यांना शब्द देतो, झुलवतो.
आणि हे माहित आहे तरीही लोकं त्याच्या बोलण्याला फसतात. मीरा आणि गायत्रीकडून सपोर्टही घेतो आणि त्यांना अलगद बाजूला काढतो. समोरच्या सगळयांना स्पष्ट सांगतो पहिली priority जय यानंतर तूच. Mobile वर smily देता येत नाहीत. इथे खदाखदा हसलेली इमोजी समजा.

विकास देखील फार हुशारीने खेळतो. चांगल्या hints पकडतो. त्याचं विश्लेषण चांगलं आहे.
पण त्यांचा ग्रुप हळूहळू individual खेळण्यात जास्त रमतोय.

जय हुशार आहे पण रागीट असल्याने माती होतेय.
त्याला खूप hint देतात, त्याला कळतात तो घेतो देखील पण अतिराग माती खातो. त्याला चिडवलं की तो पॅनिक होतो. हे विशाल आणि विकासला बरोबर कळलंय.
स्नेहा त्याला कंट्रोल करण्यासाठी उत्तम सूचना देते.
जे त्याच्या इतर 3 मित्रांनी कधीच नाही सांगितलेलं.

मीरा देखील खेळते चांगली पण negative side पटकन बाहेर येते तिची. कावेबाज, धूर्त, आणि समोरच्याला तुच्छ लेखते.

विशाल आणि मीनल देखील भारी प्लेयर आहेत.

दादुस, निवांतपणे जितके दिवस निघतील ते बघत आहेत.
मध्येच चांगलं चमकून जातात. Box टणाटण पळवले त्यांनी.

सोनाली तिच्या पूर्ण क्षमतेने खेळत नाही असं वाटतं.
तिला हिंट्स मिळाल्यात पण मुद्दा नीट नाही मांडत त्यामुळे मार खाते ती.

विशाल विकास उत्कर्ष आणि काही प्रमाणात जय मुद्दे मांडण्यात हुशार आहेत. बोलण्यातला पॉईंट पकडून पटकन गोष्टी फिरवतात. मीनल देखील मुद्दे मांडते बर्याच वेळा पण कधी कधी तिला आपला स्वार्थ साधताना वरचं गोड वेष्टन घालणे नाही जमत.

गायत्री कधी बिचारी वाटते तर कधी दुष्ट सारखी खेळते.
कधी स्टँड घेते तर कधी लूज वाटते. तिला अंदाज आला आहे. ती आणि मीरा nominate होऊच नयेत ह्या साठी खेळतील.

विशाल समोरच्याला उचकवण्यात फार हुशार आहे.
उत्कर्ष समोरच्याच्या मनात हळूच पिल्लू सोडून देण्यात expert आहे. जय देखील सोनालीला गिनीपिग बनवून पिल्लू सोडून देतो. बोलता बोलता हसता हसता समोरचा ग्रूप फुटण्यासाठी हळूच जय आणि उत्कर्ष प्रयत्न करतात.

मजा येतेय. लिहीत रहा.

Btw, voot चं 300 रु भरून subscription घ्यावं असे इतर काही चांगले कार्यक्रम आहेत का त्यावर?

झकास, खूप दिवसांनी (वर्षांनी) दिसलात. छोटा काय म्हणतो?
वूट ओरिजनल सिरीज आहेत काही छान. असूर, रायकर फॅमिली, गॉन गेम वगैरे.

झक्या खूप दिवसांनी तुला बघून बरं वाटलं. मस्त विश्लेषण केलंस. लिहीत रहा. सर्वांत उत्तम प्लेअर्स बद्द्ल मात्र एका शब्दात लिहीलंस, विशाल आणि मीनल.

मी बघत नाही, इथेच वाचते, इथे वाचून समजतं, छान लिहीतात सर्वजण. विकेंड बघते.

https://youtu.be/V1CPMFn3ZJw
यात सरळसरळ दिसत आहे सारंगे बाईंनी धक्का दिला ते.
शनिवारी हे दासवायला हव ममांनी.
सारंगेबाईऔची रिअँक्शन बघायची आहे.

सारंगेबाई म मां, बिग बॉसची लाडकी आहे. टाळतील विषय किंवा विकासला बोलतील. आदीशने स्नेहा गा दा यांनी त्याला मारलं सांगितलं तेव्हा विषय टाळला होता त्यांनी.

सोनाली तिच्या पूर्ण क्षमतेने खेळत नाही असं वाटतं.
... मला वाटते तिच्या क्षमताच तेव्हढ्या आहेत. 50 दिवस झाले की आता, नवीन काय दाखवले तर आश्चर्य वाटेल.

जय आणि विशाल कॅप्टनसीचे उमेदवार.
मीनल तिसरी.... याहू..सगळे नकोसे लोक नॉमिनेशन ला पात्र ठरतील आता.

Live कोणी पहातेय का? FB वर कोणीतरी सांगितले की सगळे रडत आहेत व आवाज बंद केला आहे. नक्की काय झाले असावे?

मला एक कळत नाही भल्याभल्यान्ना नडणारा जय स्नेहापुढे ताटाखालच मान्जर का बनतोय. नम्बर गेममध्ये ही केकाटत होती तरीही हा गप्पच. मला आता जयचीच काळजी वाटू लागलीय. सारन्गी त्याला गुण्डाळतेय.

मीराला कॅप्टनशिप मानवली नाही वाटत. सतत रडत असते.

आज सारन्गीनी ' सारान्गेचा' अर्थ सान्गितला. वरुन जनता जनार्दनाला मनापासून धन्यवाद अशी काहीतरी भर घातली.

आजचा स्टिकरचा गेम कुठलाही वाद न होता पार पडला. हुश्श! टास्कनन्तर सगळयान्ना हसताना, खेळताना बघून बर वाटल.

मीरा- गायत्री "ती वेडयासारखी हसत सुटते. हिला कसला मेण्टल प्रॉब्लेम तर नाहीये ना?" म्हणत होत्या ते सारन्गीबद्दल होत का?

नवीन प्रोमो पाहिला कॅप्टनसीचा. उत्कर्षने पुन्हा जयचा विश्वासघात केला वाटत. रडत होता जय.

Pages