नाचणीची धिरडी

Submitted by अश्विनीमामी on 30 October, 2021 - 07:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नाचणीचे पीठ दोन वाटी, तांदळाचे पीठ किंवा मैदा अर्धी वाटी, रवा पाउण वाटी, अर्धी वाटी थोडेसे आंबट दही. चवी पुरते मीठ. अर्धा चमचा जिरे, दोन हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर , दोन तीन पाकळ्या लसू ण. दोन बारके चमचे तीळ

बरोबर द्यायला पांढरे लोणी किंवा अमूल बटर,

हवे असल्यास अर्धी जुडी पालक / मेथी नि वडून / बारीक चिरून.

क्रमवार पाककृती: 

एका भांड्यात नाचणीचे पीठ, रवा व तांदळा चे पीठ किंवा मैदा मिसळून त्यात दही घालून सारखे करून घ्या. दह्याच्या व पिठाच्या गुठळ्या मोडून
घ्या.
जिरे, मीठ, मिरच्या लसूण व कोथिंबीर साध्या खल बत्त्यात कुटुन घ्या. मिक्सर मध्ये पण करता येइल पण ते टेक्स्चर बरोबर येत नाही फारच गुळ गुळीत होते. हे सर्व मिस ळून घ्या फार घट्ट नाही पण फार पातळ नाही असे रवा दोश्याच्या पिठा प्रमाणे ठेवा . बारीक काप लेला पालक नाहीतर मेथी घालता येइल. हवे असल्यास.

मग मध्यम तव्यावर ( मी नॉनस्टिकच वापरते. बिडाचा तवा नाही वापरता येत इंडक्षन कुक्टॉपच आहे. ) हे पीठ एक एक डाव जरा उंचावरोन सोडा. तव्यावर पडले की चुर्र्र आवाज होतो व भोके पडतात आंबोळी सारखी. थो डे ते ल सोडून झाकण ठेवुन चार पाच मिनिटे मंद आचेवर शिजूद्या. व मग परतून परत थोडे तेल सोडा. फार तेलकट करू नका.

पांढरे किंवा अमूल बटर बरोबर खायला द्या.
सध्या दिवाळीची तयारीची फराळ बनवण्याची गड ब ड असेल तर हा एका वेळचा नाष्टा लवकर होतो. पीठ व बटर बिग बास्केट वर उपलब्ध आहे. दोन धिरडी पोट भरीची होतात. मी आज ब्रेफाला दोन व लंच मध्ये दोन अशी खाल्ली.
नाचणीची अशी खास टेस्ट नाही पण दोश्या पेक्षा वेगळे लागते. व लोहाचा चांगला सोर्स आहे.

वाढणी/प्रमाण: 
दोन व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

ज्येना स्पेशल.

बरोबर गाजराची शेंगदाणे कूट घातलेली कोशिंबीर किंवा बिटाची कोशिंबीर दिली तर आयर्न नाश्टा आहे. बायकां नो तुमचे हिमोग्लोबिन आधी तपासून घ्या. कमी असल्यास हे आठवड्यातून एकदा तरी बनवा.

पालक ह्यात न घातल्यास त्याची ग्रीन स्मूदी बनवून सोबत घेता येते.

माहितीचा स्रोत: 
जनरल रेसीपी आहे. घरोघरी वेगवेगळ्या पिठाची धिर डी बनता तच. मध्यंतरी हिमोग्लोबिन ९ झाले होते म्हणून हे पीठ आणले होते. आज मुहूर्त व वेळ मिळाला. आता
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायनस मैदा केलं तर चांगलाच हेल्दी ब्रेकफास्ट आहे. धिरडी मेथी घालुन केली तर फारच चविष्ट होतील.
( इन्ग्रेडीअंट्समधला रवा कृतीत वापरला गेला नाही. एक ओळ लिहुन रवा वापरून टाका. )

मस्त. मला खूप आवडतात ही धिरडी. फक्त मी मैदा घालत नाही आणि थोडासा कांदा बारीक चिरून घालते. सोबत इडलीवाली चटणी असेल तर अहाहा!!!

मी साधारण अशीच नाचणीची धिरडी करते, प्रमाण १ कप नाचणीचे पीठ आणि अर्धा कप गव्हाचे पीठ असे घेते. दही घालून पीठ तयार करतानाच त्यात एक चमचा तेलही घालते आणि छान फेटून घेते. असे केले की धिरडी घालताना बीडाच्या तव्यावर पुन्हा पुन्हा तेल घालावे लागत नाही. सोबत बेलपेपरची चटणी.
हल्ली बरेचदा धिरड्या ऐवजी नाचणीचे डोसे केले जातात कारण ते +१ लाही जमतात.

रेसिपी आली तेव्हा नाचणी आणि तांदळाचं पीठ मागवलं. पहिल्यांदा पुष्कळशी रेसिपीत दिल्याप्रमाणे केली. पण आम्ही हे रविवारच्या जेवणात खात असल्याने पातळ धिरडी म्हटल्यावर जास्त टाइमपास होत होता. शिवाय ज्ये ना इतकं क्रि स्प खाववत नाही. म्हणून पुढच्या वेळी दोन वाट्या ( वाट्या वालं इडली पात्र असतं, त्यातल्या १/८ आणि १/४ कपच्या म ध्ये येईल) उडदाची डाळ सका ळीच भिजत घालून दुपारी वाटल्यावर त्यात प्रत्येकी एकेक वाटी तांदूळ आणि नाचणी पीठ घालून गुबगुबीत आंबोळ्या केल्या.
इन्स्टामार्टवर ख्रिसमस स्पेशल मध्ये पॅनकेक मिक्स होतं त्याचे पॅन केक्स आवडले नाहीत. तेव्हा पुढच्या वेळपासून तेही एकेक वाटी याच बॅटर मध्ये घातलं.
तुमच्या रेसिपीमुळे नाचणीचं पीठ आहारात आणता आलं. धन्यवाद.

रेसिपी मस्त अमा .
भरत तुमचं मॉडिफिकेशन ही आवडलं. मला ही मऊसर गुबगुबीतच आवडतात धिरडी / डोसे.

उ डाळ वाटल्यावर, बाकीची सगळी पिठं मिक्स केल्यावर लगेच घातली धिरडी की पीठ आंबवत ठेवलं ?

संक्रात झाली की उन्ह वाढू लागतात , मग नाचणीचे व ज्वारीचे आंबील रोज करायचे

साऊथवाले नाचणीचे रागी मुद्दे म्हणून गोळे करतात , मी कधी केले नाहीत
https://youtu.be/XoDbVIG43gU

साऊथवाले साध्या भातातही 2,4 चमचे रागी पीठ घालतात , हे करता येईल , पण चवीबद्दल माहिती नाही.

लाडू
https://youtu.be/Ur1HZ0lddO4

नाचणीचे रागी मुद्दे आणि साध्या भातातही 2,4 चमचे रागी पीठ>>>> हे खाल्लंय शेजार्यांकडे. काही विशेष चव नाही वाटली. बनवलं नाही कधी.

मी आजचं केली आंबोळी व डोसे. 1 वा. उ डाळ 1 छो.च मेथी रात्री भिजत घातले सकाळी वाटून त्यात नाचणी पीठ घालून मुरु दिलं फर्मेंट झाले नव्हते. त्याच्या आंबोळ्या व कुरकुरीत डोसे केले सोबत टमाट्याची चटणी.

नाचणी प्लस उडीद डाळ एकदम म्हणजे पचायला जड जाते का?
मी नाचणी धिरडी, पालक स्मूदी पालक पराठे बीट को शिंबीर खाउन हिमोग्लोबिन ९ चे १२.५ वर आणले आहे. क्याल्शिअम व आयर्न जास्त झाले तरी मला धोकाच आहे. पण सध्या सुशेगात.

नाचणीस आपली अशी काही फार चव नाही ( म्हणजे गव्हाची ताजी गरम पोळी मी तशीच खाउ शकते त्या तुलनेत) त्यात थोडे आं बट थोडे तिखट घालावे लागेल.

रागी मुद्दे हा फार हेवी प्रकार आहे बाटी सारखा. तो अंग मेहनत करणा रासच पचेल व्यवस्थित. आता मी डब्ब्यात उरलेले नाचणी पीठ व रवा एकातच ठेवले आहे.

एरवी आपण इडली किंवा डोशासाठी ज्या प्रमाणात तांदूळ आणि डाळ घेतो, त्या प्रमाणात डाळीबरोबर पूर्ण तांदुळाऐवजी निम्मे तांदूळ आणि निम्मी नाचणी (अख्खं धान्य) भिजवून, नेहमीप्रमाणे वाटून ते पीठ फुगलं की त्याचे डोसे आणि इडली छान होतात. मी अधूनमधून करते. नाचणी आदल्या दिवशी भिजवून, मग उपसून मोड आणून मग ती तांदुळाबरोबर वाटली तरी छान लागते. पण जर पीठ जास्त आंबलं तर चव अगदीच चरचरीत लागते.

थंडीत उडदाची डाळ खावी म्हणतात... गुज्जु सुकामेवा भरपूर तूप गूळ उडदाळं करता खास हिवाळ्यात. आज ते पीठ बाहेर ठेवलं छान फर्मेंट झालंय त्याची इडली, उत्तपा,आप्पे मूडपणे काहीतरी होईल.
मेधावि, धिरडं टाकलं की झाकण ठेव पांढरं पडणार नाही