नमस्कार,
मायबोलीला ह्यावर्षी तब्बल २५ वर्षॆ पुर्ण झाली आणि मायबोली गणेशोत्सवाचे देखील हे २२ वे वर्ष आहे. २०२१ च्या ह्या गणेशोत्सवातील वेगवेगळ्या उपक्रमांना भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार.
एक प्रथा म्हणून तर आहेच पण पडद्याआडचे संयोजकांचे अनुभव आणि आनंद तुम्हा सगळ्यांबरोबर वाटुन घेण्यासाठी मनोगताचे 4 शब्द लिहायला हवेतच.
यंदाही मायबोली गणेशोत्सवाची घोषणा झाल्यावर, अनेकांनी संयोजन मंडळात सहभागी होण्यासाठी नावं नोंदवली आणि जुने-नवीन, सक्रिय-रोमात, देश-परदेश अश्या सदस्यांचा रंगीबेरंगी चमू बनला. मग सुरवात झाली कामाची यादी करायला. नवनवीन उपक्रमाच्या कल्पना, स्पर्धा की उपक्रम ह्यावर चर्चा, लहान-मोठ्या गटासाठी अवघड-सोप्या विषयांची निवड वगैरे वगैरे.. शिवाय वेमांनी, तुम्हाला जमेल तसे, जमॆल तितकॆ आणि जमेल ते काम करा असं सांगुन धीर दिला. त्यामुळे संयोजकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला.
प्रतिसादाबद्दल खात्री नसल्याने काही उपक्रम बदलावे लागले, तर तांत्रिक बाबी लक्षात घेऊन, अंमलबजावणी करणे कठीण असल्याने काही स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. अर्थातच जुन्या-जाणत्या माजी संयोजकांच्या अनुभवी सल्ल्यामुळे प्रश्न सहज सुटत गेले. सर्व संयोजकांनी आपापले व्याप सांभाळून, टाइम-झोन, तारीख, वेळ यावर लक्ष ठेऊन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्सव संपला तरी नंतरच्या कामाची यादी वेळेत संपविण्यासाठी उत्साह टिकवून ठेवला.
अर्थातच हे घरचं कार्य असल्याची भावना सर्व संयोजकांच्या मनात होती. त्यामुळेच वेगवेगळ्या देश-गावातील, काहीश्या अनोळखी लोकांबरोबर फोन, कायप्पा वरून संवाद साधणे, एकमेकांच्या कल्पनांचा आदर करत काम पुढे नेणे हे सगळं खूप सहजपणे जमून गेलं.
मायबोलीकरांनी ही आपल्या घरचे गणपती, कामं सांभाळून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. छोटे दोस्त सुद्धा आपल्या ऑनलाईन शाळेचे वेळापत्रक सांभाळून ह्या आनंदात उत्साहाने सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक!
या गणेशोत्सवात 'शशक पूर्ण करा' आणी 'माझ्या आठवणीतील मायबोली' ह्या उपक्रमांना सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. शशक उपक्रमातील गोष्टी कल्पक तर होत्याच, पण प्रतिसादातून त्यांची नवनवीन आवृत्ती देखील वाचायला मिळाली. मायबोलीच्या स्मरणरंजनात तर अनेक किस्से-कहाण्या जुन्या-जाणत्या माबोकरांच्या बरोबरीने नवीन सदस्यांना पण वेगळाच आनंद देऊन गेल्या असतीलच. हो ना? माबॊकरांचा सभासद कालावधीतला रंजक प्रवास वाचुन अनेक वाचनमात्र सदस्यांना सुद्धा प्रतिक्रिया द्यायचा मोह आवरता आला नाही.
बकेट लिस्ट चा प्रवास आणि पूर्ती चे समाधान वाचकांनी पण तितक्याच समरसून अनुभवलॆ आणि स्वतंत्र लेख न लिहिताही प्रतिसादातून अनेकांनी आपल्या बकेट लिस्ट चा प्रवास अगदी मनमोकळेपणाने सर्वांसमोर मांडला. भेटकार्ड आणि गणपती बाप्पा साकारणे यात छोटे दोस्त सुंदर कलाकृती करून उत्साहात सामील झाले त्याबद्दल त्यांचे समस्त मायबोली परिवाराकडून खूप कौतुक!
पाककृती स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना जास्त मेहनत घ्यावी लागते, पण नाविन्यपूर्ण पदार्थ सर्वांच्या पसंतीस उतरले की त्या कष्टांचे चीज होते. तरी यंदा मायबोलीवरच्या बल्लवाचार्यांचा उत्साह थोडा कमी पडला की काय असे प्रवेशिकांची संख्या पाहून जाणवले. अर्थातच शब्दखेळ, प्रकाशचित्रांचा झब्बू आणि विनोदी लेखन या उपक्रमाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, धमाल केली आणि गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण प्रसन्न ठेवले. लसीकरण हा विषय खरे तर हॉट टॉपिक म्हणावा असा असतानाही तो अनुभव लेखनातून पोचवायला तेवढी उत्सुकता दिसली नाही. लोक आता खरंच कंटाळलेले असावेत. ऑलम्पिक खेळणारा बाप्पा आणि शॅडो आर्ट ह्या उपक्रमांना देखिल फारसा प्रतिसाद मिळाला नाही असे एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते. पण अशा कार्यक्रमात हे थोडेफार होणारच.
या गणेशोत्सवातल्या स्पर्धा, त्यांचे मतदान आणि विजेत्यांची यादी इथे पाहता येईल.सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अगदी कमी वेळ असतानाही , rar, साजिरा, पुरंदरे शशांक, aschig, भास्कराचार्य,कविन ,चैतन्य दीक्षित, सीमंतिनी, जयवी -जयश्री अंबासकर या मायबोलीकरांनी त्यांचे लेखन/ त्यांच्या कलाकृती सादर केल्या त्यामुळे गणेशोत्सवाची रंगत अजून वाढली. . Arundhati Joshi यांनी पाककलेसंदर्भात मार्गदर्शन केले. या सर्वांचे आभार
मायबोलीच्या पहिल्या गणेशोत्सवात संयोजनाचे काम केलेले मायबोलीकर समीर आणि असामी यांनी मदतीचा हात पुढे केला त्याबद्दल त्यांचे आभार.
तर मायबोलीकरांना वाचक, स्पर्धक म्हणून हा गणेशोत्सव कसा वाटला हे जाणून घ्यायलाही आम्हाला खूप आवडेल. काय त्रुटी होत्या, काय आवडलं, काय सुधारणा करता येतील, एखाद्या कार्यक्रमाऐवजी हे हवं होतं किंवा हे नसतं तर चाललं असतं या आणि अशा प्रकारच्या सर्व सूचना/मते/टीका यांचे स्वागत आहे. सर्व संयोजक, समस्त मायबोली परिवार आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या गणेशोत्सवात सहभागी असलेल्या कोणाचा उल्लेख अनवधानाने राहिला असेल तर त्यांनाही अनेक धन्यवाद.
लोभ आहेच तो असाच वाढुदे ही विनंती. __/\__
कळावे,
संयोजक मंडळ २०२१
(किशोर मुंढे,तेजो, गोल्डफिश, आभा, अजय)
छान झाला यंदाचा गणेशोत्सव.
छान झाला यंदाचा गणेशोत्सव.
संयोजकांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
संयोजक मंडळाने खरोखरंच छान
संयोजक मंडळाने खरोखरंच छान मेहेनत घेतली.
संपूर्ण गणेशोत्सव मजेत आणि हसत खेळत पार पडला.
सभासदांनीही मनापासून सहभाग घेतला आणि प्रतिसादकांनीही समरसून प्रतिसाद दिले.
जुन्या नव्या सभासदांनाही लिहावंसं वाटलं, यात संयोजकांचा आणि उत्सवातल्या सुरुवातीच्या लेखकांचाही वाटा आहे.
सर्व लेखकांना आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या सभासदांना धन्यवाद, विजेत्यांचे अभिनंदन आणि संयोजकांचे विशेष कौतुक..
छान झाला उपक्रम !
छान झाला उपक्रम !
संयोजक मंडळ २०२१
संयोजक मंडळ २०२१
(किशोर मुंढे,तेजो, गोल्डफिश, आभा, अजय)
खूप छान प्रकारे आयोजित झाला उत्सव.
अभिनंदन व धन्यवाद.
संयोजक चमू आणि वेमांचे अभार.
संयोजक चमू आणि वेमांचे अभार.
नमस्कार !!! माझे दोन शब्द इथे
नमस्कार !!! माझे दोन शब्द इथे मांडतो.
संयोजनामध्ये भाग घेऊ कि नको या विचारात बराच वेळ होतो. मायबोलीवर तसेच मायबोलीच्या बाहेरही संयोजनाचा अनुभव नव्हता. अतिव्यग्र असल्यामुळे पुरेसा वेळ देऊ शकेन कि नाही याबद्दल सुद्धा खात्री नव्हती. अंगी काही विशेष कलागुण नव्हते. आधीच मितभाषी असल्यामुळे एखाद्या गोष्टीवर कधी सविस्तर असा संवाद / चर्चासुद्धा केली नव्हती. मायबोलीवर बराच वेळ वाचनमात्रच होतो. स्वतःचे असे लेखन नव्हते. इतरांचे लेखन आवडूनही वेळ नसल्यामुळे किंवा माझ्यातील आळशीपणामुळे कधी प्रतिसाद द्यायला मिळायचा नाही . फक्त संयोजनात भाग घ्यायची इच्छा होती. संयोजनात निवड झाल्यापासून डोक्यात फक्त संयोजनाचाच विचार येत होता. जे दिसेल त्याबद्दल गणेशोत्सवात काही उपक्रम / स्पर्धा ठेवता येईल का असेच डोक्यात यायचे. काही कल्पना तर इतक्या खुळचट होत्या कि संयोजकातील इतर सभासदांपर्यंत सुद्धा पोचवल्या नाहीत. जसजसे संयोजनाची काम करत गेलो तसे मला जाणवले कि माझा शब्दसंग्रह प्रचंड वाढलाय. वेगवेगळ्या कल्पक गोष्टी मला सुचू शकतात आणि त्याबद्दल मी वेगवेगळ्या दृष्टिकोनाने बघून त्याबद्दल लिहू शकतो याबद्दल मलाच आश्चर्य वाटत होते. या संयोजनादरम्यान माझाच मला नव्याने शोध लागला. सकारात्मक ऊर्जा मिळाली. बऱ्याच वेळा योग्य वेळेत काम करणे जमायचे नाही तरीही सर्व संयोजन टीम आणि वेबमास्तरांनी सांभाळून घेतले. एकमेकांच्या वेळा सांभाळून सगळ्यांनी व्यवस्थित काम केले. आमची टीम खूप छान होती . कोणामध्येही "I am only right"असा ऍटिट्यूड नव्हता. संयोजनाच्या निमित्ताने मायबोली अजून जवळून बघता आली, अनुभवता आली. याबद्दल मी संयोजक टीम किशोर, तेजो, आभा आणि अजय यांचे मनापासून आभार मानतो. असामी आणि समीर यांनी योग्य मार्गदर्शन केले याबद्दल त्यांचेही आभार आणि ज्यांच्यामुळे हा उत्सव उत्साहाने पार पडला असे समस्त मायबोलीकर आणि बाळगोपाळांचे विशेष आभार मानतो. काही कारणामुळे इच्छा असूनसुद्धा ज्यांना यावेळी संयोजनात भाग घेता आला नाही त्यांनी पुढच्या वेळी नक्की भाग घ्या. खूप छान अनुभव असतो.
गोल्डफिश छान मनोगत आणि छान
गोल्डफिश छान मनोगत आणि छान अनुभव. हे वाचून मलाही कधीतरी संयोजनात भाग घ्यायचे धैर्य दाखवावे असे वाटू लागलेय
या अनुभवावर एक स्वतंत्र धागा काढून आणखी लिहा. तुमचे मायबोलीवर लिखान नाही म्हणता ते सुद्धा होईल
गोफि, मनोगत आवडलं
गोफि, मनोगत आवडलं
गोल्डफिश छान मनोगत .
गोल्डफिश छान मनोगत .
खूप सुरेख झाला हा गणेशोत्सव!
खूप सुरेख झाला हा गणेशोत्सव! संयोजकांनी बरीच मेहेनत घेतली,त्याबद्दल त्यांचे आभार.
सर्व भाग घेणारे आणि विजेते यांचे हार्दिक अभिनंदन!
गोल्डफिश, मनोगत आवडले.
गोल्डफिश छान मनोगत.
गोल्डफिश छान मनोगत.
उत्तम झाला हा गणेशोत्सव!
उत्तम झाला हा गणेशोत्सव!
बरेच लेख अजूनही वाचायचे आहेत.
स्पर्धेतील लेख मात्र वाचले आणि आवर्जून मतदानही केले.
संयोजकांचे मनापासून आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन!
गोल्डफिश छान मनोगत लिहीलंत.
गोल्डफिश छान मनोगत लिहीलंत. प्रेरणादायी.
मनोगत प्रेरणादायी आहे.
मनोगत प्रेरणादायी आहे.
संयोजकांचे अभिनंदन, कौतुक आणि
संयोजकांचे अभिनंदन, कौतुक आणि आभार. खूप छान खेळीमेळीने संपन्न झाला उत्सव. काही नेहमीचेच यशस्वी उपक्रमांबरोबर काही नाविन्यपूर्ण उपक्रम होते. (यातूनच पुढील नेहमीचे यशस्वी मिळतील)
गोल्डफिश, मनोगत आवडले. भावी संयोजकांसाठी प्रेरक.
सगळे उपक्रम उत्तम होते.
सगळे उपक्रम उत्तम होते. टाळ्या.
गोल्डफिश ... तुमचं मनोगत
गोल्डफिश ... तुमचं मनोगत आवडलं...!
गोल्ड फिश छान लिहिलंय मनोगत.
गोल्ड फिश छान लिहिलंय मनोगत.
ऋ ने लिहिलय तस तुमचं वाचून मला ही संयोजनात भाग घेऊ या अस वाटायला लागलं आहे.
छान झाला गणेशोत्सव.
छान झाला गणेशोत्सव.
संयोजकांचे अभिनंदन.
उपक्रम छान होते. पण पाककृती ची पालेभाजी च्आया पदार्थाची आयडिया काहीतरीच वाटली आणि त्यात भाग घेतलेल्या रेसिप्या पण तेवढ्याच काहीतरीच होत्या
काहीही मिश्रण करून, मुटके बनवलेल्या रेसिप्यांना प्रथम द्वितीय क्रमांक दिलेत. अर्थात आलेल्या प्रवेशिकांमधुन निवडावंच लागणार म्हणा.
पुढच्या वर्षी पाककृती स्पर्धेत जरा ड्रायफुट मिठाया, बर्फ्या, पेढे, लाडु येऊदेत. पालेभाज्या काय :नामुबा:
संयोजक मंडळ २०२१
संयोजक मंडळ २०२१
(किशोर मुंढे,तेजो, गोल्डफिश, आभा, अजय)
सणासुदीला घरचे आणि पोटापाण्याचे उद्योग सांभाळून छान पार पाडलात गणेशोत्सव ! तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे ! लेखन, हस्तकला आणि इतर स्पर्धा / उपक्रमांचीही रेलचेल होती. मला तरी माबोकरांच्या उस्फूर्त सहभागाशी वाचन - प्रतिसादाच्या वेगाचा मेळ राखणं जमलं नाही! शीघ्रकवींच्या धाग्यावर मात्र थोडीफार धमाल केली अजून बरंच वाचायचं बाकी आहे.
संयोजक मंडळ , विजेत्यांचे, सहभागी झालेल्या सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन !
२१ संयोजन मंडळांचे अनुभव
२१ संयोजन मंडळांचे अनुभव संकलित करून त्याचाच दिवाळी अंक चांगला निघू शकेल. काही धडे, आठवणी, गंमती एकत्रित वाचता येतील.
फार छान झाला उत्सव. अभिनंदन,
फार छान झाला उत्सव. अभिनंदन, संयोजक!
Pages